1 00:00:00,860 --> 00:00:05,176 आपल्या गृहितकानुसार गोष्टी घडत नाहीत तेव्हा काय म्हणाल? 2 00:00:05,176 --> 00:00:07,976 खरेतर ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं द्याल 3 00:00:08,000 --> 00:00:11,976 जेव्हा सर्व गृहीतकांना झुगारुन काहीजण यश संपादन करु शकतात? 4 00:00:12,000 --> 00:00:13,976 उदाहरणार्थ: 5 00:00:14,000 --> 00:00:15,976 ऍपल हि कंपनी एवढी नाविन्यपूर्ण का आहे? 6 00:00:16,000 --> 00:00:17,976 वर्षानुवर्षे, 7 00:00:18,000 --> 00:00:20,976 तिच्या सर्व स्पर्धकांपेक्षा ती अधिक नाविन्यपूर्ण आहे. 8 00:00:21,000 --> 00:00:23,216 आणि तरीसुद्धा ती एक संगणक बनवणारी कंपनी आहे. 9 00:00:23,216 --> 00:00:24,976 ती इतर सगळ्यांसारखीच आहे. 10 00:00:25,000 --> 00:00:27,044 तिच्याकडेही तीच प्रतिभा उपलब्ध आहे, 11 00:00:27,044 --> 00:00:28,675 त्याच सहकारी कंपन्या आहेत, 12 00:00:28,675 --> 00:00:30,525 तेच सल्लागार, तीच माध्यमं आहेत. 13 00:00:30,525 --> 00:00:33,579 तरीसुद्धा तिच्याकडे काहीतरी वेगळं आहे असं का वाटतं? 14 00:00:35,000 --> 00:00:38,976 मार्टिन ल्युथर किंग यांनी नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व का केलं? 15 00:00:39,000 --> 00:00:42,976 अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीपूर्वी दुःख सहन केलेले ते एकमेव नव्हते 16 00:00:43,000 --> 00:00:45,745 आणि त्या काळातील एकमेव महान वक्ता तर नक्कीच नव्हते. 17 00:00:45,769 --> 00:00:46,976 मग तेच का? 18 00:00:47,000 --> 00:00:49,976 आणि राईट बंधूंनाच का कळलं 19 00:00:50,000 --> 00:00:52,976 नियंत्रीत, शक्तीशाली मानवी उड्डाणाबद्दल 20 00:00:53,000 --> 00:00:55,150 जेव्हा इतरही संघ होते, 21 00:00:55,174 --> 00:00:58,047 जे अधिक पात्रतेचे होते, ज्यांच्याकडे अधिक पैसा होता -- 22 00:00:58,071 --> 00:01:00,976 आणि ज्यांना शक्तीशाली मानवी उड्डाण करता आलं नाही, 23 00:01:01,000 --> 00:01:02,975 आणि राईट बंधूंनी ज्यांना पराभूत केलं. 24 00:01:02,999 --> 00:01:04,887 हे काहीतरी वेगळं आहे. 25 00:01:06,125 --> 00:01:09,976 साधारण साडेतीन वर्षांपूर्वी मला एक शोध लागला. 26 00:01:10,000 --> 00:01:15,976 आणि जग कसं चालतं याबद्दलचे माझे विचार या शोधामुळे पूर्णतः बदलले, 27 00:01:16,000 --> 00:01:20,000 आणि जगात मी कसा वावरतो यातही खूपच बदल झाला. 28 00:01:22,000 --> 00:01:24,976 असं लक्षात येतं कि, त्याचा एक नमुना आहे. 29 00:01:25,000 --> 00:01:28,976 असं लक्षात येतं कि, जगातील सर्व प्रेरणादायी नेते आणि संस्था, 30 00:01:29,000 --> 00:01:32,015 मग ती एपल असो किंवा मार्टिन ल्युथर किंग किंवा राईट बंधू असोत, 31 00:01:32,039 --> 00:01:35,976 ते सगळे एकाच पद्धतीने विचार, कृती आणि संवाद करतात. 32 00:01:36,000 --> 00:01:39,976 आणि ते इतर प्रत्येकापेक्षा पूर्णतः विरुद्ध आहे. 33 00:01:40,000 --> 00:01:41,976 मी फक्त ते सुसूत्रित केलं, 34 00:01:42,000 --> 00:01:45,976 आणि कदाचित ती जगातील सर्वांत सोपी कल्पना आहे. 35 00:01:46,000 --> 00:01:48,000 मी त्याला सुवर्ण वर्तुळ म्हणतो. 36 00:01:56,296 --> 00:01:58,976 का? कसं? काय? 37 00:01:59,000 --> 00:02:00,976 या सोप्या कल्पनेवरून कळतं 38 00:02:01,000 --> 00:02:04,976 कि काही संस्था आणि काही नेते प्रेरित का करू शकतात जे इतरांना जमत नाही. 39 00:02:05,000 --> 00:02:06,976 मी पटकन संज्ञा सांगतो. 40 00:02:07,000 --> 00:02:09,976 या ग्रहावरील प्रत्येक माणसाला, प्रत्येक संघटनेला 41 00:02:10,000 --> 00:02:12,722 ते काय करतात हे माहित आहे, १०० टक्के. 42 00:02:14,000 --> 00:02:15,976 ते कसं करतात हे काहींना माहित आहे, 43 00:02:16,000 --> 00:02:18,684 त्याला तुम्ही तुमचं विशिष्ट मूल्य विधान म्हणा 44 00:02:18,708 --> 00:02:20,976 किंवा मालकी प्रक्रिया किंवा अद्वितीय गुण म्हणा. 45 00:02:21,000 --> 00:02:25,711 पण अगदी थोड्या लोकांना किंवा संस्थांना कळतं ते जे करतात ते का करतात. 46 00:02:25,711 --> 00:02:28,486 आणि "का" यावर माझं म्हणणं "नफा कमवण्यासाठी" असं नाही. 47 00:02:28,486 --> 00:02:30,646 ती निष्पत्ती आहे. ती नेहमी निष्पत्तीच असते. 48 00:02:30,646 --> 00:02:33,176 "का" म्हणजे मला म्हणायचं आहे: तुमचा उद्देश काय? 49 00:02:33,176 --> 00:02:35,219 तुमचं निमित्त काय? तुमची कशावर श्रद्धा आहे? 50 00:02:35,219 --> 00:02:37,976 तुमची संघटना अस्तित्वात का आहे? 