Return to Video

कोविड१९ ची टाळेबंदी बंद करत अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याची "रणनीती"

  • 0:01 - 0:03
    क्रिस अँडरसन : तर आजचे आपले पहिले
    वक्ते आहेत
  • 0:03 - 0:06
    ज्यांनी सात वर्षा पूर्वी टेड टॉक
    मध्ये सहभाग घेतला होता .
  • 0:06 - 0:09
    त्यांचे नाव आहे प्रोफ. उरी अॅलन ,
  • 0:09 - 0:12
    जे वेईझमँन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स
    येथे कार्यरत आहेत .
  • 0:12 - 0:16
    ते आणि त्यांच्या सहकार्यांना एक नवी
    कल्पना सुचली आहे
  • 0:16 - 0:18
    एका अतिशय महत्वाच्या प्रश्ना विषयी :
  • 0:18 - 0:22
    संक्रमणाच्या दुसऱ्या लाटे मध्ये
  • 0:22 - 0:25
    आपण कामावर परत कसे जायचे ?
  • 0:27 - 0:29
    उरी अॅलन ,तुमचे स्वागत आहे टेड टॉक मध्ये .
  • 0:30 - 0:34
    उरी अॅलन :परत आल्यानंतर छान वाटतेय.
  • 0:34 - 0:36
    क्रि.अन :पुन्हा भेटून छान वाटले .
  • 0:36 - 0:41
    मला वाटते कि कोवीड१९ आणि त्याचे संक्रमण
  • 0:41 - 0:44
    यानेच तुमची कल्पना प्रेरित आहे,.R0 .
  • 0:44 - 0:46
    जर R0 एक पेक्षा कमी असेल तर,
  • 0:46 - 0:50
    एकापेक्षा जास्त लोक बाधित नाही होऊ शकणार ,
  • 0:50 - 0:54
    आणि आपोआपच संक्रमण कमी होईल .
  • 0:54 - 0:56
    लोकांना हीच चिंता आहे कि जसे ते
    कामावर परततील,
  • 0:56 - 0:59
    तसा हा दर(R ) पुन्हा वाढेल .
  • 0:59 - 1:01
    हे कसे टाळावे याबद्दल तुमच्या कडे
    काही योजना आहे
  • 1:01 - 1:03
    काय आहे ती ?
  • 1:05 - 1:06
    उरी :हो नक्कीच .
  • 1:06 - 1:08
    हो आमची संकल्पना आधारित आहे ,
  • 1:08 - 1:13
    विषाणूच्या जैविक कमकुवतेवर .
  • 1:13 - 1:16
    ते एक चक्र आहे काम आणि निर्बंध यांचं .
  • 1:16 - 1:21
    जेंव्हा एखादी व्यक्ती संक्रमित होते ,
    तीन दिवसांपर्यंत ,
  • 1:21 - 1:24
    कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत
  • 1:24 - 1:27
    त्यामुळे संक्रमणाचा धोका तीन
    दिवस तरी नाही,
  • 1:27 - 1:29
    साधारणपणे दोन दिवसांनी ,
    लक्षणे दिसू लागतात .
  • 1:30 - 1:34
    आमचा असा प्रस्ताव आहे कि ,
  • 1:34 - 1:36
    ४ दिवस काम आणि १० दिवस टाळेबंदी,
  • 1:36 - 1:39
    आणि पुढचे २ आठवडे ;पुन्हा ४ दिवस
    काम आणि १० दिवस टाळेबंदी.
  • 1:39 - 1:43
    ह्याने काय होईल ,जर कोणी कामावर
    असताना संक्रमित झाला तर,
  • 1:43 - 1:46
    तर टाळेबंदी मध्ये तो संक्रमणाच्या
    उच्च पातळीवर जाईल,
  • 1:46 - 1:49
    त्यामुळे दुसर्यांना होणारे संक्रमण
    थांबेल .
  • 1:49 - 1:52
    ह्यामुळे रोगाचे संक्रमण थांबेल .
  • 1:53 - 1:55
    २ आठवडे आणि ४ दिवस काम ह्यामुळे विषाणूच्या
  • 1:55 - 1:58
    प्रसाराला निर्बंध पडेल .लोक कमी
    संक्रमित होतील ,
  • 1:58 - 2:00
    हा नक्कीच चांगला मार्ग आहे.
