WEBVTT 00:00:16.264 --> 00:00:19.569 असं समजा, की तुम्ही समारंभाला जाण्यासाठी तयारी करत आहात. 00:00:19.799 --> 00:00:22.923 तुम्हाला उत्साह वाटतो आहे, तशीच थोडीशी चिंताही वाटते आहे. 00:00:22.924 --> 00:00:25.476 पोटात गोळा आला आहे धाकधूक वाटते आहे. 00:00:25.477 --> 00:00:27.845 हृदयाच्या धडधडीसारखी. 00:00:28.860 --> 00:00:34.030 तुमचं मन तुम्हांला मागे खेचतं आहे. 00:00:34.656 --> 00:00:36.494 "थांब. इतका आनंद वाटू देऊ नकोस. 00:00:36.495 --> 00:00:41.562 जरा सावध रहा, काहीतरी विपरीत घडू शकतं." 00:00:41.938 --> 00:00:46.168 तुम्हांला प्रश्न पडतो, "समारंभात मी कोणाशी बोलू? 00:00:46.169 --> 00:00:52.078 माझ्याशी कोणी बोललं नाही तर? लोक मला विक्षिप्त समजले तर?" 00:00:53.464 --> 00:00:55.062 तुम्ही समारंभात पोहोचता. 00:00:55.063 --> 00:00:58.533 कोणीतरी तुमच्याजवळ येतं आणि तुमच्याशी बोलू लागतं. 00:00:58.534 --> 00:01:00.232 आणि त्याचवेळी 00:01:00.233 --> 00:01:04.917 तुमचं मन सैरभैर होतं. हृदयाचे ठोके वाढतात. 00:01:05.429 --> 00:01:06.798 तुम्हांला घाम फुटतो. 00:01:06.799 --> 00:01:10.781 आपण स्वतःपासून विलग झालो आहोत, असं वाटू लागतं. 00:01:10.782 --> 00:01:15.479 जणु तुम्ही तुमच्या शरीरात नसून, बाहेरून स्वतःलाच बोलताना पाहत आहात. 00:01:16.499 --> 00:01:20.611 "भानावर ये." तुम्ही स्वतःला सांगता, पण तसं करू शकत नाही. 00:01:20.612 --> 00:01:23.171 चिंतेची तीव्रता वाढत जाते. 00:01:24.171 --> 00:01:26.076 काही क्षण बोलून झाल्यावर 00:01:26.077 --> 00:01:28.838 ती व्यक्ती निघून जाते. 00:01:28.839 --> 00:01:31.735 आता तुम्हांला पूर्णपणे पराभव झाल्यासारखं वाटू लागतं. 00:01:33.344 --> 00:01:38.696 बऱ्याच काळापासून, समाजात मिसळताना तुम्हाला असेच अनुभव येताहेत. 00:01:39.051 --> 00:01:43.074 किंवा कल्पना करा, की आपण गर्दीच्या ठिकाणी आहोत. 00:01:43.075 --> 00:01:46.470 तुम्हाला भीती वाटू लागते. 00:01:46.471 --> 00:01:48.787 आजूबाजूला पुष्कळ लोक असणाऱ्या ठिकाणी, 00:01:48.788 --> 00:01:53.800 उदाहरणार्थ, बसमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. 00:01:54.769 --> 00:01:56.932 ते टाळण्यासाठी तुम्ही बाहेर जाणं टाळता. 00:01:56.933 --> 00:02:02.951 मग त्यामुळे एकटेपणा जाणवतो. 00:02:03.816 --> 00:02:08.122 या दोन्ही उदाहरणांतील व्यक्तींना 00:02:08.124 --> 00:02:10.408 चिंताविकार जडला आहे. 00:02:10.949 --> 00:02:14.583 आपल्या समजुतीपेक्षा कितीतरी जास्त लोकांना 00:02:14.584 --> 00:02:17.473 चिंताविकार जडलेला असतो. 00:02:17.474 --> 00:02:21.165 आजमितीला, जगात दर १४ व्यक्तींमागे 00:02:21.166 --> 00:02:23.589 एका व्यक्तीला हा विकार आहे. 00:02:23.590 --> 00:02:28.864 दरवर्षी, या विकारावरच्या उपचारांसाठी 00:02:28.865 --> 00:02:32.844 ४२ दशकोटी डॉलर्सहूनही जास्त खर्च होतो. 00:02:32.845 --> 00:02:36.097 चिंताविकारामुळे आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात 00:02:36.098 --> 00:02:37.378 ते सांगते.. 00:02:37.379 --> 00:02:43.524 नैराश्य, शिक्षण सोडून देणे, आत्महत्येचे विचार मनात येणे. 00:02:44.904 --> 00:02:49.129 या विकारामुळे ध्येयाकडे वाटचाल करणं, आणि नोकरी टिकवणं कठीण जातं. 00:02:49.619 --> 00:02:52.589 नातेसंबंध तुटू शकतात. 00:02:52.989 --> 00:02:55.023 हे अनेक लोकांना ठाऊक नसतं. 00:02:55.024 --> 00:02:59.084 त्यामुळे ते हा विकार दडवून ठेवतात. 00:02:59.085 --> 00:03:04.696 ही एक प्रकारची भीती आहे, आणि त्यावर मात करणं शक्य आहे असं मानलं जातं. 00:03:05.146 --> 00:03:07.385 पण या विकारात भीतीहूनही जास्त असं काहीतरी असतं. 00:03:08.705 --> 00:03:11.856 हा विकार फारसा महत्त्वाचा मानला जात नाही, 00:03:11.857 --> 00:03:14.226 कारण त्याचं नेमकं स्वरूप लोकांना ठाऊक नसतं. 00:03:14.227 --> 00:03:21.227 हा स्वभावाचा भाग आहे का? आजार आहे का? की नैसर्गिक भावना? काय आहे हे? 00:03:22.831 --> 00:03:26.072 म्हणूनच, सर्वसाधारण चिंता आणि चिंताविकार 00:03:26.073 --> 00:03:30.488 यातला फरक जाणणं महत्त्वाचं आहे. 00:03:32.277 --> 00:03:35.571 सर्वसाधारण चिंता ही एक सामान्य भावना आहे. 00:03:35.572 --> 00:03:38.035 तणावाच्या परिस्थितीत अशी चिंता वाटणं साहजिक आहे. 00:03:38.036 --> 00:03:41.688 उदाहरणार्थ, कल्पना करा, की तुम्ही जंगलात आहात, 00:03:41.689 --> 00:03:45.376 आणि तुमच्यासमोर एक अस्वल आलं. 00:03:46.650 --> 00:03:50.184 यामुळे कदाचित तुम्हांला थोडी चिंता वाटेल. 00:03:50.185 --> 00:03:53.668 तिथून पळून जावंसं वाटेल. 00:03:54.354 --> 00:04:00.404 या प्रकारची चिंता वाटणं चांगलंच, कारण त्यामुळे तुमचा जीव वाचेल. 00:04:00.405 --> 00:04:03.886 तुम्ही ताबडतोब तिथून पळून जाल. 00:04:03.887 --> 00:04:08.410 तसं पाहिलं तर अस्वल पाहून पळत सुटणं ही काही तितकीशी चांगली कल्पना नाही. 00:04:08.650 --> 00:04:11.249 अस्वलापेक्षा जलद कोणी पळू शकेल, असं मला वाटत नाही. 00:04:13.592 --> 00:04:16.935 नोकरीच्या ठिकाणी, चिंतेमुळे आपण दिलेल्या मुदतीत कामं करतो, 00:04:16.935 --> 00:04:19.841 आयुष्यात येणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगांचा सामना करतो. 00:04:19.841 --> 00:04:24.287 पण कधीकधी ही चिंतेची भावना पराकोटीला पोहोचते. 00:04:24.952 --> 00:04:29.231 ज्या घटनांपासून खराखुरा धोका उद्भवत नाही, त्याही वेळी ती निर्माण होते. 00:04:29.232 --> 00:04:32.851 अशावेळी हा चिंताविकार असू शकतो. 00:04:32.852 --> 00:04:36.481 उदाहरणार्थ, सार्वत्रिक चिंताविकार. (Generalized Anxiety Disorder) 00:04:36.482 --> 00:04:41.871 या विकारात सतत सर्व गोष्टींबद्दल पराकोटीची चिंता वाटते. 00:04:41.872 --> 00:04:46.552 ही चिंता आटोक्यात ठेवणं कठीण जातं. 00:04:47.745 --> 00:04:52.235 याबरोबर भीती, अस्वस्थता अशी लक्षणंसुद्धा जाणवतात. 00:04:52.630 --> 00:04:58.490 रात्री झोप लागत नाही. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. 00:04:59.595 --> 00:05:05.974 चिंता, मग ती कोणत्याही प्रकारची असो, 00:05:05.975 --> 00:05:09.734 तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय उपलब्ध आहेत. 00:05:09.735 --> 00:05:13.715 ते उपयुक्त आहेत, आणि अतिशय सोपे आहेत. 00:05:15.051 --> 00:05:18.500 बरेचदा, मानसिक विकारांसाठी औषधं दिली जातात. 00:05:18.501 --> 00:05:21.020 पण ती दीर्घकाळ उपयोगी पडत नाहीत. 00:05:21.021 --> 00:05:25.021 कालांतराने लक्षणं पुन्हा दिसू लागतात, आणि विकार पुन्हा पहिल्या अवस्थेत जातो. 00:05:25.560 --> 00:05:28.359 म्ह्णून हा एक वेगळा विचार करून पाहण्यासारखा आहे. 00:05:28.360 --> 00:05:33.249 आपण समस्यांना कशा प्रकारे तोंड देतो, 00:05:33.250 --> 00:05:37.250 त्यावर आपल्या चिंतेचं प्रमाण अवलंबून असतं. 00:05:37.473 --> 00:05:43.383 समस्या हाताळण्याची पद्धत जराशी बदलली, तर चिंतेचं प्रमाण कमी होऊ शकतं. 00:05:45.523 --> 00:05:47.862 केम्ब्रिज विद्यापीठातल्या आमच्या पाहणीनुसार, 00:05:47.863 --> 00:05:51.032 गरीब वस्तीतल्या स्त्रियांना चिंताविकार होण्याची शक्यता 00:05:51.033 --> 00:05:55.362 सधन वस्तीतल्या स्त्रियांपेक्षा जास्त असते. 00:05:55.363 --> 00:05:59.492 हा निष्कर्ष तसा धक्कादायक वाटला नाही. पण सखोल अभ्यासातून निराळं काही जाणवलं. 00:05:59.493 --> 00:06:02.542 गरीब वस्तीतल्या स्त्रियांना 00:06:02.543 --> 00:06:06.382 समस्या सोडवण्याची एक खास पद्धत ठाऊक असेल, 00:06:06.383 --> 00:06:08.382 तर त्यांना चिंतेचा त्रास होत नाही. 00:06:08.383 --> 00:06:13.842 पण ती पद्धत ठाऊक नसेल, तर त्यांना 00:06:13.843 --> 00:06:15.153 चिंताविकार सतावतो. 00:06:16.078 --> 00:06:17.477 इतर काही पाहण्यांनुसार, 00:06:17.478 --> 00:06:21.137 ज्या लोकांना ही पद्धत ठाऊक होती, 00:06:21.138 --> 00:06:25.267 त्यांचं मानसिक आरोग्य 00:06:25.268 --> 00:06:27.927 युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या 00:06:27.928 --> 00:06:31.838 खडतर परिस्थितीतसुद्धा उत्तम राहिलं. 00:06:32.093 --> 00:06:36.822 पण ज्यांना ही पद्धत ठाऊक नव्हती, 00:06:36.823 --> 00:06:41.483 त्यांना याच खडतर परिस्थितीमुळे मानसिक विकार जडले. 00:06:42.979 --> 00:06:47.878 तर मग, काय आहेत या समस्या हाताळण्याच्या पद्धती? 00:06:47.879 --> 00:06:52.229 त्यांचा वापर करून चिंताविकाराची तीव्रता कमी कशी करता येईल? 00:06:53.275 --> 00:06:55.294 त्याबद्दल सांगण्याअगोदर, 00:06:55.295 --> 00:06:58.914 एक रोचक गोष्ट सांगते. 00:06:58.915 --> 00:07:05.915 या पद्धती तुम्ही स्वतःच तयार करू शकता. 00:07:05.955 --> 00:07:08.355 तुमच्या स्वतःच्या वागण्यातून. 00:07:09.077 --> 00:07:12.316 तुमच्या चिंताविकारावर ताबा मिळवून त्याची तीव्रता कमी करू शकता. 00:07:12.317 --> 00:07:14.877 स्वतःला सक्षम करणारी ही गोष्ट आहे. 00:07:17.015 --> 00:07:20.604 आज मी अशा प्रकारच्या तीन पद्धतींविषयी बोलणार आहे. 00:07:20.605 --> 00:07:25.435 पहिली, आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण आहे, असे समजणे. 00:07:27.057 --> 00:07:31.436 आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणाखाली आहे असं समजणाऱ्या लोकांचं 00:07:31.437 --> 00:07:33.477 मानसिक आरोग्य चांगलं असतं. 