अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?
-
0:01 - 0:06तुमच्या पैकी किती जणांना
निदान ८० वर्ष जगायचे आहे? -
0:06 - 0:08हं!
-
0:08 - 0:10मला वाटते, आपल्या सगळ्यांनाच
-
0:10 - 0:12दिर्घायुष्यी होण्याची इच्छा आहे.
-
0:13 - 0:15चला, भविष्यात डोकावून पाहूया.
-
0:15 - 0:16भविष्यातले 'तुम्ही' पाहूया.
-
0:17 - 0:19समजा,आपण सगळे ८५ वर्षाचे झालो आहोत.
-
0:20 - 0:22आता कोणत्याही दोन लोकांकडे पहा.
-
0:23 - 0:27त्यापैकी एकाला अल्झायमर्स झालेला असेल.
-
0:27 - 0:31(हशा)
-
0:31 - 0:32ठीक आहे.
-
0:33 - 0:37तुम्हाला वाटत असेल की "मला नसेल झाला"
-
0:37 - 0:41मग... तुम्ही त्याची काळजी घेणारे असाल.
-
0:41 - 0:43थोडक्यात म्हणजे ....
-
0:43 - 0:45(हशा)
-
0:45 - 0:47कुठल्या तरी मार्गाने
हा भयानक आजार -
0:47 - 0:50आपल्या सर्वांना गाठण्याची शक्यता आहे
-
0:51 - 0:54अल्झायमर्सची भीती वाटण्याचे एक
कारण असेही आहे -
0:54 - 0:56की तो थांबवण्याकरता आपण
काहीही करू शकत नाही. -
0:56 - 1:02कित्येक वर्षाच्या संशोधनानंतरआजूनसुद्धा
-
1:02 - 1:03त्यावर कोणताही उपाय सापडला नाही.
-
1:03 - 1:06त्यामुळे आपण नशिबाने दिर्घायुष्यी
-
1:06 - 1:09झालो तर, अल्झायमर्स आपल्या
पुढ्यात वाढून ठेवला आहे. -
1:09 - 1:11पण तसे व्हायलाच हवे असेही नाही.
-
1:12 - 1:15जर मी तुम्हाला म्हटले की आपण कोणत्याही
-
1:15 - 1:18अत्याधुनिक उपायांशिवाय,
नवनवीन औषधांशिवाय आपल्या मेंदूचे -
1:18 - 1:21भवितव्य, ही आकडेवारी बदलू शकतो, तर?
-
1:22 - 1:25आपण आधी अल्झायमर्स या आजारामागचे
-
1:25 - 1:27सध्याचे न्युरो-सायन्स समजून घेऊया.
-
1:28 - 1:31इथे दोन न्यूरॉन्स एकमेकांना
जोडलेले दिसत आहेत. -
1:31 - 1:34ते जिथे जुळले आहेत तो भाग
लाल वर्तुळाने दाखवला गेला आहे. -
1:34 - 1:36त्याला 'सीनॅप्स' म्हणतात.
-
1:36 - 1:39इथून न्युरोट्रान्समीटर्स निघतात.
-
1:39 - 1:43जेव्हा न्यूरॉन्स संदेश पाठवतात,
तेव्हा इथून सिग्नल बाहेर पडतात -
1:43 - 1:48आपण विचार करतो,अनुभवतो, पाहतो,
ऐकतो, इच्छा करतो, आठवतो... -
1:48 - 1:50ते सगळे इथे घडते.
-
1:50 - 1:53अल्झायमर्सचा आजार या सीनॅप्सपाशी होतो.
-
1:53 - 1:55आता हा सीनॅप्स आपण जवळून पाहू या.