51 00:02:38,000 --> 00:02:40,368 तुम्ही सकाळी बिछान्यातून का उठता? 52 00:02:40,392 --> 00:02:42,976 आणि कोणाला कशाला काय वाटायला हवं? 53 00:02:43,000 --> 00:02:45,385 याचा परिणाम, आपली विचारपद्धती, आपली कृती, 54 00:02:45,385 --> 00:02:48,695 आपली संवादपद्धती बाह्यरंगातून अंतरंगात जाणारी आहे, हे स्वाभाविक आहे. 55 00:02:48,695 --> 00:02:50,960 आपण सुस्पष्टतेकडून अस्पष्टतेकडे जातो. 56 00:02:50,960 --> 00:02:53,976 पण प्रेरित नेते आणि प्रेरित संघटना -- 57 00:02:54,000 --> 00:02:57,595 त्यांचे आकारमान, त्यांचा उद्योग लक्षात न घेता -- 58 00:02:57,619 --> 00:03:00,745 सर्वजण विचार, कृती आणि संवाद अंतरंगातून बाहेर करतात. 59 00:03:02,547 --> 00:03:03,976 मी एक उदाहरण देतो. 60 00:03:04,000 --> 00:03:07,388 मी एपलबद्दल सांगतो कारण ते समजायला सोपं आणि प्रत्येकाला कळू शकतं. 61 00:03:07,412 --> 00:03:09,983 जर एपल कंपनी इतर प्रत्येकासारखी असती, 62 00:03:10,007 --> 00:03:13,487 तिचा विपणन संदेश असा असला असता: 63 00:03:13,511 --> 00:03:14,996 "आम्ही अप्रतिम संगणक बनवतो. 64 00:03:16,000 --> 00:03:19,976 त्यांची रचना सुंदर आहे, ते वापरायला सोपे आहेत आणि वापरणाऱ्यासाठी सोयीचे आहेत. 65 00:03:20,000 --> 00:03:21,289 एक घ्यायचा का?" 66 00:03:22,194 --> 00:03:23,195 "एकदम रटाळ." 67 00:03:23,219 --> 00:03:24,976 आपल्यातले बरेचजण असाच संवाद साधतात. 68 00:03:25,000 --> 00:03:27,488 बरंचसं विपणन आणि विक्री अशीच होते, 69 00:03:27,512 --> 00:03:29,607 आपण एकमेकांशी असाच संवाद साधतो. 70 00:03:29,631 --> 00:03:31,402 आपण जे करतो ते आपण सांगतो, 71 00:03:31,426 --> 00:03:33,705 आपण कसे वेगळे आणि अधिक चांगले आहोत ते सांगतो 72 00:03:33,705 --> 00:03:35,566 आणि आपण कुठल्यातरी कृतीची अपेक्षा करतो, 73 00:03:35,566 --> 00:03:37,076 खरेदी, मत, तत्सम काहीतरी. 74 00:03:37,100 --> 00:03:38,766 हि आमची विधी सल्लागार कंपनी आहे: 75 00:03:38,766 --> 00:03:41,102 आमच्या उत्तम कायदेपंडितांचे मोठमोठे पक्षकार आहेत, 76 00:03:41,102 --> 00:03:43,278 आम्ही नेहमी आमच्या पक्षकारांसाठी काम करतो. 77 00:03:43,278 --> 00:03:44,686 हि आमची नवीन गाडी आहे: 78 00:03:44,686 --> 00:03:48,082 तिची इंधनक्षमता उत्तम आहे, तिच्या आसनांना चामड्याची आवरणं आहेत. 79 00:03:48,082 --> 00:03:49,375 आमची गाडी विकत घ्या. 80 00:03:49,375 --> 00:03:50,626 पण ते कंटाळवाणं आहे. 81 00:03:50,626 --> 00:03:52,547 एपल कंपनी कसा संवाद साधते ते बघा. 82 00:03:53,000 --> 00:03:56,726 "आम्ही जे करतो त्यामागे सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा आमचा मानस असतो. 83 00:03:56,726 --> 00:03:59,256 आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करण्यावर विश्वास ठेवतो. 84 00:03:59,256 --> 00:04:01,765 सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा आमचा मार्ग म्हणजे 85 00:04:01,765 --> 00:04:05,976 आमच्या उत्पादनांची रचना सुंदर करणे, 86 00:04:06,000 --> 00:04:07,976 ती वापरायला सोपी आणि सोयीची बनवणे. 87 00:04:08,000 --> 00:04:10,639 आम्ही उत्तम संगणक बनवतो हा निव्वळ योगायोग आहे. 88 00:04:10,663 --> 00:04:11,717 एक हवाय का?" 89 00:04:12,892 --> 00:04:14,195 अगदीच वेगळं, बरोबर? 90 00:04:14,219 --> 00:04:16,466 तुम्ही माझ्याकडून संगणक खरेदी करायला तयार आहात. 91 00:04:16,466 --> 00:04:18,398 मी माहितीची क्रमवारी फक्त उलटी केली. 92 00:04:18,422 --> 00:04:22,294 यावरून आपल्याला काय सिद्ध होतं कि लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; 93 00:04:22,318 --> 00:04:24,723 लोक तुम्ही ते करता हे खरेदी करतात. 94 00:04:24,747 --> 00:04:28,976 यावरून हे स्पष्ट होतं कि या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती 95 00:04:29,000 --> 00:04:31,976 एपलकडून संगणक किती आरामात घेऊ शकते. 96 00:04:32,000 --> 00:04:33,976 पण आपण अगदी आरामात 97 00:04:34,000 --> 00:04:36,976 एपलचा MP3 प्लेयर किंवा एपलचा फोन, 98 00:04:37,000 --> 00:04:38,611 किंवा एपलचा DVR घेऊ शकतो. 99 00:04:38,611 --> 00:04:41,848 मी आधी म्हणल्याप्रामणे, एपल हि एक फक्त संगणक बनवणारी कंपनी आहे. 100 00:04:41,848 --> 00:04:45,386 संरचनेनुसार त्यांच्यात आणि त्यांच्या स्पर्धकांमध्ये काहीही फरक नाही. 