-
तर, आपण ब्लॉकली नावाची ड्रॅग आणि ड्रॉप
भाषा वापरून प्रोग्रॅमिंग शिकणार आहोत.
-
ब्लॉकलीमध्ये ब्लॉक्स नावाच्या रंगीत सूचना
वापरल्या जातात. यात कोडी सोडवण्यासाठी
-
तुम्ही प्रोग्रॅम तयार करू शकता. यात पडद्यामागे
तुम्ही कोडच तयार करत असता.
-
तुम्ही कोड वापरून सोडवलेले प्रत्येक कोडे
चार मुख्य भागात विभागलेले असते.
-
डावीकडे खेळाचा भाग असतो, तिथे तुमचा प्रोग्रॅम
रन होतो. मधल्या भागात,
-
तुम्हाला टूलबॉक्सचा भाग दिसेल, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कोड्यासाठी आवश्यक असलेले सगळे
-
ब्लॉक्स दिसतील. डावीकडे तुमची वर्कस्पेस आहे. इथे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी
-
ब्लॉक्स ड्रॅग कराल. शेवटी, वर्कस्पेसच्या वर, तुम्हाला
प्रत्येक कोड्यासाठी विशिष्ट सूचना दिसतील.
-
तुम्हाला नको असलेला ब्लॉक तुम्ही चुकून
ड्रॅग केलात तरी घाबरू नका.
-
जर तुमच्याकडे एखादा ब्लॉक जास्त असेल तर
फक्त तो ड्रॅग करून उलटा टूलबॉक्समध्ये न्या.
-
तुम्ही रन दाबल्यावर, तुम्ही नेहमी
-
रिसेट बटण दाबून तुमच्या पात्राला पुन्हा सुरुवातीपर्यंत नेऊ शकता, म्हणजे तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकाल.