1 00:00:00,329 --> 00:00:02,280 स्टीव्ही आणि मोठा प्रोजेक्ट. 2 00:00:02,280 --> 00:00:03,969 लेखिका - किकी प्रोट्समॅन. 3 00:00:03,969 --> 00:00:08,119 रेखाटने - जेनी लँग. 4 00:00:08,119 --> 00:00:11,780 स्टीव्ही एक अतिशय कुशल खार आहे. 5 00:00:11,780 --> 00:00:17,230 तिच्या वर्गात ती सर्वांत वेगवान धावपटू आहे आणि तिच्या शाळेतल्या सर्वोत्तम स्पेलर्सपैकी एक आहे. 6 00:00:17,230 --> 00:00:20,600 पण आज, स्टीव्ही खुश नाहीये! 7 00:00:20,600 --> 00:00:27,029 ती एका प्रोजेक्टवर काम करत होती आणि त्यात काहीच धड होत नाहीये. 8 00:00:27,029 --> 00:00:30,750 "अरे बापरे," स्टीव्ही स्वत:लाच म्हणाली. 9 00:00:30,750 --> 00:00:33,880 "हे अजिबात चांगलं नाहीये!" 10 00:00:33,880 --> 00:00:36,810 स्टीव्हीला तिचा चेहरा गरम होतोय हे लक्षात येत होतं. 11 00:00:36,810 --> 00:00:40,890 तिला काळजी वाटली की कोणीतरी बघेल आणि तिला प्रोजेक्ट करता येत नाहीये, हे कोणाला 12 00:00:40,890 --> 00:00:44,490 तरी कळेल आणि त्यांना मग ती आवडेनाशी होईल. 13 00:00:44,490 --> 00:00:46,480 "मला इतका राग आलाय!" 14 00:00:46,480 --> 00:00:47,480 स्टीव्ही ओरडली. 15 00:00:47,480 --> 00:00:49,190 "मला या प्रोजेक्टचा राग आलाय. 16 00:00:49,190 --> 00:00:50,820 मला टीचरचा राग आलाय 17 00:00:50,820 --> 00:00:53,810 आणि मला माझाच राग आलाय!" 18 00:00:53,810 --> 00:00:59,010 असं म्हणून स्टीव्हीनं तिचा प्रोजेक्ट उचलला आणि जमिनीवर आदळला. 19 00:00:59,010 --> 00:01:04,940 त्याचे तुकडे झाले आणि ती त्याला पायदळी तुडवू लागली. 20 00:01:04,940 --> 00:01:08,740 तेवढ्यातच काय झालंय ते पाहायला लॉरेल आला. 21 00:01:08,740 --> 00:01:11,850 "स्टीव्ही, काय झालं?" 22 00:01:11,850 --> 00:01:16,250 "मला या प्रोजेक्टचा राग आलाय आणि मला या वर्गाचा राग आलाय!" 23 00:01:16,250 --> 00:01:19,330 "अगं, स्टीव्ही," लॉरेल हळुवारपणे म्हणाला. 24 00:01:19,330 --> 00:01:23,470 "तू फार वैतागलेली दिसते आहेस." 25 00:01:23,470 --> 00:01:25,070 "वैतागलेली?" 26 00:01:25,070 --> 00:01:28,040 स्टीव्ही गोंधळून म्हणाली. 27 00:01:28,040 --> 00:01:32,780 "होय, वैतागलेली," लॉरेलनं पुष्टी केली. 28 00:01:32,780 --> 00:01:39,680 "वैतागणं म्हणजे बरंचसं चिडण्यासारखंच आहे पण त्याचा अर्थ असा की 29 00:01:39,680 --> 00:01:42,700 आत्ता कुठलीतरी एक गोष्ट तुला हवीय तशी घडत नाहीये." 30 00:01:42,700 --> 00:01:48,720 "तुला असं वाटेल की तू टीचरवर चिडली आहेस, स्वत:वर चिडली आहेस किंवा तुझ्या प्रोजेक्टवर चिडली आहेस. 31 00:01:48,720 --> 00:01:53,570 तू तुझा राग त्या कात्रीवर किंवा त्या टेपवरसुद्धा काढशील. 32 00:01:53,570 --> 00:01:59,580 जेव्हा तुला वाटेल की तू सगळ्यांवर चिडली आहेस आणि तुला काहीच सहन होत नाहीये, 33 00:01:59,580 --> 00:02:01,670 तेव्हा त्याला वैताग म्हणतात." 34 00:02:01,670 --> 00:02:05,040 "मग मी तो कसा घालवू?" 35 00:02:05,040 --> 00:02:06,090 स्टीव्ही म्हणाली. 36 00:02:06,090 --> 00:02:08,568 "मला असं परत कधीच वाटून घ्यायचं नाहीये." 