101 00:04:45,386 --> 00:04:48,628 त्यांचे स्पर्धकही हि सगळी उत्पादनं बनवण्यासाठी तेवढेच पात्र आहेत. 102 00:04:48,628 --> 00:04:50,316 वस्तुस्थितीत, त्यांनी प्रयत्न केला. 103 00:04:50,316 --> 00:04:53,456 काही वर्षांपूर्वी, गेटवे कंपनीने सपाट पडद्याचे टिव्ही आणले. 104 00:04:53,456 --> 00:04:56,509 सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच बनवण्यास ते पूर्णतः पात्र आहेत. 105 00:04:56,509 --> 00:04:59,496 अनेक वर्षांपासून ते सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच बनवताहेत. 106 00:04:59,496 --> 00:05:01,353 कुणीच एकही संच विकत घेतला नाही. 107 00:05:02,657 --> 00:05:07,976 डेल कंपनीने MP3 प्लेयर आणि PDA आणले, 108 00:05:08,000 --> 00:05:09,976 आणि ते उत्तम प्रतीची उत्पादनं बनवतात, 109 00:05:10,000 --> 00:05:12,976 आणि ते अगदी योग्य रचना असलेली उत्पादनं बनवतात -- 110 00:05:13,000 --> 00:05:14,800 आणि कुणीच एकही उत्पादन घेतलं नाही. 111 00:05:14,824 --> 00:05:17,706 वस्तुस्थितीत, त्याविषयी बोलताना, आपण कल्पनाही करू शकत नाही 112 00:05:17,706 --> 00:05:19,428 डेलचा MP3 प्लेयर विकत घेण्याचा. 113 00:05:19,428 --> 00:05:22,276 एका संगणक बनवणाऱ्या कंपनीकडून तुम्ही तो का विकत घ्याल? 114 00:05:22,276 --> 00:05:24,317 पण आपण रोज खरेदी करतो. 115 00:05:24,317 --> 00:05:27,802 लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; ते तुम्ही का करता याला मोल देतात. 116 00:05:27,802 --> 00:05:31,521 तुमच्याकडे जे आहे त्याची गरज ज्याला आहे त्यासोबत व्यवसाय करणे हे लक्ष्य नाही. 117 00:05:31,521 --> 00:05:36,428 तुम्ही जे मानता त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांबरोबर व्यवसाय करणे हे लक्ष्य आहे. 118 00:05:36,428 --> 00:05:37,627 हे उत्तम आहे कि: 119 00:05:37,651 --> 00:05:40,526 मी जे काही तुम्हांला सांगतो आहे ते माझं वैयक्तिक मत नाही. 120 00:05:40,526 --> 00:05:42,976 त्याचं मूळ जीवशास्त्रीय तत्त्वांमध्ये आहे. 121 00:05:43,000 --> 00:05:44,976 मानसशास्र नव्हे, जीवशास्त्र. 122 00:05:45,000 --> 00:05:47,739 मानवी मेंदूला जर आडवा छेद देऊन तुम्ही बघितलंत, 123 00:05:47,763 --> 00:05:50,396 वरपासून खाली, मानवी मेंदू खरंतर भंगलेला आहे 124 00:05:50,420 --> 00:05:51,976 तीन मुख्य घटकांमध्ये 125 00:05:52,000 --> 00:05:54,976 ज्याचा सुयोग्य संबंध सुवर्ण वर्तुळाशी आहे. 126 00:05:55,000 --> 00:05:57,976 आपला नवीनतम मेंदू, मानवी मेंदू, 127 00:05:58,000 --> 00:05:59,976 आपल्या मोठ्या मेंदूचा बाहेरील थर, 128 00:06:00,000 --> 00:06:01,976 "काय" या पातळीशी संबंधीत आहे. 129 00:06:02,000 --> 00:06:03,976 मोठया मेंदूचा बाहेरील थर जबाबदार असतो 130 00:06:04,000 --> 00:06:07,976 तो तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार आणि बोलीसाठी. 131 00:06:08,000 --> 00:06:10,976 मधले दोन भाग हे लिंबिक मेंदूचे असतात, 132 00:06:11,000 --> 00:06:14,746 आणि आपले लिंबिक मेंदू जबाबदार असतात ते आपल्या सगळ्या भावनांसाठी, 133 00:06:14,746 --> 00:06:16,976 जसा विश्वास आणि निष्ठा. 134 00:06:17,000 --> 00:06:19,143 मानवी वर्तनालादेखील तोच कारणीभूत असतो, 135 00:06:19,167 --> 00:06:20,976 सर्व निर्णय घेणे, 136 00:06:21,000 --> 00:06:23,976 आणि भाषेसाठी त्याची क्षमता नसते. 137 00:06:24,000 --> 00:06:27,636 दुसऱ्या शब्दांत, जेव्हा आपण बाह्यरंगातून अंतरंगाशी संवाद साधतो, 138 00:06:27,636 --> 00:06:30,143 लोकांना पुष्कळश्या अवघड माहितीचे आकलन होते 139 00:06:30,167 --> 00:06:32,976 जसं कि वैशिष्ट्ये आणि फायदे आणि तथ्य आणि आकडे. 140 00:06:33,000 --> 00:06:34,976 त्याच्याने वर्तन ठरत नाही. 141 00:06:35,000 --> 00:06:37,096 जेव्हा आपण अंतरंगातून बाहेर संवाद साधू शकतो, 142 00:06:37,120 --> 00:06:39,359 आपण मेंदूच्या त्या भागाशी बोलत असतो जो 143 00:06:39,383 --> 00:06:40,976 वर्तन नियंत्रित करतो, 144 00:06:41,000 --> 00:06:44,976 आणि मग आपल्या उक्ती आणि कृतीच्या मूर्त गोष्टींनी लोकांना युक्तीवाद करू देतो. 145 00:06:45,000 --> 00:06:47,550 ह्याच जागेतून महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. 