  • 2:00 - 2:02
    प्रत्येक जण ४ दिवस काम करू शकेल ,
  • 2:02 - 2:04
    मुले त्या ४ दिवसात शाळेत जाऊ शकतील,
  • 2:04 - 2:09
    हो पण सामाजिक अंतराचे भान ठेवत
    आणि मास्क चा योग्य वापर करत.
  • 2:09 - 2:11
    आणि पून्हा टाळेबंदी .
  • 2:12 - 2:15
    क्रिस : अत्यंत वाईट परिस्थितीचा
    विचार करता ,
  • 2:15 - 2:18
    तुमच्या त्या ४ दिवसांची सुरुवात सोमवार
    सकाळने झालीय ,आणि
  • 2:19 - 2:22
    तुम्ही कामावर येतानाच सबवे मध्ये
    संक्रमित झालाय ,
  • 2:22 - 2:26
    तुमच्या सिद्धान्ता नुसार ,४ दिवस
    संपताना तुम्ही,
  • 2:26 - 2:29
    तुमच्या सहकार्यांना कमीत कमी बाधित कराल.
  • 2:30 - 2:31
    उरी :अगदी बरोबर .
  • 2:31 - 2:33
    जर तुम्ही सबवे मध्ये
    संक्रमित झालाय ,
  • 2:33 - 2:36
    पहिले ३ दिवस तुम्ही प्राथमिक पातळीवर असाल,
  • 2:36 - 2:38
    तुमच्या सहकार्यांना कमी
    संक्रमित कराल,
  • 2:38 - 2:41
    संक्रमणाच्या उच्च पातळी वर
    असताना तुम्ही घरात असाल,
  • 2:41 - 2:43
    घरात संक्रमणाचा धोका कमी असेल ,
  • 2:43 - 2:47
    ह्याने लक्षणे असतील ते स्वतःला
    विलग ठेऊ शकतील ,
  • 2:47 - 2:50
    संक्रमण दर (र) १ पेक्षा जास्त नसेल ,
  • 2:50 - 2:53
    तर हे चक्र थांबेल,
  • 2:53 - 2:55
    प्रसार थांबेल .
  • 2:57 - 3:01
    क्रिस :हे खूप निराशाजनक आहे
  • 3:01 - 3:03
    लोक असे पण म्हणू शकतात कि ,
  • 3:03 - 3:05
    "थांबा मी घरातल्याना नाही संसर्ग करू शकत,
  • 3:05 - 3:08
    त्या पेक्षा मी माझ्या सहकार्यांना
    बाधित करेन ."
  • 3:08 - 3:10
    असं झालं तर काय होईल ?
  • 3:10 - 3:11
    उरी :हो ,असं होऊ शकतं.
  • 3:11 - 3:13
    तर आपल्याला दुसरा पर्याय पण शोधावा लागेल .
  • 3:13 - 3:16
    जर आपण टाळेबंदी उठवली आणि दुसरी लाट आली,
  • 3:16 - 3:19
    टाळेबंदी मध्ये टाळलेला संसर्ग तुम्हाला
    नक्कीच होणार आहे ,
  • 3:19 - 3:22
    जो अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम करेल ,
  • 3:22 - 3:24
    आणि जो दूरगामी असेल .
  • 3:25 - 3:26
    जर हे चक्रीय धोरण तुम्ही अमलात आणाल
  • 3:26 - 3:30
    ते सुद्धा संक्रमण दर (र) १ पेक्षा
    कमी ठेवत ,
  • 3:30 - 3:34
    गणिताच्या भाषेत तुम्ही सुरक्षित असाल ,
  • 3:34 - 3:38
    कारण दुसर्या लाटेमधे संसर्गाचा धोका
    जास्त असणार आहे .
  • 3:39 - 3:44
    क्रिस: हो कारण तुम्हाला आधी तुमच्या
    कुटुंबाचा विचार करायचाय.
  • 3:44 - 3:48
    उरी: जरी लोक संसर्गित असतील तरी
    घरातल्यानं पासून ते दूर राहतील .
  • 3:48 - 3:52
    सर्वेक्षणा नुसार ह्याचा संक्रमण दर
    १० ते ३० % च आहे .
  • 3:53 - 3:54
    क्रिस: अगदी बरोबर.
