Return to Video

रासपुतीनचे रहस्यमय जीवन

  • 0:07 - 0:10
    १९१६ सालच्या हिवाळ्यातली एक थंडगार रात्र.
  • 0:10 - 0:15
    फेलिक्स युसुपॉव्ह मेजवानीला येणाऱ्या
    पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत होता.
  • 0:15 - 0:19
    ठरल्याप्रमाणे घडलं, तर सकाळपर्यंत
    या पाहुण्याचा मृत्यू झाला असता.
  • 0:19 - 0:24
    यापूर्वी इतर चौघांनी त्याला मारण्याचे
    अपयशी प्रयत्न करून झाले होते.
  • 0:24 - 0:27
    रशियन साम्राज्य
    कोलमडण्याच्या बेताला आले होते.
  • 0:27 - 0:30
    युसुपॉव्ह आणि त्याच्या सहकारी
    उमरावांच्या मते
  • 0:30 - 0:35
    हा पाहुणा साधू हे त्यामागचे
    एकमेव कारण होते.
  • 0:35 - 0:36
    कोण होता तो?
  • 0:36 - 0:42
    आणि एका साम्राज्याच्या विनाशाला
    हा एकटा साधू कारणीभूत कसा काय?
  • 0:42 - 0:46
    ग्रिगोरी येफिमोविच रासपुतीन याच्या
    आयुष्याची सुरुवात सैबेरियात झाली.
  • 0:46 - 0:50
    १८६९ साली एका शेतकरी कुटुंबात
    त्याचा जन्म झाला.
  • 0:50 - 0:53
    त्या छोट्या गावात त्याचे आयुष्य
    सामान्यपणे गेले असतेही.
  • 0:53 - 0:57
    पण १८९०च्या दशकात त्याने
    रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचा
  • 0:57 - 0:59
    पंथ स्वीकारला.
  • 0:59 - 1:02
    सतत भक्तिभावाने तीर्थयात्रा करणाऱ्या
  • 1:02 - 1:04
    साधूंपासून प्रेरणा घेऊन
  • 1:04 - 1:08
    त्याने अनेक वर्षे रशियाभर
    तीर्थयात्रा केल्या.
  • 1:08 - 1:13
    प्रवासात भेटलेले अनोळखी लोक त्याच्या
    आकर्षक व्यक्तिमत्त्वाने मंत्रमुग्ध होत.
  • 1:13 - 1:19
    त्याला भविष्य समजतं, रोग बरे करता येतात,
    असा काही लोकांचा समज झाला होता.
  • 1:19 - 1:23
    अट्टल दारुडा, भुरटा चोर आणि स्वैराचारी
    म्हणून तो कुप्रसिद्ध असला,
  • 1:23 - 1:27
    तरी त्याच्या साधुगिरीची ख्याती
    सैबेरियाच्या बाहेर पोहोचली.
  • 1:27 - 1:32
    सामान्य नागरिकांबरोबरच ऑर्थोडॉक्स पंथाच्या
    धर्मगुरूंनाही त्याने भुरळ पाडली.
  • 1:32 - 1:35
    शेवटी सेंट पीटर्सबर्ग
    या राजधानीच्या शहरात पोहोचल्यावर
  • 1:35 - 1:38
    आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या
    आणि ओळखींच्या बळावर
  • 1:38 - 1:43
    रासपुतीनने राजघराण्याच्या
    आध्यात्मिक सल्लागाराशी संधान बांधले.
  • 1:43 - 1:45
    १९०५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात
  • 1:45 - 1:50
    रशियन झार दुसरा निकोलस याच्याशी
    त्याची ओळख करून देण्यात आली.
  • 1:50 - 1:55
    निकोलस आणि त्याची पत्नी अलेक्झांड्रा यांचा
    ऑर्थोडॉक्स चर्चवर निस्सीम विश्वास होता,
  • 1:55 - 1:58
    तसाच गूढवाद, अद्भुत शक्ती यांवरही होता.
  • 1:58 - 2:02
    सैबेरियातल्या या साधूने
    त्यांना मंत्रमुग्ध केले.
  • 2:02 - 2:07
    रशियासाठी आणि राजघराण्यासाठी
    तो संकटकाळ होता.
  • 2:07 - 2:10
    १९०५ च्या क्रांतीनंतर
  • 2:10 - 2:13
    राजसत्ता कशीबशी तग धरून होती.
  • 2:13 - 2:17
    आणि या राजकीय संकटांत
    एका वैयक्तिक संकटाची भर पडली होती.
  • 2:17 - 2:19
    राजसत्तेचा वारसदार अलेक्सी याला
  • 2:19 - 2:23
    हिमोफिलिया (रक्त न गोठणे) हा
    प्राणघातक रक्तविकार होता.
  • 2:23 - 2:27
    १९१२ साली या विकारामुळे
    अलेक्सीच्या जिवाला धोका उद्भवला.
  • 2:27 - 2:32
    त्यावेळी रासपुतीनने
    डॉक्टरांचे औषध बंद करण्याचा सल्ला दिला.
  • 2:32 - 2:36
    अलेक्सीची तब्येत सुधारली, आणि
    रासपुतीनजवळ दिव्य शक्ती असल्याच्या
  • 2:36 - 2:39
    राजघराण्याच्या समजाला बळकटी मिळाली.
  • 2:39 - 2:44
    राजदरबारात रासपुतीनला मानाचे स्थान मिळाले.
  • 2:44 - 2:47
    आज आपण जाणतो, की डॉक्टरांनी
    अलेक्सीला ऍस्पिरिन दिले होते,