146 00:06:47,574 --> 00:06:50,976 कधीकधी तुम्ही कोणालातरी सर्व सत्य आणि आकडेमोड सांगू शकता, 147 00:06:51,000 --> 00:06:53,722 आणि ते म्हणतात, "मला ते सगळं माहीत आहे, 148 00:06:53,746 --> 00:06:55,276 पण ते योग्य वाटत नाही" 149 00:06:55,300 --> 00:06:57,840 आपण योग्य "वाटत" नाही असं क्रियापद का वापरतो? 150 00:06:57,864 --> 00:07:00,639 कारण मेंदूचा जो भाग निर्णय प्रक्रिया नियंत्रित करतो 151 00:07:00,663 --> 00:07:01,976 तो भाषा नियंत्रित करत नाही. 152 00:07:02,000 --> 00:07:03,461 आपण म्हणू शकतो कि, 153 00:07:03,485 --> 00:07:05,538 "मला माहीत नाही. हे काही योग्य वाटत नाही" 154 00:07:05,562 --> 00:07:08,976 किंवा तुम्ही कधी म्हणता तुम्ही तुमच्या मनाचं किंवा आत्म्याचं ऐकत आहात. 155 00:07:09,000 --> 00:07:11,672 हे सांगणारा पहिला मी नाही कि ते शरीराचे वेगळे अवयव नाहीत 156 00:07:11,696 --> 00:07:12,976 वर्तन नियंत्रित करणारे. 157 00:07:13,000 --> 00:07:15,143 हे सगळं इथे घडतं, तुमच्या लिंबिक मेंदूमध्ये, 158 00:07:15,167 --> 00:07:18,453 मेंदूचा तो भाग जो निर्णय प्रक्रिया नियंत्रित करतो भाषा नव्हे. 159 00:07:18,477 --> 00:07:20,976 पण तुम्हाला जर माहित नसेल तुम्ही जे करता ते का करता, 160 00:07:21,000 --> 00:07:23,976 आणि लोक जर तुम्ही जे करता ते का करता याला प्रतिसाद देत असतील, 161 00:07:24,000 --> 00:07:26,976 तर मग लोकांना प्रवृत्त कसं कराल 162 00:07:27,000 --> 00:07:29,048 मत देण्यासाठी किंवा काही विकत घेण्यासाठी, 163 00:07:29,072 --> 00:07:30,976 किंवा महत्त्वाचं म्हणजे इमानी राहण्यासाठी 164 00:07:31,000 --> 00:07:33,976 आणि तुम्ही जे करता याचा एक भाग होण्यासाठी. 165 00:07:34,000 --> 00:07:37,050 ज्या लोकांना तुमच्याकडे असलेलं विकणं हे लक्ष्य नाही; लक्ष्य आहे 166 00:07:37,074 --> 00:07:39,976 त्यांना विकणं जे तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या गोष्टी मानतात 167 00:07:40,000 --> 00:07:43,976 ज्या लोकांना नोकरीची गरज आहे त्यांना कामावर ठेवणं हे लक्ष्य नाही; 168 00:07:44,000 --> 00:07:46,976 ते आहे त्या लोकांच्या नोकरीचं जे तुमच्यासारखा विश्वास ठेवतात 169 00:07:47,000 --> 00:07:49,120 मी नेहमी म्हणतो, असं बघा कि, 170 00:07:49,144 --> 00:07:54,976 एखादं काम करू शकतात म्हणून तुम्ही लोकांना कामावर ठेवलं, तर ते पैशासाठी काम करतील, 171 00:07:55,000 --> 00:07:56,791 पण त्यांचा विश्वास संलग्न असेल 172 00:07:56,815 --> 00:07:59,250 तर ते जीव ओतून, घाम गाळून आणि अश्रु ढाळून काम करतील. 173 00:07:59,274 --> 00:08:02,976 राईट बंधुंसारखं दुसरं उत्तम उदाहरण नाही. 174 00:08:03,000 --> 00:08:06,614 बऱ्याच लोकांना सॅम्युएल पियरपॉईंट लँगले माहित नाहीत. 175 00:08:06,638 --> 00:08:08,976 आणि मागे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, 176 00:08:09,000 --> 00:08:12,143 शक्तिशाली मानवी उड्डाणाचा पाठपुरावा आजच्या डॉट कॉम सारखा होता. 177 00:08:12,167 --> 00:08:13,976 प्रत्येकजण त्याचा प्रयत्न करत होता. 178 00:08:14,000 --> 00:08:16,976 आणि सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेकडे, आपण जो मानतो, 179 00:08:17,000 --> 00:08:19,673 तो यशाचा मंत्र होता. 180 00:08:19,697 --> 00:08:21,396 आतासुद्धा, तुम्ही लोकांना विचारा, 181 00:08:21,420 --> 00:08:24,039 "तुमचं उत्पादन किंवा तुमची कंपनी अपयशी का ठरली?" 182 00:08:24,063 --> 00:08:26,324 आणि लोक तुम्हांला नेहमी तेच संयोजन सांगतील 183 00:08:26,348 --> 00:08:27,769 त्याच तीन गोष्टींचं: 184 00:08:27,793 --> 00:08:30,770 अपुरं भांडवल, अयोग्य लोक आणि बाजाराची खराब परिस्थिती. 185 00:08:30,794 --> 00:08:33,605 नेहमी याच तीन गोष्टी असतात, बघू या कसं काय ते. 186 00:08:34,422 --> 00:08:35,976 सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेला 187 00:08:36,000 --> 00:08:38,976 युद्ध विभागाकडून ५०,००० डॉलर दिले गेले होते 188 00:08:39,000 --> 00:08:40,976 हे उडणारं यंत्र काय आहे ते बघण्यासाठी. 189 00:08:41,000 --> 00:08:42,571 प्रश्न भांडवलाचा नव्हता. 190 00:08:42,595 --> 00:08:44,976 त्यांचा हार्वर्डशी संबंध होता, 191 00:08:45,000 --> 00:08:48,000 आणि स्मिथसोनियन संस्थेत काम केलं होतं, लोकांशी उत्तम संबंध होता; 192 00:08:48,024 --> 00:08:49,976 त्या काळातील मोठे लोक त्यांना ठाऊक होते. 193 00:08:50,000 --> 00:08:53,976 पैशांसाठी काम करणारे उत्तम बुद्धिमत्तेचे लोक त्यांनी कामावर ठेवले होते 194 00:08:54,000 --> 00:08:55,976 आणि बाजारही तेजीत होता. 