-
1:55 - 1:58या चित्राच्या मदतीने
काय चाललय ते पाहूया. -
1:59 - 2:01न्यूरॉन्समधून संदेश पाठवण्याच्या
प्रक्रियेमध्ये, -
2:01 - 2:05सीनॅप्समधून ग्लूटामेटसारख्या
न्युरोट्रान्समीटरच्या -
2:05 - 2:10जोडीला 'अॅम्लॉइड बीटा' नावाचे
छोटे पेप्टाइड बाहेर पडते. -
2:11 - 2:16आपल्या मेंदूतील मायक्रोग्लिया नावाच्या
साफसफाई करणाऱ्या पेशीमार्फत -
2:16 - 2:18हे अॅम्लॉइड बीटा नियमितपणे
काढून टाकले जाते -
2:18 - 2:22जरी अल्झायमर्सच्या मूळ
कारणांबाबत वाद असले तरी -
2:22 - 2:26अनेक न्युरोसायंटिस्टच्या मते,
जेव्हा अॅम्लॉइड बीटा साठू लागते -
2:26 - 2:28तेव्हा अल्झायमर्सची सुरुवात होते.
-
2:29 - 2:32जे कधी जास्त स्त्रवते तर कधी
पुरेसे बाहेर टाकले जात नाही. -
2:32 - 2:35परिणामी सीनॅप्सवर
अॅम्लॉइड बीटाचा थर जमा होतो. -
2:35 - 2:37आणि त्याची एक गाठ तयार होते.
-
2:37 - 2:41या चिकट गाठीला 'अॅम्लॉइड प्लेक' म्हणतात.
-
2:42 - 2:45इथे बसलेल्यांपैकी किती जण ४०
किंवा अधिक वर्षाचे आहेत? -
2:45 - 2:48बहुतेक तुम्हाला मान्य करायला जड जात आहे.
-
2:48 - 2:50ही सुरुवातीची अॅम्लॉइड प्लेक'चा थर
-
2:50 - 2:53जमा होण्याची प्रक्रिया तुमच्या मेंदूत
-
2:53 - 2:56या पूर्वीच सुरु झाली असेल.
-
2:56 - 3:00हे पडताळून पाहण्याचा एकुलता एक उपाय
म्हणजे PET SCAN. -
3:00 - 3:04आज तुम्ही अनभिज्ञ आहात ही
परमेश्वराची कृपाच म्हणायची. -
3:04 - 3:08अजून तरी स्मृती, भाषा, आकलनक्षमता यांच्यात
बिघाड झाल्याचे एकही चिन्ह तुमच्यात आढळलेले -
3:08 - 3:09नाही आहे.
-
3:09 - 3:14आम्हाला वाटते की अॅम्लॉइड प्लेकचा थर
विकोपाला जाण्याकरता -
3:14 - 3:16निदान १५-२० वर्षे लागत असावीत.
-
3:16 - 3:19आणि तो टिपेला पोचला की
-
3:19 - 3:21त्याची लक्षणे दिसू लागतील.
-
3:22 - 3:24तो टिपेला पोचण्यापूर्वी,
-
3:24 - 3:27अधून मधून तुमची स्मरणशक्ती
तुम्हाला दगा देत असेल- -
3:27 - 3:30"मी या खोलीत का आले?"
-
3:30 - 3:32"अं ..काय बरं याचे नाव?"
-
3:32 - 3:35"किल्ल्या कुठे ठेवल्या मी?"
-
3:36 - 3:38आता तुम्ही सगळे परत एकदा दचकून
जाण्याआधीच सांगते, -
3:38 - 3:44गेल्या २४ तासात तुम्हीपण असे
काही ना काहीतरी विसरलेले असाल. -
3:44 - 3:47पण ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत.
-
3:47 - 3:49खरे तर, मी म्हणेन की ही उदाहरणे
-
3:49 - 3:51स्मृतीशी संबंधित देखील नाहीत.
-
3:51 - 3:54कारण खरे तर, तुम्ही किल्ल्या
-
3:54 - 3:55ठेवण्याकडे लक्षच दिलेले नव्हते.
-
3:55 - 3:57आजार टिपेला पोचल्यावर येणाऱ्या
-
3:57 - 4:01स्मृती,भाषा,आकलनक्षमतेच्या समस्या
वेगळ्या असतात. -
4:01 - 4:04किल्ल्या शेवटी कोटाच्या खिशात
-
4:04 - 4:06किंवा दरवाज्याजवळच्या टेबलावर
सापडण्याऐवजी -
4:06 - 4:08तुम्हाला त्या फ्रीजमध्ये सापडतात.
