तर सुरक्षितता म्हणजे दोन भिन्न गोष्टी आहेत:
ती एक भावना आहे आणि ते एक वास्तव आहे.
आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
तुम्ही सुरक्षित नसला तरी
तुम्हाला सुरक्षित वाटू शकते.
आणि तुम्हाला सुरक्षित वाटले नाही तरी
तुम्ही सुरक्षित असू शकता.
खरोखर, त्या दोन वेगवेगळ्या संकल्पना
एकाच शब्दाशी संबंधित आहेत.
आणि या भाषणाद्वारे मला
त्या दोन्ही तोडायच्या आहेत --
त्या कधी दूर जातात
आणि त्या कधी एकत्र येतात हे समजून घेऊन.
आणि भाषा हा यातील एक खराखुरा अडथळा आहे.
आपण ज्या संकल्पनांबद्दल बोलणार आहोत
त्यांसाठी फारसे योग्य शब्द नाही आहेत.
म्हणून जर तुम्ही सुरक्षिततेकडे
अर्थशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर,
ती एक जमा खर्चाचे गणित आहे.
प्रत्येकवेळी तुम्हाला सुरक्षितता मिळत असते
त्यावेळी तुम्ही दुसरे काहीतरी खर्च करत असता.
हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असेल --
तुम्ही घरी सुरक्षा-गजर लावणार का नाही याबद्दलचा --
किंवा राष्ट्रीय निर्णय असेल -- तुम्ही दुसर्या देशावर आक्रमण करण्यासाठीचा--
तुम्ही कशावर तरी पाणी सोडताय,
पैसा किंवा वेळ, सुविधा, क्षमता,
किंवा मूलभूत स्वातंत्र्यांवर
आणि कोणत्याही सुरक्षेकडे पाहताना विचारायचा प्रश्न
हा नाही की त्यामुळे आपण सुरक्षित होत आहोत की नाही,
पण त्यासाठी मोजलेली किंमत बरोबर आहे की नाही हा आहे.
तुम्ही गेली काही वर्षे ऐकताय,
सद्दाम हुसेन सत्तेवर नाही त्यामुळे जग जास्त सुरक्षित आहे.
ते खरे असेलही, पण ते जास्त महत्त्वाचे नाही आहे.
प्रश्न आहे की त्यासाठी मोजलेली किंमत बरोबर होती की नव्हती.
आणि तुमचा तुम्ही निर्णय घ्या,
आणि तुम्ही ठरवाल की त्यांच्यावर केलेले आक्रमण बरोबर होते की नाही.
असा तुम्ही सुरक्षिततेबद्दल विचार करायचा असतो --
जमा-खर्चाच्या गणिताद्वारे.
आता यात अनेकवेळा चूक किंवा बरोबर असे काहीच नसते.
आपल्यातील काही लोकांच्या घरात सुरक्षागजर प्रणाली असते,
आणि काहींच्यात नसते.
आणि हे सर्व अवलंबून आहे आपण कुठे राहतो,
आपण एकटे राहतो की कुटूंबासोबत,
आपल्याकडे किती मुल्यवान माल आहे,
आणि चोरीच्या धोक्याचा स्विकार
आपण किती करू शकतो यांवर.
राजकारणातही,
बरेच वेगवेगळे पर्याय असतात.
आणि बर्याच वेळेला, हे जमा-खर्च,
फक्त सुरक्षिततेशिवाय इतर गोष्टींबद्दल असतात,
आणि मला वाटते ते खरोखर महत्त्वाचे आहे.
आता लोकांना या जमाखर्चाबद्दल
नैसर्गिक अंतर्ज्ञान असते.
आपण ते दररोज करत असतो --
काल रात्री माझ्या हॉटेलच्या खोलीत,
जेव्हा मी दाराला दोन कुलुपे लावायचे ठरवले त्यावेळी,
किंवा तुम्ही इथे गाडी चालवत आला त्यावेळी
जेव्हा आपण जेवायला जातो त्यावेळी
आपण ठरवतो की जेवण विषारी नाही आहे आणि आपण ते खातो.
आपण हे जमा-खर्चाचे गणित परत परत
दररोज अनेक वेळा करतो.
बहुतांशी आपल्या ध्यानातही ते येत नाहीत.
आपल्या जिवंत असण्याचाच ते एक भाग आहेत; आपण सगळेच ते करतो.
प्रत्येक प्रजाती तसे करते.
