1 00:00:16,264 --> 00:00:19,569 असं समजा, की तुम्ही समारंभाला जाण्यासाठी तयारी करत आहात. 2 00:00:19,799 --> 00:00:22,923 तुम्हाला उत्साह वाटतो आहे, तशीच थोडीशी चिंताही वाटते आहे. 3 00:00:22,924 --> 00:00:25,476 पोटात गोळा आला आहे धाकधूक वाटते आहे. 4 00:00:25,477 --> 00:00:27,845 हृदयाच्या धडधडीसारखी. 5 00:00:28,860 --> 00:00:34,030 तुमचं मन तुम्हांला मागे खेचतं आहे. 6 00:00:34,656 --> 00:00:36,494 "थांब. इतका आनंद वाटू देऊ नकोस. 7 00:00:36,495 --> 00:00:41,562 जरा सावध रहा, काहीतरी विपरीत घडू शकतं." 8 00:00:41,938 --> 00:00:46,168 तुम्हांला प्रश्न पडतो, "समारंभात मी कोणाशी बोलू? 9 00:00:46,169 --> 00:00:52,078 माझ्याशी कोणी बोललं नाही तर? लोक मला विक्षिप्त समजले तर?" 10 00:00:53,464 --> 00:00:55,062 तुम्ही समारंभात पोहोचता. 11 00:00:55,063 --> 00:00:58,533 कोणीतरी तुमच्याजवळ येतं आणि तुमच्याशी बोलू लागतं. 12 00:00:58,534 --> 00:01:00,232 आणि त्याचवेळी 13 00:01:00,233 --> 00:01:04,917 तुमचं मन सैरभैर होतं. हृदयाचे ठोके वाढतात. 14 00:01:05,429 --> 00:01:06,798 तुम्हांला घाम फुटतो. 15 00:01:06,799 --> 00:01:10,781 आपण स्वतःपासून विलग झालो आहोत, असं वाटू लागतं. 16 00:01:10,782 --> 00:01:15,479 जणु तुम्ही तुमच्या शरीरात नसून, बाहेरून स्वतःलाच बोलताना पाहत आहात. 17 00:01:16,499 --> 00:01:20,611 "भानावर ये." तुम्ही स्वतःला सांगता, पण तसं करू शकत नाही. 18 00:01:20,612 --> 00:01:23,171 चिंतेची तीव्रता वाढत जाते. 19 00:01:24,171 --> 00:01:26,076 काही क्षण बोलून झाल्यावर 20 00:01:26,077 --> 00:01:28,838 ती व्यक्ती निघून जाते. 21 00:01:28,839 --> 00:01:31,735 आता तुम्हांला पूर्णपणे पराभव झाल्यासारखं वाटू लागतं. 22 00:01:33,344 --> 00:01:38,696 बऱ्याच काळापासून, समाजात मिसळताना तुम्हाला असेच अनुभव येताहेत. 23 00:01:39,051 --> 00:01:43,074 किंवा कल्पना करा, की आपण गर्दीच्या ठिकाणी आहोत. 24 00:01:43,075 --> 00:01:46,470 तुम्हाला भीती वाटू लागते. 25 00:01:46,471 --> 00:01:48,787 आजूबाजूला पुष्कळ लोक असणाऱ्या ठिकाणी, 26 00:01:48,788 --> 00:01:53,800 उदाहरणार्थ, बसमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. 27 00:01:54,769 --> 00:01:56,932 ते टाळण्यासाठी तुम्ही बाहेर जाणं टाळता. 28 00:01:56,933 --> 00:02:02,951 मग त्यामुळे एकटेपणा जाणवतो. 29 00:02:03,816 --> 00:02:08,122 या दोन्ही उदाहरणांतील व्यक्तींना 30 00:02:08,124 --> 00:02:10,408 चिंताविकार जडला आहे. 31 00:02:10,949 --> 00:02:14,583 आपल्या समजुतीपेक्षा कितीतरी जास्त लोकांना 32 00:02:14,584 --> 00:02:17,473 चिंताविकार जडलेला असतो. 33 00:02:17,474 --> 00:02:21,165 आजमितीला, जगात दर १४ व्यक्तींमागे 34 00:02:21,166 --> 00:02:23,589 एका व्यक्तीला हा विकार आहे. 