तुरुंगामध्ये गरीबांचा कसा होतोय छळ?
-
0:00 - 0:03२०१३ उन्हाळातल्या एका दुपारी,
वॉशिंगटन डीसीमध्ये -
0:03 - 0:06पोलिसांनी एका मनुष्याला पकडले
त्याची कसून चौकशी केली -
0:06 - 0:10त्यांना त्याच्यावर संशय आला
व त्यापासून धोका आहे असे वाटले. -
0:10 - 0:14खरे तर त्या दिवशी मला
असे अडकणे अपेक्षित नव्हते -
0:14 - 0:16पण मला ते चित्र स्पष्ट दिसते
-
0:16 - 0:18हे सर्व भीतीदायक आहे.
शांत राहण्याचा प्रयत्न कर -
0:18 - 0:19(हशा)
-
0:19 - 0:22ह्या वेळी मी पदवीपूर्व नोकरी करत होतो
-
0:22 - 0:25वॉशिंगटन डीसीमध्ये
सार्वजनिक सुरक्षा विभागात -
0:25 - 0:27कामासाठी मी पोलीस चौकीला भेट देत असे
-
0:27 - 0:28मी माझ्या मार्गावर होतो
-
0:28 - 0:30आणि कारपर्यंत पोहोचेपूर्वीच
-
0:30 - 0:33दोन पोलीस गाडयांनी माझा रस्ता अडवला
-
0:33 - 0:35आणि एका अधिकाऱ्याने मला मागून घेरले
-
0:35 - 0:37त्याने मला थांबवले, बॅग काढायला सांगितली
-
0:37 - 0:40माझे हात पुढे असलेल्या पोलीस कारवर दाबले
-
0:41 - 0:44साधारण डझनभर पोलिसांनी मला गराडा घातला
-
0:44 - 0:45सगळ्यांजवळ बंदुका होत्या
-
0:45 - 0:46तर काहींजवळ घातक रायफली
-
0:46 - 0:48त्यांनी बॅगेवर बंदूक रोखली
-
0:48 - 0:50आणि मला पाडलं
-
0:50 - 0:52माझी छायाचित्रे काढली
-
0:52 - 0:53आणि ते हसले
-
0:53 - 0:55आणि हे सगळे घडत असताना
-
0:55 - 0:58शरीर पोलिसी गाडीवर रेललेले असताना
मी पायाच्या थरथरीकडे कानाडोळा करत होतो -
0:58 - 1:00काय करावे असा विचार करत होतो
-
1:00 - 1:02तेव्हा अचानक जाणवले
-
1:02 - 1:04जेव्हा मी फोटोतल्या मला बघितले
-
1:04 - 1:06तेव्हा स्वतःबद्दल सांगायचे तर
-
1:06 - 1:08मी असे काही सांगितले असते
-
1:08 - 1:14"उठावदार टी-शर्ट व चष्मा घातलेला
१९ वर्षीय भारतीय पुरुष" -
1:14 - 1:16पण त्यांनी ह्यातलं काहीच लिहिले नव्हतं
-
1:16 - 1:18पोलीस रेडीओवर ते वर्णन सांगत
-
1:18 - 1:21"पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य"
-
1:21 - 1:23"पाठीवर बॅग घेतलेला मध्य आशियाई मनुष्य"
-
1:23 - 1:26आणि हेच वर्णन
पोलीस रिपोर्टमध्ये घातले गेले -
1:26 - 1:31माझ्या स्वतःच्या सरकारकडून
माझे असे वर्णन अपेक्षित नव्हते -
1:31 - 1:32"भ्याड"
-
1:33 - 1:35"नीच"
-
1:36 - 1:37"दहशतवादी"
-
1:37 - 1:39अशी गरळ ओकणे त्यांनी चालूच ठेवले
-
1:39 - 1:43माझ्या रहिवासाच्या सर्व जागी
त्यांनी श्वानपथके पाठवली -
1:43 - 1:46माझे नाव कुठल्या वॉचलिस्ट मध्ये आहे का
ह्याचीही सरकारी चौकशी केली. -
1:46 - 1:49माझी उलट तपासणी करण्यासाठी
त्यानी गुप्तहेरही धाडले कारण -
1:49 - 1:51माझ्यापाशी लपवायला
काही नाही हे सांगूनही -
1:51 - 1:54मी माझ्या कारची तपासणी का करू देत नाही
असे त्यांना वाटले -
1:54 - 1:55आणि मला दिसत होते कि
ते समाधानी नाहीत -
1:56 - 1:59पण त्यांची पुढची चाल मला उमगत नव्हती
-
1:59 - 2:02एका क्षणी तर ,
ज्या अधिकाऱ्याने मला पाडले होते -
2:02 - 2:05त्याने पोलीस सुरक्षा कॅमेरा कोठे आहे
हे बघितले -
2:05 - 2:08जेणेकरून काय रेकोर्ड होते आहे हे कळेल.