00:07:33.869 --> 00:07:36.868 तसं तुम्हांला वाटत नसेल, तर 00:07:36.869 --> 00:07:38.498 नियंत्रणात असलेल्या गोष्टी करून 00:07:38.499 --> 00:07:42.669 तो अनुभव घ्यावा, असं संशोधन सांगतं. 00:07:43.505 --> 00:07:45.295 माझं म्हणणं स्पष्ट करून सांगते. 00:07:46.048 --> 00:07:50.207 अजून पूर्ण तयारी झाली नाही, अशा समजुतीने 00:07:50.208 --> 00:07:52.908 तुम्ही एखादं काम सुरु करणं लांबणीवर टाकता का? 00:07:53.733 --> 00:07:55.842 आज कोणते कपडे घालावेत? कोणाबरोबर डेटला जावं? 00:07:55.843 --> 00:08:01.693 कोणती नोकरी घ्यावी? असे निर्णय तुम्हांला कठीण वाटतात का? 00:08:02.819 --> 00:08:05.818 काय करावं हा निर्णय घेण्यात तुमचा इतका वेळ वाया जातो, 00:08:05.819 --> 00:08:09.819 की तुम्ही काहीच करू शकत नाही? 00:08:11.973 --> 00:08:16.763 अनिर्णायक अवस्था, नियंत्रणाबाहेरची परिस्थिती, यावर उपाय म्हणजे 00:08:16.979 --> 00:08:19.139 ती गोष्ट चुकीची का होईना, पण करणे. 00:08:20.630 --> 00:08:24.459 जी. के. चेस्टरटन हे एक कवी आणि लेखक आहेत. ते म्हणतात, 00:08:24.460 --> 00:08:30.760 जी गोष्ट करण्यासारखी असेल, ती पहिल्या वेळी चुकीच्या पद्धतीने करायला हरकत नाही. 00:08:32.003 --> 00:08:34.361 ही युक्ती चांगली लागू पडते, कारण यामुळे 00:08:34.363 --> 00:08:39.792 अनिर्णायक अवस्था संपते, आणि तुम्ही कृतीच्या अवस्थेत ढकलले जाता. 00:08:39.793 --> 00:08:42.472 नाहीतर काय करावं, कसं करावं, 00:08:42.472 --> 00:08:45.932 या विचारात 00:08:45.933 --> 00:08:47.693 तासनतास फुकट जाऊ शकतात, 00:08:48.091 --> 00:08:53.221 तुमची शक्ती नष्ट होते, आणि ते काम सुरु करण्याची भीती वाटू लागते. 00:08:54.492 --> 00:08:59.331 बरेचदा, आपल्याला बिनचूक काम करायचं असतं. पण आपण काहीच करू शकत नाही. 00:08:59.332 --> 00:09:01.871 कारण आपण स्वतःसमोर इतके उच्च आदर्श ठेवतो, की 00:09:01.872 --> 00:09:05.051 त्यांचीच आपल्याला भीती वाटते. 00:09:05.052 --> 00:09:09.051 या तणावामुळे आपण काम पुढे ढकलत राहतो, 00:09:09.052 --> 00:09:13.052 किंवा करतच नाही. 00:09:14.716 --> 00:09:17.786 चुकीच्या पद्धतीने करण्याची मुभा मिळाल्यावर कृती मोकळेपणाने घडते. 00:09:18.420 --> 00:09:20.259 तुम्हांला हे ठाऊक आहे. 00:09:20.260 --> 00:09:24.979 अनेकदा, काम बिनचूक हवं, या भीतीपोटी आपण ते सुरूच करत नाही. 00:09:24.980 --> 00:09:28.980 योग्य वेळी करू, योग्य क्षमता आली की करू, असं म्हणतो. 00:09:29.768 --> 00:09:33.768 यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतात. 00:09:34.027 --> 00:09:37.416 त्यापेक्षा त्या कामात झटकन उडी घेऊन ते करूनच टाकलं तर? 00:09:37.417 --> 00:09:39.907 ते चांगलं होतंय की नाही, याची चिंता कशाला? 00:09:40.392 --> 00:09:43.961 या विचारामुळे काम सुरु करणं सोपं जातं. 00:09:43.962 --> 00:09:47.072 मग चुकीच्या पद्धतीने का होईना, ते करून संपतं. 00:09:47.440 --> 00:09:48.669 नंतर मागे वळून पाहताना 00:09:48.670 --> 00:09:53.810 आपल्या लक्षात येतं, की ते काही तितकंसं चुकीचं नव्हतं. 00:09:56.007 --> 00:09:58.196 माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला चिंताविकार आहे. 