आरोग्याबाबत अमेरिकेत वाटणारी भीती कोणती ? कॅन्सर ,मधुमेह ,ह्र्दय रोग ? नाही , यांतील कोणतीही नाही. अमेरिकनांना भीती आहे अल्झायमरची दर ६७ सेकंदात एकास अल्झायमर आढळतो. २०५० साली ही संख्या तिप्पट होइल. या रोगाला बळी पडणाऱ्यांची काळजी घेणं एक खडतर सामाजिक आव्हान आहे. माझ्या कुटुंबाने हे भोगले आहे. घरातील अल्झायमरच्या रुग्णाची काळजी घेतांना माझे आजोबा तीन पिढ्या आमच्या सोबत होते. मी त्यांना जवळचा होतो. मी चार वर्षाचा असतांना, आजोबांबरोबर बागेत फिरत असतांना अचानक ते हरवले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक अनुभव आहे. या प्रसंगाने प्रथमच कळले, माझ्या आजोबांना अलझायमर आहे गत १२ वर्षे स्थिती अधिकाधिक वाईट होतेय. त्यांच्या फिरण्याची आम्हा सर्वांना धास्ती वाटते. माझी आत्या जी त्यांची काळजी घेई लक्ष ठेवण्यासाठी रात्री जागायची. बऱ्याचवेळा तिची नजर चुकवून ते बाहेर जायचे. मला आत्याच्या प्रकृतीची काळजी वाटे. तशीच आजोबांच्या सुरक्षिततेचीही. या समस्येतून मार्ग निघाला नाही खूप प्रयत्न करूनही. दोन वर्षापूर्वी एका रात्री मी आजोबांना पलंगावरून उतरताना पहिले. त्यांचा पाय जमिनीवर पडला आणि मला कल्पना सुचली जेव्हा ते जमिनीवर पाय ठेवतात त्यांच्या टाचेला दाबदर्शक संवेदक का बसवू नये? जो पायाच्या वजनामुळे कार्यान्वित होऊन स्मार्ट फोनवर सूचना देईल आणि त्यामुळे आत्याला काही काळ झोपता येईल आजोबांच्या भ्रमणाची कमी काळजी करून. मी या प्रणालीचे कामकाज दाखवू इच्छितो. कृपया माझे उपकरण मंचावर ठेवा. छान जेव्हा रुग्ण जमिनीवर पाय ठेवतो (घंटी वाजते) तेव्हा हा संदेश काळजी घेणाऱ्याच्या स्मार्ट फोनवर वाजतो. (टाळ्या) आभारी आहे. या साधनाचा पण हे माझे प्राथमिक साधन आहे असे तंत्रज्ञान वृद्धिंगत करण्याचा माझा इरादा आहे हे कदाचित या तंत्रज्ञांनाची मला असलेल्या ओढीमुळे. मी सहा वर्षाचा असतांना माझ्या कुटुंबाचा एक वयस्कर मित्र स्नानगृहात पडला. तो खूप जायबंदी झाला. या घटनेमुळे मला आजी आजोबांची काळजी वाटली. स्नानगृहासाठी अशी सूचक प्रणाली शोधण्याचे ठरवले. यासाठी स्नानगृहात फरशीवर गतीदर्शक संवेदके बसवता येतील. स्नानगृहात कोणी पडल्यास कळावे यासाठी त्यावेळी मी सहा वर्षाचा होतो. बालर्गातून बाहेर ही पडलो नव्हतो. माझी कल्पना अमलात आणण्यासाठी योग्य साधने नव्हती. माझ्या शोधवृत्तीने अशी प्रणाली शोधण्यास मदत केली. संवेदके वापरून वृद्धांना मदत करणारी अशी यंत्रणा वृद्धांना सुराशित ठेवेल कामाच्या सुरवातीस मला तीन आव्हाने पेलावी लागली प्रथम असे संवेदक तयार करणे त्यासाठी विद्युत परिपथ मांडणे स्मार्ट फोनवर चालणारी प्रणाली करणे. मला वाटत होते त्यापेक्षा ही हे कठीण होते प्रथम अंगावर घालता येईल असे पातळ लवचिक संवेदक बनविणे . जे रुग्णाला त्याच्या पायात घालणे सोयीचे वाटेल रबरा सारखे निरनिराळे पदार्थ वापरून कळले हे पायात घालणे सोयीस्कर नाही. मी ठरविले, संवेदक फिल्मवर छापावे दाब दर्शक शाई विद्युतप्रवाह वाहून नेणारी असेल ज्यामुळे त्यावर दाब पडल्यावर विद्युत प्रवाह कार्यरत होईल त्या करिता दाब मोजणारा विद्युत परिपथ मला बनवावा लागेल जो मला विद्युत रोध मोजून समजेल . मला अंगावर घालता यईल असा बिनतारी परिपथ करावा लागेल बिनतारी यंत्रणेस खूप उर्जा लागते त्यासाठी मोठा विद्युतघट वापरावा लागेल या तंत्राचा मी आभारी आहे ही प्रणाली नाण्याच्या आकाराच्या सेल व कमी उर्जेवर चालते सतत रात्रीही चालते मी स्मार्ट फोनवर काम करणारे साधन केले जे संदेश देई काळजी घेणाऱ्याच्या मोबाईल फोनवर त्यासाठी मला जावा व कोडींग शिकावे लागले. ब्लूटूथ कोडिंग चे ज्ञान मिळविले. जे मी युटूब व पुस्तकातून शिकलो. त्यातूनच मी दोन प्रारंभीची उपकरणे बनविली. एकात पायाच्या मोजात हे उपकरण कायम बसविले होते दुसरे काढून पुन्हा लावता येई कोठे ही जे रुग्णाच्या संपर्कात असे रुग्णाच्या पायाशी. मी हे आजोबांसाठी वर्षभरापासून वापरतो. हे शंभर टक्के यशस्वी आहे. मी ९०० वेळा हे वापरले यशस्वीपणे गेल्या उन्हाळ्यात मला संधी मिळाली परीक्षणाची कालीफोर्नियातल्या वृद्धाश्रमात. मी या सर्वांचा प्रतिसाद घेत आहे ज्यायोगे सुधारित साधन बाजारात येईल अनेक रुग्णांवर याचा वापर केल्यावर मला कळले यात सुधारणा हवी अस अश्यांसाठी रात्री ज्यांना मोजे घालून झोपायचे नसते मला याचा प्रतिसाद सूचना मिळत आहे. बाजारात सुधारित उत्पादन करण्यासाठी. या आजारावर उपाय शोधत आहे मी सध्या परीक्षण करीत आहे रुग्णाच्या रात्र भ्रमण संख्येचा व दिवस कार्य व आहाराचा काय संबंध आहे. मी तो दिवस विसरणार नाही ज्यादिवशी आजोबाना साधनाने प्रथम पकडले प्रथमताच मला या तंत्राची शक्ती जाणवली जीवन जगणे सुखकर कसे करता येईल लोक आरोग्यदायी कसे जगू शकतील अशा जगाचे मी स्वप्न पाहत आहे मी खूप आभारी आहे (टाळ्या)