आपल्या गृहितकानुसार गोष्टी घडत नाहीत तेव्हा काय म्हणाल? खरेतर ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं द्याल जेव्हा सर्व गृहीतकांना झुगारुन काहीजण यश संपादन करु शकतात? उदाहरणार्थ: ऍपल हि कंपनी एवढी नाविन्यपूर्ण का आहे? वर्षानुवर्षे, तिच्या सर्व स्पर्धकांपेक्षा ती अधिक नाविन्यपूर्ण आहे. आणि तरीसुद्धा ती एक संगणक बनवणारी कंपनी आहे. ती इतर सगळ्यांसारखीच आहे. तिच्याकडेही तीच प्रतिभा उपलब्ध आहे, त्याच सहकारी कंपन्या आहेत, तेच सल्लागार, तीच माध्यमं आहेत. तरीसुद्धा तिच्याकडे काहीतरी वेगळं आहे असं का वाटतं? मार्टिन ल्युथर किंग यांनी नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व का केलं? अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीपूर्वी दुःख सहन केलेले ते एकमेव नव्हते आणि त्या काळातील एकमेव महान वक्ता तर नक्कीच नव्हते. मग तेच का? आणि राईट बंधूंनाच का कळलं नियंत्रीत, शक्तीशाली मानवी उड्डाणाबद्दल जेव्हा इतरही संघ होते, जे अधिक पात्रतेचे होते, ज्यांच्याकडे अधिक पैसा होता -- आणि ज्यांना शक्तीशाली मानवी उड्डाण करता आलं नाही, आणि राईट बंधूंनी ज्यांना पराभूत केलं. हे काहीतरी वेगळं आहे. साधारण साडेतीन वर्षांपूर्वी मला एक शोध लागला. आणि जग कसं चालतं याबद्दलचे माझे विचार या शोधामुळे पूर्णतः बदलले, आणि जगात मी कसा वावरतो यातही खूपच बदल झाला. असं लक्षात येतं कि, त्याचा एक नमुना आहे. असं लक्षात येतं कि, जगातील सर्व प्रेरणादायी नेते आणि संस्था, मग ती एपल असो किंवा मार्टिन ल्युथर किंग किंवा राईट बंधू असोत, ते सगळे एकाच पद्धतीने विचार, कृती आणि संवाद करतात. आणि ते इतर प्रत्येकापेक्षा पूर्णतः विरुद्ध आहे. मी फक्त ते सुसूत्रित केलं, आणि कदाचित ती जगातील सर्वांत सोपी कल्पना आहे. मी त्याला सुवर्ण वर्तुळ म्हणतो. का? कसं? काय? या सोप्या कल्पनेवरून कळतं कि काही संस्था आणि काही नेते प्रेरित का करू शकतात जे इतरांना जमत नाही. मी पटकन संज्ञा सांगतो. या ग्रहावरील प्रत्येक माणसाला, प्रत्येक संघटनेला ते काय करतात हे माहित आहे, १०० टक्के. ते कसं करतात हे काहींना माहित आहे, त्याला तुम्ही तुमचं विशिष्ट मूल्य विधान म्हणा किंवा मालकी प्रक्रिया किंवा अद्वितीय गुण म्हणा. पण अगदी थोड्या लोकांना किंवा संस्थांना कळतं ते जे करतात ते का करतात. आणि "का" यावर माझं म्हणणं "नफा कमवण्यासाठी" असं नाही. ती निष्पत्ती आहे. ती नेहमी निष्पत्तीच असते. "का" म्हणजे मला म्हणायचं आहे: तुमचा उद्देश काय? तुमचं निमित्त काय? तुमची कशावर श्रद्धा आहे? तुमची संघटना अस्तित्वात का आहे? तुम्ही सकाळी बिछान्यातून का उठता? आणि कोणाला कशाला काय वाटायला हवं? याचा परिणाम, आपली विचारपद्धती, आपली कृती, आपली संवादपद्धती बाह्यरंगातून अंतरंगात जाणारी आहे, हे स्वाभाविक आहे. आपण सुस्पष्टतेकडून अस्पष्टतेकडे जातो. पण प्रेरित नेते आणि प्रेरित संघटना -- त्यांचे आकारमान, त्यांचा उद्योग लक्षात न घेता -- सर्वजण विचार, कृती आणि