फारच छान काम केलेत,
आम्हाला कळले की स्क्रीनवर
जेवढे जास्त राक्षस असतील,
व्हायरस तेवढा लवकर पसरतो.
आम्हाला हे सुद्धा कळले की
जेव्हा राक्षसांनी मास्क लावलेला असतो,
तेव्हा पसरण्याचा धोका कमी होतो.
आणि आपण पाहिले की व्हायरसचे पसरणे
सर्वात लवकर थांबवण्याचा मार्ग
म्हणजे सर्व राक्षसांना लस लावणे आहे.
तुमचे सिम्युलेशन चालत असताना
या "print" ब्लॉकने
स्क्रीनवर अक्षरे दिसतात.
व्हायरस शहरात आलेला असताना
सर्व राक्षसांना बरे ठेवण्यासाठी
एखादा सल्ला देण्यासाठी याचा वापर करा.
"शेअर करा" बटणावर क्लिक करून
तुमचे काम तुमच्या कुटुंबीयांसोबत
आणि मित्रांसोबत शेअर करू शकता.
आत्ताच तुम्ही कॉम्प्युटर सायंस वापरून
तुमचे सार्वजनिक आरोग्याचे सिम्युलेशन
तयार केले आहे.
तुम्हाला हे आवडले असेल आणि तुम्ही
पुढे काय करता त्याची मला फार उत्सुकता आहे.