< Return to Video

अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?

  • 0:01 - 0:06
    तुमच्या पैकी किती जणांना
    निदान ८० वर्ष जगायचे आहे?
  • 0:06 - 0:08
    हं!
  • 0:08 - 0:10
    मला वाटते, आपल्या सगळ्यांनाच
  • 0:10 - 0:12
    दिर्घायुष्यी होण्याची इच्छा आहे.
  • 0:13 - 0:15
    चला, भविष्यात डोकावून पाहूया.
  • 0:15 - 0:16
    भविष्यातले 'तुम्ही' पाहूया.
  • 0:17 - 0:19
    समजा,आपण सगळे ८५ वर्षाचे झालो आहोत.
  • 0:20 - 0:22
    आता कोणत्याही दोन लोकांकडे पहा.
  • 0:23 - 0:27
    त्यापैकी एकाला अल्झायमर्स झालेला असेल.
  • 0:27 - 0:31
    (हशा)
  • 0:31 - 0:32
    ठीक आहे.

  • 0:33 - 0:37
    तुम्हाला वाटत असेल की "मला नसेल झाला"
  • 0:37 - 0:41
    मग... तुम्ही त्याची काळजी घेणारे असाल.
  • 0:41 - 0:43
    थोडक्यात म्हणजे ....
  • 0:43 - 0:45
    (हशा)
  • 0:45 - 0:47
    कुठल्या तरी मार्गाने
    हा भयानक आजार
  • 0:47 - 0:50
    आपल्या सर्वांना गाठण्याची शक्यता आहे
  • 0:51 - 0:54
    अल्झायमर्सची भीती वाटण्याचे एक
    कारण असेही आहे
  • 0:54 - 0:56
    की तो थांबवण्याकरता आपण
    काहीही करू शकत नाही.
  • 0:56 - 1:02
    कित्येक वर्षाच्या संशोधनानंतरआजूनसुद्धा
  • 1:02 - 1:03
    त्यावर कोणताही उपाय सापडला नाही.
  • 1:03 - 1:06
    त्यामुळे आपण नशिबाने दिर्घायुष्यी
  • 1:06 - 1:09
    झालो तर, अल्झायमर्स आपल्या
    पुढ्यात वाढून ठेवला आहे.
  • 1:09 - 1:11
    पण तसे व्हायलाच हवे असेही नाही.
  • 1:12 - 1:15
    जर मी तुम्हाला म्हटले की आपण कोणत्याही
  • 1:15 - 1:18
    अत्याधुनिक उपायांशिवाय,
    नवनवीन औषधांशिवाय आपल्या मेंदूचे
  • 1:18 - 1:21
    भवितव्य, ही आकडेवारी बदलू शकतो, तर?
  • 1:22 - 1:25
    आपण आधी अल्झायमर्स या आजारामागचे
  • 1:25 - 1:27
    सध्याचे न्युरो-सायन्स समजून घेऊया.
  • 1:28 - 1:31
    इथे दोन न्यूरॉन्स एकमेकांना
    जोडलेले दिसत आहेत.
  • 1:31 - 1:34
    ते जिथे जुळले आहेत तो भाग
    लाल वर्तुळाने दाखवला गेला आहे.
  • 1:34 - 1:36
    त्याला 'सीनॅप्स' म्हणतात.
  • 1:36 - 1:39
    इथून न्युरोट्रान्समीटर्स निघतात.
  • 1:39 - 1:43
    जेव्हा न्यूरॉन्स संदेश पाठवतात,
    तेव्हा इथून सिग्नल बाहेर पडतात
  • 1:43 - 1:48
    आपण विचार करतो,अनुभवतो, पाहतो,
    ऐकतो, इच्छा करतो, आठवतो...
  • 1:48 - 1:50
    ते सगळे इथे घडते.
  • 1:50 - 1:53
    अल्झायमर्सचा आजार या सीनॅप्सपाशी होतो.
