कसे आहेत सगळेजण ? माझा खरंच विश्वास नाही मी टेड टॉक वर आज वक्ता आहे . हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे . माझ्या गावातील प्रत्येकजण, आत्ता हा कार्यक्रम बघतोय . नक्कीच माझी वधु म्हणून किंमत आता जास्त झाली असेल. माझे नाव अदेओल फायेहून. मी नायजेरिया ची आहे. मी यु.स.मध्ये राहते , मी पत्रकार ,विनोदी कलाकार , किंवा उपहासात्मक लेखन करणारी आहे . तुम्हाला जसे वाटेल तसे ,खरंच माझ्यामध्ये प्रत्येक प्रकारची स्त्री आहे. माझे यु ट्यूब चॅनेल आहे "कीपिंग इट रिअल विथ अदेओल " हा शो एक मार्ग आहे सभ्य ,आदरणीय अशा भ्रष्ट आफ्रिकन नेत्यांना संबोधण्याचा . (विडिओ)अध्यक्ष बुहारी : माहित नाही माझी बायको कोणत्या पक्षाची आहे , पण ती माझ्या स्वयंपाकघरात असते . अदेओल फायेहून:अरे देवा मला पाणी हवंय-- मला खरंच पाणी हवंय बघा? यांच्या सोबत हे नेहमीच खरं असतं हा! विशेषतः ते जेंव्हा गडबड करतात जि बऱ्याचदा होते. चुकून कोणी आफ्रिकन अधिकारी मला बघत आहे का , मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, सर हो ,मी तुमच्या सहकार्यांबद्दल बोलतेय . मी हे करतेय कारण आफ्रिकेत सगळे काही महान आहे . यावर विश्वास ठेवतच मी मोठी झालीय , आफ्रिका खंड म्हणून प्रचंड मोठा आहे. आपल्याकडे कौशल्य ,विचारवंत लोक , दुसरीकडे नसलेले नैसर्गिक स्रोत जगातील ३१% सोने आफ्रिका पुरवते , मँगनीज ,युरेनियम , जगातील ५७% हिरे १३% तेल . आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याचे कारण नाही जागतिक बँकेकडून किंवा चीन कडून उधार घ्यायची हि जरुरत नाही. फक्त चांगल्या नेतृत्वा विना , आपण एक गरुड आहोत ज्याला उडायचेच माहित नाही एकट्याने आफ्रिका एखाद्या झोपलेल्या राक्षसा प्रमाणे आहे . सत्य हे आहे ,मला या राक्षसाला झोपेतून जागे करायचे आहे म्हणून मी त्या राक्षसाची सगळे घाणेरडे कपडे धुवून वाळवायचे असेच ठरवलेय .. आपले राजकारणी ,धार्मिक गुरु , ज्यांचा खुप आदर केला जातो , दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा, त्यांना तो आदर जास्त महत्वाचा आहे . मी तो त्यांना डोसच्या रूपात देते . माझ्या कार्यक्रमात, मी त्यांच्या समोर झुकते --हा! - मी त्यांना काका,काकू असे बोलवते , वडिलांसमान ,परमेश्वर , आणि नंतर -- आपल्या बुद्धिमतेचा अनादर केल्याबद्दल मी त्यांचा अपमान करते . कारण आता आपण कंटाळलो आहोत ढोंगीपणाला आणि खोट्या आश्वासनांना. जसे कि , निजेरियाच्या अध्यक्षांनी वैद्यकीय पर्यटन संपवण्याचे आश्वासन दिले होते आपली जीर्ण झालेली हॉस्पिटल व्यवस्था नीट करण्याचे आणि अजून नवीन हॉस्पिटल बांधण्याचे . पण त्यांनी काय केले ? २०१७ मध्ये ३ महिने स्वतः वर लंडन मध्ये उपचार घेतले . आणि आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो . आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो . मग हे माझे काम होते राष्ट्रपतींना बोलते करणे, तेही आदराने . मी म्हणाले "हा मा.अध्यक्ष मी तुमची मुलगी अदेओल. तुम्ही कसे आहात,मी काय करतीय तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला थोडीहि लाज नाही वाटत " मी "सर" म्हणायला विसरले . "सर" तुम्हाला जराही लाज वाटत नाही . (योरूबा भाषेत :तुम्हाला देवाची भीती नाही वाटत. ) तुम्हाला देवाची भीती नाहीय " ३५००० हजारांहून हि जास्त नायजेरिअन डॉक्टर्स सध्या यु.स., यु.के. आणि कॅनडा मध्ये चांगले काम करत आहेत , कारण त्यांना नायजेरियात चांगला पगार नाही मिळत , चांगले डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी ना त्यांच्या कडे चांगली उपकरणे आहेत आणि हे कितीतरी आफ्रिकन देशां मध्ये होत आहे . आपल्यामध्ये उडण्याची शक्ती आहे पण वास्तव हे आहे कि सगळी प्रतिभा आफ्रिके च्या बाहेर जातेय दुसऱ्या खंडांकडे . उदाहरणार्थ , ह्या डॉक्टर ने न जन्मलेल्या बाळावर शस्त्रक्रिया केली पण ती टेक्सास मध्ये . आणि या दुसऱ्या डॉक्टरांनी क्रीडापटूंच्या मेंदू वर होणाऱ्या आघातावर अभ्यास केला कितीतरी आफ्रिकन देशातील खेळाडू त्यांच्या साठी सुवर्ण पदके मिळवत आहेत . मनोरंजक गोष्ट म्हणजे , आफ्रिकेला देव च तारेल अशी आपण वाट बघत आहोत . हा काही विनोद नाही ,पण खरंच आपण देवाची वाट बघतोय म्हणजे बघा जरा अध्यक्ष बुरुंदी यांच्याकडे ते विरोधकांना ,पत्रकारांना तुरुंगात टाकत आहेत , आणि राष्ट्रीय प्रार्थना दिवस जाहीर करत आहेत ज्या दिवशी लोक देवाकडे प्राथर्ना करू शकतील देश वाचवण्याची . माझ्या मते ते स्वतः हे नाही करू शकत का ? ओह नाही ,नाही, नाही, नाही ,नाही . आम्हाला देवानेच वाचवले पाहिजे आता तुम्हाला कळले असेल कि माझी लढाई कशा सोबत आहे ? मी तुम्हाला सांगते , या राजकारण्यांकडे वेगाने जाणारे वादळ निर्माण होत आहे . त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत . मला वाटतेय आपल्या नेत्यांनी आता जवाबदारी घ्यायला हवीय सगळे काही देवावर सोडून नाही चालणार . देवाने आपल्याला हवे असलेले सगळे दिले आहे . ते इथेच आहे ,चला त्याचा वापर करूयात . इथे माझा आवडता भाग येतो तो आहे आफ्रिकन लोक जे खूप चांगलं काम करत आहेत त्यांच्या बद्दल बोलणे , सामान्य पण असामान्य काम करणारे लोक . या केनियाच्या महिलेप्रमाणे, वांगारी माथाई, मानवी हक्कांसाठी उभे राहण्याचे पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारी आफ्रिकन महिला आणि लाखो झाडांचे वृक्षारोपण करणारी . तसेच ही झिम्बाब्वेची महिला, डॉ तेरेराई ट्रेंट, जिचे वयाच्या १४ व्या वर्षीच लग्न झाले फक्त एका गायी च्या बदल्यात. या महिलेने स्वतःला साक्षर बनवले , आणि ती ओप्राह च्या कार्यक्रमात पोहोचली . ओह ,मलाही एक दिवस ओप्राह मध्ये सहभागी होयचंय . आज या महिलेने झिम्बाब्वेतील हजारो मुलांसाठी शाळा उभी केली आहे. तसेच, लोकप्रिय ब्रिटिश आर्किटेक्ट डेव्हिड ऍड्जये यांनी जगभरात अनेक नेत्रदीपक इमारती बनवल्या आहेत. आणि ते दोन्ही घाणीयन आणि टांझानियन आहेत , तर आपल्याला माहीतच असेल कि हा घानाचा जलोफ तांदूळ आहे , जो ते खातात , आणि जो त्यांना नवनवीन रचना करण्याची प्रेरणा देतो . अहं,कदाचित हा नायजेरियन जलोफ तांदूळ असेल, कारण नायजेरिअन तांदूळ जास्त चांगला असतो . ते काहीही असो हीच त्यांची प्रेरणा आहे जी त्यांना महान बनवते . जर तुमचे माझ्या कडे लक्ष असेल तर, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे जरा जवळ या . एवढेही नाही ,बस एवढे ठीक आहे. मला तुमच्यातील काहीजण आवडत नाहीत जे आफ्रिकेचे चुकीचे चित्रण करतात. सगळेच नाही ,फक्त काहीच जण . खासकरून तुम्ही . हा देश नाहीए हा खंड आहे . युगांडातील पॉल ला मी नाही ओळखत , झिम्बाब्वेच्या रेबेकाला हि मी ओळखत नाही नायजेरिया झिम्बाब्वेपासून खूप दूर आहे जसे न्यूयॉर्क फ्रान्स पासून आहे. तुम्ही असे चुकीचे समजता कारण आहेत काही निलाजरे लोक . आमच्या इथे रस्त्यावर सिंह असेच फिरतात असे नाही ,ठीक आहे ? मी बोलणारच आहे तुम्हाला माहित आहे ना पण मी कशा बद्दल बोलतेय . माझे काम करायला सुरुवात करते , राक्षसा सारख्या झोपलेल्या आफ्रिकेला जागे करण्याचे , जेणेकरून ती जगाच्या रिंगणात तिची जागा घेऊ शकेल , आणि तुम्ही सुद्धा थोडे अजून लक्ष देऊन ऐका. पूर्वग्रहदूषित न होता तुमच्या आफ्रिकन मित्रांचे म्हणणे ऐकून घ्या त्यांना नक्की काय सांगायचे आहे . आफ्रिकन पुस्तके वाचा . अरे देवा, आफ्रिकन मुव्हीज पण बघू शकता . किंवा निदान, आमच्या ५४ देशांची काहि नावे तरी लक्षात ठेवा.. हो बाळा ५४ ,५ ४ . ठीक आहे ,हे सगळे खरे आहे , जे आहे तेच मी सांगतेय . पुढच्या वेळेपर्यंत ,मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. शांतता