संवाद अंतरंगातून बाहेर करतात. मी एक उदाहरण देतो. मी एपलबद्दल सांगतो कारण ते समजायला सोपं आणि प्रत्येकाला कळू शकतं. जर एपल कंपनी इतर प्रत्येकासारखी असती, तिचा विपणन संदेश असा असला असता: "आम्ही अप्रतिम संगणक बनवतो. त्यांची रचना सुंदर आहे, ते वापरायला सोपे आहेत आणि वापरणाऱ्यासाठी सोयीचे आहेत. एक घ्यायचा का?" "एकदम रटाळ." आपल्यातले बरेचजण असाच संवाद साधतात. बरंचसं विपणन आणि विक्री अशीच होते, आपण एकमेकांशी असाच संवाद साधतो. आपण जे करतो ते आपण सांगतो, आपण कसे वेगळे आणि अधिक चांगले आहोत ते सांगतो आणि आपण कुठल्यातरी कृतीची अपेक्षा करतो, खरेदी, मत, तत्सम काहीतरी. हि आमची विधी सल्लागार कंपनी आहे: आमच्या उत्तम कायदेपंडितांचे मोठमोठे पक्षकार आहेत, आम्ही नेहमी आमच्या पक्षकारांसाठी काम करतो. हि आमची नवीन गाडी आहे: तिची इंधनक्षमता उत्तम आहे, तिच्या आसनांना चामड्याची आवरणं आहेत. आमची गाडी विकत घ्या. पण ते कंटाळवाणं आहे. एपल कंपनी कसा संवाद साधते ते बघा. "आम्ही जे करतो त्यामागे सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा आमचा मानस असतो. आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करण्यावर विश्वास ठेवतो. सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा आमचा मार्ग म्हणजे आमच्या उत्पादनांची रचना सुंदर करणे, ती वापरायला सोपी आणि सोयीची बनवणे. आम्ही उत्तम संगणक बनवतो हा निव्वळ योगायोग आहे. एक हवाय का?" अगदीच वेगळं, बरोबर? तुम्ही माझ्याकडून संगणक खरेदी करायला तयार आहात. मी माहितीची क्रमवारी फक्त उलटी केली. यावरून आपल्याला काय सिद्ध होतं कि लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; लोक तुम्ही ते करता हे खरेदी करतात. यावरून हे स्पष्ट होतं कि या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती एपलकडून संगणक किती आरामात घेऊ शकते. पण आपण अगदी आरामात एपलचा MP3 प्लेयर किंवा एपलचा फोन, किंवा एपलचा DVR घेऊ शकतो. मी आधी म्हणल्याप्रामणे, एपल हि एक फक्त संगणक बनवणारी कंपनी आहे. संरचनेनुसार त्यांच्यात आणि त्यांच्या स्पर्धकांमध्ये काहीही फरक नाही. त्यांचे स्पर्धकही हि सगळी उत्पादनं बनवण्यासाठी तेवढेच पात्र आहेत. वस्तुस्थितीत, त्यांनी प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी, गेटवे कंपनीने सपाट पडद्याचे टिव्ही आणले. सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच बनवण्यास ते पूर्णतः पात्र आहेत. अनेक वर्षांपासून ते सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच बनवताहेत. कुणीच एकही संच विकत घेतला नाही. डेल कंपनीने MP3 प्लेयर आणि PDA आणले, आणि ते उत्तम प्रतीची उत्पादनं बनवतात, आणि ते अगदी योग्य रचना असलेली उत्पादनं बनवतात -- आणि कुणीच एकही उत्पादन घेतलं नाही. वस्तुस्थितीत, त्याविषयी बोलताना, आपण कल्पनाही करू शकत नाही डेलचा MP3 प्लेयर विकत घेण्याचा. एका संगणक बनवणाऱ्या कंपनीकडून तुम्ही तो का विकत घ्याल? पण आपण रोज खरेदी