  • 3:54 - 3:57
    तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा निर्वाह
    पण करायचा आहे
  • 3:57 - 4:00
    ह्या रणनीती नुसार तुमच्या पैकी
    बऱ्याच लोकांना,
  • 4:00 - 4:02
    नाहीतरी संसर्ग होणारच आहे.
  • 4:02 - 4:04
    आता तरी हे असेच नियोजन आहे ,पण ...
  • 4:04 - 4:06
    उरी: बरोबर.
  • 4:07 - 4:10
    क्रिस:पण मला सांगा कोणीतरी म्हणेल कि ,
  • 4:10 - 4:12
    "१४ मधील फक्त ४ दिवस काम हे मस्त आहे ,"
  • 4:12 - 4:15
    पण ह्याचा अर्थव्यवस्थेच्या
  • 4:15 - 4:16
    उत्पादन क्षमतेवर ७०% परिणाम होईल
  • 4:16 - 4:18
    जे" अनपेक्षित" आहे .
  • 4:18 - 4:20
    उत्पादन क्षमतेचे नुकसान
  • 4:20 - 4:22
    कधीच नव्हते एवढे असेल .
  • 4:23 - 4:24
    उरी: बरोबर ,
  • 4:24 - 4:27
    कितीतरी लोक आठवड्याच्या शेवटी
    काम नाही करत ,
  • 4:27 - 4:29
    २ आठवड्यां मधील कामाचे १० दिवस
    आणि फक्त ४ दिवसच काम ,
  • 4:29 - 4:33
    जर एकदा तुमचं ४ दिवसांचं ,
  • 4:33 - 4:34
    वेळापत्रक निश्चित झालं ,
  • 4:34 - 4:35
    तर तुम्ही जास्त तास पण काम करू शकाल,
  • 4:35 - 4:38
    आणि उत्पदनता पण वाढवू शकता ,
  • 4:38 - 4:40
    तीही त्या ४ दिवसां मधेच .
  • 4:40 - 4:42
    ते हि ४०% ने .
  • 4:44 - 4:46
    क्रिस: त्या बद्दलच बोलूयात
    हे कसे काम करेल .
  • 4:46 - 4:50
    उत्पदना बद्दल बोलूयात जे कि,
  • 4:50 - 4:52
    सध्या बंद आहे .
  • 4:52 - 4:57
    उतपादकाला आता त्या ४ दिवसां मध्ये
  • 4:57 - 5:00
    कामाचे विभाजन २ ते ३ पाळ्यांमध्ये करत
  • 5:00 - 5:05
    जास्तीत जास्त उतपादन घ्यावे लागेल .
  • 5:05 - 5:09
    कामाचे तास ३५ तासांपर्यंत वाढवावे लागतील ,
  • 5:09 - 5:13
    ह्या पद्धतीने सतत काम सुरुच ठेवावे
    लागेल का ?
  • 5:13 - 5:15
    उरी: नक्कीच .
  • 5:15 - 5:18
    हो हि या कल्पनेची नवीन आवृत्ती असेल ,
  • 5:18 - 5:22
    सगळी लोकसंख्या जर तुम्ही २ ते ३
    गटात विभागली
  • 5:22 - 5:26
    जेंव्हा एक गट ४ दिवस काम आणि
    १० दिवस टाळेबंदी पाळेल
  • 5:26 - 5:29
    त्यांचं काम झाल्यानंतर दुसरा गट आत येईल
  • 5:29 - 5:32
    हि कल्पना बार अॅलन युनिव्हर्सिटी
    मधील सहकार्याची आहे .
  • 5:32 - 5:36
    ह्याचा फायदा हा असेल कि ,कामाच्या वेळी
    अर्धीच संख्या असल्याने
  • 5:36 - 5:38
    आणि २ गट असल्यामुळे ,
  • 5:38 - 5:40
    संसर्गाचा धोका हि अर्ध्याने कमी होईल .
  • 5:40 - 5:45
    आणि तुम्ही सतत उत्पादन हि सुरु ठेवू शकता.
  • 5:45 - 5:46
    चकित करणारी कल्पना आहे ना .