समजा शेतात एक ससा गवत खातो आहे,
आणि सश्याला कोल्हा दिसणार आहे.
ससा सुरक्षिततेच्या जमा-खर्चाचे गणित करणार आहे:
"मी थांबू की मी पळून जाऊ?"
आणि तुम्ही त्याबाबत विचार केला,
तर जे ससे ते गणित करण्यात चांगले आहेत
ते जगतील आणि प्रजनन करतील
आणि जे ससे ते करण्यात वाईट असतील
ते भक्ष्य बनतील किंवा उपाशी राहतील.
आणि तुम्हा विचार करता की
आपण, या ग्रहावरील सर्वात यशस्वी प्रजाती --
तुम्ही, मी, सर्वजण --
हे जमा-खर्चाचे गणित करण्यात एकदम पारंगत असू.
तरी परत परत असे दिसून येते
की आपण त्याबाबत अतिशय वाईट आहोत.
आणि मला वाटते की हा मूलतः रोचक प्रश्न आहे.
मी तुम्हाला थोडक्यात उत्तर देईन.
उत्तर आहे की आपण सुरक्षिततेच्या भावनेनुसार वागतो
आणि वास्तवानुसार नाही.
आणि बहुतेक वेळा ते चालते.
बर्याचदा,
भावना आणि वास्तव एकच असतात.
आणि जवळजवळ संपूर्ण मानवी प्रागैतिहासात
ते नक्कीच खरे होते.
आपण ही क्षमता विकसित केली आहे
कारण ती उत्क्रांतीच्या दृष्टीने योग्य होती.
याबद्दल असा विचार करता येईल
की आपण इसपूर्व १,००,००० मध्ये
पूर्व आफ्रिकेतील पर्वतीय प्रदेशात छोट्या कुटूंबातील गटात
राहात असताना नेहमी घ्याव्या लागलेल्या धोक्यांबद्दलच्या
निर्णयांबाबत अतिशय तल्लख आहोत.
२०१० मधल्या न्यूयॉर्कसाठी, फारसे नाही.
धोका समजण्याच्या बाबतीत अनेक चुका होत असतात.
यातील बरेच चांगले प्रयोग केले गेले आहेत.
आणि तुम्हाला काही चुका पुन्हापन्हा होताना दिसू शकतील.
मी त्यातील चार सांगतो.
आपण भव्य-दिव्य आणि असामान्य अशा धोक्यांना अतिरंजित करतो
आणि नेहमीच्या धोक्यांना कमी किंमत देतो --
जसे (विमानातून) उडणे विरूद्ध (गाडी) चालवणे.
अज्ञात गोष्टींना ज्ञात गोष्टींपेक्षा
जास्त धोकादायक समजले जाते.
त्याचे एक उदाहारण असेल,
लोकांना परके लोक अपहरण करतील अशी भीती वाटते,
तर याबाबतीतील माहिती नातेवाईकांनी केलेली अपहरणे जास्त असतात याला आधार देते.
हे आहे मुलांबाबात.
तिसरी, एखाद्या व्यक्तीशी निगडीत अशा धोक्यांना
अनामिक धोक्यांपेक्षा जास्त मोठे समजले जाते.
जसं बिन लादेन जास्त भीतीदायक आहे कारण त्याला नाव आहे.
आणि चौथी..
की लोक त्यांचे नियंत्रण असलेल्या परिस्थितीतील
धोक्यांना प्रमाणापेक्षा कमी महत्त्व देतात
आणि ज्या परिस्थितीवर त्यांचे नियत्रण नाही त्यातील धोक्यांना जास्त महत्त्व देतात.
तर एकदा तुम्ही स्कायडायविंग किंवा धुम्रपान करण्यास सुरूवात केली,
की तुम्ही त्यातील धोक्यांने कमी लेखता.
जर धोका तुमच्यावर लादला गेला असेल तर -- दहशतवाद हे चांगले उदाहरण होते --
तुम्ही त्याला जास्त किंमत देता, कारण तुम्हाला ते तुमच्या नियंत्रणाखाली आहे असे वाटत नाही.
अशा आणखीही बर्याच चुका आहेत, आकलनातील चुका,
ज्या आपल्या धोक्यांविषयीच्या निर्णयांवर परिणाम करतात.
त्यातील एक उपलब्धता अनुमान,
ज्याचा अर्थ मूलतः असा आहे की
आपण एखाद्या गोष्टीची शक्यता त्या गोष्टीबद्दलच्या
घटना किती लगेच मनात आणू शकतो यावरून ठरवतो.