-
2:08 - 2:09आणि जेव्हा त्याने असे केले
-
2:09 - 2:13तेव्हा मला जाणवले की
आपण त्यांच्या ताब्यात आहोत -
2:13 - 2:15मला वाटते लहानपणापासून
आपली धारणा असते आणि -
2:15 - 2:19पोलीस, अटका, बेड्या ह्याबद्दलच्या
आपल्या कल्पना इतक्या सरळ असतात -
2:19 - 2:23म्हणून हे लक्षात येत नाही की
-
2:23 - 2:26एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा
ताबा घेणं किती क्लेशदायक आहे! -
2:26 - 2:28असे वाटतेय ना तुम्हाला
कि मला म्हणायचंय -
2:28 - 2:30जातीमुळे मला घृणास्पद वागणूक दिली गेली
-
2:30 - 2:33आणि हो, जर मी गोरा असतो
तर मला ताब्यात घेतले नसते. -
2:33 - 2:36पण खरे तर माझ्या मनात वेगळेच काही आहे
-
2:36 - 2:39मला वाटते कि परिस्थिती आणखी वाईट असती
-
2:39 - 2:40जर मी श्रीमंत नसतो तर
-
2:40 - 2:43मला म्हणायचंय,
कि मी स्फोटके पेरली असावीत -
2:43 - 2:46असे वाटून त्यांनी
माझी जरी दीड तास चौकशी केली, -
2:46 - 2:48तरीही ना तर मला बेड्या घातल्या,
-
2:48 - 2:50नाही मला तुरुंगात नेले
-
2:50 - 2:53मला वाटते जर मी वॉशिंगटन डीसीच्या
खालच्या वर्णाच्या जमातीतील असतो -
2:53 - 2:57आणि त्यांना वाटले असते कि माझ्यामुळे
अधिकाऱ्यांच्या आयुष्याला धोका आहे -
2:57 - 2:58तर गोष्टी वेगळ्या प्रकारे घडल्या असत्या
-
2:58 - 3:02प्रत्यक्षात आपल्या समाजव्यवस्थेत
असे दृढ धरले जाते कि -
3:02 - 3:04पोलीस स्टेशन उडवण्याचा
प्रयत्न करणारा श्रीमंत -
3:04 - 3:06हा त्या गरीबापेक्षा बरा
-
3:06 - 3:08जो अगदी किरकोळ संशयाने पकडला जातो
-
3:08 - 3:11माझ्या सध्याच्या कामातले एक उदाहरण देतो
-
3:11 - 3:14सध्या मी “समान हक्क कायदा” ह्या विभागात
-
3:14 - 3:17“नागरी अधिकार व्यवस्थेत”
वाशिंगटन डीसी मध्ये कार्यरत आहे. -
3:17 - 3:20मला तुम्हा सर्वाना एक प्रश्न विचारायचा आहे
-
3:20 - 3:23तुमच्यापैकी कितींनी पार्किंग तिकीट फाडलंय?
-
3:23 - 3:24हात वर करा
-
3:24 - 3:26हं. मीही फाडलंय!
-
3:26 - 3:27आणि जेव्हा मला दंड भरावा लागला
-
3:27 - 3:29तेव्हा वाईट वाटले
-
3:29 - 3:31पण मी भरले
-
3:31 - 3:34मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांनी
असाच केले असावे -
3:35 - 3:39पण काय झाले असते जर
तुमच्याजवळ तिकिटासाठी पैसे नसते? -
3:39 - 3:42आणि तुमच्या कुटुंबाकडेही पैसे नसते !
तर काय झाले असते ? -
3:42 - 3:45बरं, कायद्यांतर्गत
एक गोष्ट घडू शकत नाही -
3:45 - 3:47आणि ती म्हणजे,
तुम्ही अटक व कारावासाला पात्र नसता -
3:47 - 3:49जेव्हा तुमच्याकडे पैसे देण्याची ऐपत नसते
-
3:49 - 3:51हे बेकायदेशीर आहे.
-
3:51 - 3:54पण देशांतर्गत असलेले स्थानिक सरकार
-
3:54 - 3:55गरीबांप्रती हेच करत आहेत
-
3:55 - 3:58आणि समान न्याय कायद्यांतर्गत
असे कित्येक खटले -
3:58 - 4:01ह्या आधुनिक काळातील तुरुंगाना
लक्ष्य करत आहेत. -
4:01 - 4:04आमचा एक खटला मिसुरी राज्यातील
फर्ग्युसन शहराच्या विरोधात आहे -
4:04 - 4:06मला माहित आहे फर्ग्युसन म्हंटले कि
-
4:06 - 4:09तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोक्यात येईल
"पोलिसी हिंसा व अत्याचार!" -
4:09 - 4:11पण आज मला आगळा वेगळा पैलू सांगायचाय
-
4:11 - 4:14पोलीस आणि नागरिक ह्यांच्यातल्या
एका वेगळ्या नात्याबद्दल बोलायचे आहे. -
4:14 - 4:18फर्ग्युसनमध्ये सरासरी
२ अटकेची फर्माने निघत. -
4:18 - 4:20प्रत्येक माणसाविरोधात ,
प्रत्येक वर्षी -
4:20 - 4:22जास्त करून कर्ज फेडू न शकल्यामुळे !
-
4:23 - 4:27मी विचार करतो कि दररोज
घरातून बाहेर पडल्यापडल्या -
4:27 - 4:30कोणीतरी आपल्याला पकडेल,
आपली कर्जे पडताळेल -
4:30 - 4:32किंवा ऋण न फेडल्यामुळे
अटकेचा वाॅरंट जारी करेल -
4:32 - 4:34जसे मला डीसीत पकडले ,
तसं पकडतील -
4:34 - 4:36आणि तुरुंगात नेतील
-
4:36 - 4:38जरा वाईट वाटतं
-
4:39 - 4:42हा अनुभव घेतलेल्या अनेकांना
मी फर्ग्युसनमध्ये भेटलो -
4:42 - 4:44आणि त्यांच्या कथाही ऐकल्या
-
4:44 - 4:45फर्ग्युसन जेलमध्ये
-
4:45 - 4:48प्रत्येक छोट्या कोठडीत
बंकबेड आणि शौचालय आहे -
4:48 - 4:51तरीही प्रत्येक कोठडीत ४ जणांना कोंबतात
-
4:51 - 4:54ज्यामुळे बेडवर २ व जमिनीवर २ जण
-
4:54 - 4:56ज्यापैकी एकाला बळेच
अस्वच्छ शौचालयालगत झोपावे लागते -
4:56 - 4:58जे कधीही स्वच्छ केले नसावे
-
4:58 - 5:00खरे तर आख्खा तुरुंग
कधीही स्वच्छ केला नसावा -
5:00 - 5:04त्यामुळे सर्व जमिनी व भिंती
रक्त अन शेंबडाने माखलेल्या आहेत -
5:04 - 5:05पिण्यास पाणी नाही
-
5:05 - 5:08शौचालयालगताच्या एका नळाला तेवढे येते
-
5:08 - 5:10पाणी अस्वच्छ तर दिसतेच पण मचूळ लागते
-
5:10 - 5:11तिथे पुरेसे अन्न कधीच नव्हते
-
5:11 - 5:13कधी अंघोळीला पाणी नव्हते
-
5:13 - 5:16रजस्वला स्त्रियांच्या अनारोग्याची सीमा नसे
-
5:16 - 5:17व काळजी तर दूरच
-
5:17 - 5:20जेव्हा मी एका स्त्रीला
आरोग्यदक्षतेबद्दल विचारले -
5:20 - 5:22तेव्हा हसून ती म्हणाली “ओह नो नो ..
