Return to Video

Unplugged - Real Life Algorithms - Dice Game

  • 0:05 - 0:13
    या धड्याचे नाव आहे फाशांची शर्यत. बहुतेक सगळ्यांनाच कॉम्प्युटर गेम्स खेळायला आवडतात.
  • 0:13 - 0:18
    तुम्ही गेमच्या पायऱ्यांचे रूपांतर कॉम्प्युटर
    प्रोग्रॅमर्स गेममध्ये कसे करतात, याचा कधी विचार केला आहे का?
  • 0:18 - 0:24
    कॉम्प्युटर गेम्स तयार करण्यातली आणि कोणतीही समस्या सोडवण्यातली पहिली पायरी म्हणजे विचार करणे आणि नियोजन करणे.
  • 0:24 - 0:29
    समस्या सोडवण्यासाठी विचार करण्यातल्या पायरीमध्ये अल्गोरीदम तयार होतो, हा समस्या सोडवण्यासाठी किंवा एखादे काम पूर्ण करण्यासाठी
  • 0:29 - 0:35
    पायरी पायरीने जाण्याचा प्लॅन असतो. या धड्यात, तुम्ही फाशाच्या शर्यतीच्या गेमसाठी एक अल्गोरीदम
  • 0:35 - 0:42
    तयार कराल. नंतर तुमच्या मित्रांना तुमचा प्लॅन वापरून त्यातील पायऱ्यांनुसार कृती करून गेम खेळता येतोय का
  • 0:42 - 0:47
    पाहायला सांगाल. त्यांनतर प्रोग्रॅमरची खात्री होते की पायऱ्या बरोबर आहेत,
  • 0:47 - 0:52
    आता अल्गोरीदमचे कॉम्प्युटरला समजणाऱ्या भाषेतील प्रोग्रॅममध्ये रूपांतर करायची
  • 0:52 - 0:59
    वेळ आली आहे. दररोज आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी अल्गोरीदमची गरज असते, त्यात ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी
  • 0:59 - 1:04
    पायऱ्यांची यादी दिलेली असते. शाळेला जाण्यासाठी तयार होणे किंवा तुमच्या मित्रांबरोबर दंगामस्तीचा एक
  • 1:04 - 1:10
    दिवस ठरवणे किंवा स्नॅक्स तयार करणे अशा गोष्टींचा विचार करा. यातील कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी,
  • 1:10 - 1:16
    तुम्ही तिचे लहान पायऱ्यांमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते आणि कधीकधी या पायऱ्या एका विशिष्ट क्रमात असणे आवश्यक असते.
  • 1:16 - 1:21
    सँडविच बनवण्याचा विचार करा. तुम्ही कपाटातून कोणताही पदार्थ आधी काढलात तरी काही फरक पडत
  • 1:21 - 1:26
    नाही. पण तुम्ही बरणी उघडल्याशिवाय पीनट बटर लावू शकत नाही. आपण ज्या सोप्या गोष्टी विचार न करता
  • 1:26 - 1:32
    करतो, त्यासाठीसुद्धा कॉम्प्युटर्सना अल्गोरीदम्स
    आणि प्रोग्रॅम्सची गरज असते.
  • 1:32 - 1:38
    अल्गोरीदम म्हणजे काय घडायला पाहिजे यामागचा विचार आणि प्रोग्रॅम म्हणजे ते घडवण्यासाठी
  • 1:38 - 1:45
    कॉम्प्युटरला दिलेल्या सूचना. कॉम्प्युटरला प्रोग्रॅम रन करण्यासाठी अल्गोरीदमचे प्रोग्रॅममध्ये
  • 1:45 - 1:51
    रूपांतर करावे लागते. टास्कचे पायऱ्यांचे विभाजन करण्याला अल्गोरीदम म्हणतात. कधीकधी हे अवघड
  • 1:51 - 1:57
    वाटते. पण कोणत्याही नव्या कौशल्याप्रमाणे, सरावाने हे अधिकाधिक सोपे होते.
Title:
Unplugged - Real Life Algorithms - Dice Game
Video Language:
English
Duration:
01:59

Marathi subtitles

Revisions