WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:03.000 मी बराच काळ शिकवते आहे, 00:00:03.000 --> 00:00:05.000 आणि शिकवता-शिकवता 00:00:05.000 --> 00:00:08.000 मुले व शिक्षण यांबद्दल बरीच माहिती गोळा केली आहे 00:00:08.000 --> 00:00:11.000 आणि विद्यार्थ्यांच्यातील क्षमतेविषयी ही माहिती मला 00:00:11.000 --> 00:00:14.000 खरोखरच अनेक लोकांना कळावी असे वाटते. 00:00:14.000 --> 00:00:16.000 १९३१ मध्ये, माझी आज्जी -- 00:00:16.000 --> 00:00:18.000 तुम्हा लोकांसाठी डावीकडे खालच्या ओळीतील -- 00:00:18.000 --> 00:00:20.000 आठव्या इयत्तेतून पास झाली. 00:00:20.000 --> 00:00:22.000 ती माहिती मिळविण्यासाठी शाळेत गेली 00:00:22.000 --> 00:00:24.000 कारण सर्व माहिती तेथेच असायची. 00:00:24.000 --> 00:00:26.000 ती माहिती पुस्तकांत होती, शिक्षकांच्या डोक्यात होती, 00:00:26.000 --> 00:00:29.000 आणि माहिती मिळविण्यासाठी तेथे जाणे तिला भाग होते, 00:00:29.000 --> 00:00:31.000 कारण शिकण्याची पद्धतच तशी होती. 00:00:31.000 --> 00:00:33.000 आता लगेच पुढच्या पिढीत चला: 00:00:33.000 --> 00:00:35.000 हे आहे एका खोलीचे विद्यालय, ओक ग्रोव्ह, 00:00:35.000 --> 00:00:37.000 जेथे माझे वडील जात असत. 00:00:37.000 --> 00:00:39.000 आणि त्यांनाही शाळेला जायला लागत होते 00:00:39.000 --> 00:00:41.000 शिक्षकांकडून माहिती घेऊन आपल्या डोक्यात साठवण्यासाठी, 00:00:41.000 --> 00:00:44.000 कारण सगळीकडे घेऊन जाण्यासारखे ते एकच स्मृतीयंत्र त्यांच्याकडे होते, 00:00:44.000 --> 00:00:46.000 आणि आपल्याबरोबर सगळीकडे नेण्यासाठी, 00:00:46.000 --> 00:00:49.000 कारण माहिती अशीच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे जात होती 00:00:49.000 --> 00:00:52.000 आणि मग जगात वापरली जायची. 00:00:52.000 --> 00:00:54.000 मी जेव्हा लहान होते, 00:00:54.000 --> 00:00:56.000 आमच्या घरात विश्वकोशांचा संच होता. 00:00:56.000 --> 00:00:58.000 मी जन्मले त्या वर्षीच तो खरेदी केला होता, 00:00:58.000 --> 00:01:00.000 आणि ती परिस्थिती असामान्य होती, 00:01:00.000 --> 00:01:03.000 कारण मला माहिती मिळविण्यासाठी ग्रंथालयात जायची गरज राहिली नव्हती; 00:01:03.000 --> 00:01:05.000 माहिती माझ्या घरातच होती 00:01:05.000 --> 00:01:07.000 आणि ती खरोखरच महान होती. 00:01:07.000 --> 00:01:09.000 हे थोडे आधीच्या 00:01:09.000 --> 00:01:11.000 दोन पिढ्यांच्या अनुभवांपेक्षा वेगळे होते, 00:01:11.000 --> 00:01:13.000 आणि त्यामुळे माहिती घेण्या-देण्याची पद्धती अगदी छोट्या प्रमाणात का होईना 00:01:13.000 --> 00:01:15.000 पण बदलली. 00:01:15.000 --> 00:01:17.000 पण माहिती माझ्यापासून जवळ होती. 