WEBVTT 00:00:00.860 --> 00:00:05.176 आपल्या गृहितकानुसार गोष्टी घडत नाहीत तेव्हा काय म्हणाल? 00:00:05.176 --> 00:00:07.976 खरेतर ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं द्याल 00:00:08.000 --> 00:00:11.976 जेव्हा सर्व गृहीतकांना झुगारुन काहीजण यश संपादन करु शकतात? 00:00:12.000 --> 00:00:13.976 उदाहरणार्थ: 00:00:14.000 --> 00:00:15.976 ऍपल हि कंपनी एवढी नाविन्यपूर्ण का आहे? 00:00:16.000 --> 00:00:17.976 वर्षानुवर्षे, 00:00:18.000 --> 00:00:20.976 तिच्या सर्व स्पर्धकांपेक्षा ती अधिक नाविन्यपूर्ण आहे. 00:00:21.000 --> 00:00:23.216 आणि तरीसुद्धा ती एक संगणक बनवणारी कंपनी आहे. 00:00:23.216 --> 00:00:24.976 ती इतर सगळ्यांसारखीच आहे. 00:00:25.000 --> 00:00:27.044 तिच्याकडेही तीच प्रतिभा उपलब्ध आहे, 00:00:27.044 --> 00:00:28.675 त्याच सहकारी कंपन्या आहेत, 00:00:28.675 --> 00:00:30.525 तेच सल्लागार, तीच माध्यमं आहेत. 00:00:30.525 --> 00:00:33.579 तरीसुद्धा तिच्याकडे काहीतरी वेगळं आहे असं का वाटतं? 00:00:35.000 --> 00:00:38.976 मार्टिन ल्युथर किंग यांनी नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व का केलं? 00:00:39.000 --> 00:00:42.976 अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीपूर्वी दुःख सहन केलेले ते एकमेव नव्हते 00:00:43.000 --> 00:00:45.745 आणि त्या काळातील एकमेव महान वक्ता तर नक्कीच नव्हते. 00:00:45.769 --> 00:00:46.976 मग तेच का? 00:00:47.000 --> 00:00:49.976 आणि राईट बंधूंनाच का कळलं 00:00:50.000 --> 00:00:52.976 नियंत्रीत, शक्तीशाली मानवी उड्डाणाबद्दल 00:00:53.000 --> 00:00:55.150 जेव्हा इतरही संघ होते, 00:00:55.174 --> 00:00:58.047 जे अधिक पात्रतेचे होते, ज्यांच्याकडे अधिक पैसा होता -- 00:00:58.071 --> 00:01:00.976 आणि ज्यांना शक्तीशाली मानवी उड्डाण करता आलं नाही, 00:01:01.000 --> 00:01:02.975 आणि राईट बंधूंनी ज्यांना पराभूत केलं. 00:01:02.999 --> 00:01:04.887 हे काहीतरी वेगळं आहे. NOTE Paragraph 00:01:06.125 --> 00:01:09.976 साधारण साडेतीन वर्षांपूर्वी मला एक शोध लागला. 00:01:10.000 --> 00:01:15.976 आणि जग कसं चालतं याबद्दलचे माझे विचार या शोधामुळे पूर्णतः बदलले, 00:01:16.000 --> 00:01:20.000 आणि जगात मी कसा वावरतो यातही खूपच बदल झाला. 00:01:22.000 --> 00:01:24.976 असं लक्षात येतं कि, त्याचा एक नमुना आहे. 00:01:25.000 --> 00:01:28.976 असं लक्षात येतं कि, जगातील सर्व प्रेरणादायी नेते आणि संस्था, 00:01:29.000 --> 00:01:32.015 मग ती एपल असो किंवा मार्टिन ल्युथर किंग किंवा राईट बंधू असोत, 00:01:32.039 --> 00:01:35.976 ते सगळे एकाच पद्धतीने विचार, कृती आणि संवाद करतात. 00:01:36.000 --> 00:01:39.976 आणि ते इतर प्रत्येकापेक्षा पूर्णतः विरुद्ध आहे. 00:01:40.000 --> 00:01:41.976 मी फक्त ते सुसूत्रित केलं, 00:01:42.000 --> 00:01:45.976 आणि कदाचित ती जगातील सर्वांत सोपी कल्पना आहे. 00:01:46.000 --> 00:01:48.000 मी त्याला सुवर्ण वर्तुळ म्हणतो. NOTE Paragraph 00:01:56.296 --> 00:01:58.976 का? कसं? काय? 00:01:59.000 --> 00:02:00.976 या सोप्या कल्पनेवरून कळतं 00:02:01.000 --> 00:02:04.976 कि काही संस्था आणि काही नेते प्रेरित का करू शकतात जे इतरांना जमत नाही. 00:02:05.000 --> 00:02:06.976 मी पटकन संज्ञा सांगतो. 00:02:07.000 --> 00:02:09.976 या ग्रहावरील प्रत्येक माणसाला, प्रत्येक संघटनेला 00:02:10.000 --> 00:02:12.722 ते काय करतात हे माहित आहे, १०० टक्के. 00:02:14.000 --> 00:02:15.976 ते कसं करतात हे काहींना माहित आहे, 00:02:16.000 --> 00:02:18.684 त्याला तुम्ही तुमचं विशिष्ट मूल्य विधान म्हणा 00:02:18.708 --> 00:02:20.976 किंवा मालकी प्रक्रिया किंवा अद्वितीय गुण म्हणा. 00:02:21.000 --> 00:02:25.711 पण अगदी थोड्या लोकांना किंवा संस्थांना कळतं ते जे करतात ते का करतात. 00:02:25.711 --> 00:02:28.486 आणि "का" यावर माझं म्हणणं "नफा कमवण्यासाठी" असं नाही. 00:02:28.486 --> 00:02:30.646 ती निष्पत्ती आहे. ती नेहमी निष्पत्तीच असते. 00:02:30.646 --> 00:02:33.176 "का" म्हणजे मला म्हणायचं आहे: तुमचा उद्देश काय? 00:02:33.176 --> 00:02:35.219 तुमचं निमित्त काय? तुमची कशावर श्रद्धा आहे? 