  • 1:53 - 1:55
    आता हा सीनॅप्स आपण जवळून पाहू या.
  • 1:55 - 1:58
    या चित्राच्या मदतीने
    काय चाललय ते पाहूया.
  • 1:59 - 2:01
    न्यूरॉन्समधून संदेश पाठवण्याच्या
    प्रक्रियेमध्ये,
  • 2:01 - 2:05
    सीनॅप्समधून ग्लूटामेटसारख्या
    न्युरोट्रान्समीटरच्या
  • 2:05 - 2:10
    जोडीला 'अॅम्लॉइड बीटा' नावाचे
    छोटे पेप्टाइड बाहेर पडते.
  • 2:11 - 2:16
    आपल्या मेंदूतील मायक्रोग्लिया नावाच्या
    साफसफाई करणाऱ्या पेशीमार्फत
  • 2:16 - 2:18
    हे अॅम्लॉइड बीटा नियमितपणे
    काढून टाकले जाते
  • 2:18 - 2:22
    जरी अल्झायमर्सच्या मूळ
    कारणांबाबत वाद असले तरी
  • 2:22 - 2:26
    अनेक न्युरोसायंटिस्टच्या मते,
    जेव्हा अॅम्लॉइड बीटा साठू लागते
  • 2:26 - 2:28
    तेव्हा अल्झायमर्सची सुरुवात होते.
  • 2:29 - 2:32
    जे कधी जास्त स्त्रवते तर कधी
    पुरेसे बाहेर टाकले जात नाही.
  • 2:32 - 2:35
    परिणामी सीनॅप्सवर
    अॅम्लॉइड बीटाचा थर जमा होतो.
  • 2:35 - 2:37
    आणि त्याची एक गाठ तयार होते.
  • 2:37 - 2:41
    या चिकट गाठीला 'अॅम्लॉइड प्लेक' म्हणतात.
  • 2:42 - 2:45
    इथे बसलेल्यांपैकी किती जण ४०
    किंवा अधिक वर्षाचे आहेत?
  • 2:45 - 2:48
    बहुतेक तुम्हाला मान्य करायला जड जात आहे.
  • 2:48 - 2:50
    ही सुरुवातीची अॅम्लॉइड प्लेक'चा थर
  • 2:50 - 2:53
    जमा होण्याची प्रक्रिया तुमच्या मेंदूत
  • 2:53 - 2:56
    या पूर्वीच सुरु झाली असेल.
  • 2:56 - 3:00
    हे पडताळून पाहण्याचा एकुलता एक उपाय
    म्हणजे PET SCAN.
  • 3:00 - 3:04
    आज तुम्ही अनभिज्ञ आहात ही
    परमेश्वराची कृपाच म्हणायची.
  • 3:04 - 3:08
    अजून तरी स्मृती, भाषा, आकलनक्षमता यांच्यात
    बिघाड झाल्याचे एकही चिन्ह तुमच्यात आढळलेले
  • 3:08 - 3:09
    नाही आहे.
  • 3:09 - 3:14
    आम्हाला वाटते की अॅम्लॉइड प्लेकचा थर
    विकोपाला जाण्याकरता
  • 3:14 - 3:16
    निदान १५-२० वर्षे लागत असावीत.
  • 3:16 - 3:19
    आणि तो टिपेला पोचला की
  • 3:19 - 3:21
    त्याची लक्षणे दिसू लागतील.
  • 3:22 - 3:24
    तो टिपेला पोचण्यापूर्वी,
  • 3:24 - 3:27
    अधून मधून तुमची स्मरणशक्ती
    तुम्हाला दगा देत असेल-
  • 3:27 - 3:30
    "मी या खोलीत का आले?"
  • 3:30 - 3:32
    "अं ..काय बरं याचे नाव?"
  • 3:32 - 3:35
    "किल्ल्या कुठे ठेवल्या मी?"
