तुम्ही कधी ऐकले आहे स्तनपान हे विनामूल्य असते? (हशा ) गम्मत आहे, स्त्रीची उर्जा आणि तिने दिलेला वेळ याचा विचार केल्यास ते खचितच विनामूल्य नाही. कोणतीही आई सांगेल किती उर्जा व वेळ लागतो तिला द्रवरुपात जायला व त्यात विरघळून जायला. (हशा) जेव्हा ती आपल्या बछड्याला दूध पाजते. (हशा ) सस्तन प्राणी चोखतात याचं कारण म्हणजे आईचं दूध. अरिझोना राज्यातील विद्यापीठात, स्तनपानाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेत मी आईच्या दुधातील घटक मिळविले. त्याची जटिलता जाणण्यासाठी. तसेच ती बालकाची वाढ कशी करते हे शिकण्यासाठी. जी सर्वात मोलाची आहे. आपण आई व बाळासाठी फार काही करीत नाही. आणि जेव्हा आपण आई व बाळाबाबत आपले कर्तव्य पार पाडीत नाही , तेव्हा आपण इतरांबाबत असेच करतो. पती ,वडील. मावशी, बाबतही तसेच रक्ताच्या नात्यातील व मित्राबाबत असेच वागत असतो. साध्या घोषणा व समाधान आपण टाळले पाहिजे. त्यामागील अर्थ ध्यानी घेतला पाहिजे. मी सुदैवी होते. याचा मूळ अर्थ व गाभा जाणण्यास माझी जेव्हा मुलाखत घेतली एका पत्रकर्तीने जेव्हा तिने प्रश्न केला, "आईने बाळाला किती काळ अंगावरचे दूध द्यावे ?" तिच्या प्रश्नाने मी हबकलेच. मी कधी कोणा महिलेला सांगणार नाही तिने तिच्या शरीराबाबत काय करावे. आईच्या दुधावर बाळ वाढत असते झपाट्याने आईचे दूध त्यांना अन्न .औषध असण्याचा संकेत देत असते . ते पूर्णान्न असते. त्यांच्या शरीराच्या वाढीकरिता ते आवश्यक घटक पुरवते. मेंदूचा विकास करते. सर्व शारीरिक क्रियेसाठी ते इंधन असते. आईच्या दुधावर जीवाणूही जगतात. जे बाळाच्या आतड्यात असतात. आई आपल्यासाठी व बाळासाठी खात नाही तर ती लक्षावधी सूक्ष्म जीवांना जगविते . आईचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढविते. अनेक हार्मोन्स देते, जे बाळाच्या शरीराला वेळोवेळी संकेत देतात. पण अलीकडच्या काळात , आपण दुधाबद्ल वेगळा विचार करू लागलो आहे. आपण आपला साधा दृष्टीकोन बदलला आपण .जंतू विरहित घुसळलेले सुगंधी पावडर स्वरुपातील चवदार बंद डब्यातील दूध वापरू लागलो आईचे स्तनपान आपण थांबविले आहे . नको त्या बाबीकडे आपले लक्ष देत आहोत. राष्ट्रीय आरोग्य संस्था जी वाशिंग्टन येथे आहे व जी औषधांची लायब्ररी आहे ज्यात २५ दशलक्ष लेख आहेत त्यात आहे जैविक - जीव वैद्यकीय मेंदू विज्ञान . एक परवलीचा शब्द लिहून आपण त्यातील माहिती शोधू शकतो. आपण जेव्हा असे करतो, तेव्हा आपल्याला लाखो लेख मिळतात गर्भ धारणेवर. पण त्यात स्तनपानावर खूप कमी माहिती असते. आपण जेव्हा ती माहिती चाळतो तेव्हा आपल्याला कळते आपल्याला कॉफी, वाईन, व टोमाटो बद्ल अधिक माहिती आहे . (हशा) त्यापेक्षा आपल्याला लैंगिक शैथिल्याबद्दल दुप्पट माहिती आहे. (हशा) मी असे म्हणत नाही की याची माहिती नसावी .. आपल्याला हे सर्व माहित पाहिजे पण आपल्याला फारच कमी माहिती असते. (हशा ) स्तनपानाबद्दल. नवजात सस्तन प्राण्याचे पहिले द्रवरुप अन्न आपल्याला त्याचा राग वाटेल दहातील नऊ महिलांना एक तरी मूल असते म्हणजे वर्षात 130 दशलक्ष बाले जन्मतात . या आयांना व बाळांसाठी ही आमची शास्त्रीय माहिती मोलाची आहे.. अलीकडचे संशोधन सांगते आईचे दूध शरीराची केवळ वाढच करीत नाही, तर ते वर्तणूक व चेतासंस्थेचा विकासही करते. २००५ मध्ये झालेल्या संशोधनात आईचे दूध आणि बाळाची लाळ प्रामुख्याने बाळाची लाळ .. याची रासायनिक प्रक्रिया होऊन हायड्रोजन पेरोक्साइड बनते. जे स्टॅफिलो व सालमोनेला जीवाणू मारतात. मानव व सस्तन प्राण्यांच्या अभ्यासावरून आपण आता जाणू लागलो आहोत जेव्हा दुधाची जैविक निर्मिती आईकडून खास तिच्या मुलांसाठी होते, तेव्हा ती एकमेव असते. आपण जेव्हा बालक शुश्रुषा घरात दुग्धदानातून आलेले दूध वापरतो, किंवा दुकानातल्या डब्यांतले दूध वापरतो तेव्हा ते सरसकट सर्व बाळांसाठी बनवलेले असते. आपण विचार करीत नाही मुले व मुली यांचा वाढीचा वेग भिन्न असतो. विकासही भिन्न असतो दूध हे त्याचे कारण असावे. आता