ठीक आहे. मी आपल्याला दोन चित्रे दाखवणार आहे वैद्यकशास्त्राच्या द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंड च्या चकित करणाऱ्या प्रबंधातील मी पूर्ण जोखीम पत्करुन म्हणते कि हा सर्वांत लक्ष वेधणारा प्रबंध आहे. वैद्यकीय द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंडच्या प्रकाशनांपैकी शीर्षक आहे "गर्भाशयातील हस्तमैथुनाच्या नोंदी" (हशा) ठीक आहे. आता डाव्या बाजूला आपल्याला हात दिसतो -- तो मोठा बाण जो आहे -- आणि पुरुषाचे जननेंद्रिय उजवीकडे आहे. हात मागेपुढे होतो आहे. आणि इथे आपण बघतोय, क्ष किरणतज्ज्ञ इस्राएल माइसनर यांच्या शब्दांत हस्तमैथुनाच्या हालचालींशी साधर्म्य साधणारी हाताची जननेंद्रियावर पकड आहे. लक्षात घ्या हे अल्ट्रासाउंड आहे, म्हणजे ते चलतचित्रण असेल. कामोन्माद स्वयंचलित मज्जासंस्थेची प्रतिक्षिप्त क्रिया असते . हा मज्जासंस्थेचा तो भाग आहे जो आपण जाणीवपूर्वक नियंत्रित न करणाऱ्या गोष्टींशी संबंधीत आहे जसं कि, पचन, हृदयगती आणि लैंगिक उद्दीपन. आणि कामोन्मादाची उत्तेजना आश्चर्यकारक अशा बऱ्याच माहितीच्या आधारे जागृत होते. जननेंद्रियाचे उत्तेजन. बकवास आहे. पण किन्सेने एका महिलेची मुलाखत घेतली . जिचा कामोन्माद कुणीतरी भुवई कुरवाळल्यावर होत असे. ज्या लोकांच्या मज्जारज्जूला इजा झाली आहे अधरांगाचा पक्षघात, हातापायांचा पक्षघात त्यांचा नेहमी एक अतिसंवेदनशील भाग तयार होतो दुखापतीच्या थोडासा वर, ती जिथे असेल तिथे. साहित्यात गुडघ्याचा कामोन्माद अशी एक गोष्ट आहे माझ्या मते , मला आढळलेलं सर्वांत विलक्षण उदाहरण एका महिलेचं होते जिचा कामोन्माद दरवेळी दात घासताना जागृत होत असे (हशा) दात घासण्याच्या क्लिष्ट अशा संवेदनशील कृतीमुळे काहीतरी कामोन्माद उत्तेजीत करत असे. आणि ती मज्जासंस्थेच्या विशेषज्ञाकडे गेली जो आश्चर्यचकित झाला त्यांनी तपासून बघितलं कि टूथपेस्टमध्ये काही आहे का पण नाही -- कुठल्याही टूथपेस्टने तेच होत होतं. त्यांनी तिच्या हिरडया दातकोरणीने उत्तेजीत केल्या त्याचा परिणाम बघण्यासाठी तसं नव्हतं. त्या संपूर्ण हालचालीमुळे तसं व्हायचं आणि माझ्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे तुम्हाला वाटेल या महिलेची मौखिक शुद्धता उत्तम असेल (हशा) दुर्दैवाने -- जर्नलच्या प्रबंधात असं म्हणलं होतं -- "तिचा असं वाटायचं कि तिला भुतांनी ग्रासलं होतं आणि मुखशुद्धीसाठी तिने औषधी द्रव्य वापरायला सुरूवात केली हे खूप दुर्दैवी आहे. (हशा) मी जेव्हा पुस्तक लिहीत होते, तेव्हा मी एका महिलेची मुलाखत घेतली जी कामोन्मादाचा विचार करू शकत होती. रटजर्स विद्यापीठाच्या एका संशोधनात ती सहभागी होती. तुम्हांला ते नक्कीच आवडेल. रटजर्स. ओकलंडमधील एका सुशी रेस्टोरंटमधे मी तिची मुलाखत घेतली. आणि मी तिला म्हणलं "तू आत्ता इथे करू शकतेस का?" आणि ती म्हणाली, "हो पण तुमची हरकत नसेल तर मला आधी माझं जेवण संपवायला आवडेल" (हशा) पण तिने नंतर दिलदारपणे बाहेरच्या बाकड्यावर प्रात्यक्षिक दाखवलं ते लक्षणीय होतं. त्याला एक मिनीट लागला. आणि मी तिला म्हणाले, "हे तू सतत असं करतेस का?" (हशा) ती म्हणाली "खरं सांगायचं तर मी जेव्हा घरी जाते तेव्हा खूप थकलेली असते" (हशा) ती म्हणाली कि शेवटचं तिने ते केलं होतं ते डिस्नेलँडच्या ट्राममध्ये. (हशा) कामोन्मादाचे मुख्यालय हे मज्जारज्जूला लागून ज्याला त्रिकोणी अस्थीच्या मज्जातंतूचे मूळ म्हणतात हे पाठीमागे इथे असते. आणि विद्युतघटाने तुम्ही जर उत्तेजीत केलं, योग्य जागी तर तुम्ही कामोन्माद उत्तेजीत करू शकता आणि हि वस्तुस्थिती आहे कि मृत व्यक्तींच्या पाठीच्या कण्याला तुम्ही उत्तेजीत करू शकता एका ठराविक प्रकारची मृत व्यक्ती, हृदय चालू असलेलं शव आता हे म्हणजे कोणीतरी ज्याचा मेंदू मृत आहे कायद्याने मृत, खात्रीशीर तपासणी केलेला, पण ज्याला कृत्रिम उपकरणाने जिवंत ठेवला आहे जेणेकरून त्यांचे अवयव रोपणासाठी जीवित राहतील आता या मेंदू मृत असलेल्या लोकांपैकी एकाला, योग्य जागी उत्तेजीत केलं, तुम्हांला सतत काहीतरी हालचाल दिसेल. याला लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. आणि हि अशी -- मी मृत नसल्याने चांगलं प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न करते ती अशी आहे. तुम्ही तिथे उत्तेजीत करा. मृत पुरुष किंवा स्री...असं करते. पॅथॉलॉजी लॅबमधील लोकांना हे खूपच बेचैन करणारं आहे (हशा) आता जर तुम्ही लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया मृत व्यक्तीत उत्तेजीत करू शकता तर कामोन्मादाची का नाही? मी हा प्रश्न मृत मेंदू तज्ज्ञाला विचारला, स्टेफनी मान जिने अगदी सरळ मनाने माझ्या ई-मेल्सना उत्तरं दिली (हशा) मी म्हणाले "मृत व्यक्तीत कामोन्माद जागृत तू कल्पनेतदेखील करू शकतेस का?" ती म्हणाली "जर त्रिकोणी अस्थीचा मज्जातंतू जीवित करता आला तर करू शकता." अर्थात त्या व्यक्तीला त्यातून आनंद मिळणार नाही पण तो कामोन्माद असेल -- (हशा) तरीही. अलाबामा विद्यापीठात एक संशोधक आहेत कामोन्मादाचं संशोधन करतात मी म्हणलं "तुम्ही एक प्रयोग करायला हवा" विद्यापीठात कामाला असाल तर तुम्हाला शव मिळतात हे माहितीये मी म्हणलं "तुम्ही हे खरंच करून बघायला हवं" त्या म्हणल्या "यासाठी मानवी विषयांच्या समीक्षा मंडळाची तुम्ही संमती घ्या" (हशा) १९३० च्या विवाह हस्तलिखिताचे लेखक, थिओडोर वॅन डे वाल्डे यांच्या मते, स्रीच्या श्वासोच्छवासाला वीर्याचा हलकासा गंध येतो समागमानंतरच्या तासाभरात. थिओडोर वॅन डे वाल्डे एक प्रकारचे वीर्याचे रसज्ञ होते (हशा) असं बघा कि हा एक माणूस "आदर्श विवाह" हे पुस्तक लिहितो खूप भारदस्त आणि वेगळा माणूस. त्यांनी "आदर्श विवाह" या पुस्तकात लिहिलंय -- ते म्हणतात कि ते फरक करू शकत होते तरुण पुरुषाचं वीर्य ज्याला आल्हाददायक आणि रोमांचक गंध होता, आणि प्रौढ पुरुषांच्या वीर्यामध्ये ज्याचा गंध ते म्हणतात "स्पॅनीश चेस्टनटच्या फुलांसारखा लक्षणीय असा कधीकधी अगदी ताज्या फुलांसारखा, तर कधीकधी खूप झोंबणारा." (हशा) ठीक आहे. १९९९ मध्ये इस्राएलमधे एका माणसाला उचकी लागायला लागली आणि हि अशी एक गोष्ट होती जी थांबतच नव्हती. मित्रांनी सुचवलेलं सगळं त्याने करून पाहिलं कशाचीच मदत झाली नाही. असेच दिवस गेले. एकदा, त्या माणसाने उचकी लागलेली असतानाच त्याच्या बायकोबरोबर समागम केला आणि गंमत बघा, उचकी थांबली. त्याने त्याच्या डॉक्टरांना सांगितलं ज्यांनी एक अहवाल प्रकाशित केला कॅनडाच्या वैद्यकीय नियतकालिकात ज्याचं शीर्षक होतं, "समागम एक संभवनीय उपचार अनियंत्रीत उचक्यांसाठी" मला हा लेख आवडतो कारण एका ठिकाणी ते सुचवतात कि उचक्या लागणारे अविवाहीत हस्तमैथुन आजमावू शकतात (हशा) मला हे आवडतं कारण लोकसंख्येचा एक मोठा भाग उचकी लागणाऱ्या अविवाहीतांचा आहे (हशा) विवाहीत, अविवाहीत उचकी लागणारे. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात, बहुतांश स्त्रीरोगतज्ज्ञांचा असा विश्वास होता कि जेव्हा स्त्रीचा कामोन्माद होतो आकुंचनांमुळे वीर्य गर्भाशयाकडे खेचलं जातं, आणि एक प्रकारे बीजांडाकडे तत्परतेने पोचवलं जातं जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात. त्याला "उर्ध्वशोषण" सिद्धांत म्हणत असत. (हशा) तुम्ही अगदी हिपोक्रेटिसच्या काळात गेलात, वैद्य मनात होते कि स्त्रियांचा कामोन्माद केवळ गर्भधारणेसाठी मदत करत नसे तर तो आवश्यक होता त्याकाळी डॉक्टर्स पुरुषांना नेहमी सांगत त्यांच्या अर्धांगिनीना कामसुख देण्याचे महत्त्व सांगत विवाह हस्तलिखिताचे लेखक आणि वीर्य हुंगणारे थिओडोर वॅन डे वाल्डे (हशा) यांच्या पुस्तकात एक ओळ आहे. मला हा माणूस आवडला. थिओडोर वॅन डे वेल्डेमुळे माझा खूप फायदा झाला त्यांच्या पुस्तकात हि ओळ आहे जी बहुदा हॅब्सबर्ग राजेशाहीतून येते, ज्यात मारिया थेरेसा नावाची राणी होती, जिला गर्भधारणेत अडचण होती. आणि राजवैद्याने तिला स्पष्टपणे सांगितलं, "मी या मताचा आहे कि महाराणींनी आपले जननेंद्रिय समागमाच्या काही काळ आधी उत्तेजीत करावं." (हशा) मला माहीत नाही पण असं दिसतं कि याची कुठेतरी नोंद आहे मास्टर्स आणि जॉन्सन: आता आपण १९५० च्या दशकात येतोय. मास्टर्स आणि जॉन्सन उर्ध्वशोषणाबाबत साशंक होते जे उच्चारायलासुद्धा गंमत वाटते. त्यांना ते पटलं नाही. मास्टर्स आणि जॉन्सन असल्याने त्यांनी ठरवलं कि ते याच्या तळापर्यंत जातील. त्यांनी स्त्रियांना प्रयोगशाळेत आणलं, बहुदा पाच स्त्रिया होत्या आणि त्यांच्या गर्भाशयाला कृत्रीम वीर्य असलेल्या टोप्या लावल्या आणि किरणोत्सर्जनाला अपारदर्शक पदार्थ कृत्रीम वीर्यात होता असा कि जो क्ष-किरण पटलावर दिसेल. हे १९५० चं दशक आहे. तर या स्त्रिया क्ष-किरण उपकरणासमोर बसल्या. आणि त्यांनी हस्तमैथुन केलं. आणि मास्टर्स आणि जॉन्सननी पाहिलं वीर्य वर खेचलं जातंय का ते उर्ध्वशोषणाचा काही पुरावा सापडला नाही. तुम्हाला कुतूहल असेल "कृत्रीम वीर्य कसं तयार करायचं?" (हशा) माझ्याकडे उत्तर आहे. किंबहुना दोन आहेत. तुम्ही पीठ आणि पाणी, मक्याचं बारीक पीठ आणि पाणी वापरू शकता मला लिखितांमध्ये तीन