35 00:02:23,590 --> 00:02:28,864 दरवर्षी, या विकारावरच्या उपचारांसाठी 36 00:02:28,865 --> 00:02:32,844 ४२ दशकोटी डॉलर्सहूनही जास्त खर्च होतो. 37 00:02:32,845 --> 00:02:36,097 चिंताविकारामुळे आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात 38 00:02:36,098 --> 00:02:37,378 ते सांगते.. 39 00:02:37,379 --> 00:02:43,524 नैराश्य, शिक्षण सोडून देणे, आत्महत्येचे विचार मनात येणे. 40 00:02:44,904 --> 00:02:49,129 या विकारामुळे ध्येयाकडे वाटचाल करणं, आणि नोकरी टिकवणं कठीण जातं. 41 00:02:49,619 --> 00:02:52,589 नातेसंबंध तुटू शकतात. 42 00:02:52,989 --> 00:02:55,023 हे अनेक लोकांना ठाऊक नसतं. 43 00:02:55,024 --> 00:02:59,084 त्यामुळे ते हा विकार दडवून ठेवतात. 44 00:02:59,085 --> 00:03:04,696 ही एक प्रकारची भीती आहे, आणि त्यावर मात करणं शक्य आहे असं मानलं जातं. 45 00:03:05,146 --> 00:03:07,385 पण या विकारात भीतीहूनही जास्त असं काहीतरी असतं. 46 00:03:08,705 --> 00:03:11,856 हा विकार फारसा महत्त्वाचा मानला जात नाही, 47 00:03:11,857 --> 00:03:14,226 कारण त्याचं नेमकं स्वरूप लोकांना ठाऊक नसतं. 48 00:03:14,227 --> 00:03:21,227 हा स्वभावाचा भाग आहे का? आजार आहे का? की नैसर्गिक भावना? काय आहे हे? 49 00:03:22,831 --> 00:03:26,072 म्हणूनच, सर्वसाधारण चिंता आणि चिंताविकार 50 00:03:26,073 --> 00:03:30,488 यातला फरक जाणणं महत्त्वाचं आहे. 51 00:03:32,277 --> 00:03:35,571 सर्वसाधारण चिंता ही एक सामान्य भावना आहे. 52 00:03:35,572 --> 00:03:38,035 तणावाच्या परिस्थितीत अशी चिंता वाटणं साहजिक आहे. 53 00:03:38,036 --> 00:03:41,688 उदाहरणार्थ, कल्पना करा, की तुम्ही जंगलात आहात, 54 00:03:41,689 --> 00:03:45,376 आणि तुमच्यासमोर एक अस्वल आलं. 55 00:03:46,650 --> 00:03:50,184 यामुळे कदाचित तुम्हांला थोडी चिंता वाटेल. 56 00:03:50,185 --> 00:03:53,668 तिथून पळून जावंसं वाटेल. 57 00:03:54,354 --> 00:04:00,404 या प्रकारची चिंता वाटणं चांगलंच, कारण त्यामुळे तुमचा जीव वाचेल. 58 00:04:00,405 --> 00:04:03,886 तुम्ही ताबडतोब तिथून पळून जाल. 59 00:04:03,887 --> 00:04:08,410 तसं पाहिलं तर अस्वल पाहून पळत सुटणं ही काही तितकीशी चांगली कल्पना नाही. 60 00:04:08,650 --> 00:04:11,249 अस्वलापेक्षा जलद कोणी पळू शकेल, असं मला वाटत नाही. 61 00:04:13,592 --> 00:04:16,935 नोकरीच्या ठिकाणी, चिंतेमुळे आपण दिलेल्या मुदतीत कामं करतो, 62 00:04:16,935 --> 00:04:19,841 आयुष्यात येणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगांचा सामना करतो. 63 00:04:19,841 --> 00:04:24,287 पण कधीकधी ही चिंतेची भावना पराकोटीला पोहोचते. 64 00:04:24,952 --> 00:04:29,231 ज्या घटनांपासून खराखुरा धोका उद्भवत नाही, त्याही वेळी ती निर्माण होते. 