अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आलेख कागद
प्रोग्रॅमिंग
या धड्याचं नाव आहे "आलेख कागद
प्रोग्रॅमिंग"
आणि हा अल्गोरीदम्सबद्दलचा आहे. आज आपण
फक्त हाताने काढलेल्या इमेजेस वापरून साध्या काळ्या
आणि पांढऱ्या इमेजेस पुन्हा कशा तयार करायच्या
हे दाखवणारे प्रोग्रॅम्स लिहायला शिकणार आहोत.
अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी
सूचनांचा एक संच. आपण बाऊल तयार करण्यासाठी
सूचनांचा हा संच वापरू. एखादी गोष्ट कशी करायची हे
दुसऱ्या कोणालातरी दाखवण्यासाठी अल्गोरीदम्स
खूप उपयोगी असतात. जर तुम्ही
कॉम्प्युटरसाठी अल्गोरीदम लिहित असाल तर
तुम्ही त्याचं अनेक छोट्या पायऱ्यांमध्ये रूपांतर करता.
ही ओळ पूर्ण करा आणि मग पुढच्या ओळीला जा,
मग पुढच्या आणि मग झालं. मी माझ्या कामात अल्गोरीदम्स वापरते. जर मी सगळ्या पायऱ्या
लिहिल्या आणि मी तीच वस्तू पुन्हा तयार करू शकते किंवा दुसऱ्या कोणालातरी करायला शिकवू शकते. काच भट्टीत
ठेवा, ती एकत्र जोडा, बाऊल बनवण्यासाठी
उरलेल्या सूचनांचे पालन करा.
अल्गोरीदम्समुळे तुम्हाला एखादी गोष्ट करून
घेण्याचा मार्ग कळतो.