WEBVTT 00:00:00.099 --> 00:00:05.060 माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये 00:00:05.060 --> 00:00:13.390 माईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. 11 किंवा 12 व्या वर्षी मी प्रोग्रॅमिंगला सुरुवात केली 00:00:13.390 --> 00:00:17.750 कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या वडीलांच्या एक मित्राने मला सांगितले की 00:00:17.750 --> 00:00:26.090 गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला लागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग आवडते आणि गोष्टींचे 00:00:26.090 --> 00:00:33.329 आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टमधली ही गोष्ट खूप आवडते. 00:00:33.329 --> 00:00:39.219 पुढच्या तासाभरात तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून 00:00:39.219 --> 00:00:45.940 कॉम्प्युटर सायन्समधल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते, 00:00:45.940 --> 00:00:51.019 पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते, 00:00:51.019 --> 00:00:57.620 ते ओढून आणि सोडून तुम्ही प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता. 00:00:57.620 --> 00:01:02.530 तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असतात. त्या कॉम्प्युटर सायन्सचा पाया आहेत. 00:01:02.530 --> 00:01:09.890 मोजांगमध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालवण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू 00:01:09.890 --> 00:01:15.299 करण्यापूर्वी, तुमचे कॅरॅक्टर निवडा. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी 00:01:15.299 --> 00:01:22.810 आपण कोड लिहूया. 00:01:22.810 --> 00:01:28.579 तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना 00:01:28.579 --> 00:01:34.740 खाली आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक 00:01:34.740 --> 00:01:40.899 म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला 00:01:40.899 --> 00:01:46.920 वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक 00:01:46.920 --> 00:01:53.340 वर्कस्पेसमध्ये ओढला आणि रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते 00:01:53.340 --> 00:01:59.770 आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण 00:01:59.770 --> 00:02:05.140 आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे, 00:02:05.140 --> 00:02:11.380 आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे. 00:02:11.380 --> 00:02:17.260 नंतर मी तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील. 00:02:17.260 --> 00:02:22.670 आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल. 00:02:22.670 --> 00:02:28.700 आणि जर ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तुम्ही तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता. 00:02:28.700 --> 00:02:33.790 तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले 00:02:33.790 --> 00:02:41.170 स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्सवरचा छोटा त्रिकोण दिसतो का? 00:02:41.170 --> 00:02:46.620 तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता. 00:02:46.620 --> 00:02:48.750 चला, कोडींग सुरू करूया!