00:02:35.219 --> 00:02:37.976 तुमची संघटना अस्तित्वात का आहे? 00:02:38.000 --> 00:02:40.368 तुम्ही सकाळी बिछान्यातून का उठता? 00:02:40.392 --> 00:02:42.976 आणि कोणाला कशाला काय वाटायला हवं? 00:02:43.000 --> 00:02:45.385 याचा परिणाम, आपली विचारपद्धती, आपली कृती, 00:02:45.385 --> 00:02:48.695 आपली संवादपद्धती बाह्यरंगातून अंतरंगात जाणारी आहे, हे स्वाभाविक आहे. 00:02:48.695 --> 00:02:50.960 आपण सुस्पष्टतेकडून अस्पष्टतेकडे जातो. 00:02:50.960 --> 00:02:53.976 पण प्रेरित नेते आणि प्रेरित संघटना -- 00:02:54.000 --> 00:02:57.595 त्यांचे आकारमान, त्यांचा उद्योग लक्षात न घेता -- 00:02:57.619 --> 00:03:00.745 सर्वजण विचार, कृती आणि संवाद अंतरंगातून बाहेर करतात. NOTE Paragraph 00:03:02.547 --> 00:03:03.976 मी एक उदाहरण देतो. 00:03:04.000 --> 00:03:07.388 मी एपलबद्दल सांगतो कारण ते समजायला सोपं आणि प्रत्येकाला कळू शकतं. 00:03:07.412 --> 00:03:09.983 जर एपल कंपनी इतर प्रत्येकासारखी असती, 00:03:10.007 --> 00:03:13.487 तिचा विपणन संदेश असा असला असता: 00:03:13.511 --> 00:03:14.996 "आम्ही अप्रतिम संगणक बनवतो. 00:03:16.000 --> 00:03:19.976 त्यांची रचना सुंदर आहे, ते वापरायला सोपे आहेत आणि वापरणाऱ्यासाठी सोयीचे आहेत. 00:03:20.000 --> 00:03:21.289 एक घ्यायचा का?" 00:03:22.194 --> 00:03:23.195 "एकदम रटाळ." 00:03:23.219 --> 00:03:24.976 आपल्यातले बरेचजण असाच संवाद साधतात. 00:03:25.000 --> 00:03:27.488 बरंचसं विपणन आणि विक्री अशीच होते, 00:03:27.512 --> 00:03:29.607 आपण एकमेकांशी असाच संवाद साधतो. 00:03:29.631 --> 00:03:31.402 आपण जे करतो ते आपण सांगतो, 00:03:31.426 --> 00:03:33.705 आपण कसे वेगळे आणि अधिक चांगले आहोत ते सांगतो 00:03:33.705 --> 00:03:35.566 आणि आपण कुठल्यातरी कृतीची अपेक्षा करतो, 00:03:35.566 --> 00:03:37.076 खरेदी, मत, तत्सम काहीतरी. 00:03:37.100 --> 00:03:38.766 हि आमची विधी सल्लागार कंपनी आहे: 00:03:38.766 --> 00:03:41.102 आमच्या उत्तम कायदेपंडितांचे मोठमोठे पक्षकार आहेत, 00:03:41.102 --> 00:03:43.278 आम्ही नेहमी आमच्या पक्षकारांसाठी काम करतो. 00:03:43.278 --> 00:03:44.686 हि आमची नवीन गाडी आहे: 00:03:44.686 --> 00:03:48.082 तिची इंधनक्षमता उत्तम आहे, तिच्या आसनांना चामड्याची आवरणं आहेत. 00:03:48.082 --> 00:03:49.375 आमची गाडी विकत घ्या. 00:03:49.375 --> 00:03:50.626 पण ते कंटाळवाणं आहे. NOTE Paragraph 00:03:50.626 --> 00:03:52.547 एपल कंपनी कसा संवाद साधते ते बघा. 00:03:53.000 --> 00:03:56.726 "आम्ही जे करतो त्यामागे सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा आमचा मानस असतो. 00:03:56.726 --> 00:03:59.256 आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करण्यावर विश्वास ठेवतो. 00:03:59.256 --> 00:04:01.765 सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा आमचा मार्ग म्हणजे 00:04:01.765 --> 00:04:05.976 आमच्या उत्पादनांची रचना सुंदर करणे, 00:04:06.000 --> 00:04:07.976 ती वापरायला सोपी आणि सोयीची बनवणे. 00:04:08.000 --> 00:04:10.639 आम्ही उत्तम संगणक बनवतो हा निव्वळ योगायोग आहे. 00:04:10.663 --> 00:04:11.717 एक हवाय का?" 00:04:12.892 --> 00:04:14.195 अगदीच वेगळं, बरोबर? 00:04:14.219 --> 00:04:16.466 तुम्ही माझ्याकडून संगणक खरेदी करायला तयार आहात. 00:04:16.466 --> 00:04:18.398 मी माहितीची क्रमवारी फक्त उलटी केली. 00:04:18.422 --> 00:04:22.294 यावरून आपल्याला काय सिद्ध होतं कि लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; 00:04:22.318 --> 00:04:24.723 लोक तुम्ही ते करता हे खरेदी करतात. NOTE Paragraph 00:04:24.747 --> 00:04:28.976 यावरून हे स्पष्ट होतं कि या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती 00:04:29.000 --> 00:04:31.976 एपलकडून संगणक किती आरामात घेऊ शकते. 00:04:32.000 --> 00:04:33.976 पण आपण अगदी आरामात 00:04:34.000 --> 00:04:36.976 एपलचा MP3 प्लेयर किंवा एपलचा फोन, 00:04:37.000 --> 00:04:38.611 किंवा एपलचा DVR घेऊ शकतो. 00:04:38.611 --> 00:04:41.848 मी आधी म्हणल्याप्रामणे, एपल हि एक फक्त संगणक बनवणारी कंपनी आहे. 00:04:41.848 --> 00:04:45.386 संरचनेनुसार त्यांच्यात आणि त्यांच्या स्पर्धकांमध्ये काहीही फरक नाही. 00:04:45.386 --> 00:04:48.628 त्यांचे स्पर्धकही हि सगळी उत्पादनं बनवण्यासाठी तेवढेच पात्र आहेत. 00:04:48.628 --> 00:04:50.316 वस्तुस्थितीत, त्यांनी प्रयत्न केला. 00:04:50.316 --> 00:04:53.456 काही वर्षांपूर्वी, गेटवे कंपनीने सपाट पडद्याचे टिव्ही आणले. 00:04:53.456 --> 00:04:56.509 सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच बनवण्यास ते पूर्णतः पात्र आहेत. 00:04:56.509 --> 00:04:59.496 अनेक वर्षांपासून ते सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच बनवताहेत. 00:04:59.496 --> 00:05:01.353 कुणीच एकही संच विकत घेतला नाही. 00:05:02.657 --> 00:05:07.976 डेल कंपनीने MP3 प्लेयर आणि PDA आणले, 00:05:08.000 --> 00:05:09.976 आणि ते उत्तम प्रतीची उत्पादनं बनवतात, 00:05:10.000 --> 00:05:12.976 आणि ते अगदी योग्य रचना असलेली उत्पादनं बनवतात -- 00:05:13.000 --> 00:05:14.800 आणि कुणीच एकही उत्पादन घेतलं नाही. 00:05:14.824 --> 00:05:17.706 वस्तुस्थितीत, त्याविषयी बोलताना, आपण कल्पनाही करू शकत नाही 00:05:17.706 --> 00:05:19.428 डेलचा MP3 प्लेयर विकत घेण्याचा. 00:05:19.428 --> 00:05:22.276 एका संगणक बनवणाऱ्या कंपनीकडून तुम्ही तो का विकत घ्याल? 00:05:22.276 --> 00:05:24.317 पण आपण रोज खरेदी करतो. 00:05:24.317 --> 00:05:27.802 लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; ते तुम्ही का करता याला मोल देतात. 00:05:27.802 --> 00:05:31.521 तुमच्याकडे जे आहे त्याची गरज ज्याला आहे त्यासोबत व्यवसाय करणे हे लक्ष्य नाही. 00:05:31.521 --> 00:05:36.428 तुम्ही जे मानता त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांबरोबर व्यवसाय करणे हे लक्ष्य आहे. NOTE Paragraph 00:05:36.428 --> 00:05:37.627 हे उत्तम आहे कि: 00:05:37.651 --> 00:05:40.526 मी जे काही तुम्हांला सांगतो आहे ते माझं वैयक्तिक मत नाही. 00:05:40.526 --> 00:05:42.976 त्याचं मूळ जीवशास्त्रीय तत्त्वांमध्ये आहे. 00:05:43.000 --> 00:05:44.976 मानसशास्र नव्हे, जीवशास्त्र. 00:05:45.000 --> 00:05:47.739 मानवी मेंदूला जर आडवा छेद देऊन तुम्ही बघितलंत, 00:05:47.763 --> 00:05:50.396 वरपासून खाली, मानवी मेंदू खरंतर भंगलेला आहे 00:05:50.420 --> 00:05:51.976 तीन मुख्य घटकांमध्ये 00:05:52.000 --> 00:05:54.976 ज्याचा सुयोग्य संबंध सुवर्ण वर्तुळाशी आहे. 00:05:55.000 --> 00:05:57.976 आपला नवीनतम मेंदू, मानवी मेंदू, 00:05:58.000 --> 00:05:59.976 आपल्या मोठ्या मेंदूचा बाहेरील थर, 00:06:00.000 --> 00:06:01.976 "काय" या पातळीशी संबंधीत आहे. 00:06:02.000 --> 00:06:03.976 मोठया मेंदूचा बाहेरील थर जबाबदार असतो 00:06:04.000 --> 00:06:07.976 तो तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार आणि बोलीसाठी. 00:06:08.000 --> 00:06:10.976 मधले दोन भाग हे लिंबिक मेंदूचे असतात, 00:06:11.000 --> 00:06:14.746 आणि आपले लिंबिक मेंदू जबाबदार असतात ते आपल्या सगळ्या भावनांसाठी, 00:06:14.746 --> 00:06:16.976 जसा विश्वास आणि निष्ठा. 00:06:17.000 --> 00:06:19.143 मानवी वर्तनालादेखील तोच कारणीभूत असतो, 00:06:19.167 --> 00:06:20.976 सर्व निर्णय घेणे, 00:06:21.000 --> 00:06:23.976 आणि भाषेसाठी त्याची क्षमता नसते. NOTE Paragraph 00:06:24.000 --> 00:06:27.636 दुसऱ्या शब्दांत, जेव्हा आपण बाह्यरंगातून अंतरंगाशी संवाद साधतो, 00:06:27.636 --> 00:06:30.143 लोकांना पुष्कळश्या अवघड माहितीचे आकलन होते 00:06:30.167 --> 00:06:32.976 जसं कि वैशिष्ट्ये आणि फायदे आणि तथ्य आणि आकडे. 00:06:33.000 --> 00:06:34.976 त्याच्याने वर्तन ठरत नाही. 00:06:35.000 --> 00:06:37.096 जेव्हा आपण अंतरंगातून बाहेर संवाद साधू शकतो, 00:06:37.120 --> 00:06:39.359 आपण मेंदूच्या त्या भागाशी बोलत असतो जो 00:06:39.383 --> 00:06:40.976 वर्तन नियंत्रित करतो, 00:06:41.000 --> 00:06:44.976 आणि मग आपल्या उक्ती आणि कृतीच्या मूर्त गोष्टींनी लोकांना युक्तीवाद करू देतो. 00:06:45.000 --> 00:06:47.550 ह्याच जागेतून महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. 