65 00:04:29,232 --> 00:04:32,851 अशावेळी हा चिंताविकार असू शकतो. 66 00:04:32,852 --> 00:04:36,481 उदाहरणार्थ, सार्वत्रिक चिंताविकार. (Generalized Anxiety Disorder) 67 00:04:36,482 --> 00:04:41,871 या विकारात सतत सर्व गोष्टींबद्दल पराकोटीची चिंता वाटते. 68 00:04:41,872 --> 00:04:46,552 ही चिंता आटोक्यात ठेवणं कठीण जातं. 69 00:04:47,745 --> 00:04:52,235 याबरोबर भीती, अस्वस्थता अशी लक्षणंसुद्धा जाणवतात. 70 00:04:52,630 --> 00:04:58,490 रात्री झोप लागत नाही. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. 71 00:04:59,595 --> 00:05:05,974 चिंता, मग ती कोणत्याही प्रकारची असो, 72 00:05:05,975 --> 00:05:09,734 तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय उपलब्ध आहेत. 73 00:05:09,735 --> 00:05:13,715 ते उपयुक्त आहेत, आणि अतिशय सोपे आहेत. 74 00:05:15,051 --> 00:05:18,500 बरेचदा, मानसिक विकारांसाठी औषधं दिली जातात. 75 00:05:18,501 --> 00:05:21,020 पण ती दीर्घकाळ उपयोगी पडत नाहीत. 76 00:05:21,021 --> 00:05:25,021 कालांतराने लक्षणं पुन्हा दिसू लागतात, आणि विकार पुन्हा पहिल्या अवस्थेत जातो. 77 00:05:25,560 --> 00:05:28,359 म्ह्णून हा एक वेगळा विचार करून पाहण्यासारखा आहे. 78 00:05:28,360 --> 00:05:33,249 आपण समस्यांना कशा प्रकारे तोंड देतो, 79 00:05:33,250 --> 00:05:37,250 त्यावर आपल्या चिंतेचं प्रमाण अवलंबून असतं. 80 00:05:37,473 --> 00:05:43,383 समस्या हाताळण्याची पद्धत जराशी बदलली, तर चिंतेचं प्रमाण कमी होऊ शकतं. 81 00:05:45,523 --> 00:05:47,862 केम्ब्रिज विद्यापीठातल्या आमच्या पाहणीनुसार, 82 00:05:47,863 --> 00:05:51,032 गरीब वस्तीतल्या स्त्रियांना चिंताविकार होण्याची शक्यता 83 00:05:51,033 --> 00:05:55,362 सधन वस्तीतल्या स्त्रियांपेक्षा जास्त असते. 84 00:05:55,363 --> 00:05:59,492 हा निष्कर्ष तसा धक्कादायक वाटला नाही. पण सखोल अभ्यासातून निराळं काही जाणवलं. 85 00:05:59,493 --> 00:06:02,542 गरीब वस्तीतल्या स्त्रियांना 86 00:06:02,543 --> 00:06:06,382 समस्या सोडवण्याची एक खास पद्धत ठाऊक असेल, 87 00:06:06,383 --> 00:06:08,382 तर त्यांना चिंतेचा त्रास होत नाही. 88 00:06:08,383 --> 00:06:13,842 पण ती पद्धत ठाऊक नसेल, तर त्यांना 89 00:06:13,843 --> 00:06:15,153 चिंताविकार सतावतो. 90 00:06:16,078 --> 00:06:17,477 इतर काही पाहण्यांनुसार, 91 00:06:17,478 --> 00:06:21,137 ज्या लोकांना ही पद्धत ठाऊक होती, 92 00:06:21,138 --> 00:06:25,267 त्यांचं मानसिक आरोग्य 93 00:06:25,268 --> 00:06:27,927 युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या 94 00:06:27,928 --> 00:06:31,838 खडतर परिस्थितीतसुद्धा उत्तम राहिलं. 