Return to Video

हत्ती कधीच काही विसरत नाहीत. का बरं?

  • 0:07 - 0:11
    हत्ती कधीच काही विसरत नाहीत,
    अशी एक म्हण आहे.
  • 0:11 - 0:15
    पण हा विशाल प्राणी म्हणजे केवळ चालती फिरती
    अजस्त्र हार्डड्राइव्ह नव्हे.
  • 0:15 - 0:17
    हत्तींबद्दल आपण जितकं जास्त शिकू,
  • 0:17 - 0:19
    तितकं लक्षात येतं,
    की त्यांची विलक्षण स्मरणशक्ती
  • 0:19 - 0:22
    हा त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा
    केवळ एक भाग आहे.
  • 0:22 - 0:25
    त्यामुळे संगतिप्रिय, सृजनशील
    आणि परोपकारी प्राण्यांमध्ये
  • 0:25 - 0:28
    त्यांची गणना होते.
  • 0:28 - 0:30
    सगळ्या म्हणी नसतील, पण
    हत्तींच्या स्मरणशक्तीची म्हण
  • 0:30 - 0:33
    वैज्ञानिक दृष्ट्या अचूक आहे.
  • 0:33 - 0:35
    हत्ती आपल्या कळपातला
    प्रत्येक सदस्य ओळखतात.
  • 0:35 - 0:40
    साधारणपणे आपले तीस सोबती
    ते पाहून किंवा वासाने ओळखू शकतात.
  • 0:40 - 0:42
    याचा उपयोग स्थलांतर करताना
  • 0:42 - 0:45
    किंवा आक्रमक हत्तींचा सामना करताना होतो.
  • 0:45 - 0:50
    धोक्याचे विशिष्ट संकेत त्यांना आठवतात,
    आणि ते निरनिराळे ओळखता येतात.
  • 0:50 - 0:54
    एखादं विशेष ठिकाण बऱ्याच काळानंतरही
    त्यांना आठवू शकतं.
  • 0:54 - 0:58
    पण जीव वाचवण्याखेरीज
    त्यांची इतर स्मरणशक्ती जास्त मनोहर आहे.
  • 0:58 - 1:02
    हत्तींना त्यांच्या कळपातले हत्तीच नव्हे,
  • 1:02 - 1:06
    तर त्यांच्या मनावर ठसा उमटवणारे
    इतर हत्तीही आठवतात.
  • 1:06 - 1:10
    एका सर्कशीत थोडासाच काळ एकत्र काम केलेले
    दोन हत्ती २३ वर्षांनी एकमेकांना सामोरे आले
  • 1:10 - 1:15
    तेव्हा त्यांनी आनंदाने ओळख दिली.
  • 1:15 - 1:19
    हत्ती फक्त हत्तींनाच ओळखत नाहीत, तर
  • 1:19 - 1:23
    कधीकाळी ज्यांच्याशी बंध निर्माण झाले होते,
    अशा माणसांनाही अनेक दशकांनंतर ओळखतात.
  • 1:23 - 1:29
    यावरून सिद्ध होतं, की हत्तींची स्मरणशक्ती
    ही केवळ प्रतिक्रिया नसते.
  • 1:29 - 1:31
    त्यांच्या मस्तकात डोकावून पाहिलं तर
    असं का, ते समजेल.
  • 1:31 - 1:35
    हत्तीचा मेंदू कोणत्याही सस्तन
    भूचर प्राण्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो.
  • 1:35 - 1:38
    त्यांचं मस्तिष्क आकारमान गुणोत्तर (EQ)
    चांगलं असतं. म्हणजे,
  • 1:38 - 1:41
    मेंदूचं प्रत्यक्ष आकारमानाचं
    अपेक्षित* आकारमानाशी गुणोत्तर.
  • 1:41 - 1:42
    (*प्राण्याच्या आकारावर अवलंबून)
  • 1:42 - 1:47
    हत्तीचा EQ जास्त, म्हणजे साधारण
    चिंपांझीइतका असतो.
  • 1:47 - 1:49
    माणसाशी फारसं साम्य नसतानाही,
  • 1:49 - 1:53
    केंद्राभिमुख उत्क्रांतीमुळे हत्तीचा मेंदू
    मानवी मेंदूशी उल्लेखनीय साम्य दाखवतो.
  • 1:53 - 1:55
    तितक्याच चेतापेशी आणि सायनॅप्सेस,
  • 1:55 - 2:00
    अतिशय प्रगत हिप्पोकॅम्पस
    आणि सेरेब्रल कॉर्टेक्स.
  • 2:00 - 2:04
    हिप्पोकॅम्पसचा भावनांशी जवळचा संबंध असतो.
  • 2:04 - 2:09
    महत्त्वाच्या अनुभवांचे रूपांतर तो
    दीर्घकालीन स्मृतींमध्ये करतो.
  • 2:09 - 2:12
    हे महत्त्व जाणण्याच्या क्षमतेमुळे
    हत्तींची स्मरणशक्ती
  • 2:12 - 2:17
    म्हणजे निव्वळ पाठांतर नसून
    एक विकसित, लवचिक शक्ती आहे.
  • 2:17 - 2:20
    यामुळेच, लहान वयात
    दुष्काळातून वाचलेले हत्ती
  • 2:20 - 2:23
    मोठेपणी दुष्काळाची चिन्हं ओळखू शकतात.
  • 2:23 - 2:27
    म्हणून, ज्या कळपांत वयोवृद्ध हत्ती असतात,
    ते कळप टिकून राहण्याचं प्रमाण जास्त असतं.
  • 2:27 - 2:32
    पण दुर्दैवाने याच कारणामुळे हत्तींमध्ये
    आघातपश्चात तणाव विकार आढळतो. (PTSD)
  • 2:32 - 2:35
    माणसाशिवाय फार कमी प्राण्यांना
    हा विकार होतो.
  • 2:35 - 2:38
    हत्तींच्या सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये
    समस्यांची उकल करण्याची क्षमता असते.
  • 2:38 - 2:42
    त्यांच्या सृजनशीलतेमधून
    ती अनेक प्रकारे प्रकट होते.
  • 2:42 - 2:44
    हत्ती परस्पर सहकार्याने समस्या सोडवतात.
  • 2:44 - 2:49
    चतुरपणे दुसऱ्या हत्तींकडून काम करून घेतात.
    कधी संशोधकांवरही मात करतात.
  • 2:49 - 2:53
    त्यांना मूलभूत गणित येतं.
  • 2:53 - 2:57
    सफरचंदांची संख्या बदलली, तरी तुलनेने
    कोणती जास्त वा कमी हे त्यांना समजतं.
  • 2:57 - 3:00
    स्मरणशक्ती, आणि
    समस्यांची उकल करण्याची क्षमता
  • 3:00 - 3:03
    यांचा दुर्मिळ मिलाफ, हे काही वेळा
    हत्तींच्या चतुराईचं कारण असतं.
  • 3:03 - 3:06
    पण आपल्याला नुकतेच समजू लागलेले
    त्यांचे इतर मनोव्यापार
  • 3:06 - 3:08
    त्यातून स्पष्ट होत नाहीत.
  • 3:08 - 3:12
    देहबोलीचे इशारे व आवाज वापरून
    हत्ती संवाद साधतात.
  • 3:12 - 3:16
    त्यांची निम्न आवाजातली खरखर
    काही किलोमीटर्सपर्यंत ऐकू जाते.
  • 3:16 - 3:21
    वाक्यरचनेची त्यांची समज पाहता, त्यांची एक
    निराळी भाषा आणि व्याकरण असावी, असं वाटतं.
  • 3:21 - 3:26
    त्यांचं भाषेचं ज्ञान साध्या संवादापेक्षा
    जास्त प्रगत असावं.
  • 3:26 - 3:29
    निरनिराळे रंग आणि घटक काळजीपूर्वक निवडून,
    ते एकत्र मिसळून
  • 3:29 - 3:32
    हत्ती कलाकृती निर्माण करतात.
  • 3:32 - 3:37
    ते संगीतातले बारा स्वर निरनिराळे ओळखू शकतात,
    आणि ऐकलेल्या चालींची पुनरावृत्ती करू शकतात.
  • 3:37 - 3:39
    हो, हत्तींचा बँडदेखील आहे.
  • 3:39 - 3:42
    पण त्यांची सर्वात विलक्षण क्षमता
  • 3:42 - 3:46
    त्यांच्या चातुर्यापेक्षाही महत्त्वाची आहे.
  • 3:46 - 3:51
    ती म्हणजे
    समानुभूती, परोपकार आणि न्याय यांची जाणीव.
  • 3:51 - 3:54
    हत्ती हा, मृतांसाठी शोक करणारा
    मानवाव्यतिरिक्त एकमेव प्राणी आहे.
  • 3:54 - 3:58
    तो अंत्यसंस्कार करतो, आणि
    पुन्हा तिथे स्मरणार्थ जातो.
  • 3:58 - 4:02
    हत्ती इतर प्राण्यांविषयीही आस्था दाखवतात.
  • 4:02 - 4:05
    एका कामकरी हत्तीने एका खड्ड्यात
    ओंडका लोटायला नकार दिला,
  • 4:05 - 4:08
    कारण त्या खड्ड्यात एक कुत्रा झोपला होता.
  • 4:08 - 4:11
    काहीवेळा जखमी माणसांना पाहून
    हत्तींनी त्यांच्यावर पहारा दिला आहे,
  • 4:11 - 4:15
    आणि सोंडेच्या हळुवार स्पर्शाने
    त्यांना दिलासा दिला आहे.
  • 4:15 - 4:18
    याउलट, हत्तीवध किंवा हत्तींना पकडण्याच्या
    घटनांनंतर,
  • 4:18 - 4:21
    हत्तींनी लगेच गावांवर हल्ले केले आहेत.
  • 4:21 - 4:24
    यातून दिसते, ती
    जाणीवपूर्वक बदला घेण्याची भावना.
  • 4:24 - 4:26
    या सर्व पुराव्याबरोबर
    हेही एक ध्यानात घ्या,
  • 4:26 - 4:29
    फार कमी प्राणी आरशात स्वतःला ओळखू शकतात.
  • 4:29 - 4:31
    हत्ती त्यापैकी एक आहे.
  • 4:31 - 4:33
    यावरून अनुमान काढता येतं, की
  • 4:33 - 4:37
    हत्ती हे सावध, हुशार,
    आणि भावनाप्रधान प्राणी आहेत.
  • 4:37 - 4:42
    दुर्दैवाने या अनुमानाकडे दुर्लक्ष करून
    माणसं हत्तींना वाईट वागणूक देतात.
  • 4:42 - 4:46
    आशिया खंडात त्यांची वसतिस्थानं
    नष्ट केली जातात.
  • 4:46 - 4:51
    आफ्रिकेत हस्तिदंतासाठी त्यांची हत्या होते.
    इतर ठिकाणी बंदिवासात त्यांचे हाल होतात.
  • 4:51 - 4:53
    आज आपल्याला हत्तींबद्दल असलेलं ज्ञान
  • 4:53 - 4:56
    आणि त्यातून प्राण्यांच्या बुद्धिमत्तेविषयी
    मिळालेली शिकवण पाहता,
  • 4:56 - 4:59
    इंग्रज कवी जॉन डन ज्या प्राण्याला
  • 4:59 - 5:04
    "निसर्गाचा एक उत्कृष्ठ आविष्कार" म्हणतात,
    तो जगाच्या कॅनव्हासवरून अदृश्य होऊ नये,
  • 5:04 - 5:07
    म्हणून त्याचं रक्षण करणं आज
    अतिशय महत्त्वाचं ठरलं आहे.
Title:
हत्ती कधीच काही विसरत नाहीत. का बरं?
Speaker:
अलेक्स जेंडलर
Description:

