संगणक शास्त्रात तज्ज्ञ असलेले लोक नसतील तर तुम्ही रेससाठी पात्रसुद्धा ठरू शकणार नाही कारण कार्स खूप डेटा गोळा करतात आणि तुम्ही काय केले पाहिजे, कामगिरी कशी सुधारली पाहिजे हे ठरवण्यासाठी प्रोग्रॅम लिहू शकणारे लोक असणे आवश्यक असते. या कोड्यांमध्ये, तुम्ही एक कलाकार असाल जो वेगवेगळे आकार काढण्यासाठी एक पेन्सिल वापरेल. तुमचा कलाकार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे तो तुमच्या मागे एक रेष काढेल. तुमच्या कॅनव्हासवर फिरण्यासाठी तुम्ही move forward ब्लॉक्स वापराल. इथे move forward ब्लॉक म्हणतो 100 पिक्सेल्सने पुढे जा. जेव्हा आपण रन बटण दाबतो, तेव्हा काय होतं? कलाकार थोडासा पुढे जातो आणि हे अंतर 100 पिक्सेल्स असते. पिक्सेल्स म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरचे अतिशय लहान चौरस. या कोड्यात आपल्याकडे असलेला दुसरा ब्लॉक म्हणतो turn right by 90 degrees आणि जेव्हा आपण तो बाहेर ड्रॅग करतो तेव्हा आपला काळकर थोडासा वळतो. त्यामुळे तुमच्या कलाकारणे किती वळले पाहिजे हे तुम्ही खेळून पाहू शकता. हे 90 अंशांचे वळण आहे आणि हे 120 अंशांचे वळण आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही पिक्सेल्स आणि अंशाच्या समोरचे बाण क्लिक करून तुम्ही ही मूल्ये बदलू शकता. तुमच्या कलाकाराबरोबर चित्रे काढण्याचा आनंद घ्या!