वेगळ्या कृती सापडल्या आहेत (हशा) मला जी सर्वांत आवडली तिच्यानुसार -- तुम्हाला माहितीये त्यांनी सामुग्री दिली आहे, आणि कृतीमध्ये लिहिलेलं आहे, उदाहरणार्थ, "मिळकत: दोन डझन कपकेक्स." याच्यात लिहिलं होतं: "एक वीर्यपतन." (हशा) कामोन्मादाने जननक्षमता वाढवण्याचा अजून एक मार्ग आहे. हा पुरुषांसाठी आहे. शरीरात एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ निश्चल असलेल्या शुक्राणूत दोष निर्माण होतात ज्यामुळे ते त्यांच्या बीजांडाकडच्या प्रवासासाठी कमी प्रभावी ठरतात. ब्रिटीश कामशास्त्रज्ञ रॉय लेव्हिन यांनी अंदाज बांधलाय कि कदाचित यामुळेच पुरुष हे उत्साही आणि वारंवार हस्तमैथुन करणारे असतात. ते म्हणाले "जर मी हस्तमैथुन करत राहिलो तर मी नवीन शुक्राणू तयार करत राहतो." जी माझ्या मते एक भन्नाट कल्पना, सिद्धांत आहे. मग आता तुम्हाला एक उत्क्रांत कारण मिळालं. (हशा) ठीक आहे. (हशा) ठीक आहे. प्राणिजगतात उर्ध्वशोषणाचा लक्षणीय पुरावा आहे -- उदाहरणार्थ, डुकरं. डेन्मार्कमध्ये डॅनिश वराहउत्पादन राष्ट्रीय समितीने शोध लावला कि जर डुकरीणीला लैंगिकरीत्या उत्तेजीत केलं कृत्रिम बीजारोपण करत असताना, तर तुम्हाला पिलावळाच्या दरात सहा टक्के वाढ दिसेल, कि जी जन्मलेल्या पिलांची संख्या असेल. मग त्यांनी डुकरीणींच्या उत्तेजनाचा पाच मुद्दे असलेला आराखडा तयार केला. गोठ्यात याची पत्रकं लावली आहेत आणि एक DVD आहे. आणि माझ्याकडे या DVD ची एक प्रत आहे. (हशा) हे माझे अनावरण आहे कारण मी तुम्हाला एक फीत दाखवणार आहे. (हशा) ठीक आहे. आता आपण बघू या, ला ला ला, काम चालू. ते सगळं कसं निरागस दिसतं. तो त्याच्या हातांनी चाळवणार आहे ज्यासाठी हात नसल्याने डुकराने नाक वापरलं असतं. ठीक आहे. (हशा) हेच ते आहे. डुकराकडे प्रियाराधनेचा खूप विचित्र खजीना आहे. (हशा) हे डुकराचं वजन भासवण्यासाठी आहे. (हशा) एक लक्षात घ्या, डुकरीणीचं योनिलिंग हे योनीच्या आत असतं. मग हे कदाचित तिला गुदगुल्या केल्यासारखं असेल. आता बघा. (हशा) आणि खुशखबर. (टाळ्या) मला हि चित्रफीत आवडते. या चित्रफितीच्या सुरुवातीला एक क्षण आहे, ज्याच्यात ते त्याचा हात आणि त्यातली अंगठी अधिक स्पष्ट दाखवतात, जणू सुचवण्यासाठी "ठीक आहे. हे त्याचं काम आहे. त्याला स्त्रियाच आवडतात." (हशा) ठीक आहे. जेव्हा मी डेन्मार्कमध्ये होते माझ्या यजमान ऍन मेरी होत्या. आणि मी म्हणलं "मग तुम्ही डुकरीणीच्या योनीलिंगालाच का उत्तेजीत करत नाही? गुराख्यांनाच तुम्ही ते का नाही सांगत? ते तुमच्या पंचसूत्रीपैकी नाही." त्या काय म्हणाल्या हे वाचून दाखवायला हवं, कारण मला ते आवडतं. त्या म्हणल्या "ती एक अडचण होती त्यांना जननेंद्रियाखाली स्पर्श करायला लावण्याचा. म्हणून आम्ही विचार केला, योनिलिंगाचा उल्लेख आत्ता करूच नये." (हशा) तथापि बुजरे पण महत्वाकांक्षी गुराखी -- हे खरंय -- डुकरीणीचं कंपन उपकरण खरेदी करू शकतात, जे शुक्राणू पुरवणाऱ्या नळीला कंपीत करतात. कारण, मी नमूद केल्याप्रमाणे, योनिलिंग हे योनीच्या