  • 3:36 - 3:38
    आता तुम्ही सगळे परत एकदा दचकून
    जाण्याआधीच सांगते,
  • 3:38 - 3:44
    गेल्या २४ तासात तुम्हीपण असे
    काही ना काहीतरी विसरलेले असाल.
  • 3:44 - 3:47
    पण ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत.
  • 3:47 - 3:49
    खरे तर, मी म्हणेन की ही उदाहरणे
  • 3:49 - 3:51
    स्मृतीशी संबंधित देखील नाहीत.
  • 3:51 - 3:54
    कारण खरे तर, तुम्ही किल्ल्या
  • 3:54 - 3:55
    ठेवण्याकडे लक्षच दिलेले नव्हते.
  • 3:55 - 3:57
    आजार टिपेला पोचल्यावर येणाऱ्या
  • 3:57 - 4:01
    स्मृती,भाषा,आकलनक्षमतेच्या समस्या
    वेगळ्या असतात.
  • 4:01 - 4:04
    किल्ल्या शेवटी कोटाच्या खिशात
  • 4:04 - 4:06
    किंवा दरवाज्याजवळच्या टेबलावर
    सापडण्याऐवजी
  • 4:06 - 4:08
    तुम्हाला त्या फ्रीजमध्ये सापडतात.
  • 4:08 - 4:10
    किंवा सापडल्यावर तुम्ही विचारात पडता
  • 4:10 - 4:12
    "या कशाच्या किल्ल्या?"
  • 4:13 - 4:18
    अॅम्लॉइड प्लेक प्रमाणाबाहेर
    जमा झाल्याने काय होते तर ..
  • 4:18 - 4:21
    आपल्या सफाई करणाऱ्या मायक्रोग्लिया पेशी
    जास्त काम करतात.
  • 4:21 - 4:26
    त्यामुळे पेशींना नुकसान करणारी
    आणि सूज आणणारी द्रव्ये बाहेर पडतात.
  • 4:26 - 4:28
    आम्हाला वाटले, ते सीनॅप्सचीच
  • 4:28 - 4:30
    साफसफाई करत असतील.
  • 4:30 - 4:35
    ऐवजी 'ताऊ' नावाच्या
    न्यूरल ट्रान्सपोर्ट प्रोटीनवर खूप
  • 4:35 - 4:38
    फॉस्फेारिल जमा झाल्याने त्यांचा
    स्वतःमध्ये गुरफटून 'गुंता' तयार होतो
  • 4:38 - 4:41
    आणि त्यामुळे न्यूरॉन्स आतल्या आत घुसमटतात.
  • 4:41 - 4:44
    अल्झायमर्सच्या मध्यावर मोठ्या प्रमाणात
    असे गुंते आणि सूज दिसून येते
  • 4:44 - 4:47
    आणि त्यांचे सिनॅप्सपाशी
    तुंबळ युद्ध सुरु होते
  • 4:47 - 4:48
    आणि शेवटी ती पेशी मरून जाते.
  • 4:48 - 4:51
    तुम्ही शात्रज्ञ असाल तर
  • 4:51 - 4:54
    तुम्हाला कोणत्या टप्प्यावर
    हस्तक्षेप करावासा वाटेल?
  • 4:55 - 4:59
    अनेक शास्त्रज्ञांची अॅम्लॉइड
    प्लेकला विकोपाला पोचू न देणे
  • 4:59 - 5:03
    या सोप्या उपायावर भिस्त आहे
  • 5:03 - 5:07
    त्यामुळे अॅम्लॉइड प्लेकचा
    साठाच होणार नाही,किंवा कमी होईल,
  • 5:07 - 5:12
    किंवा नष्ट होईल अशी औषधे
    शोधली जात आहेत.
  • 5:13 - 5:18
    त्यामुळे अल्झायमर्सवर बहुधा
    प्रतिबंधक औषध शोधले जाईल.
  • 5:18 - 5:22
    मात्र आपल्याला हे औषध
    ती घसरगुंडी चालू होण्यापूर्वी,
  • 5:22 - 5:24
    आपण किल्ल्या फ्रीजमध्ये
    ठेवायला लागण्यापूर्वी.
