Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना

  • 0:00 - 0:04
    अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | प्रस्तावना
  • 0:04 - 0:08
    हाय, मी जेन्स आणि मी माईनक्राफ्टचा
  • 0:08 - 0:09
    लीड क्रिएटीव्ह डिझायनर आहे.
  • 0:09 - 0:13
    पुढच्या तासात, तुम्ही तुमचा
    माईनक्राफ्ट गेम बनवणार आहात.
  • 0:13 - 0:16
    हे माईनक्राफ्ट सारखं दिसतंय पण
    जग थांबलंय.
  • 0:16 - 0:21
    मेंढ्या हलत नाही आहेत, कोंबड्या अंडी
    घालत नाही आहेत आणि
  • 0:21 - 0:22
    झोंबी स्थिर उभे आहेत.
  • 0:22 - 0:26
    आता माईनक्राफ्टचं जग सुरू करण्यासाठी
    तुम्हाला कोड तयार करायचाय.
  • 0:26 - 0:29
    माझं नाव मेलिसा आहे आणि मी
    माईनक्राफ्टमध्ये युजर रिसर्चर आहे.
  • 0:29 - 0:32
    (त्यांनी सतत हे सगळं करावं असं
    तुम्हाला वाटतंय?
  • 0:32 - 0:33
    हो.)
  • 0:33 - 0:37
    लोक कसा विचार करतात, तंत्रज्ञानाशी कसा
    संवाद साधतात यात मला रस आहे.
  • 0:37 - 0:42
    म्हणून हे काम माझ्यासाठी अगदी बरोबर आहे.
    मी कॉम्प्युटर इंजिनीअरींग आणि
  • 0:42 - 0:45
    मानसशास्त्र: लोक कसा विचार करतात आणि
    वागतात याची सांगड घालते.
  • 0:45 - 0:48
    तुम्हाला दिसतंय, स्क्रीनचे तीन मुख्य
    भाग आहेत.
  • 0:48 - 0:52
    1) डावीकडे माईनक्राफ्ट गेम आहे.
  • 0:52 - 0:56
    आत्ता हे जग थांबलं आहे आपण कोड लिहून
    ते दुरुस्त करणार आहे.
  • 0:56 - 0:58
    2) मधला भाग म्हणजे टूलबॉक्स आहे.
  • 0:58 - 1:05
    प्रत्येक ब्लॉक म्हणजे कोंबड्या, मेंढ्या, माईनक्राफ्टमधल्या इतर प्राण्यांना कळणाऱ्या कमांड आहेत
  • 1:05 - 1:12
    3) उजवीकडच्या जागेला वर्कस्पेस म्हणतात.
    तिथं आपण प्रोग्रॅम तयार करतो.
  • 1:12 - 1:17
    काय करायचं ते विसरलात तर प्रत्येक
    पातळीसाठी वर सूचना दिलेल्या आहेत.
  • 1:17 - 1:20
    सुरुवातीला, आपण कोंबडीसाठी प्रोग्रॅम
    लिहिणार आहोत.
  • 1:20 - 1:24
    "move forward" कमांड वर्कस्पेसमध्ये
    ओढूया.
  • 1:24 - 1:28
    मी "Run" बटण दाबलं की
    कोंबडी एक पाऊल पुढे जाते.
  • 1:28 - 1:34
    पुढे जाण्यासाठी, मी अजून एक "move forward"
    ब्लॉक पहिल्या "move forward" ब्लॉकखाली
  • 1:34 - 1:36
    ओढेन, हायलाईट दिसेपर्यंत.
  • 1:36 - 1:40
    मग मी तो सोडेन आणि दोन्ही ब्लॉक
    जोडले जातील.
  • 1:40 - 1:44
    मी परत "Run" दाबले तर कोंबडी
    दोन पावले चालते.
  • 1:44 - 1:49
    जर तुम्हाला कधी ब्लॉक काढायचा असेल तर तो
    स्टॅकमधून काढा आणि टूलबॉक्समध्ये
  • 1:49 - 1:50
    परत न्या.
  • 1:50 - 1:56
    "Run" बटण दाबल्यावर गेम पुन्हा रीसेट
    करायला "Reset" बटण दाबा आणि
  • 1:56 - 1:57
    परत सुरू करा
  • 1:57 - 2:02
    आता माईनक्राफ्टचं तुमचं स्वत:चं
    व्हर्जन तयार करायची तुमची पाळी आहे.
  • 2:02 - 2:03
    मजा करा!
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
02:08

Marathi subtitles

Revisions