प्रत्येक खेळाडूला माहिती असतं की
सराव करून आपलं कौशल्य सुधारतं,
त्याच गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करतो, त्या चांगल्या जमेपर्यंत किंवा आपलं ध्येय साध्य होईपर्यंत.
मी हायस्कूलमध्ये असताना,
मी सलग 10 फ्री थ्रोज केल्याशिवाय
सराव थांबवत नसे.
त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रॅम
आणि रिपीट कमांड मिळते तेव्हा
तुम्ही कितीवेळा पुन्हा पुन्हा करायचे आहे
त्याची संख्या सांगू शकता,
किंवा तुम्ही एक ध्येय ठरवू शकता,
आणि ते ध्येय गाठले जाईपर्यंत ती कमांड
पुन्हा पुन्हा करायला सांगू शकता.
पुढच्या उदाहरणात, "रिपीट" ब्लॉक
बदलला आहे,
तुम्हाला तो किती वेळा पुन्हा पुन्हा व्हायला हवा
आहे हे सांगण्याऐवजी
तुम्ही "repeat until" ब्लॉक वापरून अँग्री
बर्डला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायला सांगू शकता,
जोवर तो डुकरापर्यंत पोचत नाही किंवा
भिंतीवर आपटत नाही, तोपर्यंत.
आणि पुन्हा, आपण लूपच्या आत अनेक ब्लॉक्स
टाकून कृतींची मालिका पुन्हा पुन्हा करू शकतो.