  • 5:24 - 5:27
    आपला आजार विकोपाला
    जाण्यापूर्वी घ्यायला हवे,
  • 5:27 - 5:31
    म्हणूनच आम्हाला वाटते की
    आजपर्यंतची औषधे वैद्यकीय चाचण्यांमध्ये
  • 5:31 - 5:32
    नापास होण्याचे कारण
  • 5:32 - 5:35
    शास्त्र चुकीचे आहे हे नसून
  • 5:35 - 5:39
    लोकांमध्ये लक्षणे आधीच दिसू लागणे हे होय.
  • 5:39 - 5:41
    मुळातच उशीर झालेला आहे.
  • 5:41 - 5:44
    समजा अॅम्लॉइड प्लेक ही पेटती काडी आहे
  • 5:44 - 5:47
    जी विकोपाच्या क्षणी
    सगळ्या जंगलाला आग लावते.
  • 5:48 - 5:50
    आणि एकदा का वणवा पेटला,
  • 5:50 - 5:52
    की काडी विझवून काहीही फायदा नसतो.
  • 5:52 - 5:56
    तुम्ही वणवा लागण्यापूर्वीच
    काडी विझवायला हवी.
  • 5:56 - 5:58
    शास्त्रज्ञांना उत्तर मिळेपर्यंत,
  • 5:58 - 6:01
    अॅम्लॉइड प्लेक जमा व्हायला आपली
    जीवनशैली कारणीभूत असते,
  • 6:01 - 6:05
    ही माहिती आपल्याकरता
  • 6:05 - 6:06
    खूप आनंदाची गोष्ट आहे,
  • 6:06 - 6:08
    त्यामुळे आजार विकोपाला जाऊ नये
  • 6:08 - 6:11
    त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो.
  • 6:11 - 6:15
    हा अलझायमर्सचा धोका आपण सीसॉच्या
    बाजूंवर तोलून पाहूया.
  • 6:15 - 6:17
    एका बाजूला आपण धोके रचत जाऊ
  • 6:17 - 6:20
    आणि जेव्हा ती बाजू खाली टेकेल,
  • 6:20 - 6:22
    तेव्हा तुम्हाला अल्झायमर्स गाठणार
    असे आपण समजू.
  • 6:22 - 6:25
    समजा कि तुम्ही ५० वर्षाचे आहात,
  • 6:25 - 6:27
    तुम्ही आता तरुण राहिलेला नाहीत.
  • 6:27 - 6:30
    तुमच्याकडे वयोमानाने जमलेल्या
    अॅम्लॉइड प्लेकमुळे
  • 6:30 - 6:32
    ही बाजू आधीच थोडी कललेली असेल .
  • 6:32 - 6:34
    आता तुमच्या DNA कडे वळू.
  • 6:35 - 6:38
    आपले जीन्स आपल्या
    आईवडिलांकडून आलेले असतात.
  • 6:38 - 6:42
    काही जीन्समुळे आपला धोका वाढतो
    तर काहींमुळे तो कमी होतो.
  • 6:42 - 6:44
    जर तुम्ही 'Still Alice' मधल्या
    एलिसप्रमाणे असाल
  • 6:44 - 6:49
    तर तुमच्यामध्ये अॅम्लॉइड बीटा जास्त तयार
    होणारा दुर्मिळ जीन आहे
  • 6:49 - 6:53
    आणि या एकट्या कारणाने तुमचा सीसॉ
    जमिनीला टेकणार आहे.
  • 6:53 - 6:57
    पण अनेकांचे जीन्स सीसॉची बाजू किंचितच
    कलती करतात.
  • 6:57 - 7:02
    उदा. APOE4 नावाचा जीनचा प्रकार
    अॅम्लॉइड वाढवतो,
  • 7:02 - 7:05
    जो तुम्हाला आई किंवा वडिलांकडून
    मिळाला तरी तुम्हाला
  • 7:05 - 7:07
    अल्झायमर्स होईलच असे नाही.