तुम्ही विचार करू शकाल ते कसे होते.
तुम्ही जर वाघांच्या हल्ल्यांबाबात बरेच ऐकले असेल तर, आजूबाजूला भरपूर वाघ असणारच.
सिंहाचे हल्ले तुमच्या ऐकिवात नाहीत म्हणजे अजूबाजूला जास्त सिंह नाही आहेत.
हे ठीक आहे जोपर्यंत तुम्ही वर्तमानपत्रांचा शोध लावत नाही.
कारण वर्तमानपत्रे काय करतात की
ती कधीतरी उद्भवणार्या धोक्यांची
वारंवार पुनरूक्ती करतात
मी लोकांना सांगतो, जर एखादी गोष्ट वर्तमानपत्रात असेल तर त्याबद्दल काळजी करू नका.
कारण व्याख्येनुसारच,
बातमी म्हणजे एखादी गोष्ट जी जवळजवळ कधीच घडत नाही.
(हशा)
एखादी गोष्ट सारखीच घडत असेल, तर ती बातमी होऊ शकत नाही --
गाड्यांचे अपघात, घरगुती मारहाण --
त्यागोष्टींबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
आणि आपण एक गोष्टी सागणार्यांची जमात पण आहोत.
आपण माहितीपेक्षा गोष्टींना जास्त महत्त्व देतो.
आणि त्यात थोडा पायाभूत निरंकपणा (अंकांबद्दलचे अज्ञान) आहे.
म्हणजे तो "एक दोन तीन, अनेक" चा विनोद काहीसा बरोबरच आहे.
आपन लहान संख्यांच्या बाबतीत एकदम चांगले आहोत.
एक आंबा, दोन आंबे, तीन आंबे,
१०,००० आंबे, १,००,००० आंबे --
अजुनही नासून जाण्याआधी खाता येतील त्यापेक्षा ते जास्त आंबे आहेत.
तर अर्धा, पाव, एक पंचमांश -- याबाबत आपण चांगले आहोत.
दहा लाखात एक, शंभर कोटीत एक --
ते म्हणजे जवळ जवळ नसल्यासारखेच आहेत.
म्हणूनच आपल्याला सामान्य नसलेले धोके
समजण्यास त्रास होतो.
आणि या आकलनशक्तीतील चुका
आपल्या आणि वास्तवामधील चाळणी बनतात.
आणि त्याचा परिणाम
असा होतो की भावना आणि वास्तव यात काहीच समान राहत नाही,
ते भिन्न बनतात.
आता तुमची एकतर अशी भावना असते की -- तुम्हाला तुम्ही असता त्यापेक्षा जास्त सुरक्षित वाटते.
हीच आहे सुरक्षेची चुकीची समजूत.
किंवा उलट,
आपण असुरक्षित असल्याची चुकीची भावना.
मी "सुरक्षिततेच्या नाटकासंबंधी" बरेच लिहीतो,
ज्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांना सुरक्षित वाटते,
पण वास्तवात त्यांचा काहीही उपयोग होत नाही.
अशा गोष्टींसाठी कुठलाच शब्द नाही आहे ज्या आपल्याला सुरक्षित करतात,
पण आपल्याला सुरक्षित वाटू देत नाहीत.
बहुतेक ते काम आपल्यासाठी सीआयए करते.
परतूया अर्थशास्त्राकडे.
जर अर्थशास्त्र, किंवा बाजारपेठेच्या पद्धतीने सुरक्षितता चालली तर,
आणि जर लोकांनी जम-खर्चाचे गणित
सुरक्षिततेच्या भावनेवरून केले तर,
पैसा मिळविण्यासाठी कंपन्यांसाठी हुशारीची गोष्ट
म्हणजे लोकांच्यात सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठौ
जे काही करावे लागते ते करायचे.
आणि हे दोन रीतीने करता येते.
पहिली, तुम्ही लोकांना खरोखर सुरक्षित करू शकता
आणि ते त्याची नोंद घेतील अशी आशा राखता.
किंवा दुसरी, तुम्ही लोकांना फक्त ते सुरक्षित आहेत असे भासवू शकता
आणि त्यांना ते कळणार नाही अशी आशा राखता.
आणि असे काय आहे की लोकांना नोंद घ्यायला लावते?
त्या आहेत दोन गोष्टी:
सुरक्षितता, धोके, जोखिमी,
त्यांवरचे उपाय, आणि ते कसे काम करतात
याबद्दलची समज.
पण तुम्हाला गोष्टी माहिती असतील,
तर तुमच्या भावना वास्तवाच्या जवळ असण्याची शक्यता जास्त आहे.
पुरेशी व्यवहारातील उदाहारणे मदत करतील.
आता आपल्याला आपल्या आजूबाजूच्या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण माहिती आहे,
कारण आपण तेथे राहतो, आणि त्याबद्दलची आपली भावना
मूलतः वास्तवाशी एकरूप असते.
सुरक्षिततेचे नाटक तेव्हा उघडे पडते
जेव्हा ते काम करत नाही हे स्पष्ट होते.
ठीक आहे, तर कोणती गोष्ट लोकांना नोंद घ्यावयाला लावते?
ती म्हणजे कमी समज.
जर तुम्हाला धोकयांची समज नसेल तर तुम्हाला त्याच्या किंमतीची समज नसते,
आणि जमखर्चाचे तुमचे गणित चुकीचे होण्याची शक्यता वाढते,
आणि तुमची भावना वास्तवाशी एकरूप नसते.
जास्त उदाहरणे नाही आहेत.
कमी वारंवारतेच्या घटनांबाबत
एक अंतर्भूत प्रश्न असतो.
उदाहरणार्थ, जर
दहशतवाद जवळजवळ होतच नसला तर,
तर दहशतवादविरोधी-उपायांच्या प्रभावांबद्दल
कोणताही निर्णय घेणे अवघड आहे.
अशा कारणांसाठीच तुम्ही कुमारिकांचे बलिदान देत राहता,
आणि तुमचे जादूई घोड्याचे संरक्षण एकदम छान काम करते.
असफलतेची पुरेशी उदाहरणे नाही आहेत.
आणि, भावना ज्या या गोष्टीला धुरकट बनवतायत --
आकलनशक्तीतील चुका, ज्याबद्दल मी आधी बोललो,
भीती, सामजिक श्रद्धा,
किंवा मूलतः वास्तवाचे अपुरे प्रतिरूप.
तर मला गोष्टी अजुनही क्लिष्ट करू द्या.
माझ्याकडे भावना आणि वास्तव आहे.
मला तिसरे मूलतत्त्व त्यात वाढवायचे आहे, मला प्रतिरूप वाढवायचे आहे.
भावना आणि प्रतिरूप आपल्या डोक्यात,
आणि वास्तव बाहेरील जगात असते.
ते बदलत नाही; ते खरे आहे.
तर भावना आपल्या अंतर्ज्ञानावर अवलंबून असते.
प्रतिरूप विचारशक्तीवर अवलंबून असते.
मूलतः तोच फरक आहे.
एका सुलभ आणि प्राचीन जगात,
प्रतिरूप असण्यावे कारणच नाही.
कारण भावना ही वास्तवाशी जवळ आहे.
तुम्हाला प्रतिरूपाची गरजच नाही आहे.
पण आधुनिक व क्लिष्ट जगात,
आपल्याला सामोऱ्या जावे लागलेल्या धोक्यांबाबत
समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रतिरूपांची गरज असते.
जंतूंविषयी काही भावना नसते.
त्यांना समजण्यासाठी प्रतिरूपाचीच गरज असते.
म्हणजेच हे प्रतिरूप
वास्तवाचे एक हुशारीने केलेले वर्णन असते.
आणि नक्कीच ते विज्ञान आणि तंत्रज्ञानानुसार,
सीमितच असते.
जोपर्यंत सुक्ष्मदर्शीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत
जंतूजन्य रोगांच्या सिद्धांताबद्दल आपल्याला कळणे शक्यच नव्हते.
आणि ते आपल्या आकलनशक्तीतील तृटींमुळेही सीमित असते.
पण त्यात आपल्या भावनेला उलथण्याची
क्षमता असते.
आणि ही प्रतिरूपे आपल्याला कोठून मिळतात? दुसऱ्या लोकांकडून.
धर्मातून, संस्कृतीतून,
शिक्षकांकडून, वयस्क लोकांकडून.
दोन वर्षांपूर्वी,
मी दक्षिण आफ्रिकेत सफारीसाठी गेलो होतो.
तिथे माझ्याबरोबर असलेला मार्गदर्शक क्रुगर राष्ट्रीय उद्यानात वाढला होता.
कसे टिकून रहायचे याबद्दलची त्याची बरीच क्लिष्ट प्रतिरूपे होती.