आत असतं. जसं दिसतं त्यापेक्षा अधिक उत्तेजनाची शक्यता असते. आणि मी त्यांना हेही म्हणाले, आता या डुकरीणी. म्हणजे तुम्ही कदाचित दखल घेतली असेल. डुकरीणीला परमानंदाच्या कळा येताना येताना दिसत नाहीत." त्या म्हणल्या, तुम्ही निष्कर्ष काढू शकत नाही, कारण प्राणी आनंद किंवा दुःख त्यांच्या मुद्रेवर दाखवत नाहीत आपल्यासारखं. उदाहरणार्थ, डुकरं ही कुत्र्यांसारखी असतात. ते चेहऱ्याच्या वरच्या भागाचा वापर करतात; कान खूपच सूचक असतात. त्यामुळे तुम्हाला नक्की कळत नाही डुकराचं काय चाललं आहे ते. त्याविरुद्ध मानवसदृश सस्तन प्राणी तोंडाचा वापर जास्त करतात. बुंध्यासारखी शेपटी असलेल्या माकडाचा वीर्यपतनावेळीचा हा चेहरा आहे. (हशा) आणि आश्चर्य म्हणजे मादी माकडांमध्ये हे आढळलं आहे, पण फक्त दुसऱ्या मादीवर आरूढ होताना. (हशा) मास्टर्स आणि जॉन्सन. १९५० च्या दशकात, त्यांनी ठरवलं, ठीक आहे, आपण शोधू या संपूर्ण मानवी लैंगिक प्रतिसाद चक्र, उत्तेजनापासून ते कामोन्मादापर्यंत, पुरुष आणि स्त्रियांमध्ये -- मानवी शरीरात घडणारी प्रत्येक गोष्ट. स्त्रियांमध्ये बऱ्याचश्या गोष्टी आतल्या आत होत असतात. मास्टर्स आणि जॉन्सन यामुळे थांबले नाहीत. त्यांनी एक कृत्रिम संभोगाचं यंत्र तयार केलं. हे म्हणजे एका मोटरवर पुरुषाच्या जननेंद्रियासारखा कॅमेरा होय. तिथे एक उत्तेजीत जननेंद्रिय आहे, पारदर्शी ऍक्रिलिकचं जननेंद्रिय, कॅमेरा व प्रकाश स्रोत असलेलं, मोटरला जोडलेलं जी अशी जात आहे. आणि स्री त्यासोबत समागम करेल. ते असं करतील. खूपच विस्मयकारक. दुर्दैवाने, हे उपकरण मोडून टाकलेलं आहे. ह्याचं वाईट वाटतं मला वापरायचं होतं म्हणून नव्हे - तर ते मला पहायचं होतं. (हशा) एके दिवशी आल्फ्रेड किन्सेने मोजायचं ठरवलं पतन झालेलं वीर्य सरासरी किती अंतर जातं ते. हे निष्क्रिय कुतूहल नव्हतं. डॉक्टर किंसेंना कळलं होतं -- आणि त्यावेळी एक सिद्धांत प्रचलित होता, १९४० च्या दशकात -- कि वीर्याचा गर्भाशयावर पडण्याचा आवेग हा गर्भधारणेचा एक घटक होता. किंसेंना वाटलं ते अर्थशून्य आहे म्हणून त्यांनी काम सुरु केलं. त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत ३०० पुरुष, मोजपट्टी आणि चलतचित्र कॅमेरा हे जमवलं. (हशा) आणि वस्तुस्थितीत त्यांना असं आढळलं कि तीन चतुर्थांश पुरुषांचं वीर्य नुसतंच गळून पडलं. ते जोरात पिचकारीसारखं बाहेर आलं नाही. पण ज्याच्या नावे विक्रम आहे त्याचं आठ फुटाच्या थोडंसं आत पडलं जे खूपच प्रभावी आहे. (हशा) (टाळ्या) हो. खरंच. (हशा) दुर्दैवाने तो निनावी आहे. त्याचं नाव कुठं नाही. (हशा) या त्यांच्या प्रयोगाबद्दल त्यांच्या पुस्तकात लिहीताना, किन्से म्हणतात, "ओरिएंटल गालिचे खराब होऊ नयेत म्हणून दोन चादरी घातल्या होत्या." (हशा) आल्फ्रेड किंसेंच्या पूर्ण कार्यातील मला आवडलेली हि दुसरी ओळ आहे. सर्वांत आवडलेली "समागम करणाऱ्या उंदरांच्या जोडीपुढील चीजचे तुकडे मादीला विचलीत करतील पण नराला नाही." (हशा) आपली खूप आभारी आहे. (टाळ्या) धन्यवाद!