अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा अलेक्स निवडू शकता. तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा वर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी आता तुम्ही या पातळीवर कुठेही फिरू शकता. एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा, त्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा. जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली, डावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा. मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी गेमवर टॅप करा. पण हे वापरल्यावर काय होतं? माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती लोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात, वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो. काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात. इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते ऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात. आणि ते घडलं की, कृती केली जाते. आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही "when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू झाला की रन होतो. पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched" सारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा तुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल, किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.