आणि ते सर्व तुमच्यावर सिंह किंवा चित्ता किंवा रानगेंडा किंवा हत्ती
यांपैकी कोणी हल्ला केला यावर आणि तुम्हाला कधी पळून जायला लागते,
आणि तुम्हाला झाडावर कधी चढावे लागते --
आणि कधी झाडावर आजिबात चढून चालणार नव्हते यावर अवलंबून होते
मी एका दिवसातच मेलो असतो,
पण तो तिथे जन्मला होता,
आणि कसे टिकून राहायाचे याची त्याला समज होती.
मी न्युयॉर्क शहरात जन्मलो होतो.
मी त्याला न्युयॉर्कला घेऊन गेलो असतो, आणि तो एका दिवासात मेला असता.
(हशा)
कारण आमच्या वेगवेगळ्या अनुभवांनुसार
आमच्याकडील प्रतिरूपे भिन्नभिन्न होती.
प्रतिरूपे माध्यमांकडून येऊ शकतात,
आपल्या निर्वाचित अधिकाऱ्यांकडूनही.
दहशतवादाच्या, बाल अपहरणाच्या,
विमान सुरक्षेच्या, गाडीच्या सुरक्षेच्या
प्रतिरूपांचा विचार करा,
प्रतिरूपे उद्योगांकडून येऊ शकतात.
मी अभ्यास करतो अशी दोन अवेक्षण कॅमेरा आणि
ओळखपत्रांची,
संगणक सुरक्षिततेची बरीच प्रतिरूपे तिकडूनच येतात.
बरीच प्रतिरूपे विज्ञानाकडून येतात.
आरोग्यासंबंधीची प्रतिरूपे चांगली उदाहरणे आहेत.
कर्करोग, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, सार्सचा विचार करा.
या रोगासंबंधीच्या सुरक्षिततेच्या
आपल्या सर्व भावना
खरेतर विज्ञानाने दिलेल्या आणि माध्यमातून गाळून आलेल्या
प्रतिरूपांवरून येतात.
तर प्रतिरूपे बदलू शकतात.
प्रतिरूपे स्थिर नसतात.
जसे आपण आपल्या पर्यावरणात जसे जास्त रूळत जातो,
आपली प्रतिरूपे आपल्या भावनेच्या जवळ जाऊ शकतात.
तर एक उदाहरण कदाचित,
जर तुम्ही १०० वर्षापुर्वी पाहिले,
जेव्हा वीज पाहिल्यांदा रोजच्या व्यवहारात येत होती,
तिच्या संबंधी भरपूर भीती होती.
मला म्हणायचे आहे की, असे लोक होते जे दरवाजावरील घंटेची कळ दाबायला घाबरत होते,
कारण त्यात वीज होती आणि ती धोकादायक होती.
आपल्यासाठी, आपण वीजेबरोबर अगदीच सहजतेने राहतो.
आपण विद्य़ुत दिवे बदलतो
त्याबद्दल अगदी काहीही विचार न करता.
वीजेच्या सुरक्षिततेचे आपले प्रतिरूप
आपण जन्मलो तेव्हापासूनचे आहे.
आपण वाढत असताना ते बदललेले नाही.
आणि आपण त्यात चांगले आहोत.
किंवा विचार करा
विविध पिढ्यांमधील इंटरनेटवरील धोक्यांचा
तुमच्या पालकांचा इंटरनेट सुरक्षिततेबद्दल काय दृष्टिकोन आहे,
विरूद्ध तुमचा काय आहे,
विरूद्ध आपल्या मुलांचा काय असेल.
प्रतिरूपे सरतेशेवटी पृष्ठभूमीत विरून जातात.
अंतर्ज्ञान हा फक्त परिचित साठीचा दुसरा शब्द आहे.
तर जसे जसे तुमचे प्रतिरूप वास्तवाच्या जवळ जाते,
आणि तुमच्या भावनेत मिसळत जाते,
तुम्हाला त्याचे अस्तित्वच कळत नाही.
याचे एक सुरेख उदाहरण मागच्या वर्षी
स्वाईन फ्लू संबंधीचे आहे.
जेव्हा स्वाईन फ्लू पाहिल्यांदा उद्भवला,
सुरूवातीच्या बातमीमुळे प्रमाणपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या.
आता याला नाव होते,
त्यामुळे नेहेमीच्या तापापेक्षा तो जास्त भीतीदायक झाला,
जरी साधा फ्लू त्यापेक्षा जास्त प्राणघातक होता.