00:01:17.000 --> 00:01:19.000 आणि मला नित्य वापरता येऊ शकत होती. NOTE Paragraph 00:01:19.000 --> 00:01:21.000 आणि मी शाळेतील विद्यार्थिनी असल्यापासून ते 00:01:21.000 --> 00:01:23.000 मी शाळेत शिकवण्यास 00:01:23.000 --> 00:01:25.000 सुरू करण्यामधील काळात, 00:01:25.000 --> 00:01:27.000 आपल्याला इंटरनेटचा उदय होऊन प्रभाव वाढलेला दिसेल. 00:01:27.000 --> 00:01:29.000 अगदी ज्यावेळी इंटरनेट 00:01:29.000 --> 00:01:31.000 शैक्षणिक साधन म्हणून वापरण्यास सुरुवात झाली, 00:01:31.000 --> 00:01:33.000 मी विस्काँसीन मधून निघाले 00:01:33.000 --> 00:01:35.000 आणि कँसासला, छोटेसे गाव असलेल्या कँसासला पोचले, 00:01:35.000 --> 00:01:37.000 जेथे एका छोट्या गावातील 00:01:37.000 --> 00:01:39.000 छानश्या ग्रामीण शालेय परगण्यात 00:01:39.000 --> 00:01:41.000 ग्रामीण शालेय परगण्यात, 00:01:41.000 --> 00:01:43.000 तिथे मी शिकवत होते माझा आवडता विषय, 00:01:43.000 --> 00:01:45.000 अमेरिकेची सरकारपद्धती. 00:01:45.000 --> 00:01:48.000 माझे पहिलेच वर्ष -- अतिशय उत्साहात -- अमेरिकेच्या राज्यपद्धती बद्दल शिकवणार होते, 00:01:48.000 --> 00:01:50.000 राजकारण मला फार आवडायचे. 00:01:50.000 --> 00:01:52.000 १२ व्या इयत्तेतील मुले: 00:01:52.000 --> 00:01:54.000 अमेरिकेच्या राज्यपद्धतीबद्दल 00:01:54.000 --> 00:01:56.000 उत्साही होती असे म्हणता येणार नाही. 00:01:56.000 --> 00:01:59.000 वर्ष दुसरे: थोड्या गोष्टी समजल्या -- खेळी बदलावी लागली. 00:01:59.000 --> 00:02:01.000 आणि मी त्यांच्या समोर ठेवला खरोखरचा अनुभव 00:02:01.000 --> 00:02:04.000 ज्यामुळे त्यांच्या त्यांनाच शिकण्यास वाव मिळाला. 00:02:04.000 --> 00:02:06.000 मी त्यांना काय करा किंवा कसे करा काहीही सांगितले नाही. 00:02:06.000 --> 00:02:08.000 त्यांच्यासमोर एक मुद्दा उपस्थित केला, 00:02:08.000 --> 00:02:11.000 त्यांच्या समाजासाठी निवडणूक आघाडी तयार करण्यासंबंधी. NOTE Paragraph 00:02:12.000 --> 00:02:14.000 त्यांनी पत्रके काढली, विविध कचेऱ्यांत चौकशा केल्या, 00:02:14.000 --> 00:02:16.000 वेळापत्रके तपासली, सचिवांशी गाठीभेटी केल्या, 00:02:16.000 --> 00:02:18.000 आपल्या उमेदवारांची माहिती सगळ्या गावकऱ्यांना मिळावी 00:02:18.000 --> 00:02:20.000 म्हणून एक निवडणूक आघाडी पुस्तिका काढली. 00:02:20.000 --> 00:02:22.000 सरकार, राजकारण यांविषयी 00:02:22.000 --> 00:02:24.000 आणि रस्ते व्यवस्थित बांधले आहेत की नाहीत 00:02:24.000 --> 00:02:26.000 याबद्दल चर्चा करण्यासाठी 00:02:26.000 --> 00:02:28.000 एका संध्याकाळी सर्वांना शाळेत बोलावले, 00:02:28.000 --> 00:02:31.000 आणि त्यांना खरोखरच्या अनुभवातून अढळ शिक्षण मिळाले. 00:02:31.000 --> 00:02:33.000 मोठे शिक्षक -- जास्त अनुभवी -- 00:02:33.000 --> 00:02:35.000 माझ्याकडे बघून म्हणाले, 00:02:35.000 --> 00:02:38.000 "हां. ती पाहा, काय गोड आहे ना. ती काहीतरी (वेगळे) करवून घ्यायचा प्रयत्न करत आहे." 00:02:38.000 --> 00:02:40.000 (हशा) 00:02:40.000 --> 00:02:42.000 "पण तिला माहिती नाही ती कशात पडली आहे." 00:02:42.000 --> 00:02:44.000 पण मला माहिती होते मुले नक्कीच येतील. 00:02:44.000 --> 00:02:46.000 आणि मला तसा विश्वास होता. 