95 00:06:32,093 --> 00:06:36,822 पण ज्यांना ही पद्धत ठाऊक नव्हती, 96 00:06:36,823 --> 00:06:41,483 त्यांना याच खडतर परिस्थितीमुळे मानसिक विकार जडले. 97 00:06:42,979 --> 00:06:47,878 तर मग, काय आहेत या समस्या हाताळण्याच्या पद्धती? 98 00:06:47,879 --> 00:06:52,229 त्यांचा वापर करून चिंताविकाराची तीव्रता कमी कशी करता येईल? 99 00:06:53,275 --> 00:06:55,294 त्याबद्दल सांगण्याअगोदर, 100 00:06:55,295 --> 00:06:58,914 एक रोचक गोष्ट सांगते. 101 00:06:58,915 --> 00:07:05,915 या पद्धती तुम्ही स्वतःच तयार करू शकता. 102 00:07:05,955 --> 00:07:08,355 तुमच्या स्वतःच्या वागण्यातून. 103 00:07:09,077 --> 00:07:12,316 तुमच्या चिंताविकारावर ताबा मिळवून त्याची तीव्रता कमी करू शकता. 104 00:07:12,317 --> 00:07:14,877 स्वतःला सक्षम करणारी ही गोष्ट आहे. 105 00:07:17,015 --> 00:07:20,604 आज मी अशा प्रकारच्या तीन पद्धतींविषयी बोलणार आहे. 106 00:07:20,605 --> 00:07:25,435 पहिली, आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण आहे, असे समजणे. 107 00:07:27,057 --> 00:07:31,436 आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणाखाली आहे असं समजणाऱ्या लोकांचं 108 00:07:31,437 --> 00:07:33,477 मानसिक आरोग्य चांगलं असतं. 109 00:07:33,869 --> 00:07:36,868 तसं तुम्हांला वाटत नसेल, तर 110 00:07:36,869 --> 00:07:38,498 नियंत्रणात असलेल्या गोष्टी करून 111 00:07:38,499 --> 00:07:42,669 तो अनुभव घ्यावा, असं संशोधन सांगतं. 112 00:07:43,505 --> 00:07:45,295 माझं म्हणणं स्पष्ट करून सांगते. 113 00:07:46,048 --> 00:07:50,207 अजून पूर्ण तयारी झाली नाही, अशा समजुतीने 114 00:07:50,208 --> 00:07:52,908 तुम्ही एखादं काम सुरु करणं लांबणीवर टाकता का? 115 00:07:53,733 --> 00:07:55,842 आज कोणते कपडे घालावेत? कोणाबरोबर डेटला जावं? 116 00:07:55,843 --> 00:08:01,693 कोणती नोकरी घ्यावी? असे निर्णय तुम्हांला कठीण वाटतात का? 117 00:08:02,819 --> 00:08:05,818 काय करावं हा निर्णय घेण्यात तुमचा इतका वेळ वाया जातो, 118 00:08:05,819 --> 00:08:09,819 की तुम्ही काहीच करू शकत नाही? 119 00:08:11,973 --> 00:08:16,763 अनिर्णायक अवस्था, नियंत्रणाबाहेरची परिस्थिती, यावर उपाय म्हणजे 120 00:08:16,979 --> 00:08:19,139 ती गोष्ट चुकीची का होईना, पण करणे. 121 00:08:20,630 --> 00:08:24,459 जी. के. चेस्टरटन हे एक कवी आणि लेखक आहेत. ते म्हणतात, 122 00:08:24,460 --> 00:08:30,760 जी गोष्ट करण्यासारखी असेल, ती पहिल्या वेळी चुकीच्या पद्धतीने करायला हरकत नाही. 123 00:08:32,003 --> 00:08:34,361 ही युक्ती चांगली लागू पडते, कारण यामुळे 124 00:08:34,363 --> 00:08:39,792 अनिर्णायक अवस्था संपते, आणि तुम्ही कृतीच्या अवस्थेत ढकलले जाता. 