-
4:08 - 4:10किंवा सापडल्यावर तुम्ही विचारात पडता
-
4:10 - 4:12"या कशाच्या किल्ल्या?"
-
4:13 - 4:18अॅम्लॉइड प्लेक प्रमाणाबाहेर
जमा झाल्याने काय होते तर .. -
4:18 - 4:21आपल्या सफाई करणाऱ्या मायक्रोग्लिया पेशी
जास्त काम करतात. -
4:21 - 4:26त्यामुळे पेशींना नुकसान करणारी
आणि सूज आणणारी द्रव्ये बाहेर पडतात. -
4:26 - 4:28आम्हाला वाटले, ते सीनॅप्सचीच
-
4:28 - 4:30साफसफाई करत असतील.
-
4:30 - 4:35ऐवजी 'ताऊ' नावाच्या
न्यूरल ट्रान्सपोर्ट प्रोटीनवर खूप -
4:35 - 4:38फॉस्फेारिल जमा झाल्याने त्यांचा
स्वतःमध्ये गुरफटून 'गुंता' तयार होतो -
4:38 - 4:41आणि त्यामुळे न्यूरॉन्स आतल्या आत घुसमटतात.
-
4:41 - 4:44अल्झायमर्सच्या मध्यावर मोठ्या प्रमाणात
असे गुंते आणि सूज दिसून येते -
4:44 - 4:47आणि त्यांचे सिनॅप्सपाशी
तुंबळ युद्ध सुरु होते -
4:47 - 4:48आणि शेवटी ती पेशी मरून जाते.
-
4:48 - 4:51तुम्ही शात्रज्ञ असाल तर
-
4:51 - 4:54तुम्हाला कोणत्या टप्प्यावर
हस्तक्षेप करावासा वाटेल? -
4:55 - 4:59अनेक शास्त्रज्ञांची अॅम्लॉइड
प्लेकला विकोपाला पोचू न देणे -
4:59 - 5:03या सोप्या उपायावर भिस्त आहे
-
5:03 - 5:07त्यामुळे अॅम्लॉइड प्लेकचा
साठाच होणार नाही,किंवा कमी होईल, -
5:07 - 5:12किंवा नष्ट होईल अशी औषधे
शोधली जात आहेत. -
5:13 - 5:18त्यामुळे अल्झायमर्सवर बहुधा
प्रतिबंधक औषध शोधले जाईल. -
5:18 - 5:22मात्र आपल्याला हे औषध
ती घसरगुंडी चालू होण्यापूर्वी, -
5:22 - 5:24आपण किल्ल्या फ्रीजमध्ये
ठेवायला लागण्यापूर्वी. -
5:24 - 5:27आपला आजार विकोपाला
जाण्यापूर्वी घ्यायला हवे, -
5:27 - 5:31म्हणूनच आम्हाला वाटते की
आजपर्यंतची औषधे वैद्यकीय चाचण्यांमध्ये -
5:31 - 5:32नापास होण्याचे कारण
-
5:32 - 5:35शास्त्र चुकीचे आहे हे नसून
-
5:35 - 5:39लोकांमध्ये लक्षणे आधीच दिसू लागणे हे होय.
-
5:39 - 5:41मुळातच उशीर झालेला आहे.
-
5:41 - 5:44समजा अॅम्लॉइड प्लेक ही पेटती काडी आहे
-
5:44 - 5:47जी विकोपाच्या क्षणी
सगळ्या जंगलाला आग लावते. -
5:48 - 5:50आणि एकदा का वणवा पेटला,
-
5:50 - 5:52की काडी विझवून काहीही फायदा नसतो.
-
5:52 - 5:56तुम्ही वणवा लागण्यापूर्वीच
काडी विझवायला हवी. -
5:56 - 5:58शास्त्रज्ञांना उत्तर मिळेपर्यंत,
-
5:58 - 6:01अॅम्लॉइड प्लेक जमा व्हायला आपली
जीवनशैली कारणीभूत असते, -
6:01 - 6:05ही माहिती आपल्याकरता
-
6:05 - 6:06खूप आनंदाची गोष्ट आहे,
-
6:06 - 6:08त्यामुळे आजार विकोपाला जाऊ नये
-
6:08 - 6:11त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो.