  • 7:07 - 7:09
    पण म्हणजेच बऱ्याच जणांचे अल्झायमर्स होणार
  • 7:09 - 7:13
    की नाही हे फक्त DNA वर अवलंबून नसते.
  • 7:14 - 7:15
    मग कशावर अवलंबून असते ?
  • 7:15 - 7:19
    आपण वयस्कर होणे थांबवू शकत नाही
    किंवा जीन्स निवडू शकत नाही.
  • 7:19 - 7:22
    आत्तापर्यंत आपण आपल्या
    मेंदूचे भविष्य बदलू शकलो नाही.
  • 7:23 - 7:25
    झोपेबद्दल काय?
  • 7:25 - 7:29
    गाढ झोपेमध्ये ग्ल्यायल सेल्स संपूर्ण
    मेंदूमध्ये सेरेब्रल स्पायनल फ्लुईड
  • 7:29 - 7:31
    पसरवतात,
  • 7:31 - 7:34
    ज्यामुळे दिवसभराच्या चयापचयचा
    प्रक्रियेमुळे सीनॅप्सपाशी
  • 7:34 - 7:36
    झालेला कचरा साफ केला जातो.
  • 7:36 - 7:39
    गाढ झोप म्हणजे जणू मेंदूची
    पुरी स्वच्छता.
  • 7:40 - 7:43
    पण तुमची झोप अपुरी झाली तर काय होईल?
  • 7:43 - 7:45
    बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटते की
  • 7:45 - 7:49
    कमी झोपण्याची सवय ही अल्झायमर्स
    ओळखायची गुरुकिल्ली आहे.
  • 7:50 - 7:55
    एक दिवस जरी झोप झाली नाही तरी
    अॅम्लॉइड बीटा वाढते.
  • 7:55 - 7:59
    तसेच अॅम्लॉइड वाढले कि झोप अनियमित होते,
  • 7:59 - 8:01
    आणि परिणामी अजून अॅम्लॉइड वाढते.
  • 8:01 - 8:04
    सीसॉच्या झुकण्याचा वेग वाढण्याचे
  • 8:04 - 8:07
    महत्वाचे कारण हे दुष्टचक्र आहे.
  • 8:07 - 8:09
    अजून काय?
  • 8:09 - 8:10
    हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया.
  • 8:11 - 8:15
    उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व, धुम्रपान,
  • 8:15 - 8:19
    जास्तीचे कोलेस्टेरॉल या सगळ्या बाबींमुळे
    अल्झायमर्सची शक्यता वाढते.
  • 8:19 - 8:21
    अल्झायमर्स झालेल्या ८०% रुग्णांचे
  • 8:21 - 8:24
    शवविच्छेदन केल्यावर असे दिसून आले की
  • 8:24 - 8:26
    त्यांना हृदयाशी संबधित आजारदेखील होते.
  • 8:26 - 8:31
    हा आजार असलेल्या प्राण्यांवरील प्रयोगात
    असे समजले की एरोबिक व्यायाम केल्याने
  • 8:31 - 8:33
    अॅम्लॉइड बीटाचे प्रमाण कमी होते.
  • 8:34 - 8:37
    म्हणून सुदृढ हृदयाकरता असणाऱ्या
    मेडीटरेनियन जीवनशैली
  • 8:37 - 8:40
    आणि आहाराच्या मदतीने
    सीसॉचे कलणे थोपवता येते.
  • 8:41 - 8:43
    अल्झायमर्सला प्रतिबंध करण्याकरता,
    दूर राखण्याकरता
  • 8:43 - 8:45
    आपल्याला अनेक गोष्टी करता येतील.
  • 8:45 - 8:48
    पण समजा, तुम्ही त्यापैकी काहीही
    केलेले नाही आणि
  • 8:48 - 8:51
    आत्ता तुम्ही ६५ वर्षांचे आहात.