-
5:22 - 5:25इथे गार्डस लक्ष देतात
केवळ लैंगिक भुकेसाठी" -
5:26 - 5:29कर्ज चुकव्याना ते इथे आणत व म्हणत
-
5:29 - 5:32“जोवर तुम्ही कर्जाची फेड करणार नाही तोवर
तुमची सुटका नाही" -
5:32 - 5:35"आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या
कोणाला बोलवू शकला असता" -
5:35 - 5:37"जो तुमच्यासाठी पैसे आणू शकेल"
-
5:37 - 5:38"तर कदाचित तुम्ही सुटू शकला असता!"
-
5:38 - 5:41"तेही जर पुरेसे पैसे आणले असते तर"
-
5:41 - 5:44"पण जर तसे नसते तर इथे राहावे लागेल
कैक दिवस अथवा आठवडे" -
5:44 - 5:47दर दिवशी सुरक्षारक्षक
कोठडीच्या दारापाशी येत -
5:47 - 5:50कर्ज चुकवणाऱ्यांना वेठीशी धरत.
-
5:51 - 5:55जेव्हा तुरुंग पूर्ण भरे,
व तुम्ही अजूनही आत आहात -
5:55 - 5:57आणि नवा कैदी हजर होई
-
5:57 - 5:58त्याला घेताना
ते असा विचार करत -
5:58 - 6:01“ओके .. हा मनुष्य कर्ज देऊच शकणार नाही "
-
6:01 - 6:03शक्यता आहे नवा माणूस देईल”
-
6:03 - 6:06मग तुम्ही बाहेर आणि तो आत आणि
आणि हे चक्र असेच चालू राही. -
6:06 - 6:07मी एका माणसाला भेटलो,
-
6:07 - 6:08जो ९ वर्षांपूर्वी पकडला गेला
-
6:08 - 6:12वॉलग्रीनमध्ये ,
आक्रमकरित्या भीक मागताना -
6:12 - 6:16दंड व कोर्टाची फी त्याला परवडत नव्हती
-
6:16 - 6:19तरुणपणी तो आगीच्या फुफाट्यातून वाचला होता
-
6:19 - 6:22केवळ तिसऱ्या मजल्यावरच्या
खिडकीतून उडी मारल्यामुळे -
6:22 - 6:25पण त्या घटनेत
त्याच्या मेंदूला जबर जखम झाली -
6:25 - 6:27आणि पायासकट शरीराचे अनेक भाग निकामी झाले
-
6:27 - 6:28त्यामुळे तो बेकार झाला
-
6:28 - 6:30आणि आता तो सामाजिक सुरक्षा निधीवर जगतो
-
6:30 - 6:33जेव्हा मी त्याला
त्याच्या राहत्या घरी भेटलो -
6:33 - 6:36तेव्हा त्याच्याकडे मौल्यवान काही नव्हते
अगदी फ्रीजमध्ये अन्नही नव्हते -
6:36 - 6:37भुकेने तो ग्रस्त होता
-
6:37 - 6:40एका छोट्या पुठ्याच्या तुकडयाखेरीज
किमती असे त्याच्याकडे काही नव्हते -
6:40 - 6:42ज्यावर त्याने
त्याच्या मुलांची नावे लिहिली होती -
6:42 - 6:45तो त्याने खूप जपला होता
आनंदाने त्याने तो मला दाखवला -
6:45 - 6:49पण त्याच्याकडे देण्यासारखे काही नव्हते
त्यामुळे तो दंड वं फी भरू शकत नव्हता -