195 00:08:56,000 --> 00:08:58,976 द न्यु यॉर्क टाईम्स त्यांना सगळीकडे प्रसिद्धी देत होता, 196 00:08:59,000 --> 00:09:00,976 व प्रत्येकजण लँगलेंना प्रोत्साहन देत होता. 197 00:09:01,000 --> 00:09:03,988 तरीही सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेबद्दल आपण कधीही कसंच ऐकलं नाही? 198 00:09:04,485 --> 00:09:06,626 काहीशे मैलांवर डेटन ओहायोमध्ये, 199 00:09:07,579 --> 00:09:08,976 ऑर्विल आणि विल्बर राईट, 200 00:09:09,000 --> 00:09:12,976 यांच्याकडे आपण समजत असलेला यशाचा मंत्र वैगैरे काही नव्हतं. 201 00:09:13,000 --> 00:09:14,976 त्यांच्याकडे भांडवल नव्हतं; 202 00:09:15,000 --> 00:09:18,239 सायकलच्या दुकानातील कमाई त्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वापरली; 203 00:09:18,263 --> 00:09:20,549 राईट बंधुंच्या संघातील एकही व्यक्ती, 204 00:09:20,573 --> 00:09:21,976 महाविद्यालयात शिकलेला नव्हता, 205 00:09:22,000 --> 00:09:23,976 ऑर्विल आणि विल्बरसुद्धा; 206 00:09:24,000 --> 00:09:26,976 द न्यु यॉर्क टाईम्सने त्यांचा कुठेही पाठपुरावा केलेला नव्हता. 207 00:09:27,000 --> 00:09:28,976 फरक हा होता, 208 00:09:29,000 --> 00:09:32,976 ऑर्विल आणि विल्बर एका ध्येयाने, उद्देशाने, विश्वासाने प्रेरीत होते. 209 00:09:33,000 --> 00:09:36,976 त्यांचा असा विश्वास होता कि त्यांना जर या उडत्या यंत्राची उकल झाली, 210 00:09:37,000 --> 00:09:38,797 तर जगाची दिशाच बदलेल. 211 00:09:40,384 --> 00:09:42,333 सॅम्युएल पियरपॉईंट लँगले वेगळे होते. 212 00:09:42,357 --> 00:09:44,976 त्यांना श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचं होतं. 213 00:09:45,000 --> 00:09:46,976 ते फळाचा पाठपुरावा करत होते. 214 00:09:47,000 --> 00:09:48,976 ते श्रीमंतीचा पाठपुरावा करत होते. 215 00:09:49,000 --> 00:09:50,954 आणि पहा काय घडलं ते. 216 00:09:50,978 --> 00:09:54,524 जे लोक राईट बंधुंच्या स्वप्नावर विश्वास ठेवणारे होते 217 00:09:54,548 --> 00:09:56,976 त्यांनी त्यांच्यासोबत जीव ओतून काम केलं. 218 00:09:57,000 --> 00:09:58,976 इतरांनी फक्त पगारासाठी काम केलं. 219 00:09:59,000 --> 00:10:02,195 ते वर्णनं सांगतात कि राईट बंधू दरवेळी बाहेर पडताना त्यांना कसे, 220 00:10:02,219 --> 00:10:04,226 सुट्या भागांचे पाच संच न्यावे लागत असत, 221 00:10:04,250 --> 00:10:07,264 कारण संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत ते तितक्या वेळा कोसळत असत. 222 00:10:08,666 --> 00:10:12,683 आणि, अखेरीस, १७ डिसेंबर, १९०३ ला, 223 00:10:12,707 --> 00:10:14,976 राईट बंधूंनी उड्डाण केलं, 224 00:10:15,000 --> 00:10:17,048 आणि ते अनुभवण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. 225 00:10:17,072 --> 00:10:19,151 आपल्याला त्याबद्दल काही दिवसांनंतर कळलं. 226 00:10:20,754 --> 00:10:24,777 आणि लँगले हे चुकीच्या गोष्टीने प्रेरित होते याचा आणखी पुरावा: 227 00:10:24,801 --> 00:10:27,135 ज्या दिवशी राईट बंधूंनी उड्डाण केलं. 228 00:10:27,159 --> 00:10:28,160 ते बाहेर पडले. 229 00:10:28,184 --> 00:10:29,976 ते म्हणू शकले असते, 230 00:10:30,000 --> 00:10:31,976 "हा एक विस्मयकारी शोध आहे, मित्रांनो, 231 00:10:32,000 --> 00:10:34,976 व तुमच्या तंत्रज्ञानाधारे मी सुधारणा करेन," पण ते म्हणले नाहीत. 232 00:10:35,000 --> 00:10:38,591 ते प्रथम नव्हते, श्रीमंत झाले नाही, प्रसिद्ध झाले नाही, म्हणून बाहेर पडले. 233 00:10:39,710 --> 00:10:42,210 लोकांच्या लेखी मोल नाही त्यामागचा हेतु महत्वाचा. 234 00:10:42,234 --> 00:10:43,976 जे तुम्ही मानता त्याबद्दल बोललात तर, 235 00:10:44,000 --> 00:10:46,976 ते मानणाऱ्यांना तुम्ही आकर्षित कराल. 236 00:10:47,000 --> 00:10:50,334 पण जे तुम्ही मानता तेच मानणाऱ्यांना आकर्षित करणं का महत्त्वाचं आहे? 237 00:10:52,404 --> 00:10:54,957 नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम असं काहीसं म्हणतात, 238 00:10:54,981 --> 00:10:57,491 जरी नियम ठाऊक नसेल तरी, त्याची परिभाषा माहिती आहे. 239 00:10:57,515 --> 00:11:01,976 आपल्या लोकसंख्येतील पहिले २.५% लोक आपले नावीन्यतेचे प्रवर्तक आहेत. 240 00:11:02,000 --> 00:11:06,213 आपल्या लोकसंख्येतील पुढचे १३.