-
6:11 - 6:15हा अलझायमर्सचा धोका आपण सीसॉच्या
बाजूंवर तोलून पाहूया. -
6:15 - 6:17एका बाजूला आपण धोके रचत जाऊ
-
6:17 - 6:20आणि जेव्हा ती बाजू खाली टेकेल,
-
6:20 - 6:22तेव्हा तुम्हाला अल्झायमर्स गाठणार
असे आपण समजू. -
6:22 - 6:25समजा कि तुम्ही ५० वर्षाचे आहात,
-
6:25 - 6:27तुम्ही आता तरुण राहिलेला नाहीत.
-
6:27 - 6:30तुमच्याकडे वयोमानाने जमलेल्या
अॅम्लॉइड प्लेकमुळे -
6:30 - 6:32ही बाजू आधीच थोडी कललेली असेल .
-
6:32 - 6:34आता तुमच्या DNA कडे वळू.
-
6:35 - 6:38आपले जीन्स आपल्या
आईवडिलांकडून आलेले असतात. -
6:38 - 6:42काही जीन्समुळे आपला धोका वाढतो
तर काहींमुळे तो कमी होतो. -
6:42 - 6:44जर तुम्ही 'Still Alice' मधल्या
एलिसप्रमाणे असाल -
6:44 - 6:49तर तुमच्यामध्ये अॅम्लॉइड बीटा जास्त तयार
होणारा दुर्मिळ जीन आहे -
6:49 - 6:53आणि या एकट्या कारणाने तुमचा सीसॉ
जमिनीला टेकणार आहे. -
6:53 - 6:57पण अनेकांचे जीन्स सीसॉची बाजू किंचितच
कलती करतात. -
6:57 - 7:02उदा. APOE4 नावाचा जीनचा प्रकार
अॅम्लॉइड वाढवतो, -
7:02 - 7:05जो तुम्हाला आई किंवा वडिलांकडून
मिळाला तरी तुम्हाला -
7:05 - 7:07अल्झायमर्स होईलच असे नाही.
-
7:07 - 7:09पण म्हणजेच बऱ्याच जणांचे अल्झायमर्स होणार
-
7:09 - 7:13की नाही हे फक्त DNA वर अवलंबून नसते.
-
7:14 - 7:15मग कशावर अवलंबून असते ?
-
7:15 - 7:19आपण वयस्कर होणे थांबवू शकत नाही
किंवा जीन्स निवडू शकत नाही. -
7:19 - 7:22आत्तापर्यंत आपण आपल्या
मेंदूचे भविष्य बदलू शकलो नाही. -
7:23 - 7:25झोपेबद्दल काय?
-
7:25 - 7:29गाढ झोपेमध्ये ग्ल्यायल सेल्स संपूर्ण
मेंदूमध्ये सेरेब्रल स्पायनल फ्लुईड -
7:29 - 7:31पसरवतात,
-
7:31 - 7:34ज्यामुळे दिवसभराच्या चयापचयचा
प्रक्रियेमुळे सीनॅप्सपाशी -
7:34 - 7:36झालेला कचरा साफ केला जातो.
-
7:36 - 7:39गाढ झोप म्हणजे जणू मेंदूची
पुरी स्वच्छता. -
7:40 - 7:43पण तुमची झोप अपुरी झाली तर काय होईल?
-
7:43 - 7:45बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटते की
-
7:45 - 7:49कमी झोपण्याची सवय ही अल्झायमर्स
ओळखायची गुरुकिल्ली आहे. -
7:50 - 7:55एक दिवस जरी झोप झाली नाही तरी
अॅम्लॉइड बीटा वाढते. -
7:55 - 7:59तसेच अॅम्लॉइड वाढले कि झोप अनियमित होते,
-
7:59 - 8:01आणि परिणामी अजून अॅम्लॉइड वाढते.
-
8:01 - 8:04सीसॉच्या झुकण्याचा वेग वाढण्याचे
-
8:04 - 8:07महत्वाचे कारण हे दुष्टचक्र आहे.
-
8:07 - 8:09अजून काय?
-
8:09 - 8:10हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया.