  • 5:49 - 5:54
    क्रिस: आता ऑफिसला परत जाण्या
    बद्दल बोलूयात --
  • 5:54 - 5:57
    माझ्या असं बघण्यात आलं कि ,
  • 5:57 - 6:00
    घरात असताना लोकांची कार्यक्षमता
    जास्त असते
  • 6:00 - 6:04
    त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर असतं
  • 6:04 - 6:07
    त्या ४ दिवसात जेंव्हा ते पुन्हा
    कामावर जातात ,
  • 6:07 - 6:11
    त्यांचा वेळ बोलण्यात ,भांडण्यात ,
  • 6:11 - 6:15
    वैचारीक मतभेदात जातो .
  • 6:15 - 6:18
    पण घरी असताना ते फक्त एकच गोष्ट करत असतात
  • 6:18 - 6:20
    जे कि काही आठवड्याने पासून करत होते ,
  • 6:20 - 6:22
    एकट्याने काम.
  • 6:22 - 6:24
    ह्याबद्दल काहि विचार केला आहे तुम्ही ,
  • 6:24 - 6:29
    हि संकल्पना वापरून
  • 6:29 - 6:31
    दोन प्रकारात कामाची विभागणी शक्य आहे का
  • 6:31 - 6:34
    ज्याने उतपादन क्षमता आधी पेक्षा हि
    जास्त वाढवता येऊ शकेल ?
  • 6:35 - 6:38
    उरी:नक्कीच --कितीतरी क्षेत्रातील लोक
    घरातूनच चांगलं काम करत आहेत ,
  • 6:38 - 6:40
    कितीतरी क्षेत्रातून आम्हाला समजलं कि
  • 6:40 - 6:43
    त्यांची क्षमता टाळेबंदी मध्ये सुद्धा
    वाढली आहे
  • 6:43 - 6:45
    आणि लोक घरातूनच काम
    करत होते .
  • 6:45 - 6:47
    जर तुम्ही कामाचे व्यवस्थित नियोजन केले,
  • 6:47 - 6:49
    तर तुम्ही पैसे हि वाचवू शकता ,
  • 6:49 - 6:52
    आणि जेंव्हा एकत्र काम करायची गरज असेल
  • 6:52 - 6:54
    त्याच हि नियोजन करू शकता .
  • 6:54 - 6:57
    तेही वेळेचा अपव्यय टाळून ,
  • 6:57 - 6:59
    एखाद्या व्यक्तीचे काम घरी असताना
    जास्त परिणामकारक आणि
  • 6:59 - 7:02
    कामावर असताना अजून जास्त
    उत्पादनक्षम हवे असल्यास
  • 7:02 - 7:05
    काही क्षेत्रांना तडजोड करावी लागेल,
  • 7:05 - 7:06
    जसे कि हॉटेल्स ,पर्यटन ,भोजनालय .
  • 7:06 - 7:10
    काही क्षेत्रांना जास्त चांगला विचार आणि
    तडजोड करावी लागेल.
  • 7:10 - 7:13
    बाकीच्या उद्योगांनी मात्र हि कल्पना
    अमलात आणली आहे .
  • 7:13 - 7:17
    साथीचा फैलाव आटोक्यात आल्यावर हि
    ह्यावर विचार करावा,
  • 7:17 - 7:20
    कारण ह्या मूळे उत्पादन क्षमतेवर
    काही परिणाम नाही होणार.
  • 7:21 - 7:25
    क्रिस:मी जेंव्हा हे वाचलं तेंव्हा माझ्या
    डोक्यात आपले "टेड"आले
  • 7:25 - 7:29
    आपण कसा ,किती पद्धतीने युक्तिवाद करू शकतो.
  • 7:30 - 7:31
    ह्या एका गोष्टी साठी तरी,
  • 7:31 - 7:34
    दोन प्रकारचे लोक आहेत अंतर्मुख
    आणि बहिर्मुख .
  • 7:34 - 7:35
    अंतर्मुख लोक असे म्हणतील कि,
  • 7:36 - 7:39
    हि तर त्यांच्या साठी दैवीय योजना आहे .
  • 7:39 - 7:42
    कामाचा तणाव कमी असणार आहे .
  • 7:42 - 7:44
    ४ दिवस काम आणि ४ दिवस आराम ह्या पद्धतीने,
  • 7:45 - 7:49
    ते अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतील.
  • 7:49 - 7:51
    कदाचित अशा विश्वाची तुम्ही कल्पना
    करू शकता
  • 7:51 - 7:55
    जे कि दोन्ही प्रकारच्या लोकां साठी
    अनुकूल असेल?