करतो. लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; ते तुम्ही का करता याला मोल देतात. तुमच्याकडे जे आहे त्याची गरज ज्याला आहे त्यासोबत व्यवसाय करणे हे लक्ष्य नाही. तुम्ही जे मानता त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांबरोबर व्यवसाय करणे हे लक्ष्य आहे. हे उत्तम आहे कि: मी जे काही तुम्हांला सांगतो आहे ते माझं वैयक्तिक मत नाही. त्याचं मूळ जीवशास्त्रीय तत्त्वांमध्ये आहे. मानसशास्र नव्हे, जीवशास्त्र. मानवी मेंदूला जर आडवा छेद देऊन तुम्ही बघितलंत, वरपासून खाली, मानवी मेंदू खरंतर भंगलेला आहे तीन मुख्य घटकांमध्ये ज्याचा सुयोग्य संबंध सुवर्ण वर्तुळाशी आहे. आपला नवीनतम मेंदू, मानवी मेंदू, आपल्या मोठ्या मेंदूचा बाहेरील थर, "काय" या पातळीशी संबंधीत आहे. मोठया मेंदूचा बाहेरील थर जबाबदार असतो तो तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार आणि बोलीसाठी. मधले दोन भाग हे लिंबिक मेंदूचे असतात, आणि आपले लिंबिक मेंदू जबाबदार असतात ते आपल्या सगळ्या भावनांसाठी, जसा विश्वास आणि निष्ठा. मानवी वर्तनालादेखील तोच कारणीभूत असतो, सर्व निर्णय घेणे, आणि भाषेसाठी त्याची क्षमता नसते. दुसऱ्या शब्दांत, जेव्हा आपण बाह्यरंगातून अंतरंगाशी संवाद साधतो, लोकांना पुष्कळश्या अवघड माहितीचे आकलन होते जसं कि वैशिष्ट्ये आणि फायदे आणि तथ्य आणि आकडे. त्याच्याने वर्तन ठरत नाही. जेव्हा आपण अंतरंगातून बाहेर संवाद साधू शकतो, आपण मेंदूच्या त्या भागाशी बोलत असतो जो वर्तन नियंत्रित करतो, आणि मग आपल्या उक्ती आणि कृतीच्या मूर्त गोष्टींनी लोकांना युक्तीवाद करू देतो. ह्याच जागेतून महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कधीकधी तुम्ही कोणालातरी सर्व सत्य आणि आकडेमोड सांगू शकता, आणि ते म्हणतात, "मला ते सगळं माहीत आहे, पण ते योग्य वाटत नाही" आपण योग्य "वाटत" नाही असं क्रियापद का वापरतो? कारण मेंदूचा जो भाग निर्णय प्रक्रिया नियंत्रित करतो तो भाषा नियंत्रित करत नाही. आपण म्हणू शकतो कि, "मला माहीत नाही. हे काही योग्य वाटत नाही" किंवा तुम्ही कधी म्हणता तुम्ही तुमच्या मनाचं किंवा आत्म्याचं ऐकत आहात. हे सांगणारा पहिला मी नाही कि ते शरीराचे वेगळे अवयव नाहीत वर्तन नियंत्रित करणारे. हे सगळं इथे घडतं, तुमच्या लिंबिक मेंदूमध्ये, मेंदूचा तो भाग जो निर्णय प्रक्रिया नियंत्रित करतो भाषा नव्हे. पण तुम्हाला जर माहित नसेल तुम्ही जे करता ते का करता, आणि लोक जर तुम्ही जे करता ते का करता याला प्रतिसाद देत असतील, तर मग लोकांना प्रवृत्त कसं कराल मत देण्यासाठी किंवा काही विकत घेण्यासाठी, किंवा महत्त्वाचं म्हणजे इमानी राहण्यासाठी आणि तुम्ही जे करता याचा एक भाग होण्यासाठी. ज्या लोकांना तुमच्याकडे असलेलं विकणं हे लक्ष्य नाही; लक्ष्य आहे त्यांना विकणं जे तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या गोष्टी मानतात ज्या लोकांना नोकरीची गरज आहे त्यांना कामावर ठेवणं हे लक्ष्य नाही; ते आहे त्या