संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे तुमचे स्वत:चे शब्द कॉम्प्युटरच्या भाषेत समाविष्ट
करण्यासाठी नवीन कमांड्सची व्याख्या कशी करायची,
बहुतांशी कॉम्प्युटर भाषांमध्ये फक्त शंभर शब्द किंवा
कमांड्स आहेत. बिल्डींग ब्लॉक्समधून तुमचे स्वत:चे नवीन शब्द ठरवणे ही कला आणि जादू आहे.
आम्ही खेळात हे नेहमी करत असतो. उदा. बास्केटबॉलमध्ये, तुम्ही ड्रिबल, ले-अप, रिबाऊंड कसे
करायचे ते शिकण्यापासून सुरुवात करता. या मूलभूत मूव्ह्ज शिकल्यावर तुम्ही नवीन मूव्ह्ज शिकू शकता
आणि मग हे बिल्डींग ब्लॉक्स एकत्र करता उदा. पिक आणि रोल किंवा गिव्ह आणि गो.
मग तुम्ही अधिक गुंतागुंतीचा खेळ करू शकता.
तुम्ही खेळ शिकलात आणि त्याला नाव दिलेत की टीममधल्या प्रत्येकाला ते कसे करायचे हे कळते.
तसेच तुम्ही कॉम्प्युटरला या कमांड्सचा क्रम वापरून
एखादी कृती कशी करायची ते शिकवलेत तर
तुम्ही त्या कृतीला एक स्वत:चे नाव देऊ शकता, म्हणजे ती नंतर पुन्हा करणे सोपे जाते. जेव्हा तुम्ही तुमची
स्वत:ची कमांड ठरवता आणि तिला नाव देता तेव्हा त्याला फंक्शन असे म्हणतात. आता आपण मधमाशीला
मदत करण्यासाठी फंक्शन्स वापरणार आहोत. या उदाहरणात, आपल्या फंक्शनचं नाव आहे get 2 nectar.
हा इथला हिरवा ब्लॉक. या ग्रे बॉक्सकडे बघून आपल्याला get 2 nectar काय करतं ते कळतं.
ही फंक्शनची व्याख्या आहे. जर आपण आत पाहिलं
तर get 2 nectar मधुरस घेणार आहे आणि पुन्हा
मधुरस घेणार आहे. नेहमी ग्रे बॉक्सच्या आत काय
आहे ते पाहा म्हणजे हे हिरवे फंक्शन ब्लॉक्स
काय करू शकतात, ते तुम्हाला कळेल.