Return to Video

इंटरनेट म्हणजे काय?

  • 0:00 - 0:01
    [आवाज]
  • 0:01 - 0:02
    [डिंग]
  • 0:02 - 0:05
    [सुरुवातीचा आवाज]
  • 0:05 - 0:07
    [संगीत]
  • 0:07 - 0:09
    इंटरनेट म्हणजे काय?
  • 0:09 - 0:12
    इंटरनेट म्हणजे एखाद्या लोकप्रिय गोष्टीसारखं
    असतं.
  • 0:13 - 0:14
    वर असलेले काही उपग्रह.
  • 0:15 - 0:19
    माझ्या डोक्यात असं चित्र येतं की इंटरनेटच्या लहरी
    फोनपर्यंत जात आहेत.
  • 0:19 - 0:21
    कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं की
    म्हणजे क्लाऊड्स.
  • 0:21 - 0:24
    इंटरनेट म्हणजे प्लंबिंगसारखं, ते सतत हलत असतं.
  • 0:24 - 0:27
    बहुतेक लोकांना इंटरनेट कुठून आलं याची कल्पना नसते
  • 0:27 - 0:30
    आणि त्यानं काही फरक पडत नाही, त्यांना माहिती असायची गरज नाही. हे विचारणं म्हणजे
  • 0:30 - 0:31
    बॉलपॉइंट पेनचा
  • 0:32 - 0:33
    किंवा फ्लश टॉयलेटचा
  • 0:33 - 0:34
    किंवा झीपरचा शोध कुणी लावला, ते
    विचारण्यासारखं आहे.
  • 0:34 - 0:37
    या सगळ्या गोष्टींचा आपण रोज वापर करतो, याचा विचारसुद्धा न करता की कोणीतरी कधीतरी
  • 0:37 - 0:40
    त्यांचा शोध लावला आहे.
  • 0:40 - 0:45
    तर, इंटरनेट पण तसंच आहे. खूप खूप वर्षांपूर्वी,
    1970 च्या दशकाच्या सुरुवातीला
  • 0:45 - 0:51
    माझा पार्टनर बॉब कान आणि मी आपण सध्या ज्याला इंटरनेट म्हणतो, त्याच्या डिझाईनवर काम करायला सुरुवात केली.
  • 0:51 - 0:56
    ARPANET नावाच्या एका दुसऱ्या प्रयोगाचा हा परिणाम
    होता.
  • 0:56 - 1:00
    अर्पानेट म्हणजे अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क, हा संरक्षण खात्याचा
  • 1:00 - 1:02
    संशोधन प्रकल्प होता.
  • 1:02 - 1:05
    पॉल बॅरन अशी एक संवाद प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करत होता जी
  • 1:05 - 1:10
    आण्विक हल्ल्यात टिकून राहील.
  • 1:11 - 1:16
    त्यामुळे त्याची कल्पना संदेशांचे ब्लॉक्समध्ये रूपांतर करून ते शक्य तेवढ्या लवकर
  • 1:16 - 1:20
    शक्य तेवढ्या दिशांमध्ये मेश नेटवर्कच्या माध्यमातून पाठवायचे, अशी होती.
  • 1:20 - 1:20
    [आवाज]
  • 1:20 - 1:25
    तर आम्ही बनवलेली गोष्ट देशभरातील प्रायोगिक पॅकेट
    नेटवर्क बनली,
  • 1:25 - 1:26
    आणि ती चालू लागली.
  • 1:27 - 1:32
    [हेवी बीट्स असलेले इलेक्ट्रॉनिक संगीत]
  • 1:32 - 1:34
    इंटरनेटचं नियंत्रण कुणी करतं का?
  • 1:34 - 1:36
    सरकार नियंत्रण करतं.
  • 1:36 - 1:38
    बुटके, अर्थातच बुटके!
  • 1:38 - 1:42
    वाय-फाय नियंत्रित करणारे लोक.
    कारण वाय-फाय नसेल तर इंटरनेट नसतं.
  • 1:42 - 1:46
    टी-मोबाईल, अं, एक्सफिनिटी,
  • 1:46 - 1:49
    बिल गेट्स
  • 1:49 - 1:50
    [थांबते]
  • 1:50 - 1:51
    बरोबर?!