125 00:08:39,793 --> 00:08:42,472 नाहीतर काय करावं, कसं करावं, 126 00:08:42,472 --> 00:08:45,932 या विचारात 127 00:08:45,933 --> 00:08:47,693 तासनतास फुकट जाऊ शकतात, 128 00:08:48,091 --> 00:08:53,221 तुमची शक्ती नष्ट होते, आणि ते काम सुरु करण्याची भीती वाटू लागते. 129 00:08:54,492 --> 00:08:59,331 बरेचदा, आपल्याला बिनचूक काम करायचं असतं. पण आपण काहीच करू शकत नाही. 130 00:08:59,332 --> 00:09:01,871 कारण आपण स्वतःसमोर इतके उच्च आदर्श ठेवतो, की 131 00:09:01,872 --> 00:09:05,051 त्यांचीच आपल्याला भीती वाटते. 132 00:09:05,052 --> 00:09:09,051 या तणावामुळे आपण काम पुढे ढकलत राहतो, 133 00:09:09,052 --> 00:09:13,052 किंवा करतच नाही. 134 00:09:14,716 --> 00:09:17,786 चुकीच्या पद्धतीने करण्याची मुभा मिळाल्यावर कृती मोकळेपणाने घडते. 135 00:09:18,420 --> 00:09:20,259 तुम्हांला हे ठाऊक आहे. 136 00:09:20,260 --> 00:09:24,979 अनेकदा, काम बिनचूक हवं, या भीतीपोटी आपण ते सुरूच करत नाही. 137 00:09:24,980 --> 00:09:28,980 योग्य वेळी करू, योग्य क्षमता आली की करू, असं म्हणतो. 138 00:09:29,768 --> 00:09:33,768 यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतात. 139 00:09:34,027 --> 00:09:37,416 त्यापेक्षा त्या कामात झटकन उडी घेऊन ते करूनच टाकलं तर? 140 00:09:37,417 --> 00:09:39,907 ते चांगलं होतंय की नाही, याची चिंता कशाला? 141 00:09:40,392 --> 00:09:43,961 या विचारामुळे काम सुरु करणं सोपं जातं. 142 00:09:43,962 --> 00:09:47,072 मग चुकीच्या पद्धतीने का होईना, ते करून संपतं. 143 00:09:47,440 --> 00:09:48,669 नंतर मागे वळून पाहताना 144 00:09:48,670 --> 00:09:53,810 आपल्या लक्षात येतं, की ते काही तितकंसं चुकीचं नव्हतं. 145 00:09:56,007 --> 00:09:58,196 माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला चिंताविकार आहे. 146 00:09:58,197 --> 00:10:01,937 तिने हा मंत्र वापरायला सुरुवात केली आहे. 147 00:10:03,142 --> 00:10:07,511 ती म्हणते, "या मंत्रामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. 148 00:10:07,512 --> 00:10:12,732 आता मी पूर्वीपेक्षा कमी वेळात कामं उरकते. 149 00:10:13,887 --> 00:10:20,297 चुकीची मुभा असल्यामुळे मी धोका पत्करते, काही वेगळं करून पाहते. 150 00:10:20,818 --> 00:10:25,598 या वेगळ्या पद्धतीमुळे कामातली मजा अनुभवते. 151 00:10:26,562 --> 00:10:32,472 या मंत्रामुळे चिंतेची जागा उत्साहाने घेतली आहे. " 152 00:10:34,113 --> 00:10:41,063 चुकीच्या पद्धतीने काम करा, आणि करता करता कामात सुधारणा करा. 153 00:10:42,589 --> 00:10:46,119 आता यावर विचार करा पाहू.. 154 00:10:46,333 --> 00:10:53,333 आजपासून तुम्ही हा मंत्र वापरला, तर तुमच्या आयुष्यात काय बदल घडेल? 155 00:10:57,743 --> 00:11:01,743 चिंताविकाराचा सामना करण्याचं दुसरं धोरण, स्वतःला क्षमा करणे. 