आणि लोकांना वाटत होते की डॉक्टरांना त्याच्याशी सामना करता आला पाहिजे.
त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली नसल्याची भावना निर्माण झाली.
आणि त्या दोन गोष्टींनी
धोक्याला वास्तवापेक्षा जास्त बनविले.
जसे नाविन्य कमी होऊ लागले, महिने सरले,
थोडी सहनशिलता तयार झाली,
लोकांना त्याची सवय झाली.
नवीन माहिती काहीच नव्हती पण भीती कमी झाली.
शरद ऋतूपर्यंत,
लोकांना वाटू लागले
डॉक्टरांनी यावर तोडगा शोधून काढला असावा.
आणि लोकांना एक प्रकराचे --
विभाजन निवडायचे होते
भिती आणि स्विकृतीमध्ये --
खरेतर भिती आणि उदासिनतेमध्ये --
आणि त्यांनी एक प्रकारचा संशय निवडला.
आणि मागच्या हिवाळ्यात ज्यावेळी लस निघाली,
असे बरेच लोक होते -- आश्चर्यकारकरित्या जास्त --
ज्यांनी लस घेण्यास नकार दिला --
हे चांगले उदाहरण आहे
लोकांच्या सुरक्षिततेविषयीच्या भावना कशा बदलतात, त्यांचे प्रतिरूप कसे बदलते,
एकदम मोठ्या प्रमाणात
कोणत्याही नवीन माहितीशिवाय
कोणत्याही नवीन गोष्टीशिवाय.
आणि हे काहीसे बऱ्याच वेळा घडते.
मी आणखी एक गुंत्याबद्दल बोलणार आहे.
आपल्याकडे भावना, प्रतिरूप आणि वास्तव आहे.
माझी सुरक्षिततेविषयी दृष्टी सापेक्षतावादी आहे.
मला वाटते ती बघणाऱ्यावर अवलंबून असते.
आणि बरेच सुरक्षिततेबसद्दलचे निर्णय घेताना
विविध लोक सामील होतात.
आणि ज्या लोकांचा थेट नफा-तोटा
होणार असतो
ते निर्णयावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात.
आणि मी त्याला त्यांची कार्ययोजना मानतो.
आणि तुम्हाला माहिती आहे कार्ययोजाना --
म्हणजे असते विपणन, ते राजकारण असते --
तुम्हाला एका प्रतिरूपापासून दुसऱ्याकडे नेण्यासाठी
तुमचे प्रतिरूप सोडून तुमच्या भावनांवर
विश्वास ठेवायला परावृत्त करण्यासाठी,
तुम्हाला आवडत नसलेले प्रतिरूप मानणाऱ्या लोकांना एकटे पाडण्यासाठी.
हे काही असाधारण नाही आहे.
एक उदाहरण, मोठे उदाहरण, धुम्रपानाच्या धोक्याबद्दल आहे.
गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात, प्रतिरूप कशी बदलतात हे
धुम्रपानाचा धोका दाखवतो,
आणि तो हेही दाखवतो की उद्योग कसे लढतात
त्यांच्या नावडत्या प्रतिरूपांविरूद्ध.
ह्याची तुलना करा दुसऱ्याच्या -धुम्रपानामुळे होणाऱ्या धोक्याच्या चर्चेबद्दल --
जी अजुनही २० वर्षे मागे आहे.
खुर्चीच्या सुरक्षापट्ट्यांचा विचार करा.
मी ज्यावेळी लहान होतो, कोणीच खुर्चीचे सुरक्षापट्टे वापरत नव्हते.
हल्ली, तुम्ही सुरक्षापट्टा बांधला नाही तर
कोणीही मुले तुम्हाला चालवू देणार नाहीत.
त्याची तुलना करा एअरबॅगच्या चर्चेशी --
बहुतेक ती ३० वर्षे मागे आहे.
प्रतिरूपांची सर्व उदाहरणे बदलत आहेत.
आपण शिकतोय की प्रतिरूपे बदलणे कठीण आहे.
प्रतिरूपांना हटवणे कठीण आहे.
आणि ती तुमच्या भावनेशी एकरूप असतील तर,
तुम्हाला माहितीही नसते की ते एक प्रतिरूप आहे.
आणि आकलनक्षमतेत आणखीही एक चूक आहे.