-
8:11 - 8:15उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व, धुम्रपान,
-
8:15 - 8:19जास्तीचे कोलेस्टेरॉल या सगळ्या बाबींमुळे
अल्झायमर्सची शक्यता वाढते. -
8:19 - 8:21अल्झायमर्स झालेल्या ८०% रुग्णांचे
-
8:21 - 8:24शवविच्छेदन केल्यावर असे दिसून आले की
-
8:24 - 8:26त्यांना हृदयाशी संबधित आजारदेखील होते.
-
8:26 - 8:31हा आजार असलेल्या प्राण्यांवरील प्रयोगात
असे समजले की एरोबिक व्यायाम केल्याने -
8:31 - 8:33अॅम्लॉइड बीटाचे प्रमाण कमी होते.
-
8:34 - 8:37म्हणून सुदृढ हृदयाकरता असणाऱ्या
मेडीटरेनियन जीवनशैली -
8:37 - 8:40आणि आहाराच्या मदतीने
सीसॉचे कलणे थोपवता येते. -
8:41 - 8:43अल्झायमर्सला प्रतिबंध करण्याकरता,
दूर राखण्याकरता -
8:43 - 8:45आपल्याला अनेक गोष्टी करता येतील.
-
8:45 - 8:48पण समजा, तुम्ही त्यापैकी काहीही
केलेले नाही आणि -
8:48 - 8:51आत्ता तुम्ही ६५ वर्षांचे आहात.
तुमच्या घराण्यात -
8:51 - 8:54अल्झायमर्स आहे.
-
8:54 - 8:56ज्यामुळे तुमचे पारडे आधीच
कललेले आहे. -
8:56 - 8:59वर्षानुवषे तुम्ही या आजाराकडे
वेगाने जात आहात, -
8:59 - 9:01तुम्हाला बेकन प्रिय आहे,
-
9:01 - 9:03वाघ पाठी लागल्याशिवाय तुम्ही पळत नाही.
-
9:03 - 9:04(हशा)
-
9:04 - 9:08समजा तुमचे अॅम्लॉइड प्लेक
प्रचंड वाढलेले आहे. -
9:08 - 9:10आणि तुमचे पारडे जमिनीला टेकले आहे.
-
9:10 - 9:12तुमची घसरगुंडी चालू झाली आहे.
-
9:12 - 9:13वणवा पेटला आहे.
-
9:13 - 9:16तुमच्यामध्ये सूज येणे, पेशी मरणे,
पेशींचा गुंता होणे अशी -
9:17 - 9:20लक्षणे दिसू लागली आहेत.
-
9:20 - 9:23तुम्हाला शब्द न सुचणे, किल्ली हरवणे
-
9:23 - 9:26मी सुरवतीला काय बोलले ते न आठवणे
असे त्रास होत असतील. -
9:27 - 9:29किंवा तसे नसेलही.
-
9:29 - 9:32तुम्ही अल्झायमर्सच्या लक्षणांपासून स्वतःला
-
9:32 - 9:34वाचवण्याकरता अजून एक गोष्ट करू शकता,
-
9:34 - 9:39आजार अगदी टोकाला पोचल्यावरही.
-
9:39 - 9:43याचा संबंध न्यूरल प्लास्टीसिटी आणि
कॉग्निटिव्ह सायन्सशी आहे. -
9:43 - 9:46सीनॅप्स नष्ट होण्यानेच
अल्झायमर्स होतो -
9:46 - 9:49हे तुम्हाला आठवत असेल.
-
9:49 - 9:53एका मेंदू मध्ये सर्व साधारणपणे
एक लाख दशकोटी सीनॅप्स असतात, -
9:53 - 9:55आपल्याकडे बराच साठा आहे
ही चांगली गोष्ट आहे. -
9:55 - 9:57आणि हा आकडा पण काही स्थिर नसतो.
-
9:57 - 10:00सीनॅप्स सतत कमी जास्त होतच असतात.
-
10:00 - 10:02या प्रक्रियेला न्यूरल प्लास्टीसिटी म्हणतात
-
10:02 - 10:04जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो,
-
10:05 - 10:09तेव्हा आपण एक नवीन न्यूरल कनेक्शन
तयार करतो. -
10:09 - 10:10नवीन सीनॅप्स तयार करतो.