37 00:02:08,568 --> 00:02:12,640 "अनेक गोष्टी वैताग आणतात, स्टीव्ही. 38 00:02:12,640 --> 00:02:17,040 महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैताग ही एक चांगली गोष्ट आहे, हे माहिती असणं. 39 00:02:17,040 --> 00:02:18,920 "चांगली गोष्ट?!" 40 00:02:18,920 --> 00:02:21,870 स्टीव्हीला धक्का बसला. 41 00:02:21,870 --> 00:02:23,160 "हो! 42 00:02:23,160 --> 00:02:27,360 वैताग ही एक अशी भावना आहे, ज्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. 43 00:02:27,360 --> 00:02:32,230 जेव्हा तुम्ही वैतागलेले असता, तेव्हा त्याचा अर्थ असा की एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही आहे. 44 00:02:32,230 --> 00:02:36,849 तुम्हाला ते कसं असायला हवं आहे, ते तुम्हाला कळलं आणि मग तुम्ही ते दुरुस्त केलंत तर तुम्ही नक्की 45 00:02:36,849 --> 00:02:38,340 काहीतरी शिकाल जे तुम्हाला पुढच्या वेळी मदत करेल." 46 00:02:38,340 --> 00:02:43,420 "मला काही समजलं आहे, असं मला वाटत नाही," स्टीव्ही रडत म्हणाली. 47 00:02:43,420 --> 00:02:45,400 "ह्याचा विचार कर. 48 00:02:45,400 --> 00:02:48,400 जेव्हा तू सायकल चालवायला शिकत होतीस, तेव्हा काय झालं?" 49 00:02:48,400 --> 00:02:49,700 लॉरेलनं विचारलं. 50 00:02:49,700 --> 00:02:57,470 "मी सायकल घेऊन जात असे, काही वेळ पेडल्स मारत असे आणि मग पडत असे," स्टीव्ही म्हणाली. 51 00:02:57,470 --> 00:03:00,390 "आणि त्यामुळे तुला कसं वाटलं?" 52 00:03:00,390 --> 00:03:01,760 लॉरेलने विचारलं. 53 00:03:01,760 --> 00:03:04,030 "मला खूप वाईट वाटलं! 54 00:03:04,030 --> 00:03:07,810 मी रडले आणि माझ्या आईला सांगितलं की मला हे जमत नाहीये!" 55 00:03:07,810 --> 00:03:09,320 स्टीव्हीनं कपाळाला आठ्या घालून सांगितलं. 56 00:03:09,320 --> 00:03:12,860 "मग काय झालं?" लॉरेलनं विचारलं. 57 00:03:12,860 --> 00:03:17,220 "तिनं मला एक मोठा श्वास घ्यायला आणि परत प्रयत्न करायला सांगितलं. 58 00:03:17,230 --> 00:03:20,180 दोन तीन वेळा प्रयत्न केल्यावर मला ते जमलं!" 59 00:03:20,180 --> 00:03:21,940 स्टीव्ही आनंदानं म्हणाली. 60 00:03:21,940 --> 00:03:25,140 "मग तुला कसं वाटलं?" लॉरेलनं विचारलं. 61 00:03:25,140 --> 00:03:28,280 "मला मस्त वाटलं!" स्टीव्ही म्हणाली. 62 00:03:28,280 --> 00:03:30,620 "मला स्वत:चा खूप अभिमान वाटला." 63 00:03:30,620 --> 00:03:36,100 "तू जर पहिल्याच वेळी प्रयत्न सोडून दिला असतास आणि कधीच सायकल चालवायला शिकली नसतीस 64 00:03:36,100 --> 00:03:39,040 तर तुला आत्ता कसं वाटलं असतं?" लॉरेलनं विचारलं. 65 00:03:39,060 --> 00:03:43,340 "बहुतेक मला स्वत:चा राग आला असता. 66 00:03:43,349 --> 00:03:44,790 वैताग! 67 00:03:44,790 --> 00:03:50,330 आणि अजूनसुद्धा कोणालाही सायकलवर बसलेलं बघून मला वैताग आला असता." 68 00:03:50,330 --> 00:03:53,260 "अगदी बरोबर," लॉरेल म्हणाला. 69 00:03:53,260 --> 00:03:59,220 "वैताग येणं हे याचं चिन्ह आहे की तू काहीतरी छान शिकणार आहेस. 70 00:03:59,220 --> 00:04:05,080 तो धडा शिकण्यापूर्वीच तू सोडून दिलास तर तुला खूप वाईट आणि निराश वाटेल." 71 00:04:05,080 --> 00:04:11,140 "असं वाटतंय की तू चिकाटीबद्दलसुद्धा बोलतो आहेस," होरे म्हणाला. 