कार्यालयामध्ये काम करतानाची मूलभूत समस्या हीच कि कामाच्या वातावरणावर नियंत्रण नसते. [आपण ज्या प्रकारे कार्य करतो] नमस्कार माझे नाव मॅट आणि मी ऑटोमॅटिकचा सीईओ आहे, जी चालवते WordPress.com, Jetpack आणि WooCommerce आम्ही 800हून अधिक कर्मचार्यांकडे पोहचतोय आणि ते सर्वत्र राहतात, कॅलिफोर्नियापासून अलाबामा, मिसिसिपी ते माझे ठिकाण टेक्सास. आणि ६७ देशांमध्ये देखील आहेत. कॅनडा, मेक्सिको, भारत, न्यूझीलँड. त्यातील काही तर सतत प्रवास करत भटकत असतात. ते आरव्ही मधून किंवा Airbnb मधून काम करतात, दररोज,आठवडा किंवा महिन्यात ते नवीन ठिकाणी असतात. Wi-Fi ची चांगली सोय असेल तर, ठिकाण कोणते याची काळजी नाही. वितरित कार्यावरील आमचे लक्ष आम्ही विचलित होऊ देत नाही. अगदी सुरुवातीपासून ही एक जागरूक निवड होती. लक्षात घ्या मी "दूरस्थ" हा शब्द वापरत नाही. कारण ती अपेक्षा निश्चित करते, की काही लोक आवश्यक आहेत आणि काही नाहीत. "वितरित"शब्द वापरतो आमच्या कार्यवर्णऩासाठी जिथे प्रत्येकजण समान आहे. मला वाटते की वितरित कार्यबल प्रभावी आहे कंपनी बनवण्यासाठी. मात्र जाणीवपूर्वक याचा विचार करणे महत्वाचे. जेव्हा आम्ही वर्डप्रेस सुरू केले, पहिल्या २० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना मी भेटलो नव्हतो. परंतु आम्ही बर्याच वर्षांपासून ऑनलाइन संपर्कात होतो. मला ते एका साध्या कारणासाठी पुढे चालू ठेवायचे आहे. मला वाटते की कौशल्य आणि बुद्धिमत्ता जगभर सारख्याच प्रमाणात आहे. पण संधी मात्र नाही. सिलिकॉन व्हॅलीमध्ये, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यां याच लहानश्या जागी कर्मचारी शोधतात. एक वितरीत कंपनी संपूर्ण जगभरातून कर्मचारी मिळवू शकते. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या जपानी व्यक्तीला घेण्यापेक्षा अश्या कोणाला तरी तुम्ही घेऊ शकता जी जगाच्या कोणत्याही भागात राहते,काम करते. वेगळ्या संस्कृतीतील लोक वेगळा दृष्टिकोन आणतात. आणि एक वेगळा अनुभव. वितरित होण्याच्या निर्णयाच्या मागे, लोकांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची मुभा देण्याची इच्छा होती. तुमच्या कामाबाबत विशिष्ट वेळीच एखादी गोष्ट करणे गरजेचे नसल्यास तुम्हीच नियोजन करू शकता. मग प्रत्येकजण हवी तशी जागा, खायचे पदार्थ इ. निवडू शकतो. तुम्हीच निवडू शकता कधी संगीत असावे आणि कधी शांतता. तुम्हीच खोलीचे तापमान ठरवू शकता. येण्याजाण्याचा वेळ वाचवू शकता. तुमच्या गरजेच्या गोष्टींसाठी तो वापरू शकता. तंत्रज्ञान कंपनीसाठी वितरित कार्यबल आदर्श आहे. पण लोक मला नेहमी विचारतात, "हे तुमच्यासाठी चांगले आहे; पण इतरांचे काय ?" जर आपल्याकडे एखादे कार्यालय असेल तर वितरित क्षमता बनवण्यासाठी काही गोष्टी करू शकता. प्रथम: सगळ्याची कागदोपत्री नोंद ठेवा. एका कार्यालयात, क्षणात निर्णय घेणे सोपे आहे, किचनमध्ये, हॉलमध्ये. पण जेव्हा लोक दूरस्थपणे काम करतात व टीम मधील इतर सदस्य याबद्दल चर्चा करतात तेंव्हा सहभागी होता येत नाही. हे निर्णय त्यांना का ते समजून घेतल्याशिवाय घेतलेले दिसतील. आपण कुठे होता आणि काय विचार करीत होता याच्या खुणा नेहमीच सोडा. यामुळे तुम्ही जिथे सोडले तिथून ते पुढे नेणे इतरांना शक्य होईल. यामुळे भिन्न वेळातील लोक संवाद साधू शकतात. संस्थेचा विस्तार होताना याचा विचार जरूर करावा. लोक सोडतात आणि सामील होतात तेंव्हा . शक्य तितके संभाषण ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा सर्व सार्वजनिकरित्या होते, तेव्हा लोकांना सहज समजू शकते. यासाठी योग्य साधने शोधण्याची आवश्यकता आहे. बरेच अॅप्स, सेवा आहेत ज्या रोजच्या संभाषणास उपयोगी आहेत. हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रकल्प व्यवस्थापन. वस्तूंमुळे कामाच्या पद्धतीत बदल झालेला नाही संगणका मुळे झाला आहे. म्हणून सहयोग सक्षम करणारी साधने वापरा, काय प्रभावी ठरते ते पहा. कार्यक्षमरित्या संवाद साधा. पारंपारिक कार्यालयात, आपण त्याच ठिकाणी वर्षातून ४८ आठवडे असता आणि तीन चार आठवडे इतरत्र काम करता आम्ही हे बदलले: छोट्या काळासाठी एकत्र येतो. वर्षातून एकदा आम्ही एक भव्य भेट करतो संपूर्ण कंपनी एक आठवड्यासाठी एकत्रित होते. अर्धे काम, अर्धी मजा. प्राथमिक लक्ष्य आहे माणसे जोडणे. आम्ही खात्री करू इच्छितो सर्वाना सर्वकाही समजले आहे, संबंध चांगले आहेत याची. जेव्हा ते उर्वरित वर्ष एकत्र काम करतात, तेंव्हा त्यांच्यात सामंजस्य आणि सहानभूती राहील. आणि शेवटची गोष्ट : लोकांना त्यांचे स्वतःचे कामाचे वातावरण बनविण्यासाठी मुभा द्या. ऑटोमॅटिकसमधील प्रत्येकास सहकारी-भत्ता दिला जातो ज्याने ते कामासाठी जागा घेऊ शकतात. कॉफीशॉपमधील Wi-Fi वापरतांना कॉफी खरेदीसाठी वापरू शकतात सिएटलमधील एका गटाने त्यांच्या वेतन एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आणि एका घाटावर कामाची जागा भाड्याने घेतली. आमच्याकडे काम करणार्या प्रत्येकास घरच्या कार्यालयासाठी वेतन मिळते या पैशात योग्य चेअर, मॉनिटर घेऊ शकतात योग्य डेस्क सेटअप, जेणेकरुन त्यांच्यासाठी सर्वात उत्पादनक्षम वातावरण असेल. आज काही मोजक्याच कंपन्या वितरित कार्य पद्धती वापरतात एक दशक किंवा दोन दशकांत 90 टक्के कंपन्यां असे करतील यामुळे जगभरात बदल घडतील जग अश्या प्रकारे कार्य करू लागेल. ते वितरित कार्यपद्धती अनुसरतील वा काळाच्या ओघात मागे पडतील जेंव्हा तुम्ही भविष्यात काही बनवण्याचा विचार कराल तेंव्हा जगभरातील कौशल्याचा वापर कसा होतो ते पहा लोकांना जगण्याची व हवे तिथून काम करू द्या आणि तुम्ही करत असलेल्या कार्यात एकत्रितपणे सहभागी व्हा.