-
10:11 - 10:13ननवर केलेल्या एका संशोधनात,
-
10:13 - 10:17ज्यात ६७८ ननचा,
ज्यांचे वय ७५ हून जास्त होते, -
10:18 - 10:20त्यांचा २० वर्षे अभ्यास करण्यात आला.
-
10:20 - 10:23त्यांची नियमितपणे शारिरीक तपासणी
आणि मेंदूची चाचणी केली गेली. -
10:23 - 10:27मरणोत्तर त्यांचा मेंदू
शवपरीक्षेला दिला गेला. -
10:27 - 10:32शास्त्रज्ञांना काही मेंदूमध्ये
आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या. -
10:32 - 10:36त्या मेंदुंमध्ये प्लेक, गुंता
आणि आकुंचन असूनही -
10:36 - 10:39-जे म्हणजे निश्चित अल्झायमर्स,
-
10:39 - 10:43हे मेंदू ज्या ननचे होते,
त्या ननच्या जिवंतपणी -
10:43 - 10:46त्यांच्यात अल्झायमर्सचे एकही लक्षण
आढळले नव्हते. -
10:46 - 10:48याचे कारण काय असेल?
-
10:48 - 10:52आमच्या मते, या लोकांच्या मेंदूची
कार्यक्षमता प्रचंड होती. -
10:52 - 10:56म्हणजेच त्यांच्याकडे कार्यक्षम सीनॅप्स
भरपूर होते. -
10:56 - 10:59ज्यांचे उच्च शिक्षण झालेले आहे
-
10:59 - 11:01जे उत्तम साक्षर आहेत,
-
11:01 - 11:05जे नियमितपणे मेंदूला चालना
देणाऱ्या गोष्टींमधे भाग घेतात -
11:05 - 11:07अश्या सगळ्यांकडे मेंदूंची
अधिक कार्यक्षमता असते. -
11:07 - 11:11त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त
न्यूरल कनेक्शन असतात. -
11:11 - 11:14त्यामुळे त्यांना अल्झायमर्स झाला तरी आणि
-
11:14 - 11:16थोडेफार सीनॅप्स निरुपयोगी झाले तरी,
-
11:16 - 11:19त्यांच्याकडे बरयाच चांगल्या
सीनॅप्सचा साठा असतो, -
11:19 - 11:22त्यामुळे निकामी झालेले सीनॅप्स
जाणवत नाहीत. -
11:23 - 11:25एक सोपे उदाहरण घेऊया.
-
11:25 - 11:28समजा, तुम्हाला एखाद्या विषयातील
फक्त एकच गोष्ट माहित आहे. -
11:28 - 11:30समजा, ती गोष्ट माझ्याबद्दल आहे,
-
11:30 - 11:32लिसा जीनोव्हाने 'Still Alice'ची
कथा लिहिली आहे. -
11:32 - 11:34आणि ही एकच गोष्ट तुम्हाला माझ्याबद्दल
माहित आहे. -
11:34 - 11:37आता तुमच्याकडे ते एक न्यूरल कनेक्शन आहे,
-
11:37 - 11:39तो एक सीनॅप्स आहे.
-
11:39 - 11:41आता समजा तुम्हाला अल्झायमर्स आहे.
-
11:41 - 11:43प्लेक्स, गुंता, सूज सगळे काही आहे.
-
11:43 - 11:46आणि मायक्रोग्लीया तो सीनॅप्स खाऊन
टाकला आहे. -
11:47 - 11:51आता कोणी विचारले,
"Still Alice कोणी लिहिले?" -
11:51 - 11:52तर तुम्हाला आठवणार नाही.
-
11:52 - 11:55कारण तो सीनॅप्स आता तिथे नाहीच आहे.
-
11:55 - 11:57तुम्ही मला कायमचे विसरला आहात.