156 00:11:02,216 --> 00:11:05,116 हे फार प्रभावी आहे. 157 00:11:06,381 --> 00:11:09,620 चिंताग्रस्त लोक आपल्या चुका, काळज्या, दुःखभावना 158 00:11:09,621 --> 00:11:15,941 याबद्दल अति विचार करतात. 159 00:11:16,815 --> 00:11:22,285 समजा, तुमचा एक मित्र सतत तुमच्या चुका शोधून काढून 160 00:11:22,453 --> 00:11:25,242 त्या तुम्हांला सांगतो आहे. 161 00:11:25,243 --> 00:11:28,722 तुमच्या आयुष्यात जे जे काही वाईट घडलं असेल, ते सर्व. 162 00:11:28,723 --> 00:11:30,092 या माणसाला 163 00:11:30,093 --> 00:11:33,243 ताबडतोब हाकलून द्यावं, असं तुम्हांला वाटेल, हो ना? 164 00:11:34,639 --> 00:11:40,219 चिंताग्रस्त लोक दिवसभर स्वतःलाच हा त्रास देत असतात. 165 00:11:40,505 --> 00:11:42,595 ते स्वतःशी फारसे चांगुलपणाने वागत नाहीत. 166 00:11:42,939 --> 00:11:46,939 तर आता, स्वतःशी जरा दयाळूपणे वागून पहा. 167 00:11:47,473 --> 00:11:50,313 स्वतःच स्वतःचा आधार व्हा. 168 00:11:50,834 --> 00:11:54,283 हे कसं करायचं? स्वतःच्या चुकांबद्दल 169 00:11:54,284 --> 00:11:55,733 स्वतःला क्षमा करायची. 170 00:11:55,734 --> 00:11:58,414 मग त्या अगदी नुकत्याच केलेल्या चुका असोत, 171 00:11:58,766 --> 00:12:00,876 किंवा भूतकाळातल्या. 172 00:12:02,221 --> 00:12:05,180 पूर्वी कधीतरी भीतीने ग्रस्त झाल्याची शरम वाटत असेल, 173 00:12:05,181 --> 00:12:06,741 तर त्याबद्दल स्वतःला क्षमा करा. 174 00:12:07,231 --> 00:12:10,171 तुम्हांला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं असेल, 175 00:12:10,509 --> 00:12:12,648 पण तसा धीर झाला नसेल, 176 00:12:12,649 --> 00:12:14,559 तर चिंता करू नका, स्वतःला क्षमा करा. 177 00:12:14,947 --> 00:12:17,946 या सगळ्या गोष्टींबद्दल स्वतःला क्षमा करा. 178 00:12:17,947 --> 00:12:22,467 मग तुम्हांला स्वतःविषयी जरा जास्त करुणा वाटेल. 179 00:12:23,547 --> 00:12:26,667 हे केल्याशिवाय तुमच्या मनाच्या जखमा भरून येणार नाहीत. 180 00:12:28,094 --> 00:12:31,044 आता शेवटची, पण महत्त्वाची गोष्ट. 181 00:12:32,081 --> 00:12:34,920 आपल्या आयुष्याला 182 00:12:34,921 --> 00:12:37,871 काहीतरी हेतू किंवा अर्थ असणं. 183 00:12:39,238 --> 00:12:43,328 आपण आयुष्यात कोणतंही काम केलं, 184 00:12:43,915 --> 00:12:46,034 कितीही पैसा कमावला, 185 00:12:46,035 --> 00:12:51,185 तरीही कोणालातरी आपण हवे आहोत, या भावनेशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. 186 00:12:51,799 --> 00:12:55,428 आपल्या कृतीमुळे कोणाचं तरी भलं व्हावं, 187 00:12:55,429 --> 00:12:58,089 किंवा आपल्या प्रेमाचा कोणाला तरी आधार वाटावा. 