00:06:47.574 --> 00:06:50.976 कधीकधी तुम्ही कोणालातरी सर्व सत्य आणि आकडेमोड सांगू शकता, 00:06:51.000 --> 00:06:53.722 आणि ते म्हणतात, "मला ते सगळं माहीत आहे, 00:06:53.746 --> 00:06:55.276 पण ते योग्य वाटत नाही" 00:06:55.300 --> 00:06:57.840 आपण योग्य "वाटत" नाही असं क्रियापद का वापरतो? 00:06:57.864 --> 00:07:00.639 कारण मेंदूचा जो भाग निर्णय प्रक्रिया नियंत्रित करतो 00:07:00.663 --> 00:07:01.976 तो भाषा नियंत्रित करत नाही. 00:07:02.000 --> 00:07:03.461 आपण म्हणू शकतो कि, 00:07:03.485 --> 00:07:05.538 "मला माहीत नाही. हे काही योग्य वाटत नाही" 00:07:05.562 --> 00:07:08.976 किंवा तुम्ही कधी म्हणता तुम्ही तुमच्या मनाचं किंवा आत्म्याचं ऐकत आहात. 00:07:09.000 --> 00:07:11.672 हे सांगणारा पहिला मी नाही कि ते शरीराचे वेगळे अवयव नाहीत 00:07:11.696 --> 00:07:12.976 वर्तन नियंत्रित करणारे. 00:07:13.000 --> 00:07:15.143 हे सगळं इथे घडतं, तुमच्या लिंबिक मेंदूमध्ये, 00:07:15.167 --> 00:07:18.453 मेंदूचा तो भाग जो निर्णय प्रक्रिया नियंत्रित करतो भाषा नव्हे. NOTE Paragraph 00:07:18.477 --> 00:07:20.976 पण तुम्हाला जर माहित नसेल तुम्ही जे करता ते का करता, 00:07:21.000 --> 00:07:23.976 आणि लोक जर तुम्ही जे करता ते का करता याला प्रतिसाद देत असतील, 00:07:24.000 --> 00:07:26.976 तर मग लोकांना प्रवृत्त कसं कराल 00:07:27.000 --> 00:07:29.048 मत देण्यासाठी किंवा काही विकत घेण्यासाठी, 00:07:29.072 --> 00:07:30.976 किंवा महत्त्वाचं म्हणजे इमानी राहण्यासाठी 00:07:31.000 --> 00:07:33.976 आणि तुम्ही जे करता याचा एक भाग होण्यासाठी. 00:07:34.000 --> 00:07:37.050 ज्या लोकांना तुमच्याकडे असलेलं विकणं हे लक्ष्य नाही; लक्ष्य आहे 00:07:37.074 --> 00:07:39.976 त्यांना विकणं जे तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या गोष्टी मानतात 00:07:40.000 --> 00:07:43.976 ज्या लोकांना नोकरीची गरज आहे त्यांना कामावर ठेवणं हे लक्ष्य नाही; 00:07:44.000 --> 00:07:46.976 ते आहे त्या लोकांच्या नोकरीचं जे तुमच्यासारखा विश्वास ठेवतात 00:07:47.000 --> 00:07:49.120 मी नेहमी म्हणतो, असं बघा कि, 00:07:49.144 --> 00:07:54.976 एखादं काम करू शकतात म्हणून तुम्ही लोकांना कामावर ठेवलं, तर ते पैशासाठी काम करतील, 00:07:55.000 --> 00:07:56.791 पण त्यांचा विश्वास संलग्न असेल 00:07:56.815 --> 00:07:59.250 तर ते जीव ओतून, घाम गाळून आणि अश्रु ढाळून काम करतील. 00:07:59.274 --> 00:08:02.976 राईट बंधुंसारखं दुसरं उत्तम उदाहरण नाही. NOTE Paragraph 00:08:03.000 --> 00:08:06.614 बऱ्याच लोकांना सॅम्युएल पियरपॉईंट लँगले माहित नाहीत. 00:08:06.638 --> 00:08:08.976 आणि मागे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, 00:08:09.000 --> 00:08:12.143 शक्तिशाली मानवी उड्डाणाचा पाठपुरावा आजच्या डॉट कॉम सारखा होता. 00:08:12.167 --> 00:08:13.976 प्रत्येकजण त्याचा प्रयत्न करत होता. 00:08:14.000 --> 00:08:16.976 आणि सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेकडे, आपण जो मानतो, 00:08:17.000 --> 00:08:19.673 तो यशाचा मंत्र होता. 00:08:19.697 --> 00:08:21.396 आतासुद्धा, तुम्ही लोकांना विचारा, 00:08:21.420 --> 00:08:24.039 "तुमचं उत्पादन किंवा तुमची कंपनी अपयशी का ठरली?" 00:08:24.063 --> 00:08:26.324 आणि लोक तुम्हांला नेहमी तेच संयोजन सांगतील 00:08:26.348 --> 00:08:27.769 त्याच तीन गोष्टींचं: 00:08:27.793 --> 00:08:30.770 अपुरं भांडवल, अयोग्य लोक आणि बाजाराची खराब परिस्थिती. 00:08:30.794 --> 00:08:33.605 नेहमी याच तीन गोष्टी असतात, बघू या कसं काय ते. 00:08:34.422 --> 00:08:35.976 सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेला 00:08:36.000 --> 00:08:38.976 युद्ध विभागाकडून ५०,००० डॉलर दिले गेले होते 00:08:39.000 --> 00:08:40.976 हे उडणारं यंत्र काय आहे ते बघण्यासाठी. 00:08:41.000 --> 00:08:42.571 प्रश्न भांडवलाचा नव्हता. 00:08:42.595 --> 00:08:44.976 त्यांचा हार्वर्डशी संबंध होता, 00:08:45.000 --> 00:08:48.000 आणि स्मिथसोनियन संस्थेत काम केलं होतं, लोकांशी उत्तम संबंध होता; 00:08:48.024 --> 00:08:49.976 त्या काळातील मोठे लोक त्यांना ठाऊक होते. 00:08:50.000 --> 00:08:53.976 पैशांसाठी काम करणारे उत्तम बुद्धिमत्तेचे लोक त्यांनी कामावर ठेवले होते 00:08:54.000 --> 00:08:55.976 आणि बाजारही तेजीत होता. 