-
11:58 - 12:00पण जर तुम्हाला माझ्याबद्दल
-
12:00 - 12:02अजून चार गोष्टी माहित असतील,
-
12:03 - 12:04आणि तुम्हाला अल्झायमर्स असेल
-
12:04 - 12:07ज्यामुळे तुमचे तीन सीनॅप्स
नाहीसे झाले आहेत, तरिही -
12:08 - 12:11तुम्हाला नुकसान भरून
काढायला वेगळा मार्ग आहे. -
12:11 - 12:13तुम्हाला निदान माझे नाव लक्षात आहे.
-
12:13 - 12:17अजूनही सुस्थितीत असलेल्या
न्यूरॉन्सद्वारे आपण अल्झायमर्स -
12:17 - 12:20ताब्यात ठेवू शकतो.
-
12:20 - 12:24आपण नवनवीन गोष्टी शिकून असे मार्ग तयार
करू शकतो आणि -
12:24 - 12:26मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो.
-
12:26 - 12:31आपल्याला या नवीन गोष्टी दृष्टी,आवाज, भावना
आणि कार्यकारण भाव यांची जोड देऊन -
12:31 - 12:36अधिकाधिक अर्थपूर्ण बनवायला हव्या आहेत.
-
12:36 - 12:40त्यामुळे शब्दकोडी सोडवून फायदा नाही.
-
12:40 - 12:44जी माहिती तुमच्याकडे आधीच आहे,
ती मिळवण्याची गरज नाही. -
12:44 - 12:47हे म्हणजे जुन्याच पायवाटांवर चालणे झाले,
-
12:47 - 12:50त्याचा त्या गल्लीबोळातून फिरणे झाले,
-
12:50 - 12:53तुम्हाला न्यूरलचे नवीन रस्ते तयार
करायला हवे आहेत. -
12:53 - 12:55अल्झायमर्सला प्रतिबंध करणारा मेंदू
तयार करणे म्हणजे -
12:56 - 12:58इटालियन भाषा शिकणे,
-
12:58 - 12:59नव्या ओळखी करून घेणे,
-
12:59 - 13:00पुस्तके वाचणे,
-
13:00 - 13:03किंवा TED वरची सुरेख व्याख्याने ऐकणे.
-
13:03 - 13:09आणि इतके करूनही कधीकाळी अल्झायमर्स झालाच
-
13:09 - 13:12तर माझ्या अल्झायमर्स झालेल्या आजीकडून
-
13:12 - 13:16आणि इतरांकडून शिकलेल्या
तीन गोष्टी मी सांगते. -
13:16 - 13:19आजार झाला म्हणजे तुम्ही काही लगेच मरत नाही.
-
13:19 - 13:21तुम्ही तुमचे आयुष्य जगत रहा.
-
13:21 - 13:23तुमच्या भावनांची स्मृती जाणार नाही आहे.
-
13:23 - 13:27तुम्हाला प्रेम आणि आनंद समजणार आहे.
-
13:27 - 13:30तुम्हाला मी ५ मिनिटांपूर्वी काय म्हटले ते
एखादेवेळेस आठवणार नाही -
13:30 - 13:33पण तेव्हा तुम्हाला कसे वाटले
ते तुम्हाला आठवणार आहे. -
13:33 - 13:36आणि तुम्ही म्हणजे काही फक्त
तुमची स्मृती नव्हे. -
13:36 - 13:38थॅक्यू.
-
13:38 - 13:43(टाळ्या)
- Title:
- अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?
- Speaker:
- लिसा जिनोव्हा
- Description:
-
न्युरोसायन्टिस्ट आणि 'स्टील अलीस' या चित्रपटाच्या लेखिका लिसा जिनोव्हा म्हणतात की.
"अल्झायमर्स तुमच्या मेंदूचे भवितव्य असता कामा नये"आधुनिक शास्त्रीय शोध आणि खात्रीशीर संशोधनाच्या मदतीने आपण कोणत्या उपायांनी मेंदूला अल्झायमर्स होण्यापासून थोपवू शकतो याची त्यांनी इथे माहिती दिली आहे.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 13:56
Abhinav Garule approved Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Ashwini Kanthi edited Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Ashwini Kanthi edited Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Ashwini Kanthi edited Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Ashwini Kanthi edited Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's | ||
Ashwini Kanthi edited Marathi subtitles for What you can do to prevent Alzheimer's |