ग्रेट!
आपल्याला कॉडफिश मिळालाय!
तुम्हाला माहिती आहे का, जर आपण डॉल्फिनला कॉडफिश खायला दिला तर तो आपल्याला फुटलेल्या
जहाजाकडे घेऊन जातो, तिकडे खजिना असू शकतो?
आपण जवळ चाललो आहे.
कोड्यांचा पुढचा संच अवघड असणार आहे,
त्यामुळे थोडी कोडींगची कौशल्ये शिकूया.
हे काय आहे?
गुहा?
स्वागत आहे, साहसी वीरांनो!
माझं नाव आहे स्क्विड.
गेल्या काही कोड्यांमध्ये तुम्ही कमांड्सचा एकच गट पुन्हा पुन्हा वापरत आहात, असं माझ्या लक्षात आलंय.
जरा कंटाळवाणं झालं असेल.
त्याच त्याच गोष्टी करण्यासाठी दुसरा मार्ग
असायला हवा, असं तुम्हाला वाटतं का कधी?
म्हणजे न थकता किंवा न कंटाळता, भांडी घासणे
किंवा दात घासणे वगैरे?
असं असेल तर किती बरं होईल?
कोडींग वापरून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा
करणं कॉम्प्युटरना चांगलं जमतं.
जेव्हा तुम्हाला प्रोग्रॅमकडून त्याच त्याच गोष्टी खूप वेळा करून घ्यायच्या असतात, तेव्हा तुम्ही लूप वापरू शकता!
लूपमध्ये कमांडसह लक्ष्य साध्य होईपर्यंत
पुनरावृत्ती करण्याच्या सूचना असतात.
एकदा तुमच्या प्रोग्रॅमची लक्ष्य साध्य होईपर्यंत
पुनरावृत्ती होऊ लागली की तो त्याच्या आतील
सूचना वाचत राहील, लक्ष्य साध्य होईपर्यंत.
हे स्वत: करून बघा!
repeat until goal ब्लॉक मध्ये तुम्हाला ज्या कमांड्सची पुनरावृत्ती करायची आहे त्या लिहा,
रनवर क्लिक करा आणि ते चालताना पहा!
हं, हे जरा विचित्र होतं.
स्क्विड्सना कोड करता येतो,
हे कुणाला माहिती होतं?
त्यांना बोटेसुद्धा असतील असं
मला वाटलं नव्हतं.
तर आता, आपल्याला लूप्स माहिती आहेत.
अजून थोडा खजिना गोळा करायला
त्यांचा वापर करू.
Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स