लोकांच्या नोकरीचं जे तुमच्यासारखा विश्वास ठेवतात मी नेहमी म्हणतो, असं बघा कि, एखादं काम करू शकतात म्हणून तुम्ही लोकांना कामावर ठेवलं, तर ते पैशासाठी काम करतील, पण त्यांचा विश्वास संलग्न असेल तर ते जीव ओतून, घाम गाळून आणि अश्रु ढाळून काम करतील. राईट बंधुंसारखं दुसरं उत्तम उदाहरण नाही. बऱ्याच लोकांना सॅम्युएल पियरपॉईंट लँगले माहित नाहीत. आणि मागे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, शक्तिशाली मानवी उड्डाणाचा पाठपुरावा आजच्या डॉट कॉम सारखा होता. प्रत्येकजण त्याचा प्रयत्न करत होता. आणि सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेकडे, आपण जो मानतो, तो यशाचा मंत्र होता. आतासुद्धा, तुम्ही लोकांना विचारा, "तुमचं उत्पादन किंवा तुमची कंपनी अपयशी का ठरली?" आणि लोक तुम्हांला नेहमी तेच संयोजन सांगतील त्याच तीन गोष्टींचं: अपुरं भांडवल, अयोग्य लोक आणि बाजाराची खराब परिस्थिती. नेहमी याच तीन गोष्टी असतात, बघू या कसं काय ते. सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेला युद्ध विभागाकडून ५०,००० डॉलर दिले गेले होते हे उडणारं यंत्र काय आहे ते बघण्यासाठी. प्रश्न भांडवलाचा नव्हता. त्यांचा हार्वर्डशी संबंध होता, आणि स्मिथसोनियन संस्थेत काम केलं होतं, लोकांशी उत्तम संबंध होता; त्या काळातील मोठे लोक त्यांना ठाऊक होते. पैशांसाठी काम करणारे उत्तम बुद्धिमत्तेचे लोक त्यांनी कामावर ठेवले होते आणि बाजारही तेजीत होता. द न्यु यॉर्क टाईम्स त्यांना सगळीकडे प्रसिद्धी देत होता, व प्रत्येकजण लँगलेंना प्रोत्साहन देत होता. तरीही सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेबद्दल आपण कधीही कसंच ऐकलं नाही? काहीशे मैलांवर डेटन ओहायोमध्ये, ऑर्विल आणि विल्बर राईट, यांच्याकडे आपण समजत असलेला यशाचा मंत्र वैगैरे काही नव्हतं. त्यांच्याकडे भांडवल नव्हतं; सायकलच्या दुकानातील कमाई त्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वापरली; राईट बंधुंच्या संघातील एकही व्यक्ती, महाविद्यालयात शिकलेला नव्हता, ऑर्विल आणि विल्बरसुद्धा; द न्यु यॉर्क टाईम्सने त्यांचा कुठेही पाठपुरावा केलेला नव्हता. फरक हा होता, ऑर्विल आणि विल्बर एका ध्येयाने, उद्देशाने, विश्वासाने प्रेरीत होते. त्यांचा असा विश्वास होता कि त्यांना जर या उडत्या यंत्राची उकल झाली, तर जगाची दिशाच बदलेल. सॅम्युएल पियरपॉईंट लँगले वेगळे होते. त्यांना श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचं होतं. ते फळाचा पाठपुरावा करत होते. ते श्रीमंतीचा पाठपुरावा करत होते. आणि पहा काय घडलं ते. जे लोक राईट बंधुंच्या स्वप्नावर विश्वास ठेवणारे होते त्यांनी त्यांच्यासोबत जीव ओतून काम केलं. इतरांनी फक्त पगारासाठी काम केलं. ते वर्णनं सांगतात कि राईट बंधू दरवेळी बाहेर पडताना त्यांना कसे, सुट्या भागांचे पाच संच न्यावे लागत असत, कारण संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत ते तितक्या वेळा कोसळत असत. आणि, अखेरीस, १७ डिसेंबर, १९०३ ला, राईट बंधूंनी उड्डाण केलं, आणि ते अनुभवण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. आपल्याला त्याबद्दल काही दिवसांनंतर कळलं. आणि लँगले हे चुकीच्या गोष्टीने प्रेरित होते याचा आणखी पुरावा: ज्या दिवशी राईट बंधूंनी उड्डाण केलं. ते बाहेर पडले. ते म्हणू शकले असते, "हा एक विस्मयकारी शोध आहे, मित्रांनो, व तुमच्या तंत्रज्ञानाधारे मी सुधारणा करेन," पण ते म्हणले नाहीत. ते प्रथम नव्हते, श्रीमंत झाले नाही, प्रसिद्ध झाले नाही, म्हणून बाहेर पडले. लोकांच्या लेखी मोल नाही त्यामागचा हेतु महत्वाचा. जे तुम्ही मानता त्याबद्दल बोललात तर, ते मानणाऱ्यांना तुम्ही आकर्षित कराल. पण जे तुम्ही मानता तेच मानणाऱ्यांना आकर्षित करणं का महत्त्वाचं आहे? नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम असं काहीसं म्हणतात, जरी नियम ठाऊक नसेल तरी, त्याची परिभाषा माहिती आहे. आपल्या लोकसंख्येतील पहिले २.५% लोक आपले नावीन्यतेचे प्रवर्तक आहेत. आपल्या लोकसंख्येतील पुढचे १३.५% लोक त्याची तत्पर स्वीकृती करणारे आहेत. पुढचे ३४% लोक हे अग्रेसर बहुसांख्यिक, हळू जाणारे बहुसांख्यिक आणि रेंगाळणारे आहेत. हे लोक टच-टोन फोन एवढ्याचसाठी घेतात कारण नंबर फिरवायचे फोन आता उपलब्ध नाहीत. (हशा) या मोजपट्टीवर आपण सगळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी असतो, पण नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम आपल्याला काय सांगतो कि तुम्हांला जर व्यापक यश हवं असेल किंवा एखाद्या कल्पनेची व्यापक स्वीकृती हवी असेल, तर ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही बाजार प्रवेशाचा १५ ते १८ टक्क्यांपर्यंतचा पल्ला गाठत नाही, आणि नंतर व्यवस्थेत उलथापालथ होते. मला कंपन्यांना विचारायला आवडतं "नवीन व्यवसाय किती झाला?" त्यांना तुम्हाला अभिमानाने सांगायला आवडतं "जवळपास १०%". तसं तर तुम्ही १०% ग्राहकांमध्ये अडखळू शकता. आपल्याकडे १०% आहे ज्यांना अगदी सहज मिळतं. आपण त्यांना असंच म्हणतो, खरंय ना? ते त्या आंतरिक भावनेसारखं आहे "ते त्यांना सहज मिळतं" प्रश्न हा आहे: ज्यांना हे कळतं त्यांना कसं ओळखायचं देवाणघेवाण न करता आणि ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत? म्हणून हे असं आहे हि छोटी पोकळी तुम्हाला भरून काढावी लागेल, जेफ्री मूर म्हणतात त्याप्रमाणे "दरी ओलांडणे" -- कारण हे बघा, लवकर कृती करणारे बहुसांख्यिक तोपर्यंत काही आजमावणार नाहीत जोपर्यंत कुणा दुसऱ्याने ते आजमावलं नसेल. आणि लोक जे नावीन्यतेचे प्रवर्तक व तत्पर स्वीकृती करणारे आहेत, ते सहजतेने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. ते स्वाभाविक निर्णय घेण्यात त्यांना सहजता वाटते जे त्यांच्या जगाबद्दलच्या विश्वासाने प्रेरीत असतात आणि केवळ उत्पादन आहे यावर विसंबून नसतात. हे ते लोक आहेत जे सहा तास रांगेत उभे राहिले एका आयफोनसाठी जेव्हा ते प्रथम बाजारात आले, जेव्हा तुम्हाला एखादा पुढच्या