स्टँपी: स्टेसी काय करत असेल बरं?
स्टेसी: वा, मला वाटतंय मी योग्य
ठिकाणी आलेय.
काय भारी आहे!
मला वाटतंय, मी परत माईनक्राफ्टमध्ये आलेय!
हॅलो
कसा आहेस?
हॅलो?
बापरे, इथे वेल आहे. तू काही करणार नाहीस,
हो ना?
केटी: स्टेसी?
स्टेसी: हाय, केटी?
केटी: हो!
माईनक्राफ्टमध्ये स्वागत.
स्टेसी: धन्यवाद!
केटी: ये आत!
स्टेसी: काय मस्त आहे.
मग, तू इथे रोज काम करतेस डेव्हलपर
म्हणून, हो ना?
केटी: हो, खूप मजा येते.
मी माईनक्राफ्ट मार्केटप्लेस टीममध्ये
डेव्हलपर आहे.
स्टेसी: तुला कोडींगच्या किती भाषा येतात?
केटी: माझ्या करीअरमध्ये मी बहुतेक
बारापेक्षा जास्त भाषांमध्ये काम केलंय.
स्टेसी: बारा?
केटी: हो.
स्टेसी: मग आता, तुला या छोट्या "द एजंट"
नावाच्या मुलाबद्दल काहीच माहिती नसेल?
केटी: ज्या गोष्टी स्टीव्ह किंवा अलेक्स करू
शकत नाहीत, त्यासाठी आम्ही एजंट वापरतो, म्हणजे लाव्हावरून जाणं वगैरे.
स्टेसी: बरं, मला कोडींग शिकायचंय, आणि
यांना कोडींग शिकायचंय, तर शिकत
असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वांत आधी
माहीत असाव्या लागतात?
केटी: अं, तुम्हाला लूप्स कसे वापरायचे ते शिकावे लागेल.
स्टेसी: ठीकेय.
केटी: कॉम्प्युटरला ज्या कमांड्स
पुन्हा पुन्हा करायला सांगायच्या आहेत
त्यासाठी डेव्हलपर लूप्स लिहीतात.
स्टेसी: आलं लक्षात, मला वाटतंय, पुढच्या
पातळ्यांमध्ये यातले काही येणार आहे,
चला तर मग, लूप्स वापरून बघा.
पुढच्या पातळीला तुम्ही एजंटला रस्त्यावरून चालवण्यासाठी लूप वापरू शकता.
रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढा
आणि त्याच्यात मूव्ह फॉरवर्ड
ब्लॉक ठेवा.
त्याद्वारे सगळे ब्लॉक्स वर्कस्पेसमध्ये न
ओढता कॉम्प्युटरला एकच गोष्ट
एकापाठोपाठ एक अनेक वेळा करायला
सांगितली जाते.
रिपीट ब्लॉकमध्ये एक संख्या लिहून तुम्ही
कितीवेळा पुनरावृत्ती करायची ते ठरवू शकता.
तुम्ही रिपीट ब्लॉकमध्येसुद्धा टर्न्स आणि
अनेक कमांड्स लिहू शकता, पण सध्या
एजंटला काही पावले पुढे नेण्यासाठी रिपीट
वापरण्याचा प्रयत्न करा.
लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या कोड्यात अडकलात
तर नेहमी निळे "रीसेट" बटन दाबू शकता
आणि पुन्हा प्रयत्न करू शकता.
जे केटीसारखा कूल जॉब तुम्हाला हवा असेल तर,
करून पहा आणि प्रत्येक पातळी पूर्ण झाली की
"show code" बटणावर क्लिक करा.
म्हणजे तुम्हाला खरा जावास्क्रीप्ट कोड दिसेल.
केटीसारखे लोक
माईनक्राफ्ट प्रोग्रॅमिंग करताना
हा कोड वापरतात.
चला, तुला खूप खूप धन्यवाद!
केटी: सगळ्यांना शुभेच्छा!