५% लोक त्याची तत्पर स्वीकृती करणारे आहेत. 241 00:11:07,252 --> 00:11:09,096 पुढचे ३४% लोक हे अग्रेसर बहुसांख्यिक, 242 00:11:09,120 --> 00:11:11,453 हळू जाणारे बहुसांख्यिक आणि रेंगाळणारे आहेत. 243 00:11:12,445 --> 00:11:14,976 हे लोक टच-टोन फोन एवढ्याचसाठी घेतात कारण 244 00:11:15,000 --> 00:11:17,239 नंबर फिरवायचे फोन आता उपलब्ध नाहीत. 245 00:11:17,263 --> 00:11:18,976 (हशा) 246 00:11:19,000 --> 00:11:21,976 या मोजपट्टीवर आपण सगळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी असतो, 247 00:11:22,000 --> 00:11:24,976 पण नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम आपल्याला काय सांगतो 248 00:11:25,000 --> 00:11:29,976 कि तुम्हांला जर व्यापक यश हवं असेल किंवा एखाद्या कल्पनेची व्यापक स्वीकृती हवी असेल, 249 00:11:30,000 --> 00:11:33,976 तर ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही 250 00:11:34,000 --> 00:11:36,976 बाजार प्रवेशाचा १५ ते १८ टक्क्यांपर्यंतचा पल्ला गाठत नाही, 251 00:11:37,000 --> 00:11:39,976 आणि नंतर व्यवस्थेत उलथापालथ होते. 252 00:11:40,000 --> 00:11:43,245 मला कंपन्यांना विचारायला आवडतं "नवीन व्यवसाय किती झाला?" 253 00:11:43,269 --> 00:11:45,902 त्यांना तुम्हाला अभिमानाने सांगायला आवडतं "जवळपास १०%". 254 00:11:45,926 --> 00:11:48,069 तसं तर तुम्ही १०% ग्राहकांमध्ये अडखळू शकता. 255 00:11:48,093 --> 00:11:50,039 आपल्याकडे १०% आहे ज्यांना अगदी सहज मिळतं. 256 00:11:50,063 --> 00:11:51,776 आपण त्यांना असंच म्हणतो, खरंय ना? 257 00:11:51,800 --> 00:11:54,277 ते त्या आंतरिक भावनेसारखं आहे "ते त्यांना सहज मिळतं" 258 00:11:54,301 --> 00:11:56,737 प्रश्न हा आहे: ज्यांना हे कळतं त्यांना कसं ओळखायचं 259 00:11:56,761 --> 00:11:59,405 देवाणघेवाण न करता आणि ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत? 260 00:11:59,429 --> 00:12:02,976 म्हणून हे असं आहे हि छोटी पोकळी तुम्हाला भरून काढावी लागेल, 261 00:12:03,000 --> 00:12:05,381 जेफ्री मूर म्हणतात त्याप्रमाणे "दरी ओलांडणे" -- 262 00:12:05,405 --> 00:12:08,976 कारण हे बघा, लवकर कृती करणारे बहुसांख्यिक तोपर्यंत काही आजमावणार नाहीत 263 00:12:09,000 --> 00:12:12,976 जोपर्यंत कुणा दुसऱ्याने ते आजमावलं नसेल. 264 00:12:13,000 --> 00:12:15,976 आणि लोक जे नावीन्यतेचे प्रवर्तक व तत्पर स्वीकृती करणारे आहेत, 265 00:12:16,000 --> 00:12:18,191 ते सहजतेने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. 266 00:12:18,215 --> 00:12:20,976 ते स्वाभाविक निर्णय घेण्यात त्यांना सहजता वाटते 267 00:12:21,000 --> 00:12:24,976 जे त्यांच्या जगाबद्दलच्या विश्वासाने प्रेरीत असतात 268 00:12:25,000 --> 00:12:26,976 आणि केवळ उत्पादन आहे यावर विसंबून नसतात. 269 00:12:27,000 --> 00:12:29,647 हे ते लोक आहेत जे सहा तास रांगेत उभे राहिले 270 00:12:29,671 --> 00:12:31,807 एका आयफोनसाठी जेव्हा ते प्रथम बाजारात आले, 271 00:12:31,831 --> 00:12:34,976 जेव्हा तुम्हाला एखादा पुढच्या आठवड्यात सहज मिळाला असता. 272 00:12:35,000 --> 00:12:37,143 हे ते लोक आहेत ज्यांनी ४०,००० डॉलर खर्च केले 273 00:12:37,167 --> 00:12:39,976 सपाट पडद्याचा टिव्ही घेण्यासाठी जेव्हा ते प्रथम बाजारात आले, 274 00:12:40,000 --> 00:12:42,309 जरी त्याचं तंत्रज्ञान हलक्या प्रतीचं होतं तरीही. 275 00:12:43,000 --> 00:12:46,976 आणि तंत्रज्ञान उत्कृष्ट होतं म्हणून त्यांनी हे केलं नाही; 276 00:12:47,000 --> 00:12:48,976 ते त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी केलं. 277 00:12:49,000 --> 00:12:50,976 कारण त्यांना अग्रेसर राहायचं होतं. 278 00:12:51,000 --> 00:12:53,477 लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत; तिच्या हेतुला देतात 279 00:12:53,501 --> 00:12:56,976 आणि तुम्ही काय करता हे तुमचा कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. 280 00:12:57,000 --> 00:13:00,976 वास्तविक पाहता, लोक त्या गोष्टी करतात ज्या त्यांचा विश्वास सिद्ध करतात. 281 00:13:01,000 --> 00:13:05,976 त्या व्यक्तीने आयफोन पहिल्या सहा तासांत घेण्याचं कारण, 282 00:13:06,000 --> 00:13:07,976 सहा तास रांगेत उभं राहण्याचं कारण, 283 00:13:08,000 --> 00:13:10,381 जगाबद्दलचा त्यांचा विश्वास होय, 284 00:13:10,405 --> 00:13:12,405 आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असावा हे आहे. 