6:49 - 6:52ह्या नऊ वर्षात
त्याला १३ वेळा अटक झाली होती -
6:52 - 6:56आणि तब्बल १३० दिवसांची कोठडी झाली
भीकेच्या त्या केसमध्ये -
6:57 - 7:00त्यापैकी एका वेळेस तर
जोडून ४५ दिवस... -
7:00 - 7:04केवळ कल्पना करा आजपासून
तुम्हाला जून पर्यंत रहावे लागले तर -
7:04 - 7:07ह्या अशा मी काही वेळापूर्वी
वर्णन केलेल्या ठिकाणी ! -
7:09 - 7:13फर्ग्युसन जेलमधे बघितलेल्या आत्महत्येच्या
सर्व घटना त्याने मला कथन केल्या -
7:13 - 7:15एका व्यक्तीने स्वतःला गळफास लावला
-
7:15 - 7:17इतरांच्या हातात न येईल अशा ठिकाणी
-
7:17 - 7:20केवळ ओरडण्यापलीकडे
ती काही करू शकली नाहीत -
7:20 - 7:22जेणेकरून सुरक्षा कर्मचारी बघतील
-
7:22 - 7:24आणि येतील आणि
त्याला सोडवतील -
7:24 - 7:27पण तो म्हणाला की
गार्डसने ५ मिनिटे वेळकाढूपणा केला -
7:27 - 7:29व जेव्हा ते आले
तेव्हा तो मनुष्य मूर्च्छित होता -
7:29 - 7:33तेव्हा त्यांनी डॉक्टराना बोलावले
डॉक्टर तुरुंगात पोचले -
7:33 - 7:36ते म्हणाले "तो ठीक होईल"
असे म्हणून त्याला जमिनीवर सोडून ते गेले -
7:36 - 7:39अशा अनेक कथा ऐकल्या
तरीही मला मुळीच आश्चर्य वाटले नाही, -
7:40 - 7:44कारण आत्महत्या हे स्थानिक
तुरुंगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे -
7:44 - 7:47आणि ते केवळ तुरुंगातल्या
मानसिक स्वास्थ्याच्या अभावामुळे -
7:47 - 7:51तीन मुलांच्या एकट्या आईला मी भेटलो
जी तासाला ७ डाॅलर मिळवीत असे -
7:51 - 7:54फूड स्टॅपवर आपला व मुलांचा
उदरनिर्वाह ती करीत असे -
7:54 - 7:56एका दशकापूर्वी
-
7:56 - 7:59तिच्यावर
वाहतूक उल्लंघन व भुरट्या चोरीचे -
7:59 - 8:03काही गुन्हे दाखल झाले
आणि दंड भरणे तिला परवडत नसे -
8:03 - 8:06तेव्हापासून तिला जवळजवळ
१० वेळा त्या गुन्ह्यांमुळे अटक झाली -
8:06 - 8:09स्किझोफ्रेनिया व बायपोलर डीसऑर्डरने
ती ग्रस्त होती -
8:09 - 8:11तिला रोजच्या रोज औषधोपचाराची गरज भासे
-
8:11 - 8:14फर्ग्युसन जेलमध्ये तिला औषधे मिळेनात
कारण -
8:14 - 8:16कोणालाही तिच्यावर
औषधोपचार करायची परवानगी नव्हती -
8:16 - 8:20ती सांगे
"दोन आठवडे तुरुंगात डांबले जाणे" -
8:20 - 8:24"तेही चित्रविचित्र आभास वं आवाज ऐकत "
-
