Marathi subtitles

← इन्व्हिक्टस (२००९) नेतृत्व आणि प्रेरणा

Get Embed Code
19 Languages

Showing Revision 2 created 02/09/2017 by Roshan Kedar.

 1. किती गर्वाची बाब आहे ही.
 2. मी खूप उत्साहित आहे.
  मला भेटण्यासाठी इथवर आल्याबद्दल खूप आभार.
 3. हो महोदय.
  मला निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रपती महोदय.
 4. सांग तर मग फ्रान्सिस.
  तुझा घोटा कसा आहे?
 5. - माझा घोटा?
  - मला सांगितलं गेलं होतं कि तो दुखावला गेला आहे.
  आता बरा आहे का तो?
 6. खरी बाब अशी आहे महोदय,कि तुम्ही तुमचा १०० टक्के
  खेळ नाही करू शकत.कोणत्याही परिस्थितीत.
 7. हो. खेळात आणि आयुष्यातही, काय?
 8. - होय महोदय.
  - बस.
 9. तू हि खुर्ची घे.
  प्रकाशाने माझे डोळे दुखतात.
 10. सौ ब्रिट्स.
  तुम्ही माझ्या आयुष्यातला तेजस्वी प्रकाश आहात.
 11. होय महोदय.
 12. सौ ब्रिट्स,हे आहेत फ्रान्सिस पीएनार.
  स्प्रिंगबॉक चे कर्णधार.
 13. मी ओतू महोदय.
 14. नाही,नाही,मला ते स्वतः करायला आवडेल.
 15. धन्यवाद,सौ ब्रिट्स.
 16. तुला चहा कसा आवडेल फ्रान्सिस?
 17. कृपया, फक्त दूध.
 18. इंग्रजांनी आपल्याला पुष्कळ गोष्टी दिल्या...
 19. रग्बी पकडून.
 20. पण दुपारचा चहा.
  तो सर्वोत्तम आहे.
 21. हे घ्या.
 22. धन्यवाद महोदय.
 23. तुमचे काम अतिशय अवघड आहे.
 24. माझे काम?
 25. मी व्यापार करतो महोदय.
 26. स्प्रिंगबॉक चे कर्णधार.
 27. एक अतिशय अवघड काम.
 28. तुमच्या कामापेक्षा नाही.
  राष्ट्रपती महोदय.
 29. माझे काम करताना कुणी माझे
  डोके फोडण्याचा प्रयत्न करीत नाही.
 30. होय महोदय.
 31. सांग तर मग फ्रान्सिस...
 32. तुझं नेतृत्वा बद्दलच तत्वज्ञान काय आहे?
 33. तू तुझ्या संघाला सर्वत्तोम खेळण्यासाठी प्रेरणा कशी देतोस?
 34. उदाहरणातून.मी नेहमीच उदाहरणातून
  नेतृत्व करण्याचा विचार केलाय महोदय.
 35. बरोबर.
  हे एकदम बरोबर आहे.
 36. पण त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा चांगलं
  करण्यास कसं प्रेरित करायचं?
 37. ते मला अतिशय अवघड वाटतं.
 38. प्रेरणा कदाचित.
 39. आपण स्वतःला उच्चतम करण्याची प्रेरणा कशी देतो,
  जेव्हा त्याहून कमी क्षम्य नसेल?
 40. आपण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला प्रेरणा कशी देऊ शकतो?
 41. मला वाटतं -इतरांच्या कामातुन
 42. रॉबेन बेटावर ...
 43. जेव्हा गोष्टी अतिशय वाईट होत्या,
 44. मला एका कवितेतून प्रेरणा मिळाली.
 45. कविता?
  एक व्हिक्टोरिया कालीन कविता.
 46. फक्त शब्द.
 47. पण त्यांनी मला उभं राहण्यास मदत केली
  जेव्हा मला फक्त पडून राहावंसं वाटत होतं.
 48. पण तू इतका दूर एका वृद्ध माणसाला ऐकायला आलेला नाहीस...
 49. निरर्थक गोष्टींविषयी.
 50. नाही, नाही, राष्ट्रपती महोदय.
  मला अर्थ दिसतोय त्याच्यात.
 51. अतिशय महत्वाच्या सामन्याच्या दिवशी जसे कि एक कसोटी सामना,
 52. बस मधून मैदानाकडे जाताना कुणीच बोलत नाही.
 53. हो.ते सर्व तयारी करत असतात.
  बरोबर.
 54. पण जेव्हा मला वाटत कि आम्ही तयार आहोत,
  मी चालकाला गाणं लावायला सांगतो.
 55. जे मी निवडलं आहे. जे आम्हाला सर्वांना माहित आहे.
 56. आणि आम्ही सर्व मिळून ते शब्द ऐकतो.
 57. आणि त्याची मदत होते.
 58. मला आठवतं जेव्हा १९९२ च्या ऑलिम्पिकला
  मला बार्सिलोनाला बोलावलं होतं.
 59. मैदानातील सर्वांनी माझं गाण्याने स्वागत केलं होतं.
 60. त्या वेळी, भविष्य,
 61. आपलं सर्वांच भविष्य उदास वाटत होतं.
 62. पण ते गाणं संपूर्ण जगातील लोकांच्या आवाजात ऐकताना...
 63. मला दक्षिण आफ्रिकीय असल्याचा अभिमान वाटला होता.
 64. त्याने मला घरी येऊन चांगलं काम करण्याची प्रेरणा दिली.
 65. मला स्वतःकडून जास्त अपेक्षा दिल्या.
 66. विचारू शकतो, कुठलं गाणं होतं ते महोदय?
 67. देवा आफ्रिकेला आशीर्वाद दे.(Nkosi sikelel' iAfrika)
 68. अतिशय प्रेरणादायी गाणं आहे ते.
 69. आपल्याला प्रेरणा हवी आहे फ्रान्सिस.
 70. कारण आपल्या देशाच्या निर्मिती करताना...
 71. आपण स्वतःच्या अपेक्षांच्या सीमा पार करायला हव्यात.