285 00:13:12,429 --> 00:13:13,461 ते अग्रणी होते. 286 00:13:13,485 --> 00:13:15,976 लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत तर हेतुला देतात. 287 00:13:16,000 --> 00:13:17,976 मी तुम्हांला एक प्रसिद्ध उदाहरण देतो, 288 00:13:18,000 --> 00:13:22,563 नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे एक प्रसिद्ध अपयश आणि एक प्रसिद्ध यश. 289 00:13:22,587 --> 00:13:23,976 प्रथम, एक प्रसिद्ध अपयश. 290 00:13:24,000 --> 00:13:25,976 ते एक व्यावसायिक उदाहरण आहे. 291 00:13:26,000 --> 00:13:28,237 आपण आधी म्हणल्याप्रमाणे, यशाचा मूलमंत्र 292 00:13:28,261 --> 00:13:31,653 हा भांडवल, योग्यतेचे लोक आणि बाजाराची योग्य परिस्थिती आहे. 293 00:13:31,677 --> 00:13:33,422 मग तुम्हांला यश मिळायला हवं. 294 00:13:33,446 --> 00:13:34,976 टिव्हो कंपनीचं बघा. 295 00:13:35,000 --> 00:13:37,715 आठ ते नऊ वर्षांपूर्वी टिव्हो कंपनी सुरू झाल्यापासून, 296 00:13:37,739 --> 00:13:38,977 ते आजतागायत, 297 00:13:39,001 --> 00:13:42,651 बाजारातील उत्कृष्ट गुणवत्तेचे ते एकमेव उत्पादन आहे, 298 00:13:42,675 --> 00:13:44,548 याबाबत कुठचेही दुमत नाही. 299 00:13:45,595 --> 00:13:47,402 त्यांच्याकडे पुष्कळ भांडवल होतं. 300 00:13:47,426 --> 00:13:49,125 बाजारातील परिस्थिती उत्तम होती. 301 00:13:49,149 --> 00:13:50,976 म्हणजे, आपल्यासाठी टिव्हो क्रियापद आहे 302 00:13:51,000 --> 00:13:54,259 मी नेहमी फालतू अशा टाईम वॉर्नर कंपनीच्या DVR वर गोष्टी टिव्हो करतो 303 00:13:54,283 --> 00:13:56,326 (हशा) 304 00:13:56,799 --> 00:13:58,976 पण टिव्हो हे एक व्यावसायिक अपयश आहे. 305 00:13:59,000 --> 00:14:00,976 त्यांनी कधीही पैसा कमावला नाही. 306 00:14:01,000 --> 00:14:02,976 आणि जेव्हा ते शेयर बाजारात आले, 307 00:14:03,000 --> 00:14:04,976 त्यांच्या शेयरची किंमत ३० का ४० डॉलर होती 308 00:14:05,000 --> 00:14:07,429 ती घसरली, आणि नंतर ती कधीही १० डॉलरच्यावर गेली नाही. 309 00:14:07,453 --> 00:14:09,976 वास्तविक पाहता, ती कधी सहा डॉलरच्यावर गेली नाही, 310 00:14:10,000 --> 00:14:11,976 एखाद दुसऱ्या शीघ्र वाढीचा प्रसंग वगळता. 311 00:14:12,000 --> 00:14:14,334 कारण असं बघा, टिव्होने जेव्हा उत्पादन बाजारात आणलं 312 00:14:14,358 --> 00:14:16,976 त्यांच्याकडे काय आहे हे त्यांनी सांगितलं. 313 00:14:17,000 --> 00:14:20,454 ते म्हणाले "आमचं उत्पादन टिव्हीवरचं प्रक्षेपण थांबवतं, 314 00:14:20,478 --> 00:14:24,976 जाहिराती वगळतं, प्रक्षेपण पुन्हा सुरु करतं आणि तुमची आवड लक्षात ठेवतं 315 00:14:25,000 --> 00:14:26,789 तुम्हाला न विचारता." 316 00:14:28,175 --> 00:14:29,976 आणि बहुसंख्य लोक उपहासाने म्हणाले, 317 00:14:30,000 --> 00:14:31,976 "आमचा तुमच्यावर विश्वास नाही. 318 00:14:32,000 --> 00:14:34,548 आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला ते आवडलं नाही. 319 00:14:34,572 --> 00:14:35,635 तुम्ही घाबरवत आहात." 320 00:14:36,691 --> 00:14:37,976 ते जर असं म्हणाले असते, 321 00:14:38,000 --> 00:14:42,976 "जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जिला पूर्ण नियंत्रण आवडते 322 00:14:43,000 --> 00:14:45,976 आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर, 323 00:14:46,000 --> 00:14:48,976 तुमच्यासाठी आमच्याकडे एक उत्पादन आहे. 324 00:14:49,000 --> 00:14:50,978 ते प्रक्षेपण थांबवतं, जाहिराती वगळतं, 325 00:14:51,002 --> 00:14:53,162 तुमच्या आवडी लक्षात ठेवतं इत्यादी इत्यादी" 326 00:14:53,858 --> 00:14:56,372 लोक तुमच्या कृतीला मोल देत नाहीत;तिच्या हेतुला देतात. 327 00:14:56,396 --> 00:14:59,757 आणि तुम्ही काय करता हे तुमचा कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. 328 00:15:00,559 --> 00:15:04,603 आता नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे मी एक यशस्वी उदाहरण देतो. 329 00:15:06,000 --> 00:15:08,976 १९६३ च्या उन्हाळ्यात, 330 00:15:09,000 --> 00:15:12,976 वॊशिंग्टनच्या एका मोठ्या पटांगणात २,५०,००० लोक जमले होते 331 00:15:13,000 --> 00:15:14,652 डॉ. किंग यांचं भाषण ऐकण्यासाठी. 332 00:15:16,154 --> 00:15:18,976 त्यांनी कुठलंही निमंत्रण दिलं नव्हतं, 333 00:15:19,000 --> 00:15:21,976 आणि तारीख पडताळण्यासाठी कुठलं संकेतस्थळ नव्हतं. 