1 00:00:00,099 --> 00:00:05,060 माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये 2 00:00:05,060 --> 00:00:13,390 माईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. 11 किंवा 12 व्या वर्षी मी प्रोग्रॅमिंगला सुरुवात केली 3 00:00:13,390 --> 00:00:17,750 कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या वडीलांच्या एक मित्राने मला सांगितले की 4 00:00:17,750 --> 00:00:26,090 गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला लागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग आवडते आणि गोष्टींचे 5 00:00:26,090 --> 00:00:33,329 आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टमधली ही गोष्ट खूप आवडते. 6 00:00:33,329 --> 00:00:39,219 पुढच्या तासाभरात तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून 7 00:00:39,219 --> 00:00:45,940 संगणक शास्त्रातल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते, 8 00:00:45,940 --> 00:00:51,019 पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते, 9 00:00:51,019 --> 00:00:57,620 ते ओढून आणि सोडून तुम्ही प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता. 10 00:00:57,620 --> 00:01:02,530 तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असतात. त्या संगणक विज्ञानाचा पाया आहेत. 11 00:01:02,530 --> 00:01:09,890 मोयांगमध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालवण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू 12 00:01:09,890 --> 00:01:15,299 करण्यापूर्वी, तुमचे कॅरॅक्टर निवडा. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी 13 00:01:15,299 --> 00:01:22,810 आपण कोड लिहूया. 14 00:01:22,810 --> 00:01:28,579 तुमचा स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना 15 00:01:28,579 --> 00:01:34,740 खाली आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक 16 00:01:34,740 --> 00:01:40,899 म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला 17 00:01:40,899 --> 00:01:46,920 वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक 18 00:01:46,920 --> 00:01:53,340 वर्कस्पेसमध्ये ओढला आणि रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते 19 00:01:53,340 --> 00:01:59,770 आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण 20 00:01:59,770 --> 00:02:05,140 आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे, 21 00:02:05,140 --> 00:02:11,380 आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे. 22 00:02:11,380 --> 00:02:17,260 नंतर मी तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील. 23 00:02:17,260 --> 00:02:22,670 आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल. 24 00:02:22,670 --> 00:02:28,700 आणि जर ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तुम्ही तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता. 25 00:02:28,700 --> 00:02:33,790 तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले 26 00:02:33,790 --> 00:02:41,170 स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्सवरचा छोटा त्रिकोण दिसतो का? 27 00:02:41,170 --> 00:02:46,620 तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता. 28 00:02:46,620 --> 00:02:48,750 चला, कोडींग सुरू करूया!