Return to Video

माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - अभिनंदन!

  • 0:00 - 0:01
    प्रेस्टन: अभिनंदन!
  • 0:01 - 0:04
    लिझी: अभिनंदन!
  • 0:04 - 0:06
    स्टँपी: अभिनंदन, जमलं तुम्हाला!
  • 0:06 - 0:11
    स्टेसी: अभिनंदन मित्रांनो, तुम्ही एकदम
    भारी काम केलंत!
  • 0:11 - 0:16
    आता तुम्ही अवर ऑफ कोड पूर्ण केल्यामुळे,
    तुम्ही माईनक्राफ्टमध्ये कोडींग सुरू करू शकता.
  • 0:16 - 0:20
    तुम्ही लूप्स, फंक्शन्स, आणि सॉफ्टवेअर एजंट
    काय करतो, ते शिकलात.
  • 0:20 - 0:24
    आता, मुक्तपणे खेळण्याची पातळी आहे,
    इथं तुम्ही डेव्हलपर आहात.
  • 0:24 - 0:28
    उरलेल्या वेळात तुमची स्वत:ची फंक्शन्स लिहा- शोध घेण्यासाठी, मायनिंग करण्यासाठी आणि बांधण्यासाठी.
  • 0:28 - 0:32
    या पातळीला तुम्ही लिहीलेला कोड तुमच्या
    माईनक्राफ्ट जगात
  • 0:32 - 0:33
    Minecraft: Education Edition मध्ये
    नेऊ शकता.
  • 0:33 - 0:37
    फक्त "Finish" वर क्लिक करा आणि एजंट
    वापरून तुमच्या जगात कोडींग करण्यासाठी
  • 0:37 - 0:39
    लिंक मिळण्यासाठी सूचनांचे पालन करा.
  • 0:39 - 0:41
    मजा करा, आणि छान कामगिरी करा!
  • 0:41 - 0:43
    स्टेसी: आणि मी परत आलेय!
  • 0:43 - 0:45
    ओके, लोकहो, हा एजंट आहे!
  • 0:45 - 0:48
    तो काय करू शकतो ते तुम्हाला दाखवते.
  • 0:48 - 0:50
    बघा, बघा,
  • 0:50 - 0:51
    तो काम करतोय!
  • 0:51 - 0:56
    मी त्याला या टेराकोटा ब्लॉक्सपासून जिना
    तयार करायला सांगितला आहे, तो वापरून
  • 0:56 - 0:57
    आपण इथून बाहेर पडू शकतो.
  • 0:57 - 0:59
    आणि मित्रांनो, फक्त जिनेच नव्हे.
  • 0:59 - 1:03
    मी एजंटला मला हवे ते काहीही करायला सांगू
    शकते आणि तो ते करेल.
  • 1:03 - 1:05
    स्टँपी: तू हे कसं काय केलंस?
  • 1:05 - 1:07
    स्टेसी: खरं म्हणजे ते
    फार सोपं होतं.
  • 1:07 - 1:08
    मी फक्त कोड वापरला!
Title:
माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - अभिनंदन!
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:15

Marathi subtitles

Revisions