आता तुम्ही Sprite Lab चा वापर
शिकला आहात, तर आता तुम्ही
तुमच्या प्रोग्रॅमसोबत इतर कोणी खेळत असताना
प्रतिसाद द्यायला तयार करू शकता.
यासाठी तुम्हाला इव्हेंट वापरावे लागतील.
इव्हेंट तुमच्या प्रोग्रॅमला
एखादी घटना होण्याची
वाट पाहण्यास सांगते आणि
तसे होताच प्रतिसाद देते.
माउस क्लिक करणे, अॅरो बटण दाबणे किंवा
स्क्रीनवर टॅप करणे
ही इव्हेंटची उदाहरणे आहेत.
अशा ब्लॉक्सना इव्हेंट ब्लॉक म्हणतात.
इव्हेंट ब्लॉकमधील कोड
तेव्हा चालवला जातो जेव्हा
त्यानुरूप काम केले आहे असे कळते.
उदाहरणार्थ,
जर हा ब्लॉक मी
"when clicked" इव्हेंटमध्ये जोडला,
तर जेव्हा कोणी माझ्या परीवर
क्लिक करेल किंवा टॅप करेल
तेव्हा माझी परी काहीतरी बोलेल.
इव्हेंट ब्लॉक तुमच्या मुख्य प्रोग्रॅममध्ये
स्नॅप होत नाहीत याकडे लक्ष द्या.
त्याऐवजी, ते
स्वतःचे लहान प्रोग्रॅमच तयार करतात.
जर तुम्ही अनेक परी वापरल्या असतील,
तर एखादी इंटरअॅक्टिव्ह गोष्ट सांगण्यासाठी
तुम्ही आणखी इव्हेंटसुद्धा वापरू शकता.
कसा आहेस, पिझ्झा!
एव्होकाडो, माझ्या मित्रा!
Sprite Lab मध्ये यापेक्षा अधिक
काय करू शकता ते तुम्ही लवकरच शिकाल,
जसे की परीचा आकार आणि स्वरूप बदलणे,
निरनिराळ्या पार्श्वभूमी सेट करणे,
आवाज काढणे आणि इतर बरेच काही.
कोणी तुमच्या परीसोबत इंटरअॅक्ट केले तर
तुमच्या परीने काय केले पाहिजे?
ते तुम्हीच ठरवा.