हा बायनरी ब्रेसलेट्स नावाचा धडा आहे. आपण एका ब्रेसेलेटवर आपली अद्याक्षरे लिहिणार आहोत, आणि ते घालून आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवणार आहोत! बायनरी म्हणजे फक्त दोन पर्याय वापरून माहिती दाखवणे. कधीकधी लोक याचा फक्त 1 आणि 0 असा विचार करतात. पण तुम्ही सुरू किंवा बंद अशी कॉम्बिनेशन्स वापरून बायनरी दाखवू शकता. हाय, मी आहे ओरायन आणि मी इथे प्लेएलमध्ये रोबोट्सचे प्रोग्रॅमिंग करतो. सर्व कॉम्प्युटर आणि रोबोट्सचे मेंदू मूलभूत पातळीला इलेक्ट्रॉनिक गेट्स असतात. जेव्हा गेट उघडं असतं तेव्हा त्यातून वीज वाहू शकते आणि बंद असतं तेव्हा वाहू शकत नाही. रोबोटमधल्या बायनरीचं उदाहरण म्हणजे रोबोटचे डोळे. रोबोटचे डोळे एलइडीज असतात आणि ते लाईट्स एकतर सुरू किंवा बंद असतात. ही बायनरी सिस्टीम आहे, हे किंवा ते. आपण बायनरी संख्या दाखवण्यासाठी लाईट्स वापरू शकतो. जर आपल्याकडे रोबोट्सचा संच असेल आणि आपण म्हटलं की पहिला रोबो म्हणजे 1ची जागा आणि दुसरा रोबोट म्हणजे 2 ची जागा आणि तिसरा म्हणजे 4ची जागा आणि याप्रमाणे. अशाप्रकारे तुम्ही बायनरी नंबर दाखवता. रोबोट्स त्यांचे बायनरी डोळे वापरून हे करतील आणि तुमच्यासाठी ते मोजतील.