00:08:56.000 --> 00:08:58.976 द न्यु यॉर्क टाईम्स त्यांना सगळीकडे प्रसिद्धी देत होता, 00:08:59.000 --> 00:09:00.976 व प्रत्येकजण लँगलेंना प्रोत्साहन देत होता. 00:09:01.000 --> 00:09:03.988 तरीही सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेबद्दल आपण कधीही कसंच ऐकलं नाही? NOTE Paragraph 00:09:04.485 --> 00:09:06.626 काहीशे मैलांवर डेटन ओहायोमध्ये, 00:09:07.579 --> 00:09:08.976 ऑर्विल आणि विल्बर राईट, 00:09:09.000 --> 00:09:12.976 यांच्याकडे आपण समजत असलेला यशाचा मंत्र वैगैरे काही नव्हतं. 00:09:13.000 --> 00:09:14.976 त्यांच्याकडे भांडवल नव्हतं; 00:09:15.000 --> 00:09:18.239 सायकलच्या दुकानातील कमाई त्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वापरली; 00:09:18.263 --> 00:09:20.549 राईट बंधुंच्या संघातील एकही व्यक्ती, 00:09:20.573 --> 00:09:21.976 महाविद्यालयात शिकलेला नव्हता, 00:09:22.000 --> 00:09:23.976 ऑर्विल आणि विल्बरसुद्धा; 00:09:24.000 --> 00:09:26.976 द न्यु यॉर्क टाईम्सने त्यांचा कुठेही पाठपुरावा केलेला नव्हता. NOTE Paragraph 00:09:27.000 --> 00:09:28.976 फरक हा होता, 00:09:29.000 --> 00:09:32.976 ऑर्विल आणि विल्बर एका ध्येयाने, उद्देशाने, विश्वासाने प्रेरीत होते. 00:09:33.000 --> 00:09:36.976 त्यांचा असा विश्वास होता कि त्यांना जर या उडत्या यंत्राची उकल झाली, 00:09:37.000 --> 00:09:38.797 तर जगाची दिशाच बदलेल. 00:09:40.384 --> 00:09:42.333 सॅम्युएल पियरपॉईंट लँगले वेगळे होते. 00:09:42.357 --> 00:09:44.976 त्यांना श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचं होतं. 00:09:45.000 --> 00:09:46.976 ते फळाचा पाठपुरावा करत होते. 00:09:47.000 --> 00:09:48.976 ते श्रीमंतीचा पाठपुरावा करत होते. 00:09:49.000 --> 00:09:50.954 आणि पहा काय घडलं ते. 00:09:50.978 --> 00:09:54.524 जे लोक राईट बंधुंच्या स्वप्नावर विश्वास ठेवणारे होते 00:09:54.548 --> 00:09:56.976 त्यांनी त्यांच्यासोबत जीव ओतून काम केलं. 00:09:57.000 --> 00:09:58.976 इतरांनी फक्त पगारासाठी काम केलं. 00:09:59.000 --> 00:10:02.195 ते वर्णनं सांगतात कि राईट बंधू दरवेळी बाहेर पडताना त्यांना कसे, 00:10:02.219 --> 00:10:04.226 सुट्या भागांचे पाच संच न्यावे लागत असत, 00:10:04.250 --> 00:10:07.264 कारण संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत ते तितक्या वेळा कोसळत असत. NOTE Paragraph 00:10:08.666 --> 00:10:12.683 आणि, अखेरीस, १७ डिसेंबर, १९०३ ला, 00:10:12.707 --> 00:10:14.976 राईट बंधूंनी उड्डाण केलं, 00:10:15.000 --> 00:10:17.048 आणि ते अनुभवण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. 00:10:17.072 --> 00:10:19.151 आपल्याला त्याबद्दल काही दिवसांनंतर कळलं. 00:10:20.754 --> 00:10:24.777 आणि लँगले हे चुकीच्या गोष्टीने प्रेरित होते याचा आणखी पुरावा: 00:10:24.801 --> 00:10:27.135 ज्या दिवशी राईट बंधूंनी उड्डाण केलं. 00:10:27.159 --> 00:10:28.160 ते बाहेर पडले. 00:10:28.184 --> 00:10:29.976 ते म्हणू शकले असते, 00:10:30.000 --> 00:10:31.976 "हा एक विस्मयकारी शोध आहे, मित्रांनो, 00:10:32.000 --> 00:10:34.976 व तुमच्या तंत्रज्ञानाधारे मी सुधारणा करेन," पण ते म्हणले नाहीत. 00:10:35.000 --> 00:10:38.591 ते प्रथम नव्हते, श्रीमंत झाले नाही, प्रसिद्ध झाले नाही, म्हणून बाहेर पडले. NOTE Paragraph 00:10:39.710 --> 00:10:42.210 लोकांच्या लेखी मोल नाही त्यामागचा हेतु महत्वाचा. 00:10:42.234 --> 00:10:43.976 जे तुम्ही मानता त्याबद्दल बोललात तर, 00:10:44.000 --> 00:10:46.976 ते मानणाऱ्यांना तुम्ही आकर्षित कराल. NOTE Paragraph 00:10:47.000 --> 00:10:50.334 पण जे तुम्ही मानता तेच मानणाऱ्यांना आकर्षित करणं का महत्त्वाचं आहे? 00:10:52.404 --> 00:10:54.957 नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम असं काहीसं म्हणतात, 00:10:54.981 --> 00:10:57.491 जरी नियम ठाऊक नसेल तरी, त्याची परिभाषा माहिती आहे. 00:10:57.515 --> 00:11:01.976 आपल्या लोकसंख्येतील पहिले २.५% लोक आपले नावीन्यतेचे प्रवर्तक आहेत. 00:11:02.000 --> 00:11:06.213 आपल्या लोकसंख्येतील पुढचे १३.