72 00:04:11,140 --> 00:04:14,709 "सोडून न देण्यालाच दुसरा शब्द म्हणजे चिकाटी. 73 00:04:14,709 --> 00:04:19,949 जर तू एखादी समस्या सोडवण्यासाठी पुरेशा वेळेला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केलास, 74 00:04:19,949 --> 00:04:21,180 तर शेवटी तुला जमेल!" 75 00:04:21,180 --> 00:04:24,540 "पण जर मला ते जमण्यापूर्वी मी आठ वेळा प्रयत्न केला, 76 00:04:24,540 --> 00:04:28,640 तर त्याचा अर्थ मी सात वेळा अयशस्वी झाले!" स्टीव्ही म्हणाली. 77 00:04:28,640 --> 00:04:33,540 "अयशस्वी होणं ही वाईट गोष्ट आहे, असं तुला का वाटतं?" होरेनं विचारलं. 78 00:04:33,580 --> 00:04:38,740 "एखादी गोष्ट कशी करायची ते समजेपर्यंत प्रत्येकजणच अयशस्वी होतो...तू सायकल 79 00:04:38,759 --> 00:04:41,629 चालवायला शिकलीस तसंच किंवा एखादं बाळ चालायला शिकतं तसं. 80 00:04:41,629 --> 00:04:46,979 अपयश या शब्दाचा विचार तू शिकण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग, असा करायला सुरुवात केली पाहिजेस. 81 00:04:46,980 --> 00:04:52,000 "मी असा विचार कधीच केला नाही!" स्टीव्ही म्हणाली. 82 00:04:52,000 --> 00:04:59,219 "लक्षात ठेव," लॉरेलनं सुरुवात केली, "जेव्हा तुला वैताग येईल, तेव्हा हार मानू नकोस. 83 00:04:59,219 --> 00:05:03,820 तुला बरं वाटावं म्हणून काही युक्त्या इथं दिल्या आहेत, म्हणजे तू चिकाटी दाखवशील. 84 00:05:03,820 --> 00:05:12,129 "सावकाश 10 पर्यंत आकडे मोज, काही खोल श्वास घे, तुझ्या चिंता एका वहीत लिही, तुझ्या भावनांबद्दल 85 00:05:12,129 --> 00:05:15,990 मित्रमैत्रिणीशी बोल आणि मदत माग." 86 00:05:15,990 --> 00:05:21,969 "तू शांत झाल्यावर," होरे पुढे म्हणाला,"मग तू चिकाटी दाखवण्यावर लक्ष केंद्रित करू शकशील आणि 87 00:05:21,969 --> 00:05:23,919 काय चुकले याचा विचार करू शकशील. 88 00:05:23,919 --> 00:05:27,110 तुला चिकाटी दाखवण्यासाठी मदत करण्याकरता इथं काही टिप्स दिल्या आहेत." 89 00:05:27,110 --> 00:05:31,080 "तू आधीच काय प्रयत्न केले आहेस, याची नोंद ठेव. 90 00:05:31,080 --> 00:05:33,599 काय होत आहे, याचा विचार कर. 91 00:05:33,599 --> 00:05:37,289 काय व्हायला पाहिजे हे समजून घे. 92 00:05:37,289 --> 00:05:39,580 ते तुला काय सांगतंय, हे पहा. 93 00:05:39,580 --> 00:05:42,279 बदल कर आणि पुन्हा प्रयत्न कर." 94 00:05:42,280 --> 00:05:45,200 "धन्यवाद, तुम्हाला दोघांना!" स्टीव्ही ओरडली. 95 00:05:45,200 --> 00:05:48,580 "मला आता वैतागलेलं वाटत नाहीये. 96 00:05:48,580 --> 00:05:51,520 माझ्या प्रोजेक्टमध्ये मागच्या वेळी काय चुकलं हे मी शोधलं, 97 00:05:51,520 --> 00:05:56,060 आणि आता मी चिकाटी दाखवायला आणि अजून चांगलं करायला तयार आहे." 98 00:05:56,060 --> 00:05:58,640 नवीन दृष्टीकोनासह स्टीव्हीनं तिचा प्रोजेक्ट पूर्ण केला 99 00:05:58,640 --> 00:06:02,720 आणि वर्गातला उरलेला वेळ तिनं प्रोजेक्ट तिच्या मैत्रिणींच्या बरोबर टेस्ट करण्यात खर्च केला. 100 00:06:02,729 --> 00:06:03,379 समाप्त.