< Return to Video

ब्लॉकलीबरोबर स्टार वॉर्स - अवर ऑफ कोड: इव्हेंट्स

  • 0:00 - 0:05
    हॅलो, मी चरिता कार्टर. मी वॉल्ट डिस्ने
    इमॅजिनिअरिंगमध्ये सिनिअर क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे.
  • 0:05 - 0:10
    आमच्या पाहुण्यांना आवडतील अशी आकर्षणे
    तयार करणाऱ्या टीम्सची मी प्रमुख आहे.
  • 0:10 - 0:17
    आम्ही नेहमी अधिक सुधारणा करण्याचे आणि आमच्या पाहुण्यांना अधिक चांगला अनुभव देण्याचे मार्ग
  • 0:17 - 0:21
    शोधत असतो. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे
    ते म्हणजे तंत्रज्ञान.
  • 0:21 - 0:28
    अभिनंदन! छान कामगिरी केलीत! तुम्ही बीबी-8 चे
    प्रोग्रॅमिंग केले आहे. आता आपण थोडंसं अवघड
  • 0:28 - 0:33
    काहीतरी करण्यासाठी तयार आहोत. चला, करूया. तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत गोष्टी शिकला आहात, आपण
  • 0:33 - 0:40
    तुमचा स्वत:चा गेम तयार करण्यासाठी मागे जाणार आहोत. यात आर2डी2 आणि सी3पीओ असतील. गेम
  • 0:40 - 0:46
    तयार करण्यासाठी गेम प्रोग्रॅमर्स रोज वापरतात ती गोष्ट शिकायला हवी: त्यांना इव्हेंट्स म्हणतात.
  • 0:46 - 0:51
    इव्हेंट्स तुमच्या प्रोग्रॅमला ऐकायला किंवा काहीतरी होण्याची वाट पाहायला सांगतात. आणि ते घडले की
  • 0:51 - 0:57
    मग प्रोग्रॅम एक कृती करतो. इव्हेंटची उदाहरणे
    म्हणजे माऊस क्लिक होणे, अॅरो बटण
  • 0:57 - 1:03
    किंवा स्क्रीन टॅप केला गेल्याचे ऐकणे.
    इथे आपण आर2-डी2 ला हलवून बंडखोर पायलटला
  • 1:03 - 1:07
    मेसेज द्यायला सांगणार आहोत. मग खाली जाऊन दुसऱ्या बंडखोर पायलटला मेसेज द्यायला सांगणार आहोत.
  • 1:07 - 1:13
    त्याला हालचाल करायला लावण्यासाठी आपण इव्हेंट्स वापरणार आहोत. जेव्हा खेळाडू वर/खालीच्या अॅरो
  • 1:13 - 1:20
    कीज वापरतो किंवा वर/खालीची बटणे वापरतो, तेव्हा आपण when up event ब्लॉक वापरतो आणि त्याला go up ब्लॉक जोडतो.
  • 1:20 - 1:25
    जेव्हा खेळाडू वर ही अॅरो की वापरतो, तेव्हा
    when up ब्लॉकला जोडलेला कोड रन होतो.
  • 1:25 - 1:29
    आर2-डी2 ला खालच्या दिशेत पाठवण्यासाठी
    आपण असेच करणार आहोत.
  • 1:29 - 1:35
    आता आपल्या ड्रॉईडचं नियंत्रण करण्यासाठी कोड लिहून ठेवण्याऐवजी आपण आर2-डी2 ला बटण दाबल्याच्या
  • 1:35 - 1:41
    इव्हेंटला प्रतिसाद द्यायला लावू शकतो म्हणजे तो स्क्रीनभर फिरेल. हळूहळू तुमचा गेम जास्त
  • 1:41 - 1:43
    इंटरअॅक्टीव्ह व्हायला लागला आहे.
Title:
ब्लॉकलीबरोबर स्टार वॉर्स - अवर ऑफ कोड: इव्हेंट्स
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
01:48

Marathi subtitles

Revisions