नैराश्य हे जगातील विकलांग करणारे मोठे कारण आहे. एकट्या अमेरिकेत , १०% प्रौढ नैराश्याने ग्रासले आहेत. पण हा मानसिक आजार असल्याने हा समजण्यास अवघड आहे ,जसे उच्च कोलेस्ट्रोल . यात महत्वाचा गोंधळात टाकणारा फरक आहे नैराश्य असणे व फक्त जाणवणे. जे अनेकांना आयुष्यात वेळोवेळी जाणवते. खालचा दर्जा मिळणे , नोकरी गमाविणे . वादात पडणे. खूप पाऊस पडत असतंही नैराश्य जाणवते काहीवेळा या मागे काही कारण नसते. ते अचानक उगवते . जेव्हा परिस्थिती बदलते, तेव्हा नैराश्य गायब होते . उपचार करावयास लागणारे नैराश्य भिन्न असते . ती एक वैद्यकीय दुरावस्था असते. तुम्हाला वाटते म्हणून ती जात नाही ही अवस्था दोन आठवडे रेंगाळत असते. याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होतो. खेळ किवा प्रेम नैराश्याची अनेक लक्षणे असतात दुःखी अवस्था ज्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीत लक्ष न लागणे. पचनात बदल आपण निरुपयोगी व दोषी असल्याची सतत टोचणी लागणे. खूप किवा कमी झोपणे . लक्ष केंद्रित न करता येणे. अस्वस्थ वाटणे, मंद गतीने काम करणे निरुत्साही वाटणे किवा पुन्हा पुन्हा आत्महत्येचे विचार येणे यातील पाच लक्षणे दिसून आल्यास मानसोपचाराच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला याचे निदान करणे भाग आहे. ही केवळ वर्तणुकीतील लक्षणे नाहीत . नैराश्य ही मेंदूत बदल घडवीत असते . प्रथमतः काही लक्षणे डोळ्यांनी पहाता येतात. तसेच क्ष किरणांनी यासाठी मेंदूच्या हिप्पोकाम्पास भागाचे व पुढील भागाचे निरीक्षण करावे लागेल अगदी सूक्ष्मपणे . नैराश्यात काही गोष्टी आढळतात न्युरो ट्रान्समीटरचे अनैसर्गिक वहन वा त्याचा नाश. विशेषतः सेरॉटोनीन, नॉरएपिनेफ्रिन व डोपामिन. २४ तासांनी होणाऱ्या क्रिया बंद होणे झोपेच्या अवस्थेतील बदल झोपचक्रात बिघाड तसेच हार्मोन्स मधील बदल उच्च कार्टासोल पातळी थायराईड हार्मोन्सची अनियमितता पण न्यूरोविज्ञान अजून याबददल पुरेसे जाणत नाहीं कशाने नैराश्य येते. असे दिसते की परिसर व जीन्स यांची ती जातील आंतर्क्रिया असते. पण तसे शोधण्याची यंत्रणा नाही. ज्याने केव्हा व कोठे याची सुरवात होईल हे अचूक कळेल नैराश्याची लक्षणे काही सहज दिसत नाहीत एखादा चांगला स्वस्थ वाटेल पण तो याशी झगडत असेल. राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेनुसार सर्वसाधारण व्यक्तीस जो नैराश्याने ग्रासला आहे त्यास दहा वर्षांनी मदतीची गरज भासते. त्यासाठी परिणामकारक उपचार पद्धती आहेत औषधे व उपचार पद्धती मेंदूतील रासायनिक पदार्थांना चालना देण्यास पूरक असतात. टोकाच्या अवस्थेतील रुग्णासाठी विजेच्या धक्क्याचा वापर करतात. हा एक प्रकारचा मेंदूचा ताबा घेण्यासारखे आहे याने खूप मदत होते' काही खास उपचार पद्धती आहेत जसे चुंबकीय मस्तिष्क उत्तेजन. त्यावर शोध चालू आहे. नैराश्याने एखादा ग्रासला असेल तर त्यास आधार द्या, त्यास पर्याय सुचवा . त्यास एखाद्या कामात मदत करा. जसे, त्या भागातील उपचारतज्ञांची यादी मिळविणे. डॉक्टरांना विचारावयाच्या प्रश्नांची यादी करणे . निराश अवस्थेतील व्यक्तीस , सुरवातीस हे बिनमहत्वाचे वाटेल. जर त्यांना लाज वाटत असेल व न्यूनगंड असेल तर त्यांना आवर्जून सांगा, त्यांना वैद्यकीय मदत लागेल. जशी ती दमा व मधुमेहासाठी लागते. नैराश्य हे काही व्य्क्तीदोष वा कमकुवतपणा नाही त्यांनी आपोआप बरे होण्याची अपेक्षा धरू नये. जसे एखाद्याचा हात मोडल्यावर उपचार आवश्यक असतो. तुम्ही स्वतः कधी नैराश्य अनुभवलं नसेल, तर त्याची तुलना तुमच्या कोणत्याही दुःखद काळाशी करणं टाळा. त्यांच्या अनुभवाची तुलना एखाद्या साधारण, तात्पुरत्या दुःखाशी केल्यामुळे त्यांना आपल्या लढ्याबद्दल अपराधी वाटू शकतं. नैराश्याबद्दल नुसतं उघडपणे बोलण्याने देखील मदत होऊ शकते. एखाद्यास तुम्ही आत्महत्येच्या विचाराबद्दल विचारले तरी तेवढे त्यास आत्महत्येपासून परावृत्त करेल. मानसिक विकारांसंबंधी चर्चा देखील मनातील अढी दूर करेल. आणि ते सहजपणे मदत मागतील जसजसे अधिक रुग्ण मदत घेतील, तसतसे शास्त्रज्ञ नैराश्याबाबत जाणतील, आणि अधिक चांगली उपचार पद्धती देतील.