आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आणि सतत करत राहावी लागली तर? अशी वेळ तुमच्यावर न येवो! कारण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला कॉम्प्युटर्सना खूप चांगलं जमतं. हा "repeat forever" ब्लॉक आहे. या ब्लॉकमधलं काहीही या गेममध्ये सतत घडत राहील, न थांबता. जर आपल्याला कलाकाराकडून एखादी गोष्ट परत परत करून घ्यायची असेल, प्लेयरनं काहीही न करता, तर आपण हे ब्लॉक्स "repeat forever" ब्लॉक्समध्ये घालू. पुढच्या कोडयामध्ये आपलं ध्येय आहे अॅनाला सतत वर आणि खाली चालत राहायला मदत करणं. रिपीट कमांड्स कशा काम करतात ते शिकल्यावर, तुमचा स्वत:चा गेम तयार करताना तुमचा खूप वेळ वाचेल.