मला वाटतं, मुलींनी संगणक शास्त्र शिकणं
खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं, जगात
बराच काळ काही गोष्टी मुलांसाठी होत्या आणि
काही गोष्टी मुलींसाठी होत्या.
आता प्रत्येकाला माहिती आहे की मुलांना आणि मुलींना
समान संधी आहे, आपण फक्त मुलींना पाठिंबा दिला
आणि त्यांना सुरुवातीला प्रोत्साहन दिलं तर
आपण समानता आणू शकतो.
आणि मग आपल्याला या समीकरणाशी खेळायचीसुद्धा गरज नाही कारण मग तो एक नैसर्गिक मार्ग बनेल.
कोड करता येणं तुम्हाला कोणतीही गोष्ट तयार करण्याचं स्वातंत्र्य देतं आणि याचा अर्थ माझी कल्पना
प्रोग्रॅमिंग वापरून व्यक्त करण्याची ताकद
माझ्यात आहे.
प्रोग्रॅमिंगचा फक्त अनुभव तुम्हाला विचार करण्याची
नवीन पद्धत शिकवतो.
आणि त्यामुळे तुम्ही सोल्युशनपर्यंत काही पायऱ्या चालता आणि हे फारच मौल्यवान आहे.
सॉफ्टवेअर वापरणं ही एक गोष्ट आहे आणि ते कसं काम करतं त्यात बदल करणं
ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. हो, माझ्या कॉम्प्युटरच्या सगळ्या आवडत्या आठवणी
टीम्सबरोबर एकत्रितपणे प्रोग्रॅमिंग करण्याच्या आहेत.
मला नाही वाटत की संगणक शास्त्र ही एकट्यानं करायची गोष्ट आहे.
जर तुम्हाला काहीतरी अद्भुत बनवायचं असेल तर तुम्हाला सहसा ते टीममध्ये करावं लागतं आणि संगणक
शास्त्र याला अपवाद नाही. तुम्ही सगळेजण अशा काळात राहता जिथं स्वत:ला व्यक्त करणं, वेगवेगळ्या
लोकांबद्दल शिकणं, व्यवसाय करणं आणि तुमच्या समुदायात खरा बदल घडवून आणणं हे सगळं
अगदी शक्य आहे. कॉम्प्युटर्ससह ते अगदी तुमच्या बोटाच्या टोकावर आहे. हे मुलगा किंवा मुलगी
असण्यावर अवलंबून नाही. हे प्रतिभावान असण्यावर अवलंबून आहे. संगणक शास्त्राला जास्त प्रतिभावान
लोकांची गरज आहे, असे लोक जे कल्पक व्हायला आणि या जगाला अधिक चांगली जागा बनवायला घाबरत नाहीत.
सुरुवात करा! फक्त प्रयत्न करा आणि एका वर्गात सहभागी व्हा. एका तासात तुम्ही काय शिकू शकता
ते खूप अदुभूत आहे. आणि कोड ऑफ अवरचा हाच सगळ्यात छान भाग आहे. देशाच्या सगळ्या भागातल्या,
सगळ्या वयाच्या, सगळ्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेल्या तुम्ही सगळ्याजणी सहभागी होऊ शकता
आणि त्यामुळंच सगळ्यांसाठी योग्य संधी तयार होतात.
प्रत्येक मुलीला तंत्रज्ञान तयार करण्यात सहभागी होण्याचा अधिकार आहे. हे तंत्रज्ञान आपलं जग बदलेल
आणि ते कोण चालवतं तेसुद्धा बदलेल. प्रत्येक देशातील मुलींना मी एक अवर ऑफ कोड शिकण्याचं आव्हान देते.
तंत्रज्ञानानं आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत बदल घडवला आहे, जर तुम्ही तंत्रज्ञान बदलू शकलात तर
तुम्ही जग बदलू शकता. जग बदला. #HourOfCode