    तुमच्या घराण्यात
  • 8:51 - 8:54
    अल्झायमर्स आहे.
  • 8:54 - 8:56
    ज्यामुळे तुमचे पारडे आधीच
    कललेले आहे.
  • 8:56 - 8:59
    वर्षानुवषे तुम्ही या आजाराकडे
    वेगाने जात आहात,
  • 8:59 - 9:01
    तुम्हाला बेकन प्रिय आहे,
  • 9:01 - 9:03
    वाघ पाठी लागल्याशिवाय तुम्ही पळत नाही.
  • 9:03 - 9:04
    (हशा)
  • 9:04 - 9:08
    समजा तुमचे अॅम्लॉइड प्लेक
    प्रचंड वाढलेले आहे.
  • 9:08 - 9:10
    आणि तुमचे पारडे जमिनीला टेकले आहे.
  • 9:10 - 9:12
    तुमची घसरगुंडी चालू झाली आहे.
  • 9:12 - 9:13
    वणवा पेटला आहे.
  • 9:13 - 9:16
    तुमच्यामध्ये सूज येणे, पेशी मरणे,
    पेशींचा गुंता होणे अशी
  • 9:17 - 9:20
    लक्षणे दिसू लागली आहेत.
  • 9:20 - 9:23
    तुम्हाला शब्द न सुचणे, किल्ली हरवणे
  • 9:23 - 9:26
    मी सुरवतीला काय बोलले ते न आठवणे
    असे त्रास होत असतील.
  • 9:27 - 9:29
    किंवा तसे नसेलही.
  • 9:29 - 9:32
    तुम्ही अल्झायमर्सच्या लक्षणांपासून स्वतःला
  • 9:32 - 9:34
    वाचवण्याकरता अजून एक गोष्ट करू शकता,
  • 9:34 - 9:39
    आजार अगदी टोकाला पोचल्यावरही.
  • 9:39 - 9:43
    याचा संबंध न्यूरल प्लास्टीसिटी आणि
    कॉग्निटिव्ह सायन्सशी आहे.
  • 9:43 - 9:46
    सीनॅप्स नष्ट होण्यानेच
    अल्झायमर्स होतो
  • 9:46 - 9:49
    हे तुम्हाला आठवत असेल.
  • 9:49 - 9:53
    एका मेंदू मध्ये सर्व साधारणपणे
    एक लाख दशकोटी सीनॅप्स असतात,
  • 9:53 - 9:55
    आपल्याकडे बराच साठा आहे
    ही चांगली गोष्ट आहे.
  • 9:55 - 9:57
    आणि हा आकडा पण काही स्थिर नसतो.
  • 9:57 - 10:00
    सीनॅप्स सतत कमी जास्त होतच असतात.
  • 10:00 - 10:02
    या प्रक्रियेला न्यूरल प्लास्टीसिटी म्हणतात
  • 10:02 - 10:04
    जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो,
  • 10:05 - 10:09
    तेव्हा आपण एक नवीन न्यूरल कनेक्शन
    तयार करतो.
  • 10:09 - 10:10
    नवीन सीनॅप्स तयार करतो.
  • 10:11 - 10:13
    ननवर केलेल्या एका संशोधनात,
  • 10:13 - 10:17
    ज्यात ६७८ ननचा,
    ज्यांचे वय ७५ हून जास्त होते,
  • 10:18 - 10:20
    त्यांचा २० वर्षे अभ्यास करण्यात आला.
  • 10:20 - 10:23
    त्यांची नियमितपणे शारिरीक तपासणी
    आणि मेंदूची चाचणी केली गेली.
  • 10:23 - 10:27
    मरणोत्तर त्यांचा मेंदू
    शवपरीक्षेला दिला गेला.
  • 10:27 - 10:32
    शास्त्रज्ञांना काही मेंदूमध्ये
    आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या.