  • 7:56 - 7:57
    उरी :कदाचित .
  • 7:57 - 7:59
    हो मला हि असच वाटतंय .
  • 7:59 - 8:01
    मी आणि माझा सहकारी आमची दोन
    वेगळी व्यक्तिमत्व आहेत,
  • 8:01 - 8:03
    आम्ही दोघे ही युनिव्हर्सिटी
    मध्ये शिकवतो,
  • 8:03 - 8:05
    अशा पद्धतीने शिकवण्या मूळे
  • 8:05 - 8:07
    काही अंशी मी जास्त प्रगल्भ झालो .
  • 8:08 - 8:09
    मी तरी हे नक्कीच मान्य करतो ,
  • 8:09 - 8:13
    मला वाटते ह्या मूळे लोक कामाशी
    बांधून राहतील,
  • 8:13 - 8:17
    हि तरी फक्त सुरुवातच आहे
    अशा मिश्र पद्धतीची .
  • 8:18 - 8:21
    क्रिस:पण त्या लोकांचे काय जे कि
    पुढच्या फळी मध्ये काम करतात ,
  • 8:21 - 8:27
    जसे कि वितरण
  • 8:27 - 8:29
    ते तर तुम्ही घरी बसून नाही करू शकत ,
  • 8:29 - 8:30
    ह्या बद्दल काही विचार आहे का
  • 8:30 - 8:34
    ४ दिवस काम आणि नंतर विलगीकरण ,
  • 8:34 - 8:37
    हे कसं काम करेल .
  • 8:37 - 8:39
    त्यांचं काम सुरू राहण्यासाठी,
  • 8:39 - 8:42
    काही वेगळ्या प्रशिक्षणाची गरज असेल का ?
  • 8:42 - 8:48
    किंवा त्यांनी ४ दिवसात संपूर्ण काम
    हि पूर्ण करायचे आहे ,
  • 8:48 - 8:54
    तरी त्यांना त्यांचं पूर्ण वेतन नाही
    मिळणार नाही,
  • 8:54 - 8:56
    पण हे काहींचं काम नसण्या
    पेक्षा चांगलं आहे ,
  • 8:56 - 8:59
    आणि कामावर परत जाण्यापेक्षा ही ,
    तेही ह्या संक्रमणामध्ये ?
  • 9:01 - 9:02
    उरी: अगदी बरोबर.
  • 9:02 - 9:03
    ह्या दुसऱ्या लाटे मध्ये आता ,
  • 9:03 - 9:06
    सामाजिक स्तरावर सगळे सुरु होणे जरुरी आहे
  • 9:06 - 9:07
    पण टाळेबंदी सुद्धा जरुरी आहे.
  • 9:07 - 9:09

    जसे कि हॉस्पिटल मध्ये
    काम करणारे लोक ,
  • 9:09 - 9:13
    आणि काही हॉस्पिटल हीच कल्पना वापरत आहेत.
  • 9:13 - 9:16
    ज्यामुळे लोक सुरक्षित ही राहतील आणि
    जास्त गर्दी हि नाही होणार .
  • 9:16 - 9:18
    हे अगदी सरळ आणि स्पष्ट आहे.
  • 9:18 - 9:20
    ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर तुमचा
    विश्वास तेंव्हाच बसेल,
  • 9:20 - 9:25
    जेंव्हा तुम्ही खरेच कामाला सुरुवात कराल .
  • 9:25 - 9:28
    याचे परिणाम तेंव्हाच स्पष्ट होतील .
  • 9:28 - 9:32
    फक्त निवडक क्षेत्रातच नाही तर ,
  • 9:32 - 9:34
    प्रत्येकालाच कामावर जाता येईल ,
    हेच उचित असेल
  • 9:34 - 9:36
    हे अगदी स्पष्ट आहे.
  • 9:36 - 9:38
    [क्रॉस टॉक ]
  • 9:40 - 9:43
    क्रिस: असे करणेच उत्तम होईल
  • 9:43 - 9:45
    एकाच वेळी कंपनीत
  • 9:45 - 9:47
    किंवा एकाच शहरात,
  • 9:48 - 9:50
    किंवा एकदाच एका देशात ह्याची
    अंमलबजावणी करता येईल ?