00:02:46.000 --> 00:02:49.000 आणि प्रत्येक आठवड्यात मी त्यांना मला त्यांच्याकडून काय हवे आहे ते सांगितले. 00:02:49.000 --> 00:02:51.000 आणि त्या रात्री , सर्व ९० मुले -- 00:02:51.000 --> 00:02:54.000 -- व्यवस्थित कपडे घालून, जबाबदारी घेऊन आपली कामे करत होती. 00:02:54.000 --> 00:02:56.000 मला फक्त बसून पाहायचे होते. 00:02:56.000 --> 00:02:58.000 तो (कार्यक्रम) त्यांचा होता. तो एक अनुभव होता. खराखुरा. 00:02:58.000 --> 00:03:00.000 तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. 00:03:00.000 --> 00:03:02.000 आणि ती नक्कीच एक पायरी पुढे जातील. NOTE Paragraph 00:03:02.000 --> 00:03:05.000 कँसासमधून मी ऍरिझोनाला गेले, 00:03:05.000 --> 00:03:08.000 तेथे फ्लॅगस्टाफला मी बरीच वर्षे शिकवले, 00:03:08.000 --> 00:03:10.000 यावेळी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना. 00:03:10.000 --> 00:03:12.000 सुदैवाने यावेळी अमेरिकेची राज्यपद्धती शिकवायची नव्हती. 00:03:12.000 --> 00:03:15.000 येथे भूगोलासारखा विषय शिकवू शकत होते. 00:03:15.000 --> 00:03:18.000 परत, शिकण्यात थरार अनुभवला. 00:03:19.000 --> 00:03:21.000 पण येथली एक गोष्ट वेगळी होती 00:03:21.000 --> 00:03:24.000 ऍरिझानातील या कामाविषयीची, 00:03:24.000 --> 00:03:26.000 मला शिकवायचे होते एका विविध 00:03:26.000 --> 00:03:28.000 स्तरांतून, वर्गातून आलेल्या मुलांच्या गटाला 00:03:28.000 --> 00:03:30.000 एका खऱ्याखुऱ्या सार्वजनिक शाळेत. 00:03:30.000 --> 00:03:33.000 आणि असे काही प्रसंग घडायचे ज्यावेळेस आम्हाला अशा संधी मिळत असत. 00:03:33.000 --> 00:03:35.000 आणि अशीच एक संधी 00:03:35.000 --> 00:03:38.000 मिळाली पॉल रुसेसाबागिना यांना जाऊन भेटण्याची, 00:03:38.000 --> 00:03:40.000 हे तेच सदगृहस्थ आहेत 00:03:40.000 --> 00:03:42.000 ज्यांच्यावर "हॉटेल रवांडा" चित्रपट काढला आहे. 00:03:42.000 --> 00:03:44.000 आणि ते आमच्या शेजारच्या शाळेत भाषण देणार होते. 00:03:44.000 --> 00:03:46.000 आम्हाला चालत जाता येवू शकत होते; बसचेही पैसे लागणार नव्हते. 00:03:46.000 --> 00:03:49.000 कोणताही खर्च नव्हता. एक परिपूर्ण सहल. NOTE Paragraph 00:03:49.000 --> 00:03:51.000 पण प्रश्न असा होता की 00:03:51.000 --> 00:03:53.000 तुम्ही सातवी आणि आठवीच्या मुलांना वंशहत्येबद्दलच्या भाषणाला कसे न्यायचे 00:03:53.000 --> 00:03:55.000 आणि तो विषय जबाबदारीने आणि आदराने 00:03:55.000 --> 00:03:57.000 कसा त्यांच्यासमोर मांडायचा, 00:03:57.000 --> 00:03:59.000 ज्यामुळे त्यांना त्याबद्दल कसे वागायचे ते कळेल. 00:03:59.000 --> 00:04:01.000 आणि म्हणून आम्ही पॉल रुसेसाबागिना यांच्याकडे 00:04:01.000 --> 00:04:03.000 अशा एका सदगृहस्थाचे उदाहरण म्हणून पाहिले 00:04:03.000 --> 00:04:07.000 ज्यांनी स्वकर्तृत्वाने आपले आयुष्य काहीतरी चांगले करण्यासाठी वापरले आहे. 