स्टेसी: स्टँपी, लिझी, प्रेस्टन -
माझ्याबरोबर आल्याबद्दल धन्यवाद.
मला तुम्हाला दाखवायचंय हे मेसा पठार.
मला वाटतंय तुम्हाला ते खूप आवडेल!
एक मिनिट थांबा - रस्त्यात एक भगदाड आहे!
(ओरडत) सगळे ठीक आहात का?
स्टँपी: ओह, मला कळला प्रॉब्लेम.
बघा!
रस्त्यावर एक भगदाड होतं.
स्टेसी: खरंच, स्टँपी?
लिझी: हे दुरुस्त करायला आपण ब्लॉक्स
गोळा करायला पाहिजेत.
प्रेस्टन: चला, शर्यत लावूया.
पहिल्यांदा वर परत जाणारा
जिंकेल.
स्टेसी: ठीकेय, ऑन युवर मार्क, गेट सेट, गो!
ठीकेय, मी ह्यातली थोडी टेराकोटा गोळा
करणारेय.
थांबा.
मित्रांनो, मला मायनिंग करता येत नाहीये!
प्रेस्टन: मला पण.
लिझी: मला पण नाही.
स्टेसी: हे फारच विचित्र आहे.
स्टँपी, तुला मायनिंग करता येतंय का?
स्टँपी: मला मायनिंग करता येत नाहीये!
स्टेसी: ठीकेय, सगळे शांत राहा.
स्टँपी: हा गेम बिघडलाय का?
स्टेसी: आणि असला तर आपण तो कसा दुरुस्त
करू शकतो?
लिझी: मला नाही माहीत.
स्टँपी: माईनक्राफ्ट कोड कसा लिहायचा
कोणाला माहितीये का?
(आवाज) प्रेस्टन: हे काय आहे?
स्टँपी: मी यातलं काहीच आधी कधी
पाहिलेलं नाहीये.
लिझी: हे किती छान आहे!
स्टेसी: हे..हे माणसाळवता येतं का?
प्रेस्टन: अरे, काय चाललंय?
कोणीतरी खऱ्या जगात परत जाऊन हे दुरुस्त
करायला पाहिजे.
सगळे: नाही!
स्टेसी: मी नाही - (सुस्कारा सोडते.)
ठीकेय, मी जाईन.
हे!
ओह, ओके, तर मी आता खऱ्या जगात आहे.
मी माईनक्राफ्टची ऑफिसेस शोधायचा
प्रयत्न करणारेय.
पण, मला तुमची मदत लागणारेय.
ट्युटोरियल करायला सुरुवात करा, कोड कसा
करायचा ते शिकायला सुरुवात करा आणि मी तुम्हाला
काही पातळया झाल्या की भेटेन,
ठीकेय?
मला शुभेच्छा द्या!
मला वाटतंय, इकडून जायला पाहिजे.
ओ!
निवडुंग!
मी ठीक आहे!
अवर ऑफ कोड आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्हाला
एजंटला प्रोग्रॅम करण्याचा कोड लिहावा लागेल.
तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी
तुम्ही एजंटबरोबर काम कराल,
म्हणजे तुम्हाला प्रवासासाठी आवश्यक
वस्तू गोळा करता येतील.
फक्त एजंटच ब्लॉक ठेवू आणि मोडू शकतो,
आणि फक्त तुम्हीच वस्तू गोळा करू शकता.
तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत.
डावीकडे आहे माईनक्राफ्ट.
मधल्या भागात एजंटला कळणाऱ्या कमांड्स
असलेला टूलबॉक्स आहे.
आणि उजवीकडे, वर्कस्पेस आहे.
इथे आपण एजंटला नियंत्रित करण्यासाठी प्रोग्रॅम
तयार करायला एकावर एक कमांड्स ठेवतो.
एजंट चालू शकतो, वळू शकतो आणि प्रेशर
प्लेट्स ॲक्टीव्हेट करू शकतो.
तो ब्लॉक्स नष्ट करू शकतो आणि लावू शकतो.
जेव्हा तो या माईनकार्ट रेल्ससारखे ब्लॉक ठेवतो, तेव्हा तो स्वत:च्या खाली ठेवतो.
जर काय करायचेय ते तुम्ही विसरलात, प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना वर दिलेल्या आहेत.
जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल
तर, तुम्ही निळे "रीसेट" बटण दाबून जिथून
सुरुवात झाली, तिथंपर्यंत पूर्ववत करू शकता.
आणि जर तुम्हाला कोडचा ब्लॉक काढून टाकायचा असेल, तर तो तुमच्या वर्कस्पेसमधून टूलबॉक्समध्ये ड्रॅग करा.
एजंटला हलवण्यासाठी "रन" बटण दाबायचे
लक्षात ठेवा.
चला, पुढे जा आणि पहिल्या काही पातळ्या
करून बघा.
सर्वांना शुभेच्छा!