५% लोक त्याची तत्पर स्वीकृती करणारे आहेत. 00:11:07.252 --> 00:11:09.096 पुढचे ३४% लोक हे अग्रेसर बहुसांख्यिक, 00:11:09.120 --> 00:11:11.453 हळू जाणारे बहुसांख्यिक आणि रेंगाळणारे आहेत. 00:11:12.445 --> 00:11:14.976 हे लोक टच-टोन फोन एवढ्याचसाठी घेतात कारण 00:11:15.000 --> 00:11:17.239 नंबर फिरवायचे फोन आता उपलब्ध नाहीत. NOTE Paragraph 00:11:17.263 --> 00:11:18.976 (हशा) NOTE Paragraph 00:11:19.000 --> 00:11:21.976 या मोजपट्टीवर आपण सगळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी असतो, 00:11:22.000 --> 00:11:24.976 पण नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम आपल्याला काय सांगतो 00:11:25.000 --> 00:11:29.976 कि तुम्हांला जर व्यापक यश हवं असेल किंवा एखाद्या कल्पनेची व्यापक स्वीकृती हवी असेल, 00:11:30.000 --> 00:11:33.976 तर ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही 00:11:34.000 --> 00:11:36.976 बाजार प्रवेशाचा १५ ते १८ टक्क्यांपर्यंतचा पल्ला गाठत नाही, 00:11:37.000 --> 00:11:39.976 आणि नंतर व्यवस्थेत उलथापालथ होते. 00:11:40.000 --> 00:11:43.245 मला कंपन्यांना विचारायला आवडतं "नवीन व्यवसाय किती झाला?" 00:11:43.269 --> 00:11:45.902 त्यांना तुम्हाला अभिमानाने सांगायला आवडतं "जवळपास १०%". 00:11:45.926 --> 00:11:48.069 तसं तर तुम्ही १०% ग्राहकांमध्ये अडखळू शकता. 00:11:48.093 --> 00:11:50.039 आपल्याकडे १०% आहे ज्यांना अगदी सहज मिळतं. 00:11:50.063 --> 00:11:51.776 आपण त्यांना असंच म्हणतो, खरंय ना? 00:11:51.800 --> 00:11:54.277 ते त्या आंतरिक भावनेसारखं आहे "ते त्यांना सहज मिळतं" NOTE Paragraph 00:11:54.301 --> 00:11:56.737 प्रश्न हा आहे: ज्यांना हे कळतं त्यांना कसं ओळखायचं 00:11:56.761 --> 00:11:59.405 देवाणघेवाण न करता आणि ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत? 00:11:59.429 --> 00:12:02.976 म्हणून हे असं आहे हि छोटी पोकळी तुम्हाला भरून काढावी लागेल, 00:12:03.000 --> 00:12:05.381 जेफ्री मूर म्हणतात त्याप्रमाणे "दरी ओलांडणे" -- 00:12:05.405 --> 00:12:08.976 कारण हे बघा, लवकर कृती करणारे बहुसांख्यिक तोपर्यंत काही आजमावणार नाहीत 00:12:09.000 --> 00:12:12.976 जोपर्यंत कुणा दुसऱ्याने ते आजमावलं नसेल. 00:12:13.000 --> 00:12:15.976 आणि लोक जे नावीन्यतेचे प्रवर्तक व तत्पर स्वीकृती करणारे आहेत, 00:12:16.000 --> 00:12:18.191 ते सहजतेने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. 00:12:18.215 --> 00:12:20.976 ते स्वाभाविक निर्णय घेण्यात त्यांना सहजता वाटते 00:12:21.000 --> 00:12:24.976 जे त्यांच्या जगाबद्दलच्या विश्वासाने प्रेरीत असतात 00:12:25.000 --> 00:12:26.976 आणि केवळ उत्पादन आहे यावर विसंबून नसतात. 00:12:27.000 --> 00:12:29.647 हे ते लोक आहेत जे सहा तास रांगेत उभे राहिले 00:12:29.671 --> 00:12:31.807 एका आयफोनसाठी जेव्हा ते प्रथम बाजारात आले, 00:12:31.831 --> 00:12:34.976 जेव्हा तुम्हाला एखादा पुढच्या आठवड्यात सहज मिळाला असता. 00:12:35.000 --> 00:12:37.143 हे ते लोक आहेत ज्यांनी ४०,००० डॉलर खर्च केले 00:12:37.167 --> 00:12:39.976 सपाट पडद्याचा टिव्ही घेण्यासाठी जेव्हा ते प्रथम बाजारात आले, 00:12:40.000 --> 00:12:42.309 जरी त्याचं तंत्रज्ञान हलक्या प्रतीचं होतं तरीही. 00:12:43.000 --> 00:12:46.976 आणि तंत्रज्ञान उत्कृष्ट होतं म्हणून त्यांनी हे केलं नाही; 00:12:47.000 --> 00:12:48.976 ते त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी केलं. 00:12:49.000 --> 00:12:50.976 कारण त्यांना अग्रेसर राहायचं होतं. 00:12:51.000 --> 00:12:53.477 लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत; तिच्या हेतुला देतात 00:12:53.501 --> 00:12:56.976 आणि तुम्ही काय करता हे तुमचा कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. 00:12:57.000 --> 00:13:00.976 वास्तविक पाहता, लोक त्या गोष्टी करतात ज्या त्यांचा विश्वास सिद्ध करतात. 00:13:01.000 --> 00:13:05.976 त्या व्यक्तीने आयफोन पहिल्या सहा तासांत घेण्याचं कारण, 00:13:06.000 --> 00:13:07.976 सहा तास रांगेत उभं राहण्याचं कारण, 00:13:08.000 --> 00:13:10.381 जगाबद्दलचा त्यांचा विश्वास होय, 00:13:10.405 --> 00:13:12.405 आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असावा हे आहे. 