00:04:07.000 --> 00:04:09.000 मग मी मुलांना आव्हान दिले, त्यांच्या 00:04:09.000 --> 00:04:12.000 त्यांच्या आयुष्यातील अशी कोणत्याही व्यक्तीची किंवा त्यांची स्वतःची गोष्ट, 00:04:12.000 --> 00:04:14.000 त्यांच्या जगातील अशी घटना शोधण्याबाबत ज्यात असे घडले आहे. 00:04:14.000 --> 00:04:16.000 मी त्यांना याबाबत एक छोटासा माहितीपट तयार करायला सांगितला. 00:04:16.000 --> 00:04:18.000 असे आम्ही पहिल्यांदाच करत होतो. 00:04:18.000 --> 00:04:20.000 कोणालाच संगणकावर छोट्या चलचित्रीका तयार करण्याबद्दल माहिती नव्हती. 00:04:20.000 --> 00:04:23.000 पण त्यांनी मनापासून काम केले. मग मी त्यांना त्यांच्या स्वतःच्या आवाजात माहितीपटात वर्णन घालण्यास सांगितले. 00:04:24.000 --> 00:04:29.000 आणि त्यातून एक मोठी महत्त्वाची गोष्ट उघड झाली की 00:04:29.000 --> 00:04:32.000 तुम्ही जेव्हा मुलांना त्यांचा स्वतःचा आवाज वापरण्यास सांगता, 00:04:32.000 --> 00:04:34.000 आणि त्यांचे विचार त्यांना मांडू देता, 00:04:34.000 --> 00:04:36.000 तेव्हा काय काय अचाट गोष्टी ती सांगतात. 00:04:36.000 --> 00:04:38.000 या अभ्यासाचा शेवटचा प्रश्न आहे: 00:04:38.000 --> 00:04:40.000 तुम्ही तुमचे आयुष्य लोकांच्या भल्यासाठी कसे 00:04:40.000 --> 00:04:42.000 वापरू इच्छिता? 00:04:42.000 --> 00:04:44.000 तुम्ही असे विचारल्यावर आणि वेळ देऊन ऐकल्यावर 00:04:44.000 --> 00:04:47.000 मुले ज्या काही गोष्टी बोलतात 00:04:47.000 --> 00:04:50.000 त्या केवळ असाधारण असतात. NOTE Paragraph 00:04:50.000 --> 00:04:53.000 चला पुढे जाऊया पेनसिल्वानियाला, जेथे मी हल्ली असते. 00:04:53.000 --> 00:04:55.000 मी सायन्स लिडरशीप ऍकॅडमी येथे शिकवते, 00:04:55.000 --> 00:04:58.000 जी फ्रँकलिन इंस्टीट्युट आणि फिलाडेल्फियातील शालेय विभाग यांच्यातील 00:04:58.000 --> 00:05:00.000 सहकारामधून तयार झाली आहे. 00:05:00.000 --> 00:05:03.000 आमची शाळा नववी ते बारावी पर्यंतची आहे, 00:05:03.000 --> 00:05:06.000 पण आम्ही शाळा वेगळ्या पद्धतीने चालवतो. 00:05:06.000 --> 00:05:08.000 मी तेथे गेले मुख्यतः 00:05:08.000 --> 00:05:10.000 तेथील त्या शैक्षणिक पर्यावरणाचा भाग होण्यासाठी 00:05:10.000 --> 00:05:12.000 जेथे मला माहिती असलेल्या मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीला योग्य मानले जात होते, 00:05:12.000 --> 00:05:14.000 आणि जेथे याचा खरोखरीचा तपास केला जात होता की 00:05:14.000 --> 00:05:16.000 जर आपण माझी आज्जी शाळेत जात होती 00:05:16.000 --> 00:05:18.000 आणि माझे वडील शाळेत जात होते किंवा मीही शाळेत जात होते त्यावेळच्या 00:05:18.000 --> 00:05:20.000 माहितीच्या दुष्काळातील जुनी शैक्षणिक विचारसरणी 00:05:20.000 --> 00:05:23.000 टाकून देण्यास तयार झालो, 00:05:23.000 --> 00:05:26.000 तर माहितीच्या महापुराच्या या क्षणी, 00:05:26.000 --> 00:05:28.000 काय काय करणे शक्य आहे. 