हा विचार मातांपर्यंत पोहोचला आहे. बहुतेक आया स्तनपानानेच बाळाचे संवर्धन करतात. पण त्यातील अनेक आपले ध्येय साध्य करू शकत नाहीत. हे काही त्यांचे अपयश नाही. आपले आहे. स्थूलता , ग्रंथी स्त्राव यातील समस्या सीझर आणि वेळेआधी जन्म या गोष्टी जैविक दुधाची गुणवत्ता बाधित करतात. अनेक महिलांना याचे वैद्यकीय ज्ञान नसते. पंचवीस वर्षापूर्वी . जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी नियमावली घालून दिली. बाळांसाठी उत्तम म्हणवू इच्छिणाऱ्या इस्पितळांनी आई व बाळ यांच्या निकटतेवर,आणि स्तनपानावर माहिती द्यावी . आज अमेरिकेत पाचातील एक मूल अशा इस्पितळात जन्म घेते. ही समस्या आहे, कारण आईला अनेक आरोग्याच्या समस्या असू शकतात. काही मिनिटांसाठी, तासांसाठी वा अनेक दिवसांसाठी त्यांना झगडावे लागते. वेदनेसहित आईला दूध येत नाही दुधाबाबत चुकीची धारणा असते . अशा आयांना या इस्पितळात तेथील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली पाहिजे. ही प्रक्रिया त्यांना माहित करून द्यावी अशा लढा देणाऱ्या महिला माझ्याशी संपर्क करतात रडवेल्या आवाजात सांगतात "मला दूध येत नाही " मला स्तनपान नैसर्गिकरित्या सहज देता आलं पाहिजे, ना? "मग का असे होते ?' एखादी गोष्ट उत्क्रांती नियमानुसार पुरातनकालीन असली, तरी ती सोपी असेल, किंवा सहज करता येईल असं नव्हे. असं दुसरं काय तुम्हाला माहीत आहे? (हशा) सेक्स पहिल्या क्षणापासून कोणी त्यात तरबेज नसतं. (हशा ) इस्पितळे अधिक गुणवत्तापूर्ण होतील जर त्यांनी असे शिक्षण दिले आणि उत्तेजन दिले स्तनपानास हे सतत शिक्षण देण्यासाठी नवनवे संशोधन त्यांना माहित करून द्यावे. जीव विज्ञानात व सामाजिक विज्ञानात आपल्याला माहित असणे आवश्यक आहे अनेकदा ऐतिहासिक दुर्घटना गैरसमज आई व बाळात दरी निर्माण करते. शरीर हे नीती निर्धार करते. स्तनपाना विषयी आपण जागरूक असणे पुरेसे नाही आई जेव्हा कामावरून घरी येते, काही देशात अमेरिकेसारख्या संगोपन रजा मिळत नाही काही काळातच त्यांना बाळंतपणा नंतर कामावर रुजू व्हावे लागते. मग आपण बाळ व आई यांची कशी काळजी घेऊ केवळ संदेश देऊन उपयोग नाही होणार त्यासाठी आस्थापनांचे सहकार्य आवश्यक आहे. आई बाळाच्या या ममतेच्या बंधास मदत केली पाहिजे स्तनपानास उत्तेजन दिले पाहिजे पण याचे उत्तर मिळाले आपण हे करीत नाही मी कायदे करणाऱ्यांशी बोलत आहे आणि मतदारांशीही त्यांना निवडणाऱ्या. मी चर्चा करीत आहे नोकऱ्या देणाऱ्यांशी सहायभूत संघटनाशी कामगार व भागधारकांशी आपल्या सर्वांच्या सार्वजनिक आरोग्याविषयी अपेक्षा आहेत मागणी आहे हे सर्व साध्य करण्यासाठी आपण काम केले पाहिजे. स्तनपान हे मानवी आरोग्याचा विकास करणारे आहे. बालक शुश्रुषा घरात जेव्हा मूल जन्मते अकाली व आजारी स्थितीत तेव्हा जैविक घटक असलेले दूध महत्वाचे आहे. असे पर्यावरण जेथे संसर्गजन्य आजार आहेत तेथे तर स्तनपान हे अनमोल सं रक्षण आहे. वादळ भूकंप अश्या आपत्तीत किंवा विजेचा अभाव अथवा पिण्यायोग्य पाण्याचा अभाव असेल तेव्हा तर हे लाख मोलाचे आहे . मानवी आपत्तीच्या संदर्भात जे सिरियात घडले आईची ताटातूट युद्धात अशा वेळी दुधाचे काही थेंब जीवन देऊन जागतिक आव्हान पेलतात केवळ आईला स्तनपानाचे महत्व सांगून उपयोगी नाही तर त्यासाठी नीती निर्माण व्हावी. यासाठी स्तनपानाचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे जेणे करून आपण अधिक चांगले तयार दूध बाळांसाठी देऊ शकू, अशा आयांना ज्या बाळाला स्तनपान देऊ शकत नाहीत. आपण अधिक चांगल्या रीतीने माता अनुसरत असलेल्या विविध प्रकारच्या बाल संगोपनाला सहाय्य करू शकू. भिन्न प्रकारे. जगभरातील महिला लढा देत आहेत सामाजिक आर्थिक बाबतीत समता मिळवण्यासाठी. आपण आईपणाची नवी व्याख्या केली पाहिजे. महिलांचं अस्तित्व फक्त आईपणाभोवती केंद्रित नसून, आईपणा ही, महिलांना अनन्यसाधारण ठरवणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक आहे. ती वेळ येऊन ठेपली आहे. (टाळ्या)