188 00:12:59,744 --> 00:13:00,973 म्हणजे, 189 00:13:00,974 --> 00:13:04,553 कोणीतरी आपली स्तुती केली तर आपण सुखी होऊ, असं नव्हे. 190 00:13:04,554 --> 00:13:08,093 याचा अर्थ असा, की आपण दुसऱ्यांसाठी कधीच काही केलं नाही, 191 00:13:08,094 --> 00:13:11,804 तर मानसिक आरोग्य ढासळण्याची शक्यता असते. 192 00:13:13,642 --> 00:13:17,282 सुप्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल म्हणतात, 193 00:13:17,771 --> 00:13:21,380 "ज्यासाठी जगावं, असं काही उरलं नाही, किंवा 194 00:13:21,381 --> 00:13:24,551 आयुष्याकडून कसलीच अपेक्षा शिल्लक नाही, 195 00:13:24,742 --> 00:13:27,651 असं म्हणणाऱ्या व्यक्तींना समजवायला हवं, 196 00:13:27,652 --> 00:13:32,082 की तुम्ही जिवंत आहात, म्हणजे अजून तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. " 197 00:13:35,601 --> 00:13:40,611 इतर कोणाच्या हितासाठी केलेली कृती आपल्याला कठीण समयी तारून नेते. 198 00:13:41,493 --> 00:13:44,192 जगायचं कशासाठी, हे त्यातून आपल्याला समजतं, 199 00:13:44,193 --> 00:13:50,133 आणि मग आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. कोणत्याही. 200 00:13:52,771 --> 00:13:55,541 आता प्रश्न असा, की 201 00:13:56,324 --> 00:14:00,154 केवळ दुसऱ्यासाठी अशी एक तरी कृती तुम्ही करता का? 202 00:14:01,127 --> 00:14:02,867 मग ते विनावेतन काम असेल, 203 00:14:03,682 --> 00:14:08,941 किंवा आज, इथे मिळालेलं हे ज्ञान इतरांना सांगणं असेल. 204 00:14:08,942 --> 00:14:11,372 खासकरून ज्यांना गरज असेल, त्यांना. 205 00:14:11,511 --> 00:14:15,230 आणि अशाच लोकांजवळ समुपदेशन घेण्यासाठी पैसे नसतात. 206 00:14:15,231 --> 00:14:16,730 आणि साधारणपणे अशाच लोकांमध्ये 207 00:14:16,731 --> 00:14:19,821 चिंताविकार मोठ्या संख्येने आढळतो. 208 00:14:20,232 --> 00:14:22,621 हे ज्ञान त्यांना द्या, सर्वांना द्या. 209 00:14:22,622 --> 00:14:26,352 कारण त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य खरोखर सुधारेल. 210 00:14:30,317 --> 00:14:32,857 आता आणखी एक विचार सांगून हे भाषण संपवते. 211 00:14:35,224 --> 00:14:39,423 इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे 212 00:14:39,424 --> 00:14:44,244 पुढच्या पिढयांना ज्याचा उपयोग होईल, असं काही कार्य करणे. 213 00:14:45,614 --> 00:14:50,513 तुमचं हे कार्य त्यांना समजलं नाही, 214 00:14:50,514 --> 00:14:51,793 तरी हरकत नाही. 215 00:14:51,794 --> 00:14:57,113 कारण तुमचं कार्य तुम्हांला ठाऊक असेल. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, 216 00:14:57,114 --> 00:15:01,904 की या बाबतीत आपण एकमेव आहोत, आणि हेच आपल्या आयुष्याचं महत्त्व आहे. 217 00:15:02,737 --> 00:15:04,016 धन्यवाद. 218 00:15:04,017 --> 00:15:05,347 (टाळ्या)