जेव्हा तुम्ही एक लूप दुसऱ्या लूपमध्ये घालता, तेव्हा आपण त्याला नेस्टेड लूप म्हणतो. उदाहरण म्हणजे, इथे आपल्याला 100 पिक्सेल्स बाजू असलेला त्रिकोण काढायचा कोड आधीच दिलेला आहे. त्यात प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूसाठी एकदा असा तीन वेळा रिपीट ब्लॉक वापरला आहे. पण आपल्याला सहा त्रिकोण काढायचे आहेत. त्यासाठी, आपण हा लूप दुसऱ्या रिपीट टाईम्स ब्लॉकमध्ये घालणार आहोत. मस्त!