00:09:58.197 --> 00:10:01.937 तिने हा मंत्र वापरायला सुरुवात केली आहे. 00:10:03.142 --> 00:10:07.511 ती म्हणते, "या मंत्रामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. 00:10:07.512 --> 00:10:12.732 आता मी पूर्वीपेक्षा कमी वेळात कामं उरकते. 00:10:13.887 --> 00:10:20.297 चुकीची मुभा असल्यामुळे मी धोका पत्करते, काही वेगळं करून पाहते. 00:10:20.818 --> 00:10:25.598 या वेगळ्या पद्धतीमुळे कामातली मजा अनुभवते. 00:10:26.562 --> 00:10:32.472 या मंत्रामुळे चिंतेची जागा उत्साहाने घेतली आहे. " 00:10:34.113 --> 00:10:41.063 चुकीच्या पद्धतीने काम करा, आणि करता करता कामात सुधारणा करा. 00:10:42.589 --> 00:10:46.119 आता यावर विचार करा पाहू.. 00:10:46.333 --> 00:10:53.333 आजपासून तुम्ही हा मंत्र वापरला, तर तुमच्या आयुष्यात काय बदल घडेल? 00:10:57.743 --> 00:11:01.743 चिंताविकाराचा सामना करण्याचं दुसरं धोरण, स्वतःला क्षमा करणे. 00:11:02.216 --> 00:11:05.116 हे फार प्रभावी आहे. 00:11:06.381 --> 00:11:09.620 चिंताग्रस्त लोक आपल्या चुका, काळज्या, दुःखभावना 00:11:09.621 --> 00:11:15.941 याबद्दल अति विचार करतात. 00:11:16.815 --> 00:11:22.285 समजा, तुमचा एक मित्र सतत तुमच्या चुका शोधून काढून 00:11:22.453 --> 00:11:25.242 त्या तुम्हांला सांगतो आहे. 00:11:25.243 --> 00:11:28.722 तुमच्या आयुष्यात जे जे काही वाईट घडलं असेल, ते सर्व. 00:11:28.723 --> 00:11:30.092 या माणसाला 00:11:30.093 --> 00:11:33.243 ताबडतोब हाकलून द्यावं, असं तुम्हांला वाटेल, हो ना? 00:11:34.639 --> 00:11:40.219 चिंताग्रस्त लोक दिवसभर स्वतःलाच हा त्रास देत असतात. 00:11:40.505 --> 00:11:42.595 ते स्वतःशी फारसे चांगुलपणाने वागत नाहीत. 00:11:42.939 --> 00:11:46.939 तर आता, स्वतःशी जरा दयाळूपणे वागून पहा. 00:11:47.473 --> 00:11:50.313 स्वतःच स्वतःचा आधार व्हा. 00:11:50.834 --> 00:11:54.283 हे कसं करायचं? स्वतःच्या चुकांबद्दल 00:11:54.284 --> 00:11:55.733 स्वतःला क्षमा करायची. 00:11:55.734 --> 00:11:58.414 मग त्या अगदी नुकत्याच केलेल्या चुका असोत, 00:11:58.766 --> 00:12:00.876 किंवा भूतकाळातल्या. 00:12:02.221 --> 00:12:05.180 पूर्वी कधीतरी भीतीने ग्रस्त झाल्याची शरम वाटत असेल, 00:12:05.181 --> 00:12:06.741 तर त्याबद्दल स्वतःला क्षमा करा. 00:12:07.231 --> 00:12:10.171 तुम्हांला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं असेल, 00:12:10.509 --> 00:12:12.648 पण तसा धीर झाला नसेल, 00:12:12.649 --> 00:12:14.559 तर चिंता करू नका, स्वतःला क्षमा करा. 00:12:14.947 --> 00:12:17.946 या सगळ्या गोष्टींबद्दल स्वतःला क्षमा करा. 00:12:17.947 --> 00:12:22.467 मग तुम्हांला स्वतःविषयी जरा जास्त करुणा वाटेल. 00:12:23.547 --> 00:12:26.667 हे केल्याशिवाय तुमच्या मनाच्या जखमा भरून येणार नाहीत. 00:12:28.094 --> 00:12:31.044 आता शेवटची, पण महत्त्वाची गोष्ट. 00:12:32.081 --> 00:12:34.920 आपल्या आयुष्याला 00:12:34.921 --> 00:12:37.871 काहीतरी हेतू किंवा अर्थ असणं. 00:12:39.238 --> 00:12:43.328 आपण आयुष्यात कोणतंही काम केलं, 00:12:43.915 --> 00:12:46.034 कितीही पैसा कमावला, 00:12:46.035 --> 00:12:51.185 तरीही कोणालातरी आपण हवे आहोत, या भावनेशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. 00:12:51.799 --> 00:12:55.428 आपल्या कृतीमुळे कोणाचं तरी भलं व्हावं, 00:12:55.429 --> 00:12:58.089 किंवा आपल्या प्रेमाचा कोणाला तरी आधार वाटावा. 00:12:59.744 --> 00:13:00.973 म्हणजे, 00:13:00.974 --> 00:13:04.553 कोणीतरी आपली स्तुती केली तर आपण सुखी होऊ, असं नव्हे. 00:13:04.554 --> 00:13:08.093 याचा अर्थ असा, की आपण दुसऱ्यांसाठी कधीच काही केलं नाही, 00:13:08.094 --> 00:13:11.804 तर मानसिक आरोग्य ढासळण्याची शक्यता असते. 00:13:13.642 --> 00:13:17.282 सुप्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल म्हणतात, 00:13:17.771 --> 00:13:21.380 "ज्यासाठी जगावं, असं काही उरलं नाही, किंवा 00:13:21.381 --> 00:13:24.551 आयुष्याकडून कसलीच अपेक्षा शिल्लक नाही, 00:13:24.742 --> 00:13:27.651 असं म्हणणाऱ्या व्यक्तींना समजवायला हवं, 00:13:27.652 --> 00:13:32.082 की तुम्ही जिवंत आहात, म्हणजे अजून तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. " 00:13:35.601 --> 00:13:40.611 इतर कोणाच्या हितासाठी केलेली कृती आपल्याला कठीण समयी तारून नेते. 00:13:41.493 --> 00:13:44.192 जगायचं कशासाठी, हे त्यातून आपल्याला समजतं, 00:13:44.193 --> 00:13:50.133 आणि मग आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. कोणत्याही. 00:13:52.771 --> 00:13:55.541 आता प्रश्न असा, की 00:13:56.324 --> 00:14:00.154 केवळ दुसऱ्यासाठी अशी एक तरी कृती तुम्ही करता का? 00:14:01.127 --> 00:14:02.867 मग ते विनावेतन काम असेल, 00:14:03.682 --> 00:14:08.941 किंवा आज, इथे मिळालेलं हे ज्ञान इतरांना सांगणं असेल. 00:14:08.942 --> 00:14:11.372 खासकरून ज्यांना गरज असेल, त्यांना. 00:14:11.511 --> 00:14:15.230 आणि अशाच लोकांजवळ समुपदेशन घेण्यासाठी पैसे नसतात. 00:14:15.231 --> 00:14:16.730 आणि साधारणपणे अशाच लोकांमध्ये 00:14:16.731 --> 00:14:19.821 चिंताविकार मोठ्या संख्येने आढळतो. 00:14:20.232 --> 00:14:22.621 हे ज्ञान त्यांना द्या, सर्वांना द्या. 00:14:22.622 --> 00:14:26.352 कारण त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य खरोखर सुधारेल. 00:14:30.317 --> 00:14:32.857 आता आणखी एक विचार सांगून हे भाषण संपवते. 00:14:35.224 --> 00:14:39.423 इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे 00:14:39.424 --> 00:14:44.244 पुढच्या पिढयांना ज्याचा उपयोग होईल, असं काही कार्य करणे. 00:14:45.614 --> 00:14:50.513 तुमचं हे कार्य त्यांना समजलं नाही, 00:14:50.514 --> 00:14:51.793 तरी हरकत नाही. 00:14:51.794 --> 00:14:57.113 कारण तुमचं कार्य तुम्हांला ठाऊक असेल. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, 00:14:57.114 --> 00:15:01.904 की या बाबतीत आपण एकमेव आहोत, आणि हेच आपल्या आयुष्याचं महत्त्व आहे. 00:15:02.737 --> 00:15:04.016 धन्यवाद. 00:15:04.017 --> 00:15:05.347 (टाळ्या)