  • 10:32 - 10:36
    त्या मेंदुंमध्ये प्लेक, गुंता
    आणि आकुंचन असूनही
  • 10:36 - 10:39
    -जे म्हणजे निश्चित अल्झायमर्स,
  • 10:39 - 10:43
    हे मेंदू ज्या ननचे होते,
    त्या ननच्या जिवंतपणी
  • 10:43 - 10:46
    त्यांच्यात अल्झायमर्सचे एकही लक्षण
    आढळले नव्हते.
  • 10:46 - 10:48
    याचे कारण काय असेल?
  • 10:48 - 10:52
    आमच्या मते, या लोकांच्या मेंदूची
    कार्यक्षमता प्रचंड होती.
  • 10:52 - 10:56
    म्हणजेच त्यांच्याकडे कार्यक्षम सीनॅप्स
    भरपूर होते.
  • 10:56 - 10:59
    ज्यांचे उच्च शिक्षण झालेले आहे
  • 10:59 - 11:01
    जे उत्तम साक्षर आहेत,
  • 11:01 - 11:05
    जे नियमितपणे मेंदूला चालना
    देणाऱ्या गोष्टींमधे भाग घेतात
  • 11:05 - 11:07
    अश्या सगळ्यांकडे मेंदूंची
    अधिक कार्यक्षमता असते.
  • 11:07 - 11:11
    त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त
    न्यूरल कनेक्शन असतात.
  • 11:11 - 11:14
    त्यामुळे त्यांना अल्झायमर्स झाला तरी आणि
  • 11:14 - 11:16
    थोडेफार सीनॅप्स निरुपयोगी झाले तरी,
  • 11:16 - 11:19
    त्यांच्याकडे बरयाच चांगल्या
    सीनॅप्सचा साठा असतो,
  • 11:19 - 11:22
    त्यामुळे निकामी झालेले सीनॅप्स
    जाणवत नाहीत.
  • 11:23 - 11:25
    एक सोपे उदाहरण घेऊया.
  • 11:25 - 11:28
    समजा, तुम्हाला एखाद्या विषयातील
    फक्त एकच गोष्ट माहित आहे.
  • 11:28 - 11:30
    समजा, ती गोष्ट माझ्याबद्दल आहे,
  • 11:30 - 11:32
    लिसा जीनोव्हाने 'Still Alice'ची
    कथा लिहिली आहे.
  • 11:32 - 11:34
    आणि ही एकच गोष्ट तुम्हाला माझ्याबद्दल
    माहित आहे.
  • 11:34 - 11:37
    आता तुमच्याकडे ते एक न्यूरल कनेक्शन आहे,
  • 11:37 - 11:39
    तो एक सीनॅप्स आहे.
  • 11:39 - 11:41
    आता समजा तुम्हाला अल्झायमर्स आहे.
  • 11:41 - 11:43
    प्लेक्स, गुंता, सूज सगळे काही आहे.
  • 11:43 - 11:46
    आणि मायक्रोग्लीया तो सीनॅप्स खाऊन
    टाकला आहे.
  • 11:47 - 11:51
    आता कोणी विचारले,
    "Still Alice कोणी लिहिले?"
  • 11:51 - 11:52
    तर तुम्हाला आठवणार नाही.
  • 11:52 - 11:55
    कारण तो सीनॅप्स आता तिथे नाहीच आहे.
  • 11:55 - 11:57
    तुम्ही मला कायमचे विसरला आहात.
  • 11:58 - 12:00
    पण जर तुम्हाला माझ्याबद्दल
  • 12:00 - 12:02
    अजून चार गोष्टी माहित असतील,
  • 12:03 - 12:04
    आणि तुम्हाला अल्झायमर्स असेल
  • 12:04 - 12:07
    ज्यामुळे तुमचे तीन सीनॅप्स
    नाहीसे झाले आहेत, तरिही
  • 12:08 - 12:11
    तुम्हाला नुकसान भरून
    काढायला वेगळा मार्ग आहे.