334 00:15:22,000 --> 00:15:23,976 तुम्हाला हे कसं जमू शकतं? 335 00:15:24,000 --> 00:15:26,143 डॉ. किंग काही अमेरिकेतील एकमेव व्यक्ती नव्हती 336 00:15:26,167 --> 00:15:28,570 जी उत्तम वक्ता होती. 337 00:15:28,594 --> 00:15:30,760 अमेरिकेतील यातना भोगलेला एकमेव माणूस नव्हता 338 00:15:30,784 --> 00:15:32,562 नागरी कायद्याच्या आधीच्या अमेरिकेतील. 339 00:15:32,586 --> 00:15:34,976 खरंतर, त्यांच्या काही कल्पना चांगल्या नव्हत्या. 340 00:15:35,000 --> 00:15:36,023 पण एक देणगी होती. 341 00:15:36,960 --> 00:15:40,231 अमेरिकेत काय बदल होणं गरजेचं आहे हे ते सगळीकडे सांगत सुटले नाहीत. 342 00:15:40,255 --> 00:15:42,572 त्यांना काय वाटतं हे त्यांनी लोकांना सांगितलं. 343 00:15:42,596 --> 00:15:45,976 "मी मानतो, मी मानतो, मी मानतो" ते लोकांना म्हणाले. 344 00:15:46,000 --> 00:15:48,531 आणि ते जे मानतात ते मानणाऱ्या लोकांनी 345 00:15:48,555 --> 00:15:51,976 त्यांचं ध्येय घेतलं आणि ते आपलं मानलं आणि लोकांना सांगितलं. 346 00:15:52,000 --> 00:15:54,048 आणि त्यांपैकी काही लोकांनी रचना तयार केली 347 00:15:54,072 --> 00:15:56,567 अधिक लोकांपर्यंत तो शब्द पोहोचवण्यासाठी. 348 00:15:56,591 --> 00:15:59,976 आणि बघा, २,५०,००० लोक जमले 349 00:16:00,000 --> 00:16:04,246 ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. 350 00:16:05,000 --> 00:16:07,502 त्यांच्यासाठी म्हणून किती जण आले होते? 351 00:16:09,319 --> 00:16:10,351 शून्य. 352 00:16:11,000 --> 00:16:12,976 ते स्वतःसाठी आले होते. 353 00:16:13,000 --> 00:16:15,702 अमेरिकेबद्दल त्यांना जे वाटत होतं 354 00:16:15,726 --> 00:16:17,976 त्याने त्यांना बसचा प्रवास करवून खेचून आणलं 355 00:16:18,000 --> 00:16:20,976 ऑगस्ट महिन्याच्या ऐन मध्यात वॊशिंग्टनमध्ये भर उन्हात उभं केलं. 356 00:16:21,000 --> 00:16:24,048 ते जे मानत होते ते हे होतं व काळे विरुद्ध गोरे नव्हतं: 357 00:16:24,072 --> 00:16:26,385 २५% श्रोते श्वेतवर्णीय होते. 358 00:16:27,397 --> 00:16:31,000 डॉ. किंग यांचा असा विश्वास होता कि या जगात दोन प्रकारचे कायदे आहेत: 359 00:16:31,024 --> 00:16:34,976 एक जे विधात्याने बनवलेले आहेत आणि दुसरे जे माणसांनी बनवलेले आहेत. 360 00:16:35,000 --> 00:16:37,976 आणि जोपर्यंत माणसांनी बनवलेले कायदे 361 00:16:38,000 --> 00:16:40,793 विधात्याने बनवलेल्या कायद्यांशी सुसंगत होत नाहीत तोपर्यंत 362 00:16:40,817 --> 00:16:42,753 आपण न्याय्य जगात राहत नसतो. 363 00:16:42,777 --> 00:16:45,192 नागरी हक्काची चळवळ हे एक केवळ निमित्त 364 00:16:45,216 --> 00:16:48,976 झालं त्यांचं ध्येय जीवित करण्यासाठी. 365 00:16:49,000 --> 00:16:51,976 आपण अनुसरण केलं, त्यांच्यासाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी. 366 00:16:52,000 --> 00:16:54,301 बरं त्यांनी "माझं एक स्वप्न आहे" हे भाषण दिलं, 367 00:16:54,325 --> 00:16:56,310 "माझी एक योजना आहे" असं नाही. 368 00:16:56,334 --> 00:16:59,976 (हशा) 369 00:17:00,000 --> 00:17:03,191 आता राजकारण्यांची १२ मुद्द्यांची सर्वसमावेशक योजना ऐका. 370 00:17:03,215 --> 00:17:04,976 ते कोणालाही प्रेरीत करत नाहीत. 371 00:17:05,000 --> 00:17:07,976 कारण काही नेते असतात आणि काही जे नेतृत्व करतात. 372 00:17:08,000 --> 00:17:11,976 नेते सामर्थ्य आणि अधिकाराचा वापर करतात, 373 00:17:12,000 --> 00:17:15,000 पण जे नेतृत्व करतात ते प्रेरणा देतात. 374 00:17:16,533 --> 00:17:18,884 त्या व्यक्ती असतील किंवा संघटना असतील, 375 00:17:18,908 --> 00:17:21,976 नेतृत्व करणाऱ्यांच्या मागे आपण जातो, ते जावं लागतं म्हणून नव्हे, 376 00:17:22,000 --> 00:17:23,837 तर आपल्याला जावंसं वाटतं म्हणून. 377 00:17:24,785 --> 00:17:29,223 जे नेतृत्व करतात त्यांचं अनुसरण आपण करतो, त्यांच्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी. 378 00:17:30,484 --> 00:17:32,976 आणि जे "का" ने सुरुवात करतात, 379 00:17:33,000 --> 00:17:37,740 त्यांच्यातच सभोवतालच्या लोकांना प्रेरीत करण्याची क्षमता असते 380 00:17:37,764 --> 00:17:40,105 किंवा ते त्यांना प्रेरीत करू शकणाऱ्यांना शोधतात. 381 00:17:40,976 --> 00:17:42,380 आपला खूप आभारी आहे. 382 00:17:42,404 --> 00:17:44,000 (टाळ्या)