पूर्ण धडा येथे पहा: http://ed.ted.com/lessons/why-elephants-never-forget-alex-gendler

हत्ती कधीच काही विसरत नाहीत, असं म्हटलं जातं. पण हत्तींबद्दल आपण जितकं जास्त शिकू, तितकं लक्षात येतं, की त्यांची विलक्षण स्मरणशक्ती हा त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा केवळ एक भाग आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांची गणना पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात संगतिप्रिय, निर्मितीक्षम, आणि परोपकारी प्राण्यांमध्ये होते. अलेक्स जेंडलर आपल्याला घेऊन जाताहेत हत्तींच्या विस्मयकारी आणि अविस्मरणीय अशा मनात.

शिक्षक: अलेक्स जेंडलर, ऍनिमेशन: अवि ओफर.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
05:23
Abhinav Garule approved Marathi subtitles for Why elephants never forget
Arvind Patil accepted Marathi subtitles for Why elephants never forget
Smita Kantak edited Marathi subtitles for Why elephants never forget
Smita Kantak edited Marathi subtitles for Why elephants never forget
Smita Kantak edited Marathi subtitles for Why elephants never forget
Smita Kantak edited Marathi subtitles for Why elephants never forget
Smita Kantak edited Marathi subtitles for Why elephants never forget
Smita Kantak edited Marathi subtitles for Why elephants never forget

Marathi subtitles

Revisions