  • 2:47 - 2:50
    ज्यामुळे हिमोफिलिया बळावतो.
  • 2:50 - 2:53
    या घटनेनंतर रासपुतीनने एक भाकीत केले,
  • 2:53 - 2:57
    "माझा मृत्यू झाला, किंवा राजघराण्याने
    मला दूर लोटले,
  • 2:57 - 3:01
    तर त्यांचा पुत्र आणि राजसत्ता
    दोन्ही नष्ट होतील."
  • 3:01 - 3:06
    राजघराण्याबाहेर लोकांच्या मनात
    रासपुतीनबद्दल संमिश्र भावना होत्या.
  • 3:06 - 3:09
    एकीकडे सामान्य जनतेला
    तो त्यांच्यातलाच एक वाटे.
  • 3:09 - 3:13
    कारण त्यांचा दडपला गेलेला आवाज
    तो राजसत्तेपर्यंत पोहोचवीत असे.
  • 3:13 - 3:17
    पण उमराव आणि धर्मगुरूंना
    त्याचा तिरस्कार वाटे.
  • 3:17 - 3:20
    कारण रासपुतीनचे लज्जास्पद वर्तन
    बदलले नव्हते.
  • 3:20 - 3:23
    त्याच्या तथाकथित दिव्य शक्तीबद्दल
    त्यांना शंका वाटत होती.
  • 3:23 - 3:26
    तो राजघराण्याला भ्रष्ट करतो आहे,
    असेही त्यांना वाटे.
  • 3:26 - 3:28
    पहिले महायुद्ध संपेपर्यंत
  • 3:28 - 3:31
    त्यांची खात्रीच पटली होती, की
    देशात सुव्यवस्था हवी असेल,
  • 3:31 - 3:35
    तर या दांभिक साधूला दूर करावे लागेल.
  • 3:35 - 3:37
    अशा दृढ विचाराने
  • 3:37 - 3:40
    युसुपॉव्हने रासपुतीनच्या हत्येचा कट रचला.
  • 3:40 - 3:43
    नेमके तपशील उपलब्ध नसले, तरी
  • 3:43 - 3:48
    युसुपॉव्हच्या स्मरणलेखनावरून
    काही अंदाज बांधता येतात.
  • 3:48 - 3:54
    त्याने रासपुतीनला मिठाई खाऊ घातली. त्यात
    सायनाईड हे विष असल्याचा त्याचा समज होता.
  • 3:54 - 3:56
    पण कटातल्या एका साथीदाराचे
    मतपरिवर्तन होऊन
  • 3:56 - 3:59
    त्याने युसुपॉव्हच्या नकळत सायनाईडऐवजी
  • 3:59 - 4:02
    दुसरा बिनविषारी पदार्थ त्यात घातला होता.
  • 4:02 - 4:07
    मिठाई खाऊन रासपुतीनला अपाय न झाल्याने
    युसुपॉव्हला धक्का बसला.
  • 4:07 - 4:12
    त्याने निराश होऊन रासपुतीनला
    अगदी समोरून गोळी घातली.
  • 4:12 - 4:16
    पण रासपुतीन वाचला,
    आणि युसुपॉव्हला ठोसा लगावून पळाला.
  • 4:16 - 4:19
    युसुपॉव्ह आणि त्याच्या साथीदारांनी
    त्याचा पाठलाग केला.
  • 4:19 - 4:22
    शेवटी त्यांनी कपाळावर गोळी मारून
    त्याला ठार केले,
  • 4:22 - 4:26
    आणि त्याचे प्रेत
    मालयनेव्हका नदीत टाकून दिले.
  • 4:26 - 4:29
    पण रासपुतीनच्या हत्येमुळे
    राजसत्ता स्थिरस्थावर तर झाली नाहीच,
  • 4:29 - 4:32
    उलट सामान्य जनतेचा संताप उफाळून आला.
  • 4:32 - 4:34
    रासपुतीनने केलेल्या भाकितानुसार
  • 4:34 - 4:38
    त्याच्या हत्येनंतर लवकरच
    राजघराण्याचीही हत्या झाली.
  • 4:38 - 4:40
    रशियन साम्राज्याचा अंत झाला,
  • 4:40 - 4:42
    तो साधूच्या शापामुळे, की
  • 4:42 - 4:46
    कित्येक दशके धुमसत असलेल्या
    राजकीय ताणामुळे,
  • 4:46 - 4:48
    हे कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही.
Title:
रासपुतीनचे रहस्यमय जीवन
Speaker:
एडन गिरमा
Description:

पूर्ण धडा येथे पहा: https://ed.ted.com/lessons/the-mysterious-life-and-death-of-rasputin-eden-girma

१९१६ सालच्या एका रात्री रशियन उमरावांनी एका हत्येचा कट रचला. तो ठरल्याप्रमाणे पार पडला असता, तर सकाळपर्यंत एका माणसाचा मृत्यू झाला असता.
त्या माणसाच्या हत्येचे प्रयत्न त्यापूर्वी अनेकांनी केले होते. पण त्यांना अपयश आलं होतं. राजसत्ता कोलमडण्याच्या बेताला आली होती, आणि त्यामागे फक्त हा एक माणूस असावा, असं त्यांना वाटत होतं. कोण होता हा माणूस? आणि एका साम्राज्याच्या विनाशाला तो कारणीभूत कसा काय?

त्या कुप्रसिद्ध रासपुतीनच्या आयुष्याचा वेध घेताहेत एडन गिरमा.

शिक्षक: एडन गिरमा, दिग्दर्शक : हाईप सी जी

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:52

Marathi subtitles

Revisions