आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात, ती आपण शिकणार आहोत, तिला इव्हेंट्स म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही उदाहरणं द्यायची तर, माऊस क्लिक, अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं. इथे आपण स्पेस बॉटवर प्लेयरनं क्लिक केलं की त्याला पृथ्वीवासियांना अभिवादन करायला लावू. आपण "when clicked" ब्लॉक वापरू आणि त्याला "say" ब्लॉक जोडू. जेव्हा प्लेयर स्पेस बॉटवर क्लिक करेल तेव्हा, या "when clicked" इव्हेंट ब्लॉकला जोडलेलं सगळं काही केलं जाईल. तुमचा परग्रहवासी काय म्हणतोय? इथं "when arrow" ब्लॉक्ससुद्धा आहेत. जर तुम्ही "move" ब्लॉक्स त्याला जोडलेत, तर तुम्ही या कलाकारांना वर, खाली, डावीकडं, उजवीकडं हलवू शकता. हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय. माझ्यासाठी, गेम कंपनी सुरू करण्याचं एक कारण मला गेम्स तयार करायचे होते, हे होतं. लोकांना आवडेल, खेळता येईल आणि मजा करता येईल असं काहीतरी मला तयार करायचं होतं ज्या मुलांना काहीतरी करायचंय आणि संगणक शास्त्र शिकायचंय त्यांना माझा सल्ला आहे, काहीतरी सुरू करा. खेळून बघा. आणि तुम्हाला थोडंसं असुरक्षित वाटेल किंवा भीती वाटेल, पण ते ठीक आहे. थोडासा जास्त अनुभव असलेला मित्र/मैत्रिण शोधा. व्हिडीओ ट्युटोरीयल्स बघा. त्यात उडी घ्या आणि काहीतरी तयार करायचा प्रयत्न करा. "हे फारच साधं दिसतंय का?" असं वाटलं तरी. किंवा ते पाहून तुम्हाला वाटलं "मी हे तर कुठंही जाऊन खेळू शकतो." तरीही. आपल्या स्वत:च्या विचारातून ठरवलेलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायची कृती हा अतिशय मजेशीर अनुभव आहे. मी लोकांना आधी काहीतरी करायला प्रोत्साहन देतो. तेच सर्वांत महत्त्वाचं आहे.