  • 12:11 - 12:13
    तुम्हाला निदान माझे नाव लक्षात आहे.
  • 12:13 - 12:17
    अजूनही सुस्थितीत असलेल्या
    न्यूरॉन्सद्वारे आपण अल्झायमर्स
  • 12:17 - 12:20
    ताब्यात ठेवू शकतो.
  • 12:20 - 12:24
    आपण नवनवीन गोष्टी शिकून असे मार्ग तयार
    करू शकतो आणि
  • 12:24 - 12:26
    मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो.
  • 12:26 - 12:31
    आपल्याला या नवीन गोष्टी दृष्टी,आवाज, भावना
    आणि कार्यकारण भाव यांची जोड देऊन
  • 12:31 - 12:36
    अधिकाधिक अर्थपूर्ण बनवायला हव्या आहेत.
  • 12:36 - 12:40
    त्यामुळे शब्दकोडी सोडवून फायदा नाही.
  • 12:40 - 12:44
    जी माहिती तुमच्याकडे आधीच आहे,
    ती मिळवण्याची गरज नाही.
  • 12:44 - 12:47
    हे म्हणजे जुन्याच पायवाटांवर चालणे झाले,
  • 12:47 - 12:50
    त्याचा त्या गल्लीबोळातून फिरणे झाले,
  • 12:50 - 12:53
    तुम्हाला न्यूरलचे नवीन रस्ते तयार
    करायला हवे आहेत.
  • 12:53 - 12:55
    अल्झायमर्सला प्रतिबंध करणारा मेंदू
    तयार करणे म्हणजे
  • 12:56 - 12:58
    इटालियन भाषा शिकणे,
  • 12:58 - 12:59
    नव्या ओळखी करून घेणे,
  • 12:59 - 13:00
    पुस्तके वाचणे,
  • 13:00 - 13:03
    किंवा TED वरची सुरेख व्याख्याने ऐकणे.
  • 13:03 - 13:09
    आणि इतके करूनही कधीकाळी अल्झायमर्स झालाच
  • 13:09 - 13:12
    तर माझ्या अल्झायमर्स झालेल्या आजीकडून
  • 13:12 - 13:16
    आणि इतरांकडून शिकलेल्या
    तीन गोष्टी मी सांगते.
  • 13:16 - 13:19
    आजार झाला म्हणजे तुम्ही काही लगेच मरत नाही.
  • 13:19 - 13:21
    तुम्ही तुमचे आयुष्य जगत रहा.
  • 13:21 - 13:23
    तुमच्या भावनांची स्मृती जाणार नाही आहे.
  • 13:23 - 13:27
    तुम्हाला प्रेम आणि आनंद समजणार आहे.
  • 13:27 - 13:30
    तुम्हाला मी ५ मिनिटांपूर्वी काय म्हटले ते
    एखादेवेळेस आठवणार नाही
  • 13:30 - 13:33
    पण तेव्हा तुम्हाला कसे वाटले
    ते तुम्हाला आठवणार आहे.
  • 13:33 - 13:36
    आणि तुम्ही म्हणजे काही फक्त
    तुमची स्मृती नव्हे.
  • 13:36 - 13:38
    थॅक्यू.
  • 13:38 - 13:43
    (टाळ्या)
Title:
अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?
Speaker:
लिसा जिनोव्हा
Description:

न्युरोसायन्टिस्ट आणि 'स्टील अलीस' या चित्रपटाच्या लेखिका लिसा जिनोव्हा म्हणतात की.
"अल्झायमर्स तुमच्या मेंदूचे भवितव्य असता कामा नये"

आधुनिक शास्त्रीय शोध आणि खात्रीशीर संशोधनाच्या मदतीने आपण कोणत्या उपायांनी मेंदूला अल्झायमर्स होण्यापासून थोपवू शकतो याची त्यांनी इथे माहिती दिली आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
13:56

Marathi subtitles

Revisions