आठवड्यात सहज मिळाला असता. हे ते लोक आहेत ज्यांनी ४०,००० डॉलर खर्च केले सपाट पडद्याचा टिव्ही घेण्यासाठी जेव्हा ते प्रथम बाजारात आले, जरी त्याचं तंत्रज्ञान हलक्या प्रतीचं होतं तरीही. आणि तंत्रज्ञान उत्कृष्ट होतं म्हणून त्यांनी हे केलं नाही; ते त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी केलं. कारण त्यांना अग्रेसर राहायचं होतं. लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत; तिच्या हेतुला देतात आणि तुम्ही काय करता हे तुमचा कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. वास्तविक पाहता, लोक त्या गोष्टी करतात ज्या त्यांचा विश्वास सिद्ध करतात. त्या व्यक्तीने आयफोन पहिल्या सहा तासांत घेण्याचं कारण, सहा तास रांगेत उभं राहण्याचं कारण, जगाबद्दलचा त्यांचा विश्वास होय, आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असावा हे आहे. ते अग्रणी होते. लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत तर हेतुला देतात. मी तुम्हांला एक प्रसिद्ध उदाहरण देतो, नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे एक प्रसिद्ध अपयश आणि एक प्रसिद्ध यश. प्रथम, एक प्रसिद्ध अपयश. ते एक व्यावसायिक उदाहरण आहे. आपण आधी म्हणल्याप्रमाणे, यशाचा मूलमंत्र हा भांडवल, योग्यतेचे लोक आणि बाजाराची योग्य परिस्थिती आहे. मग तुम्हांला यश मिळायला हवं. टिव्हो कंपनीचं बघा. आठ ते नऊ वर्षांपूर्वी टिव्हो कंपनी सुरू झाल्यापासून, ते आजतागायत, बाजारातील उत्कृष्ट गुणवत्तेचे ते एकमेव उत्पादन आहे, याबाबत कुठचेही दुमत नाही. त्यांच्याकडे पुष्कळ भांडवल होतं. बाजारातील परिस्थिती उत्तम होती. म्हणजे, आपल्यासाठी टिव्हो क्रियापद आहे मी नेहमी फालतू अशा टाईम वॉर्नर कंपनीच्या DVR वर गोष्टी टिव्हो करतो (हशा) पण टिव्हो हे एक व्यावसायिक अपयश आहे. त्यांनी कधीही पैसा कमावला नाही. आणि जेव्हा ते शेयर बाजारात आले, त्यांच्या शेयरची किंमत ३० का ४० डॉलर होती ती घसरली, आणि नंतर ती कधीही १० डॉलरच्यावर गेली नाही. वास्तविक पाहता, ती कधी सहा डॉलरच्यावर गेली नाही, एखाद दुसऱ्या शीघ्र वाढीचा प्रसंग वगळता. कारण असं बघा, टिव्होने जेव्हा उत्पादन बाजारात आणलं त्यांच्याकडे काय आहे हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले "आमचं उत्पादन टिव्हीवरचं प्रक्षेपण थांबवतं, जाहिराती वगळतं, प्रक्षेपण पुन्हा सुरु करतं आणि तुमची आवड लक्षात ठेवतं तुम्हाला न विचारता." आणि बहुसंख्य लोक उपहासाने म्हणाले, "आमचा तुमच्यावर विश्वास नाही. आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला ते आवडलं नाही. तुम्ही घाबरवत आहात." ते जर असं म्हणाले असते, "जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जिला पूर्ण नियंत्रण आवडते आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर, तुमच्यासाठी आमच्याकडे एक उत्पादन आहे. ते प्रक्षेपण थांबवतं, जाहिराती वगळतं, तुमच्या आवडी लक्षात ठेवतं इत्यादी