00:05:28.000 --> 00:05:31.000 जर माहिती सर्वत्र उपलब्ध असेल तर तुम्ही काय कराल? 00:05:31.000 --> 00:05:33.000 तुम्हाला मुलांना शाळेत का बोलवावे लागतेय 00:05:33.000 --> 00:05:36.000 जर त्यांना माहिती मिळवण्यासाठी तेथे येण्याची आता गरज राहिली नाही आहे? NOTE Paragraph 00:05:36.000 --> 00:05:39.000 फिलाडेल्फियामध्ये प्रत्येकासाठी लॅपटॉपची योजना आहे, 00:05:39.000 --> 00:05:42.000 मग मुले लॅपटॉप दररोज त्यांच्याबरोबर आणतात, 00:05:42.000 --> 00:05:45.000 घरी घेऊन जातात, आणि माहिती मिळवतात. 00:05:45.000 --> 00:05:48.000 आणि जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना 00:05:48.000 --> 00:05:50.000 माहिती मिळविण्यासाठी साधने देता 00:05:50.000 --> 00:05:52.000 तेव्हा एका गोष्टीसाठी तुम्हाला तयार असावे लागेल, 00:05:52.000 --> 00:05:54.000 तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की 00:05:54.000 --> 00:05:56.000 मुलांनी अपयशी होणे हा 00:05:56.000 --> 00:05:59.000 ज्ञानार्जनाच्या या नवीन पद्धतीचा एक साधारण भागच आहे. 00:05:59.000 --> 00:06:01.000 साधारण बहुपर्यायी चाचणीतील 00:06:01.000 --> 00:06:03.000 एकाच अचूक उत्तराला रेखांकित करण्याच्या 00:06:03.000 --> 00:06:05.000 संस्कृतीच्या खूळाला 00:06:05.000 --> 00:06:08.000 सध्या शैक्षणिक क्षेत्रात आपण तोंड देतो आहे, 00:06:08.000 --> 00:06:10.000 आणि मी येथे तुम्हाला सांगू इच्छिते की, 00:06:10.000 --> 00:06:12.000 ते म्हणजे शिक्षण नव्हेच. 00:06:12.000 --> 00:06:15.000 तुम्ही कधीही चूक करुच नये, 00:06:15.000 --> 00:06:17.000 असे मुलांना सांगणे पूर्णपणे चुकीचे आहे. 00:06:17.000 --> 00:06:20.000 म्हणून त्यांच्याकडून प्रत्येक वेळी बरोबर उत्तराचीच अपेक्षा केली तर 00:06:20.000 --> 00:06:22.000 त्यांना शिकणे शक्यच होणार नाही. 00:06:22.000 --> 00:06:24.000 आम्ही एक प्रकल्प केला, 00:06:24.000 --> 00:06:26.000 आणि त्यातून आलेलीच ही एक कृती आहे 00:06:26.000 --> 00:06:28.000 अपयशाविषयी असलेल्या आपल्या कल्पनांमुळे 00:06:28.000 --> 00:06:30.000 मी जवळजवळ कधीच त्या कृती (कुणासमोर) भाव खाण्याच्या उद्देशाने सादर करत नाही. NOTE Paragraph 00:06:30.000 --> 00:06:32.000 तेलगळतीवर आधारित हा प्रकल्प 00:06:32.000 --> 00:06:35.000 आम्ही वर्ष अखेरीस करायचा असे ठरवले होते 00:06:35.000 --> 00:06:37.000 त्यातूनच माझ्या विद्यार्थ्यांनी ही माहितीचित्रे तयार केली. 00:06:37.000 --> 00:06:40.000 मी त्यांना सांगितले विविध सार्वजनिक माध्यमांमध्ये अस्तित्वात असलेली 00:06:40.000 --> 00:06:42.000 जी अनेक माहितीचित्रे आहेत 00:06:42.000 --> 00:06:44.000 ती उदाहरण म्हणून घ्या, 00:06:44.000 --> 00:06:47.000 त्यातील महत्त्वाच्या भागांचे निरीक्षण करा, 00:06:47.000 --> 00:06:49.000 आणि अमेरिकेच्या इतिहासातील इतर 00:06:49.000 --> 00:06:51.000 मनुष्यकृत दुर्घटनांची तशीच माहितीचित्रे स्वतः बनवा. 00:06:51.000 --> 00:06:53.000 आणि त्यांना काही विशिष्ट नियमांनुसार ते करायचे होते. 