  • 9:52 - 9:54
    उरी:आम्हाला वाटते हे काम करेल
    [काही ठिकाणी तरी ].
  • 9:54 - 9:58
    काही उद्योगां मध्ये हे अगदी नैसर्गिक पणे
    ,अमलात आणता येईल
  • 9:58 - 10:00
    किंवा हॉस्पिटल्स ,शाळा ,ई.
  • 10:00 - 10:03
    किंवा काही स्तरावर शहराचा भाग ,शहर
  • 10:03 - 10:07
    आम्ही निदान महिनाभरासाठी ह्याचा सल्ला देउ
    ,
  • 10:07 - 10:09
    पण संसर्ग वाढतोय का ह्यावर हि लक्ष असेल .
  • 10:09 - 10:13
    त्यावेळी तुम्ही कामाचे दिवस वाढवायचे कि ,
  • 10:13 - 10:16
    कमी करायचे ते ठरवावे लागेल .
  • 10:16 - 10:20
    व्यक्तीला त्याच्या वातावरण,जागा
    ह्याचा विचार करत
  • 10:21 - 10:23
    परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
  • 10:23 - 10:25
    क्रिस :उदा. कामाचा आणि शाळेचा
    ताळमेळ करताना ,
  • 10:25 - 10:27
    कधी पालकांना कामावर जावे लागेल
  • 10:27 - 10:35
    तर कधी मुलांना शाळेत जावे लागेल ,तेंव्हा--
  • 10:35 - 10:36
    उरी:अगदी.
  • 10:36 - 10:38
    क्रिस : माझ्या मते जसे हे अमलात येईल
  • 10:38 - 10:41
    तसा देश कामाची विभागणी काही भागात करेल
  • 10:41 - 10:45
    जसे प्रकार अ,प्रकार ब आणि तसेच अजून काही,
  • 10:45 - 10:48
    अशा प्रकारची व्यवस्था शक्य आहे का ?
  • 10:49 - 10:50
    उरी: नक्कीच.
  • 10:50 - 10:54
    जर तुम्ही घरातल्या कामांची व्यवस्थित
    विभागणी केली तर ,
  • 10:54 - 10:56
    सगळे सध्या होईल मुले शाळेत जातील ,
    लोक ऑफिसला जाऊ शकतील ,
  • 10:56 - 10:58
    सगळे सुरळीत चालेल .
  • 10:58 - 11:01
    आणि दुसरा गट पण असेच आलटूनपालटून करेल.
  • 11:01 - 11:04
    काही लोक मात्र पूर्ण वेळ काम करतच होते.
  • 11:04 - 11:08
    जसे कि शिक्षक ,अत्यावश्यक सेवा देणारे
    लोक सतत काम करतच होते .
  • 11:08 - 11:10
    संपूर्ण टाळेबंदी च्या काळात हि
  • 11:10 - 11:12
    हे लोक काम करत होते .
  • 11:13 - 11:16
    काही अर्थाने हे सुरक्षित होते,
  • 11:16 - 11:18
    कारण तेंव्हा संक्रमण दार( र)१ पेक्षा
    हि कमी होता ,
  • 11:19 - 11:22
    त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होता .
  • 11:23 - 11:27
    क्रिस : आता आपण डेव्हिड बीएल्लो
    यांच्या सोबत बोलूयात ,डेव्हिड.
  • 11:27 - 11:29
    डेव्हिड: नमस्कार ,कसे आहेत सगळे.
  • 11:29 - 11:31
    उरी, खूप प्रश्न आहेत आता,
  • 11:31 - 11:33
    प्रेक्षकांकडून
  • 11:33 - 11:35
    आणि आता पहिला प्रश्न
  • 11:35 - 11:40
    अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांबद्दल
  • 11:40 - 11:45
    याचा काय परिणाम असेल अत्यावश्यक
    वैद्यकीय सेवा देणारे ,आणि इतर यांच्या वर
  • 11:45 - 11:51
    ज्यांच्या कडे टाळेबंदी च्या काळात
    बिलकुलच वेळ नव्हता
  • 11:51 - 11:52
    तुम्ही सुचवल्या प्रमाणे.
  • 11:53 - 11:54
    उरी: चांगला प्रश्न आहे.
