Marathi subtitles

← डीन ओर्निश म्हणतात तुमचे जीन्स (अनुवांशिक गुण) म्हणजे तुमचे भाग्य नव्हे

डीन ओर्निश यांचे नवीन संशोधन दर्शविते की आरोग्याला पूरक जीवनशैली आणि पथ्ये पाळली तर त्याचा मनुष्यावर अनुवांशिक पातळीपर्यंत परिणाम पडतो. उदाहरणार्थ, ते म्हणतात, जर तुम्ही स्वस्थ सवयी अंगीकारल्या, पोषक अन्न घेतलं, जास्त व्यायाम आणि प्रेम केलं, तर तुमच्या मेंदूच्या पेशींची संख्या वाढते.

Get Embed Code
55 Languages

Subtitles translated from English Showing Revision 1 created 06/20/2011 by Abhishek Payal.

 1. आपले जीन्स (अनुवांशिक घटक) बदलण्याचा एक मार्ग म्हणजे नवीन जीन्स बनवणे
 2. जसे क्रेग वेंटरने इतक्या सुरेखरीत्या दाखवले आहे.
 3. दुसरा मार्ग म्हणजे आपली जीवनशैली बदलणे.
 4. आणि आपल्याला आता समजते आहे की हे बदल इतके शक्तिशाली (परिणामकारक) आणि गतिमान असू शकतात
 5. की त्यांचे फायदे दिसून येण्यास फार काळ थांबावे लागत नाही.
 6. तुम्ही पोषक आहार घ्याल, तणावावर नियंत्रण ठेवाल, जास्त व्यायाम आणि प्रेम कराल,
 7. तर तुमच्या मेंदूला जास्त रक्त आणि प्राणवायू पुरवठा मिळेल.
 8. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मेंदूचा आकार वाढेल
 9. काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्यप्राय वाटायच्या
 10. त्या गोष्टींची मोजमाप देखील आपण आता करू शकतो.
 11. रॉबिन विल्यम्सला हे कळले होते
 12. आपल्यासर्वांच्या काही वर्षे अगोदरच.
 13. आता, तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता

 14. ज्याने तुमचा मेंदू नवीन (मेंदू ) पेशी बनवेल.
 15. माझ्या काही आवडत्या वस्तू, जसे चॉकलेट आणि चहा, ब्लुबेरीज
 16. अगदी बेताचे मद्यपान, तणावाचे नियंत्रण
 17. आणि गांज्यात आढळणारे कॅनाबॅनॉइड्स.
 18. मी फक्त माहिती पोचवणारा आहे.
 19. (हशा)
 20. आपण आत्ता कशाबद्दल बोलत होतो?
 21. (हशा)
 22. आणि इतर काही गोष्टी ज्या त्याला नुकसानकारक असतात
 23. ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होऊ शकतात.
 24. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी, जसे (सॅच्युरेटेड) मेद आणि साखर,
 25. निकोटीन, अफूयुक्त पदार्थ, कोकेन, प्रमाणाबाहेर दारू आणि सततचा तणाव.
 26. तुम्ही तुमची जीवनशैली बदलली की तुमच्या त्वचेला रक्तपुरवठा वाढतो

 27. त्यामुळे वाढत्या वयाचे परिणाम कमी दिसून येतात, त्वचेला सुरकुत्या कमी पडतात.
 28. तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा वाढतो.
 29. आम्ही दाखवले आहे की हृदयरोगाचे परिणाम उलटवले जाऊ शकतात.
 30. येथे वरती डावीकडे तुम्ही पाहत असलेल्या तुंबलेल्या रक्तवाहिन्या,
 31. फक्त एका वर्षात पुष्कळ प्रमाणात मोकळ्या झाल्या.
 32. आणि खाली डावीकडे दिसणारे हृदयाचे PET (पेट) स्कॅन,
 33. निळा रंग म्हणजे तिथे रक्त पुरवठा होत नाहीये.
 34. एका वर्षानंतर - नारिंगी आणि पांढरा म्हणजे तिथे सर्वाधिक रक्तपुरवठा होतोय.
 35. आम्ही दाखवले आहे की (कर्करोगाची) प्रगती थांबवू शकली जाऊ शकते आणि उलटवू देखील जाऊ शकते
 36. प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आणि ओघाने स्तनाच्या कर्करोगाचीही
 37. फक्त हे बदल केल्यावर.
 38. आम्हाला प्रयोगशाळेत आढळून आले की हे बदल करणाऱ्या गटात ट्युमर पेशींची वाढ
 39. सत्तर (७०) टक्क्यांनी कमी झाली ,
 40. पण तुलनेत दुसऱ्या गटात फक्त नऊ (९) टक्क्यांनी वाढ कमी झाली.
 41. हा फरक खरोखर खूप मोठा आहे.

 42. लैंगिक अवयवांना देखील रक्तपुरवठा वाढतो,
 43. त्यामुळे लैंगिक सामर्थ्य वाढते.
 44. धूम्रपानाच्या विरोधात काढण्यात आलेल्या जाहिरातींपैकी एक सर्वात परिणामकारक
 45. जाहिरात डिपार्टमेंट ऑफ़ हेल्थ सर्विसेस यांनी काढली होती,
 46. (त्यात) दाखवण्यात आले होते की निकोटीन, जे रक्तवाहिन्यांना संकुचित करते,
 47. (निकोटीनमुळे) हृदयाचा झटका आणि (मेंदू) संपात होऊ शकतो
 48. पण त्याने नपुंसकतेचा धोकासुद्धा उद्भवतो.
 49. धूम्रपान करणाऱ्यांपैकी अर्धे पुरुष लैंगिकरित्या दुर्बल असतात.
 50. हे किती उत्तेजक वाटते?
 51. लवकरच आम्ही एका संशोधनाचे परिणाम प्रस्तुत करणार आहोत --

 52. त्या संशोधनात दिसून आले आहे की प्रोस्टेटचा कर्करोग असणाऱ्या पुरुषांमध्ये अनुवांशिक घटकांचे परिणाम बदलता येतात.
 53. ह्याला हीट मॅप म्हणतात
 54. हे वेगवेगळे रंग आणि बाजूला उजवीकडे असलेले विविध जीन्स आहेत
 55. आणि आम्हाला दिसून आले की पाचशेहून (५००) अधिक जीन्स (अनुवांशिक घटक) मध्ये फायदेशीर बदल झाला होता
 56. म्हणजेच चांगले जीन्स, ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो, ते कार्यान्वित झाले होते
 57. आणि रोगांसाठी कारणीभूत असणारे जीन्स बंद पडले होते.
 58. आणि म्हणून मला वाटते की हा शोध फार शक्तिशाली आहे

 59. अनेक लोकांना यामुळे नवीन आशा आणि नवीन पर्याय मिळतील.
 60. आणि Navigenix , DNA Direct आणि 23andMe सारख्या कंपन्या ,
 61. ज्या तुम्हाला तुमची अनुवांशिक माहिती पुरवतात ,
 62. ते बघून लोकांमध्ये अशी भावना निर्माण होते , "अरे! याबद्दल मी काय करू शकतो ?"
 63. आपले अनुवांशिक घटक आपले भाग्य नाही ठरवत, आणि जर का आपण हे बदल केले --
 64. ते रोगाला प्रवण असण्याची स्थिती निर्माण करतात, पण आपण जर मोठे बदल घडवून आणले
 65. आपण यापूर्वी विचार केला आहे त्याहूनही मोठे
 66. तर आपण आपल्या जीन्सद्वारे घडणारे परिणाम बदलू शकतो
 67. धन्यवाद
 68. (टाळ्या)