00:06:53.000 --> 00:06:55.000 ते सुरुवातीला याबद्दल थोडे अस्वस्थ होते, 00:06:55.000 --> 00:06:57.000 कारण आम्ही असे पुर्वी कधीच केले नव्हते, आणि हे व्यवस्थित कसे करायचे ते त्यांना माहिती नव्हते. 00:06:57.000 --> 00:06:59.000 त्यांना बोलता येते -- एकदम सफाईदारपणे, 00:06:59.000 --> 00:07:01.000 आणि ते अत्यंत उत्कृष्ट लिहूही शकतात, 00:07:01.000 --> 00:07:04.000 पण त्यांना त्यांच्या कल्पना वेगळ्या पद्धतीने सादर करायला सांगितल्यावर 00:07:04.000 --> 00:07:07.000 थोडे त्रासदायक वाटले. 00:07:07.000 --> 00:07:10.000 पण मी त्यांना काहीतरी करून ते करण्याची मोकळीक दिली. 00:07:10.000 --> 00:07:12.000 जा समजावून घ्या. जा तयार करा. 00:07:12.000 --> 00:07:14.000 पाहूया आपल्याला काय करता येते ते. 00:07:14.000 --> 00:07:16.000 आणि नेहेमी चांगली चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्याने 00:07:16.000 --> 00:07:19.000 यावेळीही निराशा केली नाही. 00:07:19.000 --> 00:07:21.000 हे दोन-तीन दिवसात केले होते. 00:07:21.000 --> 00:07:24.000 आणि ही कृती होती अशा विद्यार्थ्याची जो नेहमी असे करायचा. NOTE Paragraph 00:07:24.000 --> 00:07:27.000 आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांना बसवले आणि म्हटले, "सगळ्यात चांगले कुणाचे आहे?" 00:07:27.000 --> 00:07:29.000 आणि ते लगेचच म्हणाले, "ते पाहा तेथे." 00:07:29.000 --> 00:07:31.000 काही वाचले नाही आणि म्हणे "ते पाहा तेथे." 00:07:31.000 --> 00:07:33.000 मग मी म्हणाले, "ते सर्वात चांगले का आहे?" 00:07:33.000 --> 00:07:35.000 ते म्हणाले, "अं.., रचना चांगली आहे, आणि त्याने चांगला रंग वापरला आहे 00:07:35.000 --> 00:07:38.000 आणि थोडे ... ". आणि आम्ही मोठ्याने त्यावर चर्चा केली 00:07:38.000 --> 00:07:40.000 मग मी म्हटले, "जा, ते वाचून या." 00:07:40.000 --> 00:07:43.000 मग ते म्हणाले की, "हं, ते तेवढे खास नाही आहे." 00:07:43.000 --> 00:07:45.000 मग आम्ही दुसऱ्या माहितीचित्राकडे गेलो -- 00:07:45.000 --> 00:07:47.000 त्यात चांगलीशी चित्रे नव्हती, पण माहिती मात्र अप्रतिम होती -- 00:07:47.000 --> 00:07:50.000 मग आम्ही या शिक्षणाच्या पद्धतीवर बोलण्यात एक तास घालवला, 00:07:50.000 --> 00:07:52.000 कारण ती पद्धती केलेली गोष्ट सर्वोत्तम आहे का नाही याबद्दलची नव्हती, 00:07:52.000 --> 00:07:54.000 किंवा मी काय करू शकतो वा शकत नाही याबद्दलही नव्हती; 00:07:54.000 --> 00:07:57.000 या पद्धतीनुसार त्यांनी करून पाहायचे होते. 00:07:57.000 --> 00:07:59.000 आणि तसे करताना त्यांना अपयशाला , 00:07:59.000 --> 00:08:01.000 आणि त्यातून शिकायला मुभा होती. 00:08:01.000 --> 00:08:03.000 आणि यावर्षी परत आम्ही याची फेरी घेऊ, 00:08:03.000 --> 00:08:05.000 यावेळी ते मागच्या वेळेपेक्षा चांगले करतील. 00:08:05.000 --> 00:08:07.000 कारण शिक्षणात 00:08:07.000 --> 00:08:10.000 काही प्रमाणात अपयशाची गरज आहे, 00:08:10.000 --> 00:08:12.000 कारण या पद्धतीत 00:08:12.000 --> 00:08:14.000 अपयश हे सूचनात्मक असते. NOTE Paragraph 00:08:14.000 --> 00:08:17.000 येथे टिचकी मारून दाखवण्याजोगी 00:08:17.000 --> 00:08:19.000 लाखो चित्रे आहेत, 00:08:19.000 --> 00:08:22.000 आणि काळजीपूर्वक निवडले -- हे मला आवडलेल्यांपैकी एक -- 00:08:22.000 --> 00:08:24.000 मुले शिकत असतानाचे, 00:08:24.000 --> 00:08:26.000 माहिती मिळविण्यासाठी मुलांना शाळेत यावे लागते 00:08:26.000 --> 00:08:29.000 या कल्पनेला तिलांजली दिल्यानंतरच्या दृश्यात 00:08:29.000 --> 00:08:31.000 शिक्षण कसे असू शकते हे दाखवणारे, 00:08:31.000 --> 00:08:33.000 पण त्या ऐवजी त्यांना माहिती कशी वापरणार हे विचारा. 00:08:33.000 --> 00:08:35.000 त्यांना काही आवडीचे प्रश्न विचारा. 00:08:35.000 --> 00:08:37.000 ते निराश करणार नाहीत. 00:08:37.000 --> 00:08:39.000 त्यांना विविध ठिकाणी जाण्यास सांगा, 00:08:39.000 --> 00:08:41.000 त्यांच्या त्यांना गोष्टी पाहू द्या, 00:08:41.000 --> 00:08:43.000 त्यांना प्रत्यक्षात शिकण्याचा, खेळण्याचा, 00:08:43.000 --> 00:08:46.000 आणि प्रश्न विचारण्याचा अनुभव द्या 00:08:46.000 --> 00:08:48.000 हा माझ्या आवडीचा एक फोटो आहे, 00:08:48.000 --> 00:08:50.000 कारण हा मंगळवारी घेतला होता, 00:08:50.000 --> 00:08:52.000 जेव्हा मी विद्यार्थ्यांना मतदानासाठी जाण्यास सांगितले. 00:08:52.000 --> 00:08:55.000 हा रॉबी आहे, आणि हा त्याचा मतदानाचा पहिला दिवस होता, 00:08:55.000 --> 00:08:57.000 आणि त्याला मतदान सर्वांना सांगून करायचे होते. 00:08:57.000 --> 00:08:59.000 पण हेही शिक्षणच आहे, 00:08:59.000 --> 00:09:02.000 कारण आम्ही त्यांना खऱ्याखुऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले. NOTE Paragraph 00:09:05.000 --> 00:09:07.000 मुख्य मुद्दा 00:09:07.000 --> 00:09:10.000 हा आहे की, जर आपण शिक्षणाकडे असेच पाहत राहिलो की 00:09:10.000 --> 00:09:13.000 ते फक्त शाळेत येवून 00:09:13.000 --> 00:09:15.000 माहिती मिळविणे इतकेच आहे 00:09:15.000 --> 00:09:17.000 आणि ते अनुभवातून शिकणे नव्हे, 00:09:17.000 --> 00:09:20.000 किंवा मुलांच्या आवाजाला ताकद देणे किंवा अपयशाला कवटाळणे नव्हे, 00:09:20.000 --> 00:09:22.000 तर आपण काहीतरी चुकत आहोत. 00:09:22.000 --> 00:09:24.000 आणि हे सगळे सर्वजण आज बोलतायत ते 00:09:24.000 --> 00:09:27.000 अशा शिक्षण पद्धतीत शक्य होणार नाही ज्यात 00:09:27.000 --> 00:09:30.000 या गुणांना किंमत नाही आहे, 00:09:30.000 --> 00:09:32.000 कारण आपण तेथे प्रमाणीकृत चाचणी 00:09:32.000 --> 00:09:34.000 किंवा फक्त एकच बरोबर उत्तराच्या संस्कृतीने पोहचू शकणार नाही. 00:09:34.000 --> 00:09:36.000 आपल्याला माहिती आहे हे अजुन ही चांगले कसे करता येईल, 00:09:36.000 --> 00:09:38.000 आणि ते करण्याची वेळ आता आली आहे. NOTE Paragraph 00:09:38.000 --> 00:09:43.000 (टाळ्या)