सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त गोष्ट म्हणजे सर्किटरी हा एक कलाप्रकार आहे. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे एक प्रकारची माहितीच असते. ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि एकत्र आणावे लागतात. ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. ते विद्युत सिग्नल्स, ऑन किंवा ऑफ घेतं आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं.