[२७ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत जगभरात ८२००० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. २८१० मरण पावले. टेड ने डेव्हिड हेमान यांना यावरील उपायांची माहिती देण्यासाठी बोलाविले आहे.] [काय होईल तुम्हाला जर या रोगाची बाधा झाल्यास?] हा सर्दी प्रमाणे एक सामान्य आजार वाटतो. सर्वसामान्य लोकांकरिता. ज्यांना अगोदरच गंभीर आजार आहेत, आणि जे आरोग्य सेवक आहेत, त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे. सामान्य लोकांहून त्यांना याचा संपर्क जास्त होत असतो. याच वेळी अन्य आजाराने रोग प्रतिकार शक्ती नसते. सामान्य लोकात साधारणपणे या विषाणूंची संख्या --मात्रा या आरोग्यसेवकांहून जे अगोदरच अन्य रोगाने बाधित आहेत, त्यांच्यापेक्षा कमी असते. त्यामुळे तुमचा संसर्ग हा कमी धोक्याचा असू शकतो. वृद्ध व एकावेळी अनेक आजारांनी ग्रस्त असणारे, यांच्याबाबत मात्र धोका असतो. त्यांची इस्पितळात देखरेख केली पाहिजे. [कोणाची अधिक काळजी घेतली पाहिजे?] असे कोणते लोक आहेत? प्रथम काळजी केली पाहिजे विकसनशील देशातील लोकांची आणि ज्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. ज्यांना इस्पितळात जाणे शक्य नाही. अशा विकसनशील देशात याची साथ पसरू शकते. त्या देशातील लोक याचे अधिक बळी पडू शकतात. प्रामुख्याने वृद्ध. जगभरातील वृद्ध यांना नेहमीच धोका असतो. जसे ज्यांना प्राणवायू पुरेसा मिळत नाही. औदयोगिकदृष्ट्या प्रगत देशांत अन्य आजारावर उपचार घेणारे वृद्ध ज्यांना मधुमेह आहे, अशा सर्वाना याचा धोका आहे. सर्वसामान्य लोकांना याचा मोठा धोका नसतो. [सध्याची शरीराची स्थिती कशी धोकादायक ठरते?] प्रथमतः फुफुस विकारावर जसे दमा, श्वसन विकार यावर उपचार घेणारे वृद्ध यांना याचा धोका असतो. ७० वर्षावरील लोक बळी पडतात, कारण त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असते. ती अशी अगोदरच कमी असते, यांना याचा संसर्ग अधिक होतो. जसे चीन मध्ये. अगोदरच इनफ्लूएन्झा पसरलेला असताना त्याच काळात, अन्य जिवाणूंचा संसर्ग असताना न्युमोनिया साथीत न्युमोनिया पसरलेला असताना हा अधिक धोकेदायक असतो. [अद्ययावत माहिती कोठे मिळेल?] The Center for Disease Control in Atlanta यांच्या वेबसाईटवर नियमित स्वरूपात अद्ययावत माहिती मिळेल. तसेच he World Health Organization in Geneva, ही संस्था अनेक बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. त्यांची वेब साईट दररोज अपडेट होत असते आपली जबाबदारी आहे ही माहिती मिळविण्याची व माहिती जाणून घेण्याची. व त्यापासून आपला मार्ग निवडण्याची. जेणेकरून याचा प्रसार होणार नाही. [SARS च्या २००३ च्या उद्रेकात तुमचा पुढाकार होता. त्यावेळेची व आजची कशी तुलना कराल?] सर्व नव्या संसर्ग बाबत असेच घडते. विषाणूंचा हा संसर्ग मानव प्रथमच अनुभवत आहे. या पूर्वी कधी याचा मानवी शरीरात प्रवेश झाला नव्हता. आपल्या शरीरात याचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके नाहीत. आपली रोग प्रतिकार शक्ती परिणामकारक ठरेल की नाही हे सांगता येणार नाही हा विषाणू हा प्रामुख्याने वटवाघुळ व काही प्राण्यात आढळतो. त्याने अचानक मानवी शरीरात प्रवेश केला. आपल्याला याचा काही अनुभव नाही . पण हळूहळू आपण अनेक बाबी शिकल्या आहेत. नक्कीच मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. SARS पेक्षा अधिक. पण मृतांच्या संख्येला जर संसर्ग झालेल्या संख्येने भागले तर काय होईल पहा. SARS मुळे यापेक्षा अधिक आजारी होते. SARS मध्ये गुणोत्तर होते मृत भागिले संसर्गित हे गुणोत्तर होते १० टक्के. आणि कोरोना व्हायरस COVID-19, बाबत ते आहे २ टक्के किंबहुना त्याहून कमी. म्हणजे त्याचा प्रसार तुलनेने कमी आहे. पण तरीही तो विषाणू मृत्यूदायी आहे. म्हणूनच त्यास आपण शरीरात प्रवेश करू न देणे महत्वाचे आहे [विमानतळावर व सीमेवर पुरेशी काळजी घेतली जाते का?] आता कळून चुकले आहे की विमानतळ व सीमा या या रोगास अटकाव करण्यास समर्थ नाहीत. रोगाच्या आधी शयन काळातील व्यक्ती सीमा रेषा ओलांडून येऊ शकते. आणि ते येथे आल्यावर रुग्ण बनून इतरांना संसर्गित करू शकतात. सीमारेषेवर आपण येणाऱ्यांचे तापमान पहातो. पण त्याने अटकाव होत नाही. सीमा महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या संसर्गित व्यक्तींना लिखित व शाब्दिक स्वरुपात माहिती दिली पाहिजे. या संसर्गाची लक्षणे कोणती, आणि ते काय करू शकतील याची बाधा झाल्यावर. [प्रतिबंधक लस कधी तयार होईल?] प्रतिबंधक लस तयार होत आहे. त्यावर बरेच संशोधन चालू आहे. प्रथम लस विकसित केली जाईल. प्राण्यावर परीक्षा केली जाईल. ती किती सुरक्षित व परिणामकारक आहे तपासले जाईल. लस टोचल्यावर विषाणूंचा प्राण्यावरील संसर्ग होतो का, हे पाहिले जाईल. नंतरच ती माणसांवर वापरली जाईल. प्राण्यांवरील अभ्यास अजून सुरु झाला नाही. पण लवकरच सुरु होईल. असे वाटते की वर्षाच्या शेवटी, किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीस काही प्रायोगिक लसी मिळू लागतील. शासकीय संस्था त्या लसींचे संशोधन करून परवाने देण्याबाबतीत निर्णय घेतील. म्हणजे साधारण एका वर्षानंतर लोकांच्या वापरासाठी लस उपलब्ध होईल. [या उद्रेकाबद्दल अद्याप कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत?] याचे संक्रमण कसे होते हे समजले आहे. पण हा विषाणू सहजतेने समाजात व उघड्या जागी मानवी शरीरात कसा प्रवेश करतो माहित नाही. आपण जाणतो, की बंदिस्त जहाजात तो सहज पसरतो. अधिक माहिती मिळविणे आवश्यक आहे, की तो उघड्यावर कसा पसरतो? आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कसा पसरतो? [जागतिक प्रतिसाद कसा मिळत आहे?] जगापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे या उद्रेकाचा अविकसित देशात होणारा प्रसार कसा थांबविता येईल. जेव्हा एबोलाचा उद्रेक झाला तेव्हा आम्ही विचार केला या देशात कसा थांबविता येईल. आपण त्या देशाला मदत करून, त्याची क्षमता कशी वाढवावी हे पहात नाही. तसे केल्याने ते अटकाव करू शकतील. यावर आपण अद्याप गुंतवणूक केली नाही. अविकसित देशांना पुरेशी मदत केली नाही. जागतिक स्तरावरील काही यंत्रणा उभारण्यास आम्ही मदत केली आहे, ज्यामुळे काही देशांना मदत मिळेल. त्यामुळे त्यांना मदत होईल. आपण असे जग उभारले पाहिजे, की त्यातील प्रत्येक देश स्वतः यास अटकाव घालू शकेल. [भविष्य काळात याचा अधिक प्रसार होईल का?] जगाची लोकसंख्या ७०० कोटी च्या वर आहे. आणखी वाढल्यास अधिक अन्न लागेल. जगभरातील लोकांच्या अनेक गरजा आहेत. ते जवळ जवळ रहातात. शहरी भागात जवळ जवळ रहातात. प्राण्यांची संख्या वाढतच आहे. ते प्राणी माणसाला अन्न पुरवीत आहेत. आपण पहातो, मानव व प्राणी एकमेकांजवळ येत आहेत. प्राण्यांची ही उपज, मानवी वाढती लोकसंख्या, जवळ जवळ रहातात या ग्रहावर हा या उद्रेकाचा परमोच्च बिंदू आहे. आणि असे अनेक उद्रेक भविष्यात घडू शकतील. आजचे उभे राहिलेले संकट ही पूर्वसूचना आहे. पुढील भविष्याची ती चाहूल आहे. आपण ठरविले पाहिजे जगभरातील देशांनी तांत्रिक सहकार्य एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे. या उद्रेकाचा एकत्र अभ्यास केला पाहिजे उपाय शोधला पाहिजे, आणि आवश्यक माहिती पुरविली पाहिजे. [या उद्रेकाचा जोर ओसरला आहे का?] मी अचूक सांगू शकणार नाही. फक्त सांगतो,आपण तयार राहिले पाहिजे, वाईट घडेल असे गृहीत धरून. त्याच वेळी : आपण आपल्याला व इतरांना कसे सुरक्षित ठेऊन साथीला अटकाव करू शकू हे शिकले पाहिजे. [अधिक माहिती साठी Centers for Disease Control and Prevention] [World Health Organization]