WEBVTT 00:00:05.089 --> 00:00:12.530 या धड्याचे नाव आहे फाशांची शर्यत. बहुतेक सगळ्यांनाच कॉम्प्युटर गेम्स खेळायला आवडतात. 00:00:12.530 --> 00:00:17.640 तुम्ही गेमच्या पायऱ्यांचे रूपांतर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स गेममध्ये कसे करतात, याचा कधी विचार केला आहे का? 00:00:17.640 --> 00:00:23.860 कॉम्प्युटर गेम्स तयार करण्यातली आणि कोणतीही समस्या सोडवण्यातली पहिली पायरी म्हणजे विचार करणे आणि नियोजन करणे. 00:00:23.860 --> 00:00:29.240 समस्या सोडवण्यासाठी विचार करण्यातल्या पायरीमध्ये अल्गोरीदम तयार होतो, हा समस्या सोडवण्यासाठी किंवा एखादे काम पूर्ण करण्यासाठी 00:00:29.240 --> 00:00:35.100 पायरी पायरीने जाण्याचा प्लॅन असतो. या धड्यात, तुम्ही फाशाच्या शर्यतीच्या गेमसाठी एक अल्गोरीदम 00:00:35.100 --> 00:00:41.820 तयार कराल. नंतर तुमच्या मित्रांना तुमचा प्लॅन वापरून त्यातील पायऱ्यांनुसार कृती करून गेम खेळता येतोय का 00:00:41.820 --> 00:00:47.000 पाहायला सांगाल. त्यांनतर प्रोग्रॅमरची खात्री होते की पायऱ्या बरोबर आहेत, 00:00:47.000 --> 00:00:51.920 आता अल्गोरीदमचे कॉम्प्युटरला समजणाऱ्या भाषेतील प्रोग्रॅममध्ये रूपांतर करायची 00:00:51.920 --> 00:00:58.780 वेळ आली आहे. दररोज आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी अल्गोरीदमची गरज असते, त्यात ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी 00:00:58.780 --> 00:01:03.980 पायऱ्यांची यादी दिलेली असते. शाळेला जाण्यासाठी तयार होणे किंवा तुमच्या मित्रांबरोबर दंगामस्तीचा एक 00:01:03.980 --> 00:01:10.159 दिवस ठरवणे किंवा स्नॅक्स तयार करणे अशा गोष्टींचा विचार करा. यातील कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी, 00:01:10.159 --> 00:01:16.229 तुम्ही तिचे लहान पायऱ्यांमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते आणि कधीकधी या पायऱ्या एका विशिष्ट क्रमात असणे आवश्यक असते. 00:01:16.229 --> 00:01:20.749 सँडविच बनवण्याचा विचार करा. तुम्ही कपाटातून कोणताही पदार्थ आधी काढलात तरी काही फरक पडत 00:01:20.749 --> 00:01:26.479 नाही. पण तुम्ही बरणी उघडल्याशिवाय पीनट बटर लावू शकत नाही. आपण ज्या सोप्या गोष्टी विचार न करता 00:01:26.479 --> 00:01:31.999 करतो, त्यासाठीसुद्धा कॉम्प्युटर्सना अल्गोरीदम्स आणि प्रोग्रॅम्सची गरज असते. 00:01:31.999 --> 00:01:38.369 अल्गोरीदम म्हणजे काय घडायला पाहिजे यामागचा विचार आणि प्रोग्रॅम म्हणजे ते घडवण्यासाठी 00:01:38.369 --> 00:01:44.709 कॉम्प्युटरला दिलेल्या सूचना. कॉम्प्युटरला प्रोग्रॅम रन करण्यासाठी अल्गोरीदमचे प्रोग्रॅममध्ये 00:01:44.709 --> 00:01:50.989 रूपांतर करावे लागते. टास्कचे पायऱ्यांचे विभाजन करण्याला अल्गोरीदम म्हणतात. कधीकधी हे अवघड 00:01:50.989 --> 00:01:57.339 वाटते. पण कोणत्याही नव्या कौशल्याप्रमाणे, सरावाने हे अधिकाधिक सोपे होते.