  • 11:54 - 11:57
    माझ्या मते खूप असे लोक आहेत
    अत्यावश्यक सेवादेणारे ,
  • 11:57 - 12:01
    कमी उत्पन्न असणारे ,जे घरात बसून
    नाही राहू शकत
  • 12:01 - 12:03
    त्यांना घर चालवण्यासाठी काम
    करणे जरुरी आहे .
  • 12:03 - 12:09
    अभ्यासानुसार टाळेबंदी च्या काळात
    कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांमध्ये
  • 12:09 - 12:10
    संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे .
  • 12:10 - 12:14
    विकसनशील देशांमध्ये लोकांना
    कामावर जावेच लागते .
  • 12:14 - 12:16
    तुम्ही टाळेबंदी ची जबरदस्ती
    नाही करू शकत .
  • 12:16 - 12:21
    तर हि ४-१० ची रणनीती टाळेबंदीला
    सुसह्य करेल
  • 12:21 - 12:25
    जिथे कि लोक जगणं सुरु ठेवू शकतील
  • 12:25 - 12:27
    त्यासाठीचा पर्याय शोधू शकतील
  • 12:27 - 12:30
    कधी काम करायचे आणि कधी घरात
    थांबायचे हे ठरवू शकतील .
  • 12:30 - 12:33
    कितीतरी क्षेत्रांच्या अनियमित पालनामुळे ,
  • 12:33 - 12:37
    बरेच देश संक्रमण दर (र) वाढण्या पासून
    वाचवू नाही शकले .
  • 12:37 - 12:41
    आमचा विश्वास आहे ४-१० ची रणनीती
    निश्चितच टाळेबंदीला सुसह्य करेल
  • 12:41 - 12:44
    संक्रमण कमी करेल.
  • 12:44 - 12:47
    ज्यामुळे जगात करोडो लोक ग्रसित आहेत .
  • 12:48 - 12:50
    मला वाटतेय कि मी तुमच्या
    प्रश्नाचे उत्तर दिले आहे .
  • 12:51 - 12:52
    डेव्हिड: हो मलाही वाटतेय ,
  • 12:52 - 12:55
    माझ्याकडे एक प्रश्न आहे ,
  • 12:55 - 12:58
    जो कि यानंतर येतो ,
  • 12:58 - 13:00
    तो कोणता :
  • 13:00 - 13:02
    ४-१० च्या रणनीती नंतरहि
    संक्रमण वाढू शकते ,
  • 13:02 - 13:07
    याचे काही गणित तुम्ही मांडले आहे का ?
  • 13:09 - 13:12
    उरी: आमच्या सर्वेक्षणानुसार संसर्गाचा
    धोका वाढू शकतो ,
  • 13:12 - 13:15
    याचेही संवेदनशील विश्लेषण केले आहे .
  • 13:15 - 13:19
    प्रश्न राहतो वाढलेल्या संसर्गाची
    तुलना कशा सोबत करायची ?
  • 13:19 - 13:21
    तर ती अर्थव्यवस्थे सोबत .....
  • 13:21 - 13:23
    दुसऱ्या संक्रमण लाटेची शक्यता आहे.
  • 13:23 - 13:26
    असे होऊ नाही असे वाटते, पण शक्यता
    नाकारता नाही येत,
  • 13:26 - 13:31
    आणि त्या वेळी दुसरी लाट आणि
    टाळेबंदी हि नाही टाळता येणार.
  • 13:31 - 13:35
    याचे खुप वाईट परिणाम आरोग्यावर होतील
  • 13:36 - 13:39
    ४-१० च्या रणनीती सोबत तुलना करता.
  • 13:39 - 13:44
    आता खरंच असा प्रश्न आहे कि तुलना
    करायची कशा सोबत.
  • 13:46 - 13:48
    डेव्हिड: खरं आहे .
  • 13:48 - 13:51
    उरी, आभारी आहे या संकल्पने साठी .
  • 13:53 - 13:56
    क्रिस: नक्कीच .
  • 13:56 - 13:57
    डेव्हिड थांबा जरा ,
  • 13:57 - 13:58
    डेव्हिड थांबा जरा :
  • 13:58 - 14:03
    कोणते देश हि संकल्पना अवलंबवत आहेत का?
  • 14:03 - 14:06
    देशांतर्गत धोरणा प्रमाणे
  • 14:06 - 14:08
    खरेच लोक वागत आहेत का ?