मी तिला म्हणेन पुष्टीकरण चूक,
ज्यात आपण आपल्या विश्वासांचे
पुष्टीकरण करणारी माहिती लगेच स्विकारतो
आणि त्यांचे खंडन करणारी माहिती धुडकावून लावतो.
म्हणून आपल्या प्रतिरूपाविरुद्धचा पुरावा,
जरी ठोस असला तरी आपण तो उपेक्षित करण्याची शक्यता असते.
आपले लक्ष्य वेधण्यासाठी तो अतिशय ठोस असायला हवा.
लांब कालांतरावर पसरलेली नवी प्रतिरूपे कठीण असतात.
वैश्विक तापमानवाढ हे मोठे उदाहरण आहे.
८० वर्षांपेक्षा जास्त काळात पसरलेले
प्रतिरूप समजण्याबाबत आपण अती वाईट आहोत.
आपण पुढचे पीक काढू शकतो.
आपण मुले वाढेपर्यंतच्या काळापर्यंत विचार करू शकतो.
पण ८० वर्षाच्या काळासाठी आपण जराही चांगले नाही.
म्हणून ते स्विकार करण्यासाठी कठीण प्रतिरूप आहे.
एकाचवेळी आपल्या डोक्यात दोन प्रतिरूपे असू शकतात,
किंवा अशा पद्धतीची जटीलता ज्यात
आपण एकाच वेळी दोन गोष्टींवर विश्वास ठेवतो,
किंवा आकलनक्षमतेतील विसंवाद.
सरतेशेवटी,
नवे प्रतिरूप जुन्या प्रतिरूपाची जागा घेईल.
ठोस विश्वास प्रतिरूप तयार करू शकते.
११ सप्टेंबर मुळे बऱ्यच लोकांच्या डोक्यात
सुरक्षिततेचे एक नवे प्रतिरूप तयार झाले.
परत, आपराधाचा स्वतःला आलेला अनुभव तसे करू शकतो,
स्वतःच्या आरोग्याबद्दलचे प्रश्न,
बातमीत असलेले रोग.
तुम्ही पाहाल की मनोरोगतज्ञ या घटनांना
चमकदार दिव्यांच्या घटना म्हणतात.
त्या एका क्षणात नवे प्रतिरूप तयार करू शकतात,
कारण त्या लोकांना भावनाकूल बनवतात.
तर तांत्रिक जगात,
प्रतिरुपांबाबत निर्णय घेण्याचा
आपल्याला अनुभव नाही.
आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, आपण मध्यस्थांवर अवलंबून असतो.
मला म्हणायचे आहे की हे दुसरे लोक बरोबर असेपर्यंतच चालू शकते.
कोणती औषधे सुरक्षित आहेत हे ठरवण्यासाठी
आपण सरकारी यंत्रणेवर अवलंबून असतो.
मी येथे काल उडून आलो.
मी स्वतः विमानाची पाहणी केली नाही.
माझे विमान सुरक्षित आहे की नाही ठरवण्यासाठी
मी दुसऱ्या गटावर विश्वास ठेवला.
आपण येथे आहोत, आणि हे छप्पर आपल्यावर कोसळेल याची कोणालाच भिती वाटत नाही,
आपण स्वतः चाचपणी केली म्हणून नाही,
पण आपल्याला माहिती आहे की बांधकामाचे इथले नियम
चांगले आहेत म्हणून
हे एक असे प्रतिरूप आहे जे आपण
फक्त श्रद्धेने स्विकारले आहे.
आणि ते ठीकही आहे.
आता, आपल्याला गरज आहे ती
लोकांनी चांगल्या प्रतिरूपांबद्दल
पुरेशी माहिती समजून घेण्याची --
आणि ती त्यांच्या भावनेत प्रतिबिंबित करण्याची --
ज्यातून त्याने सुरक्षिततेच्या जमा-खर्चाचे गणित करता येईल.
जर भावना आणि प्रतिरूप परस्परविरोधी असले,
तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
एक तुम्ही लोकांच्या भावना सुधारू शकता,
थेट त्यांच्या भावनेला हात घालून.
ती एकप्रकारची फसवणूक आहे, पण ती काम करेल.
दुसरी जास्त प्रामाणिक पद्धत आहे
प्रतिरूप दुरूस्त करण्याची.
बदल हळूहळू घडतो.
धुम्रपानाबद्दलची चर्चा ४० वर्षे व्हावी लागली,
आणि तो प्रश्न सोपा होता.