00:13:12.429 --> 00:13:13.461 ते अग्रणी होते. 00:13:13.485 --> 00:13:15.976 लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत तर हेतुला देतात. NOTE Paragraph 00:13:16.000 --> 00:13:17.976 मी तुम्हांला एक प्रसिद्ध उदाहरण देतो, 00:13:18.000 --> 00:13:22.563 नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे एक प्रसिद्ध अपयश आणि एक प्रसिद्ध यश. 00:13:22.587 --> 00:13:23.976 प्रथम, एक प्रसिद्ध अपयश. 00:13:24.000 --> 00:13:25.976 ते एक व्यावसायिक उदाहरण आहे. 00:13:26.000 --> 00:13:28.237 आपण आधी म्हणल्याप्रमाणे, यशाचा मूलमंत्र 00:13:28.261 --> 00:13:31.653 हा भांडवल, योग्यतेचे लोक आणि बाजाराची योग्य परिस्थिती आहे. 00:13:31.677 --> 00:13:33.422 मग तुम्हांला यश मिळायला हवं. 00:13:33.446 --> 00:13:34.976 टिव्हो कंपनीचं बघा. 00:13:35.000 --> 00:13:37.715 आठ ते नऊ वर्षांपूर्वी टिव्हो कंपनी सुरू झाल्यापासून, 00:13:37.739 --> 00:13:38.977 ते आजतागायत, 00:13:39.001 --> 00:13:42.651 बाजारातील उत्कृष्ट गुणवत्तेचे ते एकमेव उत्पादन आहे, 00:13:42.675 --> 00:13:44.548 याबाबत कुठचेही दुमत नाही. 00:13:45.595 --> 00:13:47.402 त्यांच्याकडे पुष्कळ भांडवल होतं. 00:13:47.426 --> 00:13:49.125 बाजारातील परिस्थिती उत्तम होती. 00:13:49.149 --> 00:13:50.976 म्हणजे, आपल्यासाठी टिव्हो क्रियापद आहे 00:13:51.000 --> 00:13:54.259 मी नेहमी फालतू अशा टाईम वॉर्नर कंपनीच्या DVR वर गोष्टी टिव्हो करतो NOTE Paragraph 00:13:54.283 --> 00:13:56.326 (हशा) NOTE Paragraph 00:13:56.799 --> 00:13:58.976 पण टिव्हो हे एक व्यावसायिक अपयश आहे. 00:13:59.000 --> 00:14:00.976 त्यांनी कधीही पैसा कमावला नाही. 00:14:01.000 --> 00:14:02.976 आणि जेव्हा ते शेयर बाजारात आले, 00:14:03.000 --> 00:14:04.976 त्यांच्या शेयरची किंमत ३० का ४० डॉलर होती 00:14:05.000 --> 00:14:07.429 ती घसरली, आणि नंतर ती कधीही १० डॉलरच्यावर गेली नाही. 00:14:07.453 --> 00:14:09.976 वास्तविक पाहता, ती कधी सहा डॉलरच्यावर गेली नाही, 00:14:10.000 --> 00:14:11.976 एखाद दुसऱ्या शीघ्र वाढीचा प्रसंग वगळता. NOTE Paragraph 00:14:12.000 --> 00:14:14.334 कारण असं बघा, टिव्होने जेव्हा उत्पादन बाजारात आणलं 00:14:14.358 --> 00:14:16.976 त्यांच्याकडे काय आहे हे त्यांनी सांगितलं. 00:14:17.000 --> 00:14:20.454 ते म्हणाले "आमचं उत्पादन टिव्हीवरचं प्रक्षेपण थांबवतं, 00:14:20.478 --> 00:14:24.976 जाहिराती वगळतं, प्रक्षेपण पुन्हा सुरु करतं आणि तुमची आवड लक्षात ठेवतं 00:14:25.000 --> 00:14:26.789 तुम्हाला न विचारता." 00:14:28.175 --> 00:14:29.976 आणि बहुसंख्य लोक उपहासाने म्हणाले, 00:14:30.000 --> 00:14:31.976 "आमचा तुमच्यावर विश्वास नाही. 00:14:32.000 --> 00:14:34.548 आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला ते आवडलं नाही. 00:14:34.572 --> 00:14:35.635 तुम्ही घाबरवत आहात." NOTE Paragraph 00:14:36.691 --> 00:14:37.976 ते जर असं म्हणाले असते, 00:14:38.000 --> 00:14:42.976 "जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जिला पूर्ण नियंत्रण आवडते 00:14:43.000 --> 00:14:45.976 आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर, 00:14:46.000 --> 00:14:48.976 तुमच्यासाठी आमच्याकडे एक उत्पादन आहे. 00:14:49.000 --> 00:14:50.978 ते प्रक्षेपण थांबवतं, जाहिराती वगळतं, 00:14:51.002 --> 00:14:53.162 तुमच्या आवडी लक्षात ठेवतं इत्यादी इत्यादी" 00:14:53.858 --> 00:14:56.372 लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत;तिच्या हेतुला देतात. 00:14:56.396 --> 00:14:59.757 आणि तुम्ही काय करता हे तुमचा कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. NOTE Paragraph 00:15:00.559 --> 00:15:04.603 आता नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे मी एक यशस्वी उदाहरण देतो. 00:15:06.000 --> 00:15:08.976 १९६३ च्या उन्हाळ्यात, 00:15:09.000 --> 00:15:12.976 वॊशिंग्टनच्या एका मोठ्या पटांगणात २,५०,००० लोक जमले होते 00:15:13.000 --> 00:15:14.652 डॉ. किंग यांचं भाषण ऐकण्यासाठी. 00:15:16.154 --> 00:15:18.976 त्यांनी कुठलंही निमंत्रण दिलं नव्हतं, 00:15:19.000 --> 00:15:21.976 आणि तारीख पडताळण्यासाठी कुठलं संकेतस्थळ नव्हतं. 