माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये
माईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. 11 किंवा 12 व्या
वर्षी मी प्रोग्रॅमिंगला सुरुवात केली
कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या वडीलांच्या एक मित्राने मला सांगितले की
गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला लागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग आवडते आणि गोष्टींचे
आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टमधली ही गोष्ट खूप आवडते.
पुढच्या तासाभरात तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून
संगणक शास्त्रातल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते,
पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते,
ते ओढून आणि सोडून तुम्ही प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता.
तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असतात. त्या संगणक विज्ञानाचा पाया आहेत.
मोजँगमध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालवण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू
करण्यापूर्वी, तुमचे कॅरॅक्टर निवडा. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी
आपण कोड लिहूया.
तुमचा स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना
खाली आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक
म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला
वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक
वर्कस्पेसमध्ये ओढला आणि रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते
आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण
आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे,
आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे.
नंतर मी तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील.
आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल.
आणि जर ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तुम्ही तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता.
तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले
स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्सवरचा छोटा त्रिकोण दिसतो का?
तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता.
चला, कोडींग सुरू करूया!