  • 14:09 - 14:13
    उरी : हो, आम्ही बऱ्याच युरोपिअन
    देशांच्या संपर्कात आहोत
  • 14:13 - 14:17
    जसे कि दक्षिण अमेरिका ,इस्राईल ,इत्यादी .
  • 14:17 - 14:21
    ऑस्ट्रिया ने तर हे धोरण शाळां साठी
    हि वापरले आहे
  • 14:22 - 14:27
    जे कि ५ दिवस शाळा ती हि
    आठवड्याच्या अंतराने.
  • 14:27 - 14:32
    काही उद्योग ,हॉस्पिटल्स हि हेच करत आहेत .
  • 14:32 - 14:37
    आता आम्ही खूप उत्सुक आहोत
    कि हे कसे काम करेल.
  • 14:38 - 14:41
    क्रिस : मला सुरुवातच खरेतर खूप आवडलीय
  • 14:41 - 14:44
    ज्यामध्ये आपण शत्रूच्या कमतरतेवरच
    घाव घालतो ते .
  • 14:44 - 14:47
    जे आहेत सुरवातीचे ४ दिवस
  • 14:47 - 14:53
    जे दुसर्यां साठी एवढे घातक नाही ठरत
  • 14:53 - 14:56
    आणि तुम्हाला आधीच कळलं तर फारच चांगलं .
  • 14:56 - 14:59
    पूर्व तपासण्या खूप महत्वाची भूमिका
    निभावतील,बरोबर?
  • 14:59 - 15:01
    कामावर रुजू होण्या आधीच तपासणी
    करणे चांगले असेल ---
  • 15:01 - 15:04
    उरी:प्राथमिक तपासणी मध्ये
    काही साध्य नाही होणार.
  • 15:04 - 15:06
    इथे तपासणी हा मार्ग नाही
  • 15:06 - 15:09
    नाहीतर अशा खूप तपासण्या कराव्या लागतील,
  • 15:09 - 15:12
    तपासणी चा योग्य प्रकारे उपयोग
    करून घेता येईल
  • 15:12 - 15:15
    लोक जेंव्हा कामावर पुन्हा रुजू होतील ,
  • 15:15 - 15:17
    त्या १० दिवसाच्या शेवटी केलेली
    तपासणी योग्य असेल ,
  • 15:17 - 15:19
    तेंव्हा तपासणीचा अहवाल जास्त
    प्रभावी असेल
  • 15:19 - 15:21
    ज्यामुळे संक्रमण दर(र) कमी
    ठेवण्यात यश येईल .
  • 15:21 - 15:24
    क्रिस:नक्कीच ,सगळ्या जनतेची दर
    ३-४ दिवसांनी,
  • 15:24 - 15:25
    तपासणी करण्यापेक्षा ,
  • 15:25 - 15:27
    दोन आठवड्यात एकदा हे जास्त
    सोयीस्कर असेल.
  • 15:27 - 15:30
    हे अगदी साध्य आहे .
  • 15:31 - 15:33
    उरी: नक्कीच
  • 15:33 - 15:34
    क्रिस : हो .
  • 15:34 - 15:37
    उरी खूप खूप धन्यवाद तुमचा
    वेळ दिल्याबद्दल .
Title:
कोविड१९ ची टाळेबंदी बंद करत अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याची "रणनीती"
Speaker:
उरी अलोन,क्रिस आंदर्सन
Description:

कोरोना विषाणूचे दुसरे संक्रमण टाळत आपण पुन्हा कामावर कसे जाणार ?जीवशास्त्रवेत्ता उरी आलोन यांची विचार करण्या जोगी रणनीती :४ दिवस काम आणि १० दिवस टाळेबंदी याने विषाणूच्या पुनर्निर्मितीच्या चक्राला भेदता येईलआणि संक्रमण दर (र) नियंत्रित करता येईल .जाणून घेऊयात हा दृष्टिकोन --- जो काही देशांनी ,उद्योगांनी आधीच अमलात आणायला सुरुवात केलीय --आणि हा कसा अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यात उपयोगी ठरेल . (टेड चे मुख्य अधिकारी क्रिस अँडरसन आणि विज्ञान प्रमुख डेव्हिड बीएल्लो यांनी आयोजित केलेले आभासी संभाषण २० मे २०२० ला नोंदवले आहे )

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
15:50

Marathi subtitles

Revisions