यातील काही गोष्टी कठीण आहेत.
पण मला असे वाटते की खरोखर
माहिती हीच आपली सर्वात चांगली आशा आहे.
आणि मी खोटे बोललो.
लक्षात आहे का जेव्हा मी भावना, प्रतिरूप, वास्तव यांबद्दल बोललो.
मी म्हणालो वास्तव बदलत नाही. ते खरेतर बदलते.
आपण तांत्रिक जगात राहतो;
वास्तव सारखेच बदलत असते.
आपल्या प्रजातीसाठी पहिल्यांदा असे होतेय की
भावना प्रतिरूपांच्या मागे आहेत, प्रतिरूपे वास्तवाच्या मागे आहे आणि वास्तव बदलत आहे --
आणी ते कधीच मिळणार नाहीत.
आपल्याला माहिती नाही.
पण मोठ्या कालखंडात,
दोन्ही भावना आणि वास्तव महत्त्वाचे आहेत.
आणि हे समजविण्यासाठी दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे.
१९८२ -- माहिती नाही लोकांच्या लक्ष्यात आहे की नाही --
त्यावेळी संयुक्त संस्थानात एक छोटीशी साथ पसरली होती
टायलेनॉलतू होणाऱ्या विषबाधेची.
ती एक भयानक गोष्ट आहे. कोणीतरी टायलेनॉलची बाटली घेतली,
त्यात विष टाकले, बंद केली आणि परत जागेवर ठेवली.
कोणीतरी दुसऱ्याने ती विकत घेतली आणि मृत्यमूखी पडले.
याने लोक प्रचंड घाबरले.
अशाच प्रकारचे एकदोन आणखीही हल्ले झाले.
यातून खरा धोका काहीच नव्हता, पण लोक घाबरले होते.
आणि यातूनच
ढवळाढवळ-रोधक औषधोद्योगांची सुरुवात झाली.
ती ढवळाढवळ-रोधक टोपणे, यातूनच आली.
ते संपूर्णपणे एक सुरक्षिततेचे नाटक आहे.
गृहपाठ म्हणून त्यावर मात करण्याचे १० मार्ग शोधा.
मी तुम्हाला एक देतो, औषधी सुई
पण यातून लोकांना चांगले वाटले.
त्यामुळे त्यांची सुरक्षीततेची भावना
वास्तवाच्या जवळ येण्यास मदत झाली.
शेवटची गोष्ट, काही वर्षांपूर्वी, माझ्या मैत्रिणीने जन्म दिला.
मी तिला दवाखान्यात भेटायला गेलो.
हल्ली जेव्हा बाळ जन्माला येते,
ते बाळाच्या हातार रेडियो-बांगडी घालतात ओळखण्यासाठी,
आणि तशीच एक आईच्या हातात घालतात,
म्हणजे जर आईशिवाय कोणी मुलाला प्रसुतीगृहातून बाहेर नेले,
तर गजर वाजतो.
मी म्हणालो, "वा, एकदम छान आहे हे.
पण आपल्याकडे दवाखान्यातून मुलांना पळविण्याचे
प्रमाण किती आहे."
मी घरी गेलो आणि पाहिले.
मूलतः ते कधीच होत नाही.
पण जर त्याबद्दल तुम्ही विचार केला तर,
जर तुम्ही दवाखाना असाल,
आणि जर तुम्हाला बाळाला काही चाचण्या करण्यासाठी
आईपासून दूर घेऊन जायचे आहे,
तर तुमच्याकडे एक चांगले "सुरक्षिततेचे नाटक" असणे गरजेचे आहे.
नाहीतर आई तुमचा हात तोडून टाकेल.
(हशा)
म्हणून ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे,
आपल्यातील जे सुरक्षिततेची संरचना करतात त्यांच्यासाठी,
जे सुरक्षा नीती पाहतात त्यांच्यासाठी,
किंवा सुरक्षेवर परिणाम करणारी
सार्वजनिक नीती ठरवतात त्यांच्यासाठी.
सुरक्षितता फक्त वास्तवच नाही तर भावना आणि वास्तव आहे.
आणि महत्त्वाचे हे आहे की
ते दोन्ही जवळजवळ एकसारखेच असावेत.
महत्त्वाचे आहे की, आपल्या भावना वास्तवाशी एकरूप असाव्यात.
आपण सुरक्षेच्या जमा-खर्चाचे गणित व्यवस्थित करावे.
धन्यवाद.
(टाळ्या)