00:15:22.000 --> 00:15:23.976 तुम्हाला हे कसं जमू शकतं? 00:15:24.000 --> 00:15:26.143 डॉ. किंग काही अमेरिकेतील एकमेव व्यक्ती नव्हती 00:15:26.167 --> 00:15:28.570 जी उत्तम वक्ता होती. 00:15:28.594 --> 00:15:30.760 अमेरिकेतील यातना भोगलेला एकमेव माणूस नव्हता 00:15:30.784 --> 00:15:32.562 नागरी कायद्याच्या आधीच्या अमेरिकेतील. 00:15:32.586 --> 00:15:34.976 खरंतर, त्यांच्या काही कल्पना चांगल्या नव्हत्या. 00:15:35.000 --> 00:15:36.023 पण एक देणगी होती. 00:15:36.960 --> 00:15:40.231 अमेरिकेत काय बदल होणं गरजेचं आहे हे ते सगळीकडे सांगत सुटले नाहीत. 00:15:40.255 --> 00:15:42.572 त्यांना काय वाटतं हे त्यांनी लोकांना सांगितलं. 00:15:42.596 --> 00:15:45.976 "मी मानतो, मी मानतो, मी मानतो" ते लोकांना म्हणाले. 00:15:46.000 --> 00:15:48.531 आणि ते जे मानतात ते मानणाऱ्या लोकांनी 00:15:48.555 --> 00:15:51.976 त्यांचं ध्येय घेतलं आणि ते आपलं मानलं आणि लोकांना सांगितलं. 00:15:52.000 --> 00:15:54.048 आणि त्यांपैकी काही लोकांनी रचना तयार केली 00:15:54.072 --> 00:15:56.567 अधिक लोकांपर्यंत तो शब्द पोहोचवण्यासाठी. 00:15:56.591 --> 00:15:59.976 आणि बघा, २,५०,००० लोक जमले 00:16:00.000 --> 00:16:04.246 ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. NOTE Paragraph 00:16:05.000 --> 00:16:07.502 त्यांच्यासाठी म्हणून किती जण आले होते? 00:16:09.319 --> 00:16:10.351 शून्य. 00:16:11.000 --> 00:16:12.976 ते स्वतःसाठी आले होते. 00:16:13.000 --> 00:16:15.702 अमेरिकेबद्दल त्यांना जे वाटत होतं 00:16:15.726 --> 00:16:17.976 त्याने त्यांना बसचा प्रवास करवून खेचून आणलं 00:16:18.000 --> 00:16:20.976 ऑगस्ट महिन्याच्या ऐन मध्यात वॊशिंग्टनमध्ये भर उन्हात उभं केलं. 00:16:21.000 --> 00:16:24.048 ते जे मानत होते ते हे होतं व काळे विरुद्ध गोरे नव्हतं: 00:16:24.072 --> 00:16:26.385 २५% श्रोते श्वेतवर्णीय होते. NOTE Paragraph 00:16:27.397 --> 00:16:31.000 डॉ. किंग यांचा असा विश्वास होता कि या जगात दोन प्रकारचे कायदे आहेत: 00:16:31.024 --> 00:16:34.976 एक जे विधात्याने बनवलेले आहेत आणि दुसरे जे माणसांनी बनवलेले आहेत. 00:16:35.000 --> 00:16:37.976 आणि जोपर्यंत माणसांनी बनवलेले कायदे 00:16:38.000 --> 00:16:40.793 विधात्याने बनवलेल्या कायद्यांशी सुसंगत होत नाहीत तोपर्यंत 00:16:40.817 --> 00:16:42.753 आपण न्याय्य जगात राहत नसतो. 00:16:42.777 --> 00:16:45.192 नागरी हक्काची चळवळ हे एक केवळ निमित्त 00:16:45.216 --> 00:16:48.976 झालं त्यांचं ध्येय जीवित करण्यासाठी. 00:16:49.000 --> 00:16:51.976 आपण अनुसरण केलं, त्यांच्यासाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी. 00:16:52.000 --> 00:16:54.301 बरं त्यांनी "माझं एक स्वप्न आहे" हे भाषण दिलं, 00:16:54.325 --> 00:16:56.310 "माझी एक योजना आहे" असं नाही. NOTE Paragraph 00:16:56.334 --> 00:16:59.976 (हशा) NOTE Paragraph 00:17:00.000 --> 00:17:03.191 आता राजकारण्यांची १२ मुद्द्यांची सर्वसमावेशक योजना ऐका. 00:17:03.215 --> 00:17:04.976 ते कोणालाही प्रेरीत करत नाहीत. 00:17:05.000 --> 00:17:07.976 कारण काही नेते असतात आणि काही जे नेतृत्व करतात. 00:17:08.000 --> 00:17:11.976 नेते सामर्थ्य आणि अधिकाराचा वापर करतात, 00:17:12.000 --> 00:17:15.000 पण जे नेतृत्व करतात ते प्रेरणा देतात. 00:17:16.533 --> 00:17:18.884 त्या व्यक्ती असतील किंवा संघटना असतील, 00:17:18.908 --> 00:17:21.976 नेतृत्व करणाऱ्यांच्या मागे आपण जातो, ते जावं लागतं म्हणून नव्हे, 00:17:22.000 --> 00:17:23.837 तर आपल्याला जावंसं वाटतं म्हणून. 00:17:24.785 --> 00:17:29.223 जे नेतृत्व करतात त्यांचं अनुसरण आपण करतो, त्यांच्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी. 00:17:30.484 --> 00:17:32.976 आणि जे "का" ने सुरुवात करतात, 00:17:33.000 --> 00:17:37.740 त्यांच्यातच सभोवतालच्या लोकांना प्रेरीत करण्याची क्षमता असते 00:17:37.764 --> 00:17:40.105 किंवा ते त्यांना प्रेरीत करू शकणाऱ्यांना शोधतात. NOTE Paragraph 00:17:40.976 --> 00:17:42.380 आपला खूप आभारी आहे. NOTE Paragraph 00:17:42.404 --> 00:17:44.000 (टाळ्या)