8:24 - 8:26"औषधासाठी केलेली आर्जवे"
-
8:26 - 8:28व त्याबदल्यात मिळालेले दुर्लक्ष"
किती भीषण असते -
8:28 - 8:30आणि हे असंबद्ध नाहीये
-
8:30 - 8:33एकंदर आपल्याकडे
कारावासातील ३०% स्त्रियांना -
8:33 - 8:35तीव्र मानसोपचाराची गरज भासते तिच्यासारखीच,
-
8:35 - 8:39पण फक्त सहा जणींमध्ये एकीला
तुरुंगात मानसोपचार मिळतात -
8:40 - 8:43मी ह्या सगळ्या विलक्षण गोष्टी ऐकल्या
-
8:43 - 8:46ज्या फर्ग्युसनमध्ये
कर्ज बुडव्यांबरोबर घडल्या -
8:46 - 8:48आणि हे बघण्याची जेव्हा स्वतःवर वेळ आली
-
8:48 - 8:50व तुरुंगात जावे लागले
-
8:50 - 8:52तेव्हा मला खात्री नव्हती काय बघेन
-
8:52 - 8:54पण हे अपेक्षित नव्हते
-
8:54 - 8:56ती एक साधारण सरकारी इमारत होती,
-
8:56 - 8:57पोस्ट ऑफिस सारखी
-
8:57 - 8:59अथवा शाळेची असावी तशी
-
8:59 - 9:00त्या घटनेने मला जाणवून दिले की
-
9:00 - 9:03ह्या बेकायदेशीर खंडणी योजना
-
9:03 - 9:04लपून छपून
चालवल्या जात नाहीयेत तर -
9:04 - 9:06खुलेआम चालवल्या जात आहेत
-
9:06 - 9:07आपल्या सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून
-
9:07 - 9:09सार्वजनिक योजनेच्या भाग आहेत
-
9:09 - 9:12ह्या घटनेने मला जाणवून दिले की
एकंदर गरिबीचा तुरुंगवासाला , -
9:12 - 9:14कर्जबुडव्यांच्या तुरुंगवासाच्या कक्षेबाहेरही
-
9:14 - 9:16जास्त महत्वाचे
आणि मध्यवर्ती स्थान आहे -
9:16 - 9:18आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये!
-
9:18 - 9:19माझ्या मनात येते
-
9:19 - 9:20आपली जमीन पद्धत
-
9:20 - 9:23आपल्या संस्थेमध्ये तुम्ही मुक्त असा
अथवा बंदी तुम्ही किती धोकादायक आहात -
9:23 - 9:24हे महत्वाचे ठरत नाही
-
9:24 - 9:26किंवा तुम्ही पळून जाण्याची
किती भीती आहे -
9:26 - 9:28ह्याचा संबंध नसतो
-
9:28 - 9:30तुम्ही जामीन भरू शकता की नाही
हे मायने ठेवते -
9:30 - 9:31बिल कोस्बी
-
9:31 - 9:32ज्याचा जमीन
-
9:32 - 9:33एक लाख रुपये होता
-
9:33 - 9:34व ज्याने त्वरित चेक फाडला
-
9:34 - 9:36त्याला एकही सेकंद तुरुंगवास झाला नाही
-
9:36 - 9:37पण सॅन्द्रा ब्लांड,
-
9:37 - 9:39तुरुंगात मेली
-
9:39 - 9:43कारण तिचे कुटुंब ५०० डॉलर
आणू शकले नाही -