इत्यादी" लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत;तिच्या हेतुला देतात. आणि तुम्ही काय करता हे तुमचा कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. आता नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे मी एक यशस्वी उदाहरण देतो. १९६३ च्या उन्हाळ्यात, वॊशिंग्टनच्या एका मोठ्या पटांगणात २,५०,००० लोक जमले होते डॉ. किंग यांचं भाषण ऐकण्यासाठी. त्यांनी कुठलंही निमंत्रण दिलं नव्हतं, आणि तारीख पडताळण्यासाठी कुठलं संकेतस्थळ नव्हतं. तुम्हाला हे कसं जमू शकतं? डॉ. किंग काही अमेरिकेतील एकमेव व्यक्ती नव्हती जी उत्तम वक्ता होती. अमेरिकेतील यातना भोगलेला एकमेव माणूस नव्हता नागरी कायद्याच्या आधीच्या अमेरिकेतील. खरंतर, त्यांच्या काही कल्पना चांगल्या नव्हत्या. पण एक देणगी होती. अमेरिकेत काय बदल होणं गरजेचं आहे हे ते सगळीकडे सांगत सुटले नाहीत. त्यांना काय वाटतं हे त्यांनी लोकांना सांगितलं. "मी मानतो, मी मानतो, मी मानतो" ते लोकांना म्हणाले. आणि ते जे मानतात ते मानणाऱ्या लोकांनी त्यांचं ध्येय घेतलं आणि ते आपलं मानलं आणि लोकांना सांगितलं. आणि त्यांपैकी काही लोकांनी रचना तयार केली अधिक लोकांपर्यंत तो शब्द पोहोचवण्यासाठी. आणि बघा, २,५०,००० लोक जमले ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. त्यांच्यासाठी म्हणून किती जण आले होते? शून्य. ते स्वतःसाठी आले होते. अमेरिकेबद्दल त्यांना जे वाटत होतं त्याने त्यांना बसचा प्रवास करवून खेचून आणलं ऑगस्ट महिन्याच्या ऐन मध्यात वॊशिंग्टनमध्ये भर उन्हात उभं केलं. ते जे मानत होते ते हे होतं व काळे विरुद्ध गोरे नव्हतं: २५% श्रोते श्वेतवर्णीय होते. डॉ. किंग यांचा असा विश्वास होता कि या जगात दोन प्रकारचे कायदे आहेत: एक जे विधात्याने बनवलेले आहेत आणि दुसरे जे माणसांनी बनवलेले आहेत. आणि जोपर्यंत माणसांनी बनवलेले कायदे विधात्याने बनवलेल्या कायद्यांशी सुसंगत होत नाहीत तोपर्यंत आपण न्याय्य जगात राहत नसतो. नागरी हक्काची चळवळ हे एक केवळ निमित्त झालं त्यांचं ध्येय जीवित करण्यासाठी. आपण अनुसरण केलं, त्यांच्यासाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी. बरं त्यांनी "माझं एक स्वप्न आहे" हे भाषण दिलं, "माझी एक योजना आहे" असं नाही. (हशा) आता राजकारण्यांची १२ मुद्द्यांची सर्वसमावेशक योजना ऐका. ते कोणालाही प्रेरीत करत नाहीत. कारण काही नेते असतात आणि काही जे नेतृत्व करतात. नेते सामर्थ्य आणि अधिकाराचा वापर करतात, पण जे नेतृत्व करतात ते प्रेरणा देतात. त्या व्यक्ती असतील किंवा संघटना असतील, नेतृत्व करणाऱ्यांच्या मागे आपण जातो, ते जावं लागतं म्हणून नव्हे, तर आपल्याला जावंसं वाटतं म्हणून. जे नेतृत्व करतात त्यांचं अनुसरण आपण करतो, त्यांच्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी. आणि जे "का" ने सुरुवात करतात, त्यांच्यातच सभोवतालच्या लोकांना प्रेरीत करण्याची क्षमता असते किंवा ते त्यांना प्रेरीत करू शकणाऱ्यांना शोधतात. आपला खूप आभारी आहे. (टाळ्या)