  • 1:51 - 1:55
    प्रामाणिक उत्तर म्हणजे कोणीही नाही आणि
    दुसरं उत्तर म्हणजे प्रत्येकजण.
  • 1:55 - 2:01
    खरं उत्तर म्हणजे इंटरनेट खूप मोठ्या संख्येनं
    असलेल्या स्वतंत्रपणे
  • 2:01 - 2:04
    चालवल्या जाणाऱ्या नेटवर्क्सनी बनलेलं असतं.
  • 2:04 - 2:07
    या प्रणालीची रंजक गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे
    वितरीत असते. पॅकेट्स
  • 2:07 - 2:12
    कशी राऊट होतात किंवा नेटवर्कचे भाग कुठे बनतात
    किंवा कोण कोणाशी जोडलेलं असेल
  • 2:12 - 2:14
    हे ठरवणारं मध्यवर्ती नियंत्रण नसतं.
  • 2:14 - 2:18
    हे सर्व व्यावसायिक निर्णय आहेत आणि ते
    ऑपरेटर्सद्वारे स्वतंत्रपणे घेतले जातात.
  • 2:18 - 2:23
    नेटवर्कच्या प्रत्येक भागात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण कनेक्टीव्हिटी असेल हे ते सुनिश्चित
  • 2:23 - 2:27
    करतात. कारण कोणतंही साधन कोणत्याही साधनाशी संवाद साधू शकतं,
  • 2:27 - 2:30
    हीच इंटरनेटची उपयुक्तता आहे; तुम्हाला जगातील दुसऱ्या कोणत्याही फोनवर फोन
  • 2:30 - 2:33
    करायचा असतो, अगदी तसंच.
  • 2:33 - 2:36
    यासारखं काही यापूर्वी कधीच तयार करण्यात
    आलं नव्हतं.
  • 2:36 - 2:40
    तुम्हाला काहीतरी माहिती आहे, ते दुसऱ्या कोणालातरी उपयोगी पडणारं असू शकतं किंवा त्या उलट, ही
  • 2:40 - 2:43
    कल्पना माहिती शेअर करण्यासाठी
  • 2:43 - 2:44
    अतिशय प्रेरणादायक आहे.
  • 2:44 - 2:48
    अशाचप्रकारे, विज्ञान विकसित होतं, लोक माहिती शेअर करतात.
  • 2:48 - 2:51
    मग लोकांना नवीन उपयोगाचा विचार करण्याची
    संधी मिळते.
  • 2:52 - 2:55
    कदाचित ते मोबाईल फोनवरचं अॅप म्हणून
    प्रोग्रॅम तयार करतात.
  • 2:55 - 3:00
    किंवा तो नेटवर्कच्या सातत्यपूर्ण वाढीचा भाग बनतो
  • 3:00 - 3:04
    आणि ज्या लोकांना अजून नेटवर्क उपलब्ध नसेल, ते त्यावर येतात किंवा ते फक्त त्याचा रोजच्यारोज
  • 3:04 - 3:06
    वापर करतात.
  • 3:06 - 3:12
    तुम्ही इंटरनेटचा संपर्क आणि त्याचा वापर टाळू शकत नाही, मग ते जाणून घेऊन का
  • 3:12 - 3:13
    वापरू नये?
  • 3:13 - 3:15
    [फिरणारा साऊंड इफेक्ट]
  • 3:15 - 3:17
    [डिंग]
Title:
इंटरनेट म्हणजे काय?
Description:

इंटरनेट म्हणजे काय? थोडक्यात उत्तर: वितरीत पॅकेट-स्विच्ड नेटवर्क.
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा. हा "इंटरनेट कसे काम करते? या मालिकेतील प्रस्तावनेचा व्हिडिओ आहे. व्हिंट सर्फ, "इंटरनेटच्या जनकांपैकी" एक यांनी नेट कसे तयार झाले याचा इतिहास आणि कोणतीही व्यक्ती त्याचे कसे नियंत्रण करत नाही, हे समजावून सांगितले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण मालिका बघा:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
03:45

Marathi subtitles

Revisions