9:43 - 9:47प्रत्यक्षात , आज जगात अर्धा लाख
सॅन्द्रा ब्लांड आहेत -
9:47 - 9:48५००००० लोक आज तुरुंगवासात आहेत
-
9:48 - 9:52फक्त एका कारणाने - ते जामीन देऊ शकत नाहीत
-
9:52 - 9:54आपल्याला सांगितले जाते की
जेल म्हणजे गुन्हेगारांसाठी असतात -
9:54 - 9:56पण आकडेवारीप्रमाणे तसे नाहीये
-
9:56 - 10:00प्रत्येक ५ पैकी ३ जण केवळ चाचपणीसाठी
जेलमध्ये टाकले गेले आहेत -
10:00 - 10:02त्यांनी प्रत्यक्षात
काहीच गुन्हा केलेला नाही -
10:02 - 10:05किंवा त्यांनी कुठल्याही गुन्ह्याची
कबुली दिलेली नाही -
10:05 - 10:07खुद्द सान्स फ्रान्सिस्को मध्ये
-
10:07 - 10:09जेलमधील ८५% कैदी
-
10:09 - 10:12हे केवळ अटकपूर्व कैदी असावेत
-
10:12 - 10:15ह्याचा अर्थ सान्स फ्रान्सिस्को जवळजवळ
८० लक्ष डॉलर खर्च करते -
10:16 - 10:20दरवर्षी केवळ अटकपूर्व कैदेसाठी
-
10:20 - 10:25ह्यापैकी बरेच लोक जेलमध्ये आहेत
जामीन देऊ शकत नाहीत म्हणून -
10:25 - 10:27आणि तेही अगदी किरकोळ गुन्ह्यांसाठी
-
10:27 - 10:29आणि तपासणी होईपर्यंतचा वेळ
-
10:29 - 10:34हा त्यांना गुन्हेगार ठरवल्यावर होणाऱ्या
शिक्षेपेक्षाही जास्त असेल -
10:34 - 10:36ह्याचा अर्थ त्यांना पक्की सुटका मिळेल
-
10:36 - 10:38जर त्यांनी क्षमायाचना केली तर
-
10:38 - 10:40आता निवडीचे पर्याय असे:
-
10:40 - 10:41ह्या भयानक जागेवर राहावे?
-
10:41 - 10:45माझ्या कुटुंब आणि
माझ्यावर अवलंबित लोकांपासून दूर -
10:45 - 10:47नोकरीपासून वंचित
-
10:47 - 10:49आणि मग आरोपांविरुद्ध लढावे?
-
10:49 - 10:51का वकिलाच्या इच्छेनुसार क्षमायाचना
करून बाहेर पडावे? -
10:51 - 10:54आणि ह्याक्षणी ते केवळ अटकपूर्व कैदी आहेत,
गुन्हेगार नव्हेत -
10:54 - 10:57पण एकदा त्यांनी क्षमायाचना केली,
कि आम्ही त्यांना गुन्हेह्गार म्हणतो -
10:57 - 11:00आणि जरी श्रीमंत मनुष्य
ह्या परिस्थितीमध्ये कधी अडकला नसेल -
11:00 - 11:02तरीही श्रीमंत माणसाला
सरळ जामीन मिळाला असता -
11:02 - 11:07ह्या वेळी तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि
-
11:07 - 11:09"हा मुलगा प्रभाव पाडण्यासाठी उभा आहे.
आणि काय करतोय?" -
11:09 - 11:10(हशा)
-
11:10 - 11:12"हे अतिशय निराशाजनक आहे.
मला माझे पैसे हवेत " -
11:12 - 11:13(हशा)
-
11:16 - 11:17पण खरे तर
-
11:17 - 11:21जेलबद्दल बोलणे हे इतर पर्यायांपेक्षा
कमी निराशाजनक वाटते -
11:21 - 11:24कारण मला असे वाटते की
आपण जर ह्याविषयी मौन बाळगले -
11:24 - 11:26आणि जेलबद्दलचा विचार
सामूहिकरीत्या बदलला तर -
11:26 - 11:27आपल्या आयुष्याच्या सरतेशेवटी
-
11:27 - 11:30आपल्याकडे तरी तुरुंग भरलेले असतील
अशा कैद्यांनी जे तिथले नसतील -
11:30 - 11:31हे मला अतिशय खेदजनक वाटते
-
11:31 - 11:34पण मला ज्याचे अप्रूप वाटते
ते म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी -
11:34 - 11:36जेलबद्दलची आपली विचारसरणी
बदलू शकतात -
11:36 - 11:39शास्त्रशुद्ध रित्या "" नव्हे
-
11:39 - 11:42किंवा "गुन्हेगारीची शिक्षा"
-
11:42 - 11:44पण माणुसकीच्या शब्दात
-
11:44 - 11:47जेव्हा आपण एखाद्या माणसाला
काही दिवस वा आठवडे किंवा महिन्यांसाठी -
11:47 - 11:49किंवा काही वर्षांसाठी सुद्धा
तुरुंगात धाडतो तेव्हा -
11:49 - 11:53आपण त्याच्या शरीरावर किंवा मनावर
काय परिणाम घडवत आहोत का? -
11:53 - 11:55कुठल्या परिस्थितीत आपण हे करू इच्छितो?
-
11:55 - 11:58आणि कर इथे असलेल्या
आपण १०० जणांनी सुरुवात केली तर -
11:58 - 12:02आपण जेलप्रती वेगळ्या पद्धतीने
विचार करण्यासाठी वचनबद्ध होऊ शकतो -
12:02 - 12:04मग आपण पूर्वीची जुनी विचारधारा बदलू शकतो
-
12:04 - 12:08आज जर मी तुमच्याजवळ काही सोडून जात असेन
तर तो आशादायी विचार असेल -
12:08 - 12:11की जर मुळापासून बदल घडवायचा असेल तर
-
12:11 - 12:15केवळ दंड आणि जामिनाविषयी
नियम बदलून होणार नाही -
12:15 - 12:17तर जे नवे नियम जुन्यांना
बदलून निर्माण होतील -
12:17 - 12:20त्यांच्यामुळे गोरगरीबांना
व अल्पसंख्यांकांना शिक्षा होणार नाही -
12:20 - 12:23जर असा बदल हवा असेल.
-
12:23 - 12:25तर प्रत्येकाने दृष्टीकोन बदलायला हवा
-
12:25 - 12:26धन्यवाद
-
12:26 - 12:28(टाळ्या)
- Title:
- तुरुंगामध्ये गरीबांचा कसा होतोय छळ?
- Speaker:
- सलील दुडानी
- Description:
-
गरीब असल्याकारणाने आपण लोकांना तुरुंगात का पाठवतो? आज, अर्धा लक्ष अमेरिकन जेलमध्ये आहेत केवळ ते अटकेनंतर जामीन देऊ शकत नाहीत , आणि अजून बरेच डांबलेले आहेत कारण त्यांची कर्जे थकली आहेत, कधीकधी अगदी पार्किंग तिकिटाच्या क्षुल्लक कारणासाठी तुरुंगवास भोगत आहेत. सलील दुडानी अशा अनेकांच्या कथा व्यक्त करतात, ज्यांनी मिसूरी राज्यातील फर्ग्युसन शहरात कारावास भोगला. अशा गोष्टी ज्या "गरिब वं अल्पसंख्याकांना कशी शिक्षा करावी " ह्याबद्दल आपले विचार बदलायला भाग पाडतात.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 12:43
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Smita Kelkar edited Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Smita Kelkar edited Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Smita Kelkar edited Marathi subtitles for How jails extort the poor | ||
Smita Kelkar edited Marathi subtitles for How jails extort the poor |