आता कल्पकता दाखवण्याची वेळ आहे. तुमची कोडींगची
कौशल्ये वापरून एक गोष्ट सांगा. तुमच्या गोष्टीत पात्रे
असतील आणि तुम्ही या पात्रांना बोलायला आणि एकमेकांशी संवाद साधायला लावाल. तर मी माझा स्वत:चा
गेम तयार करत आहे. मला मांजराला आणि कुत्र्याला हालचाल करायला लावायची आहे आणि त्यांना बोलायला लावायचं आहे.
तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट सांगायची आहे, त्याचा विचार करा. मांजराला नेहमी कुत्र्याची भीती वाटते
आणि जर कुत्रा छान वागायचा प्रयत्न करतो आहे असे
मांजराला कळले तर काय होईल? "when run" ब्लॉक
सगळ्याची सुरुवात करतो. "move" ब्लॉक तुमच्या पात्राला हलवेल आणि "say" ब्लॉक तुम्ही जे टाईप
कराल ते तुमच्या पात्राला म्हणायला लावेल. मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. ती खूप घाबरेल.
हा "when actors collide" ब्लॉक तुम्ही दुसऱ्याला जोडू शकता.
मी कुत्र्याला येऊन "हाय." म्हणायला लावत होते. पण मग मांजर घाबरले आणि पळाले